uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 764 підписників, посідаючи 5 596 місце в категорії Освіта та 11 963 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 764 підписників.

За останніми даними від 12 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -48, а за останні 24 години на 21, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 11.43%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.47% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 856 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 507 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 13 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 764
Підписники
+2124 години
+317 днів
-4830 день
Архів дописів
Simplified YearBook 2020 All Pages.pdf25.73 MB

🟪भारत- नेदरलँड्स यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2021 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. नेदरलँडसमध्ये अलीकडेच झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये पंतप्रधान रुट यांना मिळालेल्या विजयानंतर या परिषदेचे आयोजन होत आहे आणि दोन्ही देशांदरम्यान नियमितपणे होणाऱ्या उच्च स्तरीय संवादामुळे द्विपक्षीय संबंधांना प्राप्त झालेली गती त्यामुळे कायम राखली जाईल. या शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करतील आणि दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणाऱ्या नव्या मार्गांचा वेध घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही ते परस्परांशी विचारविनिमय करतील. भारत आणि नेदरलँड्स यांच्यात लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य यांच्या सामाईक विभागणीमुळे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. युरोप खंडात मोठ्या प्रमाणावर असलेल्या भारतीय समुदायाचे नेदरलँड्स म्हणजे जणू काही घरच आहे. दोन्ही देशांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी आणि अन्न प्रक्रिया, आरोग्य सेवा, स्मार्ट सिटी आणि शहरी वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नूतनक्षम उर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य आहे. दोन्ही देशांदरम्यान अतिशय भक्कम आर्थिक भागीदारी असून नेदरलँड्स हा भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतामध्ये 200 पेक्षा जास्त डच कंपन्या कार्यरत आहेत आणि नेदरलँडसमध्येही तितक्याच प्रमाणात भारतीय कं पन्या कामकाज करत आहेत

🟪भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे. गेल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाथीचा फटका बसला. ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला आहे. या संदर्भात कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ग्रामीण भागातील दारिद्र्यातील वाढ कुणाच्याही लक्षात येऊ शकते. या भागात बेकारीचे प्रमाण मोठे होते; ग्राहकांचा खर्च (कंझ्युमर एक्सपेंडिचर) सतत कमी होत होता आणि विकासावरील खर्च अवरुद्ध झाला होता. हे तीन घटक एखाद्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य ठरवतात. प्रामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश असलेल्या ग्रामीण भारतीयांनी २०२१ साली एक वर्षभराहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढले आहेत. लोकांनी अन्नधान्यावरचा खर्च कमी केला आहे आणि धान्य महागल्यामुळे अनेकांनी मसुरीच्या डाळीसारखे प्राथमिक अन्नधान्य वापरणे सोडून दिले आहे.

🟪विष्णू, गणपती-वरुण ऑलिम्पिकसाठी पात्र भारतीय नौकानयनपटूंनी गुरुवारचा दिवस संस्मरणीय ठरवला. विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला. भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर या डोडीने ४९ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. ‘‘नौकानयनपटू, पालक आणि प्रशिक्षकांनी इतक्या वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले,’’ असे भारताचे प्रशिक्षक टोमास्झ जानूझेवस्की यांनी ओमानहून सांगितले.

🟪भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry; स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे. भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून करोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे

🟪भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीy करण्यात आली आहे. २०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती. ५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.

🟪एस. रामन्न: SIDBI याचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक. एस. रामन्न यांची भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. 🔴 भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) विषयी. भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) ही सूक्ष्मवित्त संस्थांसाठीची सर्वोच्च नियामक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. याचा उद्देश उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करणे हा आहे. SIDBI याची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे आहे.

आरबीआयचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध •रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने 15 मे रोजी भारतातील 'पेमेंट अॅन्ड सेटलमेंट सिस्टम्सः व्हिजन 2019 - 2021' हा व्हिजन दस्तावेज जाहीर केला आहे. •अधिक सोईस्कर, परवडणारी, जलद आणि सुरक्षित ई-पेमेंट प्रणाली सुनिश्चित हा यामागचा उद्देश आहे. •RBI चे डिजिटल व्यवहारांसाठी लक्ष्य: •जीडीपीचे डिजिटल पेमेंट व्यवहार 15% ने वाढवणे •पेमेंट सिस्टम ऑपरेटर वाढवणे •डिजिटल व्यवहारांमध्ये चौपट वाढ करणे डेबिट कार्ड व्यवहार 35% वाढवणे •एकूण कार्ड स्वीकृती आधारभूत संरचना सहा पटीने वाढवणे

कंदांगी साडी आणि दिंडीगुल लॉक यांना जीआय टॅग •तामिळनाडूतील कंदांगी साडी आणि दिंडीगुल लॉक यांना जीआय टॅग देण्यात आला आहे. •दिंडीगुल लॉक त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि टिकाऊपणासाठी जगभरात ओळखले जातात. या मुळेच दिंडीगुल शहराला 'लॉक सिटी' देखील म्हटले जाते. तामिळनाडूच्या कारागृह, गोदामे, रुग्णालये आणि मंदिरामध्ये दिंडीगुलचे कुलूप वापरले जातात. •शिवगंगा जिल्ह्यातील संपूर्ण कराईकुडी तालुक्यात कंदांगी साड्या तयार केल्या जातात. साड्या साधारणतः सुमारे 5.10 मीटर ते 5.60 मीटर लांबीच्या असतात. या सूती साडीचा वापर उन्हाळ्यात होतो.

महाराष्ट्राचा पाचवा वित्त आयोग •महाराष्ट्र सरकारने पाचव्या राज्य वित्त आयोगाला आपला अंतिम अहवाल देण्यासाठी एप्रिल 2020 पर्यंतचा वेळ दिला आहे. •यापूर्वीची मुदत 24 ऑक्टोबर 2018 ही होती. पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज •28 मार्च 2018 रोजी या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. •राज्यघटना कलम 243-आय व 243-वाय तसेच महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतुदी) अधिनियम, 1994 च्या तरतुदींना अनुसरून •महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते. राज्याचा पहिला वित्त आयोग 1994 मध्ये स्थापन करण्यात आला होता. •तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- सतीश त्रिपाठी (अहवाल 2006) •चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- जे पी डांगे (स्थापना 2011, अहवाल - 2014)

असा लावूया योग्य पद्धतीने मास्क! #मीजबाबदार #IamResponsible #माझामास्क_माझीसुरक्षा
असा लावूया योग्य पद्धतीने मास्क! #मीजबाबदार #IamResponsible #माझामास्क_माझीसुरक्षा

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content
+7

photo content
+9