LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
6 624
जळगावच्या केळी दुबईत
LetsUpp I Positive News
● जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी येथून 20 मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला. यानिमित्ताने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावले टाकली आहेत.
● रावेर तालुक्यातील तांदलवाडी सुमारे 5 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील बहुसंख्य शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. येथील केळी उत्पादक शेतकरी वर्षाकाठी 350 कंटेनर म्हणजेच सुमारे 7 ते साडेसात हजार मेट्रिक टन निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतात.
● उत्पादित होणाऱ्या केळीपैकी काही माल हा देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत तर काही माल हा परदेशात निर्यात होत असतो. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
● याच गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जी आय मानांकित केळीची दुबईला निर्यात केली आहे. आतापर्यंत या गावातील केळीची परदेशात निर्यात होत होती. मात्र, जीआय मानांकन या टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात दुबईला झाली असून, शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.
जीआय टॅग म्हणजे काय ?
● एखाद्या प्रदेशात एखादे उत्पादन जर मोठ्या प्रमाणात होत असेल
● तेथील भौगोलिक परिस्थिती त्या उत्पदनासाठी अनुकूल असते
● या भौगोलिक परिस्थितीला अनुसरूनच संबंधित उत्पादनाला विशेष ओळख दिली जाते
● या विशेष ओळखीलाच जीआय टॅग म्हणतात
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/hsiyNLU8chb
6 624
अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगावात सुरु झाली विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा
LetsUpp | Ahmednagar
राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरेबाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु करण्यात आली आहे.
हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. पहिलीचे वर्गही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती. मात्र, शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही.
पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतली जातेय काळजी...
● विद्यार्थ्यांची शाळेत नियमित आरोग्य तपासणी होते.
● सुरक्षित अंतर ठेवून बसविले जाते
● सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात
● मुले एकत्र येऊ नये म्हणून मुलांना जेवणाचे डब्बे घेऊन येण्यास परवनगी नाही
● मैदानावर खेळण्यास परवानगी नाही
● विद्यार्थ्यानी शाळा सुटली की घरी जायचे
● घरात कोणी आजारी असेल तर मुलांना शाळेत पाठवू नये
● विद्यार्थी उपस्थिती : शाळेत पाचवी ते दहावीचे मिळून एकूण २९४ विद्यार्थी उपस्थितीत असतात.
● विद्यार्थी आजारी पडला तर गाव खर्च उचलणार :
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येते. शासनाने परवानगी दिली नसली तर कोणत्याही विद्यार्थ्यास त्रास जाणवल्यास त्याचा आजारपणाचा खर्च गाव करणार आहे. अशी माहिती उपसरपंच पोपटराव पवार यांनी दिली आहे., कार्याध्यक्ष, राज्य आदर्श गाव समिती.
● दहावीची परीक्षा घेणार :
दहावीच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. मात्र हिवरेबाजारचे माध्यमिक विद्यालय १० वी च्या विद्यार्थ्यांची ४० गुणांची परीक्षा घेणार आहे. ही परीक्षा २५ जूनला होणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/gmqlFZN3chb
6 624
अबब! तुम्ही कधी पहिला का तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा आंबा?
Letsupp | Trending
● आंबा म्हणजे फळांचा राजा आणि आंबा आवडत नाही असे लोक अगदी तुरळक आढळतात. भारतातील आंब्यांना परदेशात देखील मोठी मागणी असते. आंब्याचं नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग खिसा थोडा रिकामा करून आंब्याची खरेदी होते. मात्र जबलपूरमध्ये पिकणारा आंबा खिसा नव्हे, तर संपूर्ण बँक खातं रिकामं करू शकतो.
● मध्यप्रदेशातील जबलपूर येथे जपानी आंबा 'टायगो नो टमेंगौश' या आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच त्याला मिळणारा दरदेखील जास्त आहे. तर या आंब्याला आंबा मालकाने चक्क कडक सुरक्षा तैनात केली आहे.
● मध्यप्रदेशातील जबलपूर येथील 'संकल्पसिंह पीहार' यांच्या शेतात असलेल्या या सात आंब्यांना त्यांनी ४ रक्षक आणि ६ कुत्री अशी सुरक्षा तैनात केली आहे. त्यांच्या या झाडाला केवळ सातच फळे असून एका आंब्याचे वजन ९०० ग्रॅम आहे. हा आंबा पिकल्यावर लाल व पिवळ्या रंगाचा दिसत असून तो चवीला अतिशय गोड आहे. तर या एका आंब्याची किंमत तब्बल २ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.
● आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याला प्रचंड मागणी आणि त्याची लाखोंची किंमत याची माहिती सर्वत्र पसरल्यावर आंबा मालकाला याचा फाटक यादेखील बसला आहे. त्यांच्या शेतातून काही गोष्टी चोरीला गेल्या असून त्यामुळे त्यांनी हि कडक सुरक्षा तैनात केली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/NoP4lx50chb
6 624
*...अन्यथा मी डाकू झालो असतो : मिल्खा सिंग*
*LetsUp l Special*
भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा जन्मतारखेविषयी नेहमी गोंधळ पाहायला मिळतो. मात्र 8 ऑक्टोबर 1929 हि त्यांची मूळ जन्मतारीख नाही. लेट्सअप बरोबर बोलताना 'द फ्लाइंग शीख' ने त्यांच्या जीवनाबद्दल असणारे अनेक गैरसमज दूर केले आहेत. त्यांच्या या जुन्या मुलाखतीचा अंश खास तुमच्यासाठी...
● *प्रश्न* : तुमची जन्मतारीख 20 नोव्हेंबर 1929 रोजी असल्याचे कळाले आहे?
➡️ *मिल्खा* : होय. मलाही या तारखेबद्दल पंधरा वर्षांपूर्वी माहिती मिळाली. मी पाकिस्तानमध्ये गोल्फ स्पर्धेसाठी गेलो होतो. तिथे माझ्या जन्मतारखेच्या शोधात मी चौथीच्या वर्गापर्यंत शिकलेल्या मदरशाला गेलो होतो. त्यानंतर हा खुलासा झाला. यापूर्वी मला 20 नोव्हेंबर 1935 ची जन्मतारीख माहित होती. सैन्यातही हीच तारीख आहे.
● *प्रश्न* : जर तुम्हाला टाईम मशीनद्वारे परत जाण्याची संधी मिळाली तर तुम्हाला जीवनातून कोणत्या गोष्टी बदलायच्या असतील?
➡️ *मिल्खा* : द मोमेंट ऑफ रोम ऑलिम्पिक अॅण्ड पार्टिशन.
● प्रश्न : तुमच्यानंतर दुसरा मिल्खा सिंग का नाही?
➡️ मिल्खा : जर प्रत्येकजण नोकरीनंतर धावपळ करत राहिला तर पदके कशी जिंकली जातील? अॅथलिट्सनी त्यांची विचार करण्याची पद्धत बदलणे आवश्यक आहे. अन्यथा ऑलिम्पिकमध्ये भारत कधीही या पराक्रमाला स्पर्श करणार नाही.
● प्रश्न : जर तुम्ही अॅथलिट नसता तर काय असता?
➡️ मिल्खा : याचे उत्तर डाकू असे आहे. कारण फाळणीमुळे माझे वडील, आई, भाऊ व बहिणी मारल्या गेल्या. त्या वेळी मला सैन्यात नोकरी मिळाली नसती तर मी नक्कीच डाकू बनलो असतो. तिहार तुरुंगात डाकूंच्या एका गटाने मला त्यांच्या गटात सामील होण्याची ऑफर दिली होती.
● प्रश्न : तुम्हाला जामीन मिळावा म्हणून तुमच्या बहिणीने तिचे दागिने विकले होते?
➡️ मिल्खा : त्यावेळी तिकीटाची किंमत बहुधा अडीच रुपये होती. मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीने दागिने विकले होते.
● प्रश्न : तुमचा सुपरहीरो कोण आहे?
➡️ मिल्खा : ओटिस डेव्हिस. (रोम ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकणारा.)
● प्रश्न : तुमची मोठी मुलगी न्यूयॉर्कमधील कोविड योद्धा आहे?
➡️ मिल्खा : हो, मला अभिमान आहे तिचा वडील असल्याचा. या कठीण काळात ती रात्रंदिवस काम करत आहे. विशेष म्हणजे ती तिथून नेहमी आम्हाला सतर्क करत राहते.
● प्रश्न : या परिस्थितीत आपण काय खबरदारी घेत आहेत?
➡️ मिल्खा : योग्य स्वास्थ्य आणि पौष्टिक अन्न या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या आपल्याला कोविडपासून दूर ठेवतात. आपण भुकेच्या एक त्रितीअंश खाल्ले पाहिजे. 2 तास चालणे आणि नियमित व्यायाम करणे.
● प्रश्न : कारगिल युद्धाततील शहीद बिक्रम सिंगचा 7 वर्षाचा मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता? तो आता काय करत आहे?
➡️ मिल्खा : बिक्रम सिंग नाही. हवालदार मिलकाईत सिंह असे त्याचे नाव आहे. तो आता इंजिनियर असून कॅनडामध्ये राहतो आहे.
● प्रश्न : वयाच्या 92 व्या वर्षी तुमची कोणती अपूर्ण इच्छा तुम्हाला पूर्ण होताना पाहायचे आहे?
➡️ मिल्खा : मला अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा अॅथलीट (ट्रॅक आणि फील्ड) पहायचा आहे.
To know more click here
https://letsup.app.link/zq3ceRaVchb
6 624
😍 *RUMMY खेळत रहा आणि जिंकत रहा!*
💰 आता Rummy Circle अॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका मोठी रक्कम!
💷 *डाउनलोड करा Rummy Circle App अॅप आणि जिंका 2,000 ₹ बोनस*
🤪 जेवढे जास्त खेळाल तेवढे जास्त कमवाल...
💯 *100% कायदेशीर* : Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे
🤩 *अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : https://cost.affcost.com/click?campaign_id=88&pub_id=659&p1=%7Byour-transaction-id%7D&source=%7Byour-sub-aff-id%7D
(ADVT)
6 624
महिनाभर कोरोना संकटाशी झुंजल्यानंतर मिल्खा सिंह यांचे ९१व्या वर्षी निधन झाले.
फ्लाइंग शीख मिल्खा सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
6 624
ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन
LetsUpp | Trending
● ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे.
● त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.
● विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली.
● त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे.
● राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
To know more click here
https://letsup.app.link/tJ1KUYnEbhb
6 624
राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत
LetsUpp | Trending
▪️ राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
▪️ मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत.
▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
▪️ विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका का घेण्यात येत नाही? असा सवाल या याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
▪️ दरम्यान, आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती बघून ऑक्टोबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/sa0TQFrmbhb
6 624
🎯 *आयसीआयसीआय घेऊन आलेय तुमच्या जीवनशैलीला पूरक क्रेडिट कार्ड*
💳 'आयसीआयसीआय बँक प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड'
✔️ *'या' कार्डचे फायदे एकदा वाचाच!* :
● कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानासह मॅग्निफिसिएंट कार्ड
● रीडीमेबल पेबॅक पॉईंट्स, आकर्षक भेटवस्तू आणि व्हाउचर
● आजीवन मोफत प्लॅटिनम चिप ग्रेट कार्ड
● विशेष ऑनलाईन ऑफर
चिप कार्डच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि तुमचे अर्थ विश्व सुरक्षित करा!
👍 *अधिक माहितीसाठी क्लिक करा* https://offer.trackrpm.com/click?campaign_id=218&pub_id=264&p1=%7Bclick_id%7D
(ADVT)
6 624
PUBG बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया गेम आजपासून उपलब्ध...
LetsUpp | Tech
▪️ अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया आता भारतात डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होत आहे.
▪️ PUBG Mobile वर चीनसोबत झालेल्या वादानंतर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून या गेमचे चाहते या गेमची वाट पाहत होते.
▪️ ज्यांनी Pre-Register केलं होतं, त्यांच्यापैकी काही जणांना हा गेम आता प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
▪️ आताही ही गेम Early Access मध्येच आहे. प्रि रजिस्टर सुरू केल्यावर २ आठवड्यातच तब्बल २ कोटी युजर्सनी नोंदणी केली होती.
▪️ PUBG Mobile चा आधीचा गेम डेटा या नव्या गेममध्ये Migrate करण्याची सोय देण्यात आली आहे.
▪️ त्यामुळे तुमच्याकडे आधी असलेल्या Skins इथेही उपलब्ध होतील. त्यासाठी Krafton ने Proxima Beta Pte. Limited मार्फत पर्याय दिला आहे.
▪️ दरम्यान, तुम्ही गेम इंस्टॉल करून सुरू केली की तसा पॉपअप आलेला दिसणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/Xrb6FDmQ9gb
6 624
हॉलमार्क नसलेल्या तुमच्याकडील दागिन्यांचं काय होणार?
LetsUpp l Trending
● सोन्याच्या दागिन्यांवर १६ जूनपासून हॉलमार्क बंधनकारक केला असला तरी नागरिकांना त्यांच्याकडील जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकता येणार आहेत.
● व्यावहारिक असल्यास ज्वेलर्स जुने दागिने वितळवून हॉलमार्कसह नवे दागिने तयार करू शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
● १६ जूनपासून २५६ जिल्ह्यांमध्ये हाॅलमार्क बंधनकारक करण्याची योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून ऑगस्ट २०२१ पर्यंत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नसल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ज्वेलर्स आणि उद्योजकांशी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
● या २५६ जिल्ह्यांमध्ये सोनारांना फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकता येतील. २०, २३ आणि २४ कॅरेटचे दागिनेही बनवता येणार आहेत.
● दरम्यान घड्याळे, फाऊंटेन पेन तसेच कुंदन, पोल्की, जडाऊ आदी आभूषणांमध्ये वापरलेल्या सोन्यावर हॉलमार्कमधून सूट दिल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
● सरकारने २०१९ मध्ये सोन्याचे दागिने व आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर याला आणखी चार महिने मुदत वाढवून दिली होती.
● कोरोनामुळे ज्वेलर्स व उद्योजकांनी विनंती केल्याने ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवली होती.
To know more click here
https://letsup.app.link/9VL8ASGM9gb
6 624
सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षाचा फॉर्म्यूला ठरला
LetsUpp | Trending
● बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
● सीबीएसईच्या 12 वीच्या निकाल प्रकरणी नियुक्त केलेली 13 सदस्यीय समितीनं सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे.
असा असणार फॉर्म्युला
● सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
● त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
निकाल कधी जाहीर होणार? : सीबीएसईने 31जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अंतिम निकाल असा बनवला जाणार
● दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अशाचप्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल.
● तसंच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.
To know more click here
https://letsup.app.link/rsyc3r6K9gb
6 624
केंद्र सरकारने ट्विटरचे कायदेशीर संरक्षण काढून घेतले
LetsUpp | Trending
माहिती तंत्रज्ञान नियमांचे व नवीन आदेशांचे पालन केले नाही म्हणून केंद्र सरकारने ट्विटरचे कायदेशीर संरक्षण काढून घेतले आहे.
ही कारवाई फक्त ट्विटरवर करण्यात आली आहे. गुगल, फेसबूक, युट्यूब, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम इत्यादींचा दर्जा कायम आहे.
● कायदेशीर संरक्षण हटवणे म्हणजे काय?
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत थर्ड पार्टी मजकुराबाबत सोशल मीडिया कंपन्यांना संरक्षण मिळत होते. याचा अर्थ, एखाद्याने काही आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जायचं.
पण, ट्विटरकडून नव्या आयटी नियमांचे पालन झाले नसल्याने यापुढे ट्विटरवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी कंपनीलाही जबाबदार धरलं जाणार आहे.
● *नियमांची पायमल्ली*
केंद्र सरकारने सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमांबाबत 25 मे पर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र विहित वेळेत ट्विटरने भारतीय तक्रारनिवारण अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
● ट्विटरला धोका !
वादग्रस्त आणि बेकायदेशीर मजकूर ट्विटरवर प्रसारित झाल्यास टिवटरच्या उच्चाधिकार्यांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागेल.
● ट्विटरचा खुलासा
ट्विटरने मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती आम्ही केली आहे अशी माहिती दिली आहे. तसंच केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला याबाबत आम्ही कळवलं असल्याचंही ट्विटरने म्हटलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/6JqPpHjG9gb
6 624
दूध दरासाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात; शेतकरी रस्त्यावर
LetsUpp l Trending
● दूध दरवाढीच्या मागणीवरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी किसान सभेच्यावतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
● अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात केली आहे.
● आज किसान सभा आणि संघर्ष समितीतर्फे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरूवात केली आहे.
● किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील अंबड येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरूवात केली आहे.
● लॉकडाऊनपूर्वी दूधाला ३५ रूपये दर मिळत होता तो आता २० रूपये केली आहे. तो पुन्हा ३५ रूपये करण्याची मागणी संघटनेनं केली आहे.
नेमक्या मागण्या काय?
- लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले, याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा.
- आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही, यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.
- साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.
- अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा.
- दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.
To know more click here
https://letsup.app.link/DvmkOSpF9gb
