uk
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
जगाला पहिल्यांदा शून्याची ओळख देणारे 'आर्यभट्ट' LetsUpp | Special ● जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे भारतीय, तसेच ग्रह नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इसवी सन १५०० च्या पूर्वीचे महान व्यक्तिमत्व, आपण सर्व या महान व्यक्तिमत्वाला ओळखत असणारच ते आहेत महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ आर्यभट्ट आज त्यांच्या स्मृतिदिन जाणूनन घेऊया त्यांच्या विषयी ज्यांनी जगाला सर्वात आधी बऱ्याच गोष्टींचे ज्ञान दिले. आर्यभट्ट यांचे सुरुवातीचे जीवन ● आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याविषयी कुठेही असा ठोस पुरावा नाही परंतु आर्यभट्ट यांनी त्यांच्या “आर्यभटिया” या ग्रंथात असा उल्लेख केला आहे कि जेव्हा कलियुगाचे ३६०० वर्ष संपले होते तेव्हा त्यांचे वय २३ वर्ष होते, तर यावरून त्यांचा जन्म इसवी सन ४७६ ला झाला असेल असे इतिहासकार मानतात.आर्यभट्ट यांचे निधन इसवी सन ५५० च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते. आर्यभट्ट यांचे कार्य ● आपण आज सहज समजतो आणि मानतो सुद्धा कि पृथ्वी अंडाकृती आहे आणि तिच्या स्वतःच्या ध्रुवावर फिरते. तेच नाही तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होतात, हे सुद्धा आपण आता मानतो. ● आपण समजतो कि हि गोष्ट सर्वात आधी जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकस नी सांगितली पण निकोलस कॉपरनिकस यांच्या १ हजार वर्ष अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात फक्त हेच नव्हते सांगितले कि पृथ्वी गोल आहे, तर तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते तर आपण विचार करू शकता कि आर्यभट्ट यांनी त्या काळात कसे या गोष्टीचे संशोधन केले होते. ● आर्यभट्ट यांनी आर्किमिडीज़ पेक्षाही अचूक अशी “पाय” ची किमंत सांगितली होती, ती अशी होती ३.१४१६. परंतु नालंदा विश्वविद्यालयाला जाळण्यात आले होते तेव्हा तेथील काही महत्वाची ग्रंथे जाळल्या गेली होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील बरेचश्या गोष्टी आज नष्ट झालेल्या आहेत, आणि त्यामुळे त्यांनी केलेले काही नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहचले नाहीत. ● १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. ● भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने २००९ मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये शोधलेल्या तीन जिवाणूंपैकी एका जीवाणुला “बॅसिलस आर्यभट’ असे नाव दिले. ● आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला ‘आर्यभट्ट’ असे नाव दिले आहे. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/nwB0GBmv1gb

विद्यापीठात फिरण्यासाठी आता लागणार १ हजार रुपये LetsUpp l Trending ● पुणे विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एसपीपीयू ऑक्सि पार्क योजना आणली होती. ज्यामध्ये नागरिकांना महिन्याला 1 हजार रुपये आकारावे लागणार असल्याचे परिपत्रक काढले होते. ● मात्र अनेक पुणेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून या परिपत्रकाला विरोध केला. त्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाकडून एक हजार रुपयांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. ● सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे सरकारी ठिकाण असताना कुलगुरूंनी आणि विद्यापीठ रजिस्टर यांनी पुणेकरांना लुटण्याचा नवीन फंडा काढला असल्याच्या भावना पुणेकरांनी व्यक्त केल्या होत्या. ● त्या नंतर ही गोष्ट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पर्यंत ही गोष्ट पोहचल्यानंतर त्यांनी ● निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत असं मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ● सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्थगितीचं परिपत्रक लवकरच विद्यापीठ प्रशासनाकडून जारी करण्यात येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. To know more click here https://letsup.app.link/2cgZasvI1gb

दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव! 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी LetsUpp l Trending ● राजधानी दिल्लीमध्ये भीषण अग्नी तांडव पहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. ● अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही दिल्लीमधील सर्वात मोठी आग आहे. ● सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप घेतले आहे. ● अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळात आहे. ● अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाच मोठ्या कपड्यांची दुकाने आगीच्या विळख्यात आली असून यामध्ये बाटला हँडलूम, संगम साडी आणि रेमंड अशी तीन आणखी दोन मोठ्या दुकानांचा यामध्ये समावेश आहे. ● दिल्लीत वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने विझवलेली आग पुन्हा पेटली आहेत. To know more click here https://letsup.app.link/7uJ8a8kx1gb

पाच वर्ष सत्तेत असतानाही गुलामासारखी वागणूक मिळाली - संजय राऊत यांचे खळबळजनक विधान LetsUpp | Trending ● शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी फडणवीस सरकार विरुद्ध निशाणा साधत खळबळजनक विधान केले. ● "पाच वर्ष राज्यात सत्तेत असतानाही गुलामासारखी वागणूक मिळाली" असे खळबळजनक विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. ● सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे To know more click here https://letsup.app.link/4HNKwhLF1gb

photo content

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या या भेटीत नेमकी चर्चा काय झाली? LetsUpp l Special प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेली बैठक राजकीय वर्तृळातील अनेकांच्या भूवय्या उंचावणारी होती. या बैठकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीत नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद पहायला मिळणार का? हि भेट देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणीसाठी होती का? अशाच काही शक्यतांबद्दल जाणून घेऊयात... २०१४ मधील मोदींचा विजय असो किंवा नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल, तमिळनाडूतील निवडणूक असो प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने याची दाखल राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. 1. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याने आगामी राजकीय डावपेचांची पवारांनी चाचपणी केल्याचे मानले जाते आहे. 2. महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवायचे, त्याच वेळी देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय कसा द्यायचा? यावरही बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. 3. बिगर भाजप आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा राजधानीत सूर आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी केलेली चर्चा महत्त्वाची मानले जाते आहे. 4. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने यात सहभागी होण्याचे टाळल्यास बिगर भाजप व बिगर काँग्रेसची तिसऱ्या आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, देवेगौडा, अकाली दल अशा विविध पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 5. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचं कळतं. यामुळे विरोधक पवारांना गळ घालणार आहे का? हा हि एक महत्वाचा मुद्दा यानिमित्ताने समोर येत आहे. महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवणे शक्य होईल का? शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुक लढतील का? हे येणारी वेळच सांगेल. मात्र या बैठकीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले एवढं नक्की! To know more click here https://letsup.app.link/leRn6eGx1gb

photo content

राज्यभरामध्ये चार दिवस अतिवृष्टीचा इशारा LetsUpp l Trending ● मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबापुरीला दिलेला तडाखा अजूनही कायम आहे. ● मुंबईला मान्सूनच्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापले आहे. ● नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाने वेग धरला आहे. मुंबईत सलग पाऊस पडत आहे. तर राज्यातील काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. ● मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. ● या पाच दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अति तिव्र मुसळधार पावसाची शक्यता : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व त्याची तीव्रता वाढण्याचे पुर्वानुमान आणि त्याबरोबरच त्याचा पश्चिमेकडचा प्रवास हे गृहित धरुन पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकणाकडे पुढील ४ ते ५ दिवस अती तिव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ● पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. To know more click here https://letsup.app.link/OL3IthOr1gb

पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...! (स्त्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)
पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...! (स्त्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)

photo content

कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नये; तज्ज्ञांचा दावा! LetsUpp l Covid HelpLine ● सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना एक अहवाल दिला आहे. यामध्ये अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला असून कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही असे देखील सांगण्यात आले आहे. ● या टास्क फोर्समध्ये एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनविला आहे. ● लसींचा तुटवडा असल्याने वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ● डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या २ डोसचे १२ आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा. त्याचबरोबर पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यासाठी वापरावा असे देखील डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या या अहवालात म्हटले आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/I4YbPFbm1gb

....चहाच्या घोटाने वाचविला 'त्या' दोघांचा जीव LetsUpp | Pune ● कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या व न
....चहाच्या घोटाने वाचविला 'त्या' दोघांचा जीव LetsUpp | Pune ● कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या व नगरकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या एका कारवार माळशेज घाटात दरड कोसळली आहे. यात कारचे नुकसान झाले तर दोघेजण बचावले आहेत. ● सविस्तर घटना अशी की, माळशेज घाटात सध्या पाऊस तसेच दाट धुके आहे. या घाटातून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते. ● चहा पिण्यासाठी ते माळशेज घाटात कार बाजुला लावून खाली उतरले. हॉटेलमध्ये पोहचताच याच वेळी कारवर मोठी दरड कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला. गाडीत कुणी नसल्याने दुर्घटना टळली. ● घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. To know more click here https://letsup.app.link/iD6cLzYh1gb

ऑनलाईन उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 1200 रुपये भत्ता : 'या' महापालिकेचा निर्णय LetsUpp | Trending ● महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यांसाठी 1200 रुपये प्रोत्सानपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. ● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर शाळा संपूर्णपणे बंद आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते शिक्षणापासून दूर जावू नयेत. यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. ● ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे व अस्लम कुंगले आदी उपस्थित होते. To know more click here https://letsup.app.link/be11uraf0gb

मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयातील लसींचे दर जाहीर LetsUp | Trending ● मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक जाहीर केलं आहे. ● त्यानुसार खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, आणि स्पुतनिक व्हीसाठी 1 हजार 145 रुपये दर ठरवण्यात आले आहेत. ● त्यात 5 टक्के जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तक्रार कुठे करता येणार? ● कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. ● त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत. ● या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी अधिक रक्कम मागितल्यास complaint.epimumbai@gmail.com या मेलवर तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे. To know more click here https://letsup.app.link/5ks9426c0gb

आता एटीएममधून पैसे काढणे महागणार LetsUpp | Trending ● एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. ● आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. ● यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. ● तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल. ● वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. आर्थिक गैरआर्थिक व्यवहार ● गैर आर्थिक ट्रांझॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे. ● आर्थिक ट्रांझॅक्शन: पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे. ● गैर आर्थिक ट्रांझॅक्शन: खात्यावरील बॅलेन्स चेक करणे. दरम्यान आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. *चेक बुकसाठी शुल्क :* एका आर्थिक वर्षात खातेधारकास बॅंक 10 पानी चेकबुक देईल. त्यानंतर चेकबुक करता एसबीआय शुल्क आकारणार आहे. ● 10 पानी चेकबुक : 40 रुपये आणि जीएसटी शुल्क ● 25 पानी चेकबुक : 75 रुपये आणि जीएसटी शुल्क ● 10 पानी आपत्कालीन चेकबुक : 50 रुपये आणि जीएसटी शुल्क To know more click here https://letsup.app.link/vlpEhl1PZgb

संख्याशास्त्राच्या स्पर्धेत सोलापूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा LetsUp | Trending ● भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे. ● प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे.ह्या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. ● फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे. ● ह्या स्पर्धेसाठी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डाॕ.आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ● अत्यंत गारीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव ,नवोद्यय विद्यालय पोखरापूर , फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापिठ येथे झाले आहे. To know more click here https://letsup.app.link/HiQ7mYo4Zgb

पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती ; भारतीय वैज्ञानिकानं लावला शोध LetsUpp l Positive News ● कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता देशात जाणवली होती. परंतु यावर कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. ● डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयार केला आहे. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक ठरू शकतो. कार्य कसं करतो ? यामध्ये डिव्हाईसमध्ये दोन युनिट आहेत. पॉवर आणि व्हेंटिलेटर हे मास्कशी जोडलेले आहेत. एक बटन दाबल्यानंतर व्हेंटिलेटर काम करण्यास सुरूवात करतो. तसंच याद्वारे शुद्ध ऑक्सिजन रुग्णापर्यंत पोहोचवला जातो. जर कोणत्याही रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल तर युव्ही फिल्टर विषाणूचा खात्मा करण्यास मदत करतो आणि शुद्ध हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो, असं मुखर्जी म्हणाले. काय आहे विशेष? या व्हेंटिलेटरची एक महत्त्वाची बाब म्हणजे यात एक कंट्रोल नॉब आहे जो हवेचा फ्लो कंट्रोल करतो. याचं वजन केवळ २५० ग्राम आहे. हा व्हेंटिलेटर ब‌ॅटरीच्या मदतीने चालतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा व्हेंटिलेटर ८ तास काम करतो. तसंच अँड्रॉईड फोनच्या चार्जरनंही हा व्हेंटिलेटर चार्ज करता येऊ शकतो. आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/OWAwc5t2Zgb

कोरोना लसीकरणासाठी जिओचा पुढाकार : WhatsApp वर मिळणार 'ही' माहिती LetsUpp | Trending ● भारताने लसीकरण मोहिमेला जोरदार सुरवात केली आहे. लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर केंद्र आणि राज्य सरकारने भर दिला. आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करून सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केली आहे. ● रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना कोरोना लसीच्या उपलब्धते विषयी जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिओने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवरुन आपल्या ग्राहकांना कोव्हिड -19 लस आणि इतर ग्राहक सेवा देण्यास सुरवात केली आहे. या सुविधा मिळतील ● जीओने सुरु केलेल्या या नवीन सेवेद्वारे, सेशन रीफ्रेश करण्यासाठी Jio युजर्स वन-टाइम पासवर्डच्या त्रासातून वाचतील. ही सेवा त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कोरोना लसीच्या उपलब्धते बद्दल माहिती मिळवण्यात मदत करेल. ● 'जिओ यूजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर जियो चॅटबॉटवर रिचार्ज करू शकतात, पेमेंट करू शकतात, प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. याशिवाय तक्रार देखील दाखल करु शकतात. ही सेवा कोव्हिड -19 या लसीच्या उपलब्धते विषयी ही माहिती देते. ● तुम्हाला 7000770007 या क्रमांकावर फक्त 'Hi'टाइप करावे लागेल. यानंतर कंपनी तुमचा या सेवेमध्ये समावेश करुन घेईल आणि तुम्हाला वेळोवेळी नोटीफिकेशन मिळेल. To know more click here https://letsup.app.link/sdvf277MYgb

VIDEO! मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी LetsUpp | Trending ● मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ● कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली. कोल्हापुरातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. 16 जूनला मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येणार आहे त्यावर चर्चा करण्यात आली. व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/yhavSklp6LQ ● येत्या 16 जून रोजी कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड याठिकाणी सुरुवातीला आंदोलन होईल.36 जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल आणि मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच जोर लावाण्यात येईल. त्यात पुण्यापासून मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. या मोर्चासाठी सर्व आमदार, खासदार यांचा सन्मान ठेऊन बोलवू. ● संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "येत्या 12 तारखेला कोपर्डीला जाणार काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले जाणार. जे आमदार खासदर येणार नाही त्यांची रिकामी पाटी लावली जाणार. 16 तारखेला आता मूक आंदोलन करण्यात येईल.आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीनी बोलायला हवं. आपली व्हॉट बँक बाजूला जाईल म्हणून कुणी बोलत नाही." ● माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांशी संबध चांगले असल्याचं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "माझ्या मराठा समाजासाठी काय करता ते सांगा. मी समाजाची दिशाभूल करणारा नाही, दिशा देणारा आहे. शाहू महाराजांच्या भूमीतून आंदोलन व्हावं अशी भूमिका सर्व समन्वयक यांनी घेतली." To know more click here https://letsup.app.link/ujCj3NJJYgb

राज्यात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज : 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा LetsUpp | Trending ● महाराष्ट्रात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रतील कोकण किनारपट्टीवर अत्यंत मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर दिली आहे. ● नागरिकांनी झाडाखाली थांबू नये. जलसाठा जवळ, नदी जवळ जाऊ नये. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पुल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. ● पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, शेतकऱ्यांनी 17 जूनपर्यंत पेरण्या टाळाव्यात, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. To know more click here https://letsup.app.link/QZj25cZEYgb