ru
Feedback
एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

Открыть в Telegram

मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke

Больше
312
Подписчики
+524 часа
+207 дней
+3630 день

Загрузка данных...

Похожие каналы
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
июль '26
июль '26
+50
в 7 каналах
июнь '26
+13
в 7 каналах
Get PRO
май '26
+85
в 6 каналах
Get PRO
апрель '260
в 7 каналах
Get PRO
март '26
+98
в 8 каналах
Get PRO
февраль '260
в 7 каналах
Get PRO
январь '26
+92
в 9 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
22 июля+3
21 июля+5
20 июля+1
19 июля0
18 июля+2
17 июля+2
16 июля+7
15 июля+5
14 июля+3
13 июля+1
12 июля0
11 июля0
10 июля0
09 июля+1
08 июля+3
07 июля+4
06 июля+3
05 июля+2
04 июля+6
03 июля0
02 июля0
01 июля+2
Посты канала
_*विठोबा भेटतोच फक्त विचारात ज्ञानोबा आणि वागण्यात तुकोबा भिनले पाहिजेत.*_
_*विठोबा भेटतोच फक्त विचारात ज्ञानोबा आणि वागण्यात तुकोबा भिनले पाहिजेत.*_

2
*उठ पोरी हूकूमशाही* *राजकारणाच्या संहार कर* *हातातील गुलाबाला* *बाबासाहेबांची लेखणी कर..* *हात जोडून* *पाया पडून प्रयत्नाचा र
*उठ पोरी हूकूमशाही* *राजकारणाच्या संहार कर* *हातातील गुलाबाला* *बाबासाहेबांची लेखणी कर..* *हात जोडून*     *पाया पडून प्रयत्नाचा रथ कर* *पण पाठीवर पडणाऱ्या प्रत्येक घावाला*     *तू शिवरायांची तलवार कर...* *डोळ्यातील अश्रूंना* *तु तुझी ताकद बनव*     *सावित्रीची लेक तू* *राणी लक्ष्मीची कास धर!...* *शिक्षणासाठी धावलीस तू*      *सामान्यांसाठी झगडलीस तू* *ज्ञानाचे बळ घेऊन* *अज्ञानाचा पुढे गुडघ्यावर आलीस तू* *पण एकदिवस असा येईल*       *ज्ञानाच्या प्रकाशातून झुरळे उठतील* *हुकूमशाहीच्या वृत्तीला तोडून तोडून*             *खाली खेचतील* *@Prasad🩷* दिल्लीतील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुषपणे माराहाणीचा निषेध त्या अनुषंगाने वरील कविता आवडली तर नक्की शेअर करा.... 🙏🙏🙏
50
3
या जगात सर्वात मोठा भिकारी कोण माहिती आहे का,? ज्याला समजून घेणार असे कोणीच नाही असा व्यक्ती😒😒 म्हणून प्रत्येकाकडे अशी एक व
या जगात सर्वात मोठा भिकारी कोण माहिती आहे का,? ज्याला समजून घेणार असे कोणीच नाही असा व्यक्ती😒😒 म्हणून प्रत्येकाकडे अशी एक व्यक्ती हवी तिच्याकडे हक्काने मन मोकळ करता येईल नाही तर आपल्या मनाचा एवढा काही कोंडमारा होईल की त्यापुढे स्वतःच अस्तित्व संपवावं वाटेल!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
1 581
4
शरीराला आलेली मरगळ शांत करण्यासाठी जशी कडक चहाची गरज असते. तशी मनाची मरगळ दूर करण्यासाठी आवडत्या माणसांची Prasad🩷
शरीराला आलेली मरगळ शांत करण्यासाठी जशी कडक चहाची गरज असते. तशी मनाची मरगळ दूर करण्यासाठी आवडत्या माणसांची Prasad🩷
60
5
आयुष्य हे खूप सुंदर आहे तु डोळे उघडून तर बग प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो तु आनंद घेऊन तर बग नशीबच काहीच नसत तु प्रयत्न करून तर बग माणसे ही आपलीच असतात तु त्यांना आपल म्हणून तर बग नाती ही मोलाच्चीच असतात तु ती नाती जपून तर बग तुझं आयुष्य खूप सुंदर आहे तु पुढचं पाऊल टाकून तर बग . शुभ सकाळ....🌺🌺
73
6
काही रस्ते आपण निवडत नाही... आयुष्यात काही वळण अशीही येतात, ज्यावरून चालण्याची इच्छाच नसते. मन हजार वेळा मागे वळून पाहत असतं, थांबावंसं वाटतं, सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण परिस्थिती अशी उभी ठाकते की, मनाचं काहीच चालत नाही. त्या क्षणी आपल्या इच्छा, भावना आणि स्वप्नांपेक्षा वास्तव मोठं ठरतं. कधी घराची जबाबदारी, कधी अपूर्ण राहिलेली स्वप्नं, कधी तुटलेली नाती, तर कधी काळाने दिलेले घाव... हे सगळं माणसाला अशा वाटेवर आणून उभं करतं, जिथे पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. आपण अनेकदा विचार करतो, "हे माझ्याच वाट्याला का?" पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरं काळ देतो, काही अनुभव देतात, आणि काही जखमा आयुष्यभर गप्प राहून शिकवत राहतात. काही रस्ते आपण स्वतः निवडत नाही, ते नशीब आपल्यासाठी निवडत असतं. त्या रस्त्यावर फुलं कमी आणि काटे जास्त असतात. तरीही चालत राहावं लागतं, कारण थांबलो तर प्रवास संपतो; आणि चालत राहिलो तर कदाचित एखाद्या वळणावर पुन्हा प्रकाश दिसेल. म्हणून आयुष्याने कितीही कठीण वळण दिलं तरी हार मानू नका. परिस्थितीला स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक पाऊल पुढे टाकत राहा. कारण प्रत्येक कठीण प्रवासाच्या शेवटी एक नवी सुरुवात तुमची वाट पाहत असते. लक्षात ठेवा... "मनाला जे मान्य नसतं, तेही कधी कधी परिस्थिती स्वीकारायला शिकवते. कारण काही रस्ते आपण निवडत नाही, ते नशीब आपल्यासाठी आधीच ठरवून ठेवलेले असतात... आणि त्या रस्त्यावरून चालतानाच माणूस खऱ्या अर्थाने घडत असतो." ✍@King_of_the_pen आयुष्याला नवीन दिशा देण्याचा प्रवास
89
7
आपण जसं आहोत तसं जगण्यात खरचं खूप समाधान लपलेलं आहे नाही तर दिखावा करण्यात त्या माणसाला एवढा त्रास होतो की त्याला त्यातून दुः
आपण जसं आहोत तसं जगण्यात खरचं खूप समाधान लपलेलं आहे नाही तर दिखावा करण्यात त्या माणसाला एवढा त्रास होतो की त्याला त्यातून दुःखाशिवाय  काहीच मिळत नाही म्हणूनचं म्हटल जातं की जे आपल्याकडे आहे त्यात सुखी राहता आलं की जे आपल्याकडे  नाही त्याच दुःख आपल्याल कधीच होणार नाही कारण आपण जसे आज आहोत तसं जीवन जगण्याचं कित्येकाचं स्वप्नं असू शकते!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
1 905
8
"लॉर्डचा राजाची यशोगाथा"(नक्की पूर्ण वाचा✍) जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोल
"लॉर्डचा राजाची यशोगाथा"(नक्की पूर्ण वाचा✍) जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोलवायचे हे रोहित शर्माने आपल्या खेळातून दर्शवले🔥संघर्षाच्या काळात कसे मैदानावर खंबीर उभे राहायचे व बाहेर चालू असलेल्या तुमच्याबद्दलच्या चर्चेला स्वकार्यातून कसे शांततेत उत्तर द्यायचे हे शिकवले💪दडपणाखाली तर सर्वच व्यक्ती(खेळाडू)जातात पण त्यातून जो स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जातो तोच खरा खेळाडू🫡इतरांना लाजवेल अशी त्यांची खेळी.सोपे नसते बाहेर एवढ्या तुफान चर्चा चालू असताना स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवून आपल्या कार्यावर लक्ष बिंबवून चालणे✍हे कार्य कठीण आहे पण अशक्यही नाही हे दाखवून दिली आणि लॉर्डच्या मैदानावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतका झळकवण्याच्या पहिला मानही मिळवला..संघर्षात दम असेल तर इतिहासालाही आपली नोंद घ्यावी लागते🔥हे दिमाखात यश मिळवल्यासारखेच..हेच खरे प्रतिउत्तर त्या सर्व शंकांचे जे ध्येयापासून दूर करतात..खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो! ......🦋🌺✍🙏..... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
75
9
🌅 " आजचे सुविचार " 1) ज्या गोष्टीचा उदय आहे, त्या गोष्टीचा अंत देखील निश्चित आहे. मग ती निराशा असो, दुःख असो अथवा पराभव... आपण फक्त कर्म करत पुढे मार्गक्रमण करत रहावं. 2) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. 3) आपले विचार सरळ असले की, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काहीही फरक पडत नाही. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
61
10
वारी म्हणजे प्रवास आनंदाचा......❤️🙏🌸🌸🌸
वारी म्हणजे प्रवास आनंदाचा......❤️🙏🌸🌸🌸
152
11
मनातलं वादळ... मनातलं वादळ नेमकं कधी शांत होईल, हे मलाही माहीत नाही. कधी कधी असं वाटतं की श्वासही त्या चार भिंतींमध्ये अडकून पडला आहे. बाहेर सगळं शांत दिसत असलं तरी आत मात्र विचारांचं रणांगण पेटलेलं असतं. त्या खोलीतील प्रत्येक भिंतीवर मला माझंच आयुष्य दिसतं. एका भिंतीवर भूतकाळ उभा असतो—काय गमावलं, कोण दूर गेलं, कोणती स्वप्नं अपुरी राहिली याची आठवण करून देणारा. दुसऱ्या भिंतीवर वर्तमानकाळ उभा असतो—संघर्ष, जबाबदाऱ्या, अपयश आणि तरीही चालू ठेवलेली धडपड. तिसऱ्या भिंतीवर भविष्यकाळ असतो—अजून किती लढायचं, किती घडायचं आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किती किंमत मोजायची, हा प्रश्न विचारणारा. रोज रात्री मी त्या न सुटणाऱ्या प्रश्नांमध्ये बुडून जातो. उत्तरं शोधता शोधता स्वतःलाच दोष देतो. काही निर्णयांची खंत वाटते, काही संधी हातातून निसटल्याचं दुःख होतं. पण त्या वेदनांमध्येही एक गोष्ट शिकतो—आयुष्य कोणासाठी थांबत नाही. भरलेलं पान शांतपणे पालटतो आणि नव्या पानावर पुन्हा लिहायला सुरुवात करतो. कारण कालच्या चुका आजचा शेवट नसतात; त्या उद्याच्या यशाची तयारी असतात. प्रत्येक सकाळ मला नवी संधी देऊन जाते. पुन्हा उभं राहण्याची, पुन्हा लढण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची. कदाचित मनातलं वादळ लगेच शांत होणार नाही. पण या वादळातूनच एक दिवस माझ्यातला मजबूत माणूस जन्माला येईल. कारण अंधार कितीही दाट असला, तरी प्रत्येक रात्रीनंतर उगवणारा सूर्य हीच आशेची खरी ओळख आहे. "आयुष्याचं प्रत्येक भरलेलं पान काहीतरी शिकवून जातं. महत्त्वाचं इतकंच... ते पान बंद करून, नव्या आशेने पुढचं पान लिहिण्याचं धैर्य आपण कधीच सोडू नये." ✍@King_of_the_pen आयुष्याला नवीन दिशा देण्याचा प्रवास
156
12
🌅 " आजचे सुविचार " 1) समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे...!! 2) समाधानी व्हायचं असेल तर, जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका..! मग ते जवळचे असोत किंवा दूरचे..! 3) दुसऱ्याचं चांगलं होण्याची भावना ठेवा...! आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
126
13
स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच कोणाला फसवू शकत नाही कारण त्याला पूर्णपणे माहिती असतं की कोणाला दुःख देऊन आपल्याला कधीच
स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच कोणाला फसवू शकत नाही कारण त्याला पूर्णपणे माहिती असतं की कोणाला दुःख देऊन आपल्याला कधीच सुख मिळणार नाही कारण कर्मचाफेरा हा देवाला सुद्धा चुकला नाही मग आपण तर साधी माणसं ना!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
3 475
14
कर्तव्याच्या ओझ्याखाली दडलेलं प्रेम घरातली परिस्थिती जेव्हा उरावर बसते ना, तेव्हा प्रेमाच्या बाजारात फिरायचं धाडस होत नाही. कारण आयुष्य तेव्हा स्वप्नांनी नाही, तर जबाबदाऱ्यांनी चालत असतं. पोटासाठी धावणाऱ्या पायांना कुणाच्या मागे धावायला वेळच उरत नाही. ज्याच्या घरात रोज वास्तवाशी झुंज सुरू असते, त्याच्यासाठी प्रत्येक सकाळ ही एका नव्या संघर्षाची सुरुवात असते. आई-वडिलांच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्नं आणि हातात मर्यादित साधनं... या सगळ्यांच्या गर्दीत प्रेमाला जागा मिळणं कठीणच असतं. लोक म्हणतात, "तू इतका शांत का? भावना नाहीत का तुला?" पण त्यांना कुठे माहीत असतं की, भावना नसतात असं नाही; त्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवाव्या लागतात. कारण आधी कर्तव्य निभावणं गरजेचं असतं. प्रेमासाठी वेळ नंतर मिळेल, पण कर्तव्याची वेळ निघून गेली तर ती पुन्हा परत येत नाही. ज्याच्या डोळ्यांसमोर आपले स्वप्न करिअर असते, तो प्रेमापेक्षा करिअर निवडतो. भावनांपेक्षा जबाबदारी निवडतो. कारण त्याला माहीत असतं की, स्वतः उभं राहिल्याशिवाय दुसऱ्याचा हात धरता येत नाही. संघर्ष करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रेम असतंच, पण ते व्यक्त करण्यापेक्षा तो आपल्या कुटुंबासाठी झटणं निवडतो. त्याच्या त्यागाचं मोल बाहेरच्या जगाला कदाचित कधीच कळणार नाही, पण त्याच्या प्रत्येक घामाच्या थेंबात त्याच्या कुटुंबाचं सुख दडलंलेलं असतं. म्हणून प्रत्येक शांत चेहऱ्यामागे भावना नसतात असं समजू नका. काही माणसं प्रेमाला नाकारत नाहीत, तर योग्य वेळ येईपर्यंत ते मनात जपून ठेवतात. कारण त्यांच्यासाठी आयुष्यातील पहिलं प्रेम म्हणजे त्यांचं कर्तव्य आणि त्यांच्या कुटुंबाचं हसू असतं. **कारण शेवटी... कर्तव्य पूर्ण करणारा माणूसच खऱ्या अर्थाने प्रेम करण्याची पात्रता कमावतो.** ✍@King_of_the_pen आयुष्याला नवीन दिशा देण्याचा प्रवास
148
15
जगाने आपल्या सोबत कसं वागायचं हे आपण ठरवू शकत नाही मात्र आपण जगासोबत कसे राहू शकतो हे आपल्या हातात असत कारण की आपण पूर्ण जगाच
जगाने आपल्या सोबत कसं वागायचं हे आपण ठरवू शकत नाही मात्र आपण जगासोबत कसे राहू शकतो हे आपल्या हातात असत कारण की आपण पूर्ण जगाची दुष्टी तर नाही बदलू शकत पण स्वतःचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो म्हणून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तुमची शांतता जगाच्या बऱ्याच प्रश्नांना दिलेल उत्तम उत्तर असतं !,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
3 668
16
"आयुष्य" आयुष्यं माणसाला सतत खेळवत असतं. आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ. कधी विचार केलाय का? आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक rhythm मध्ये का चालते? ECG वर दिसणारी ती वर-खाली जाणारी रेषा, ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं सर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर-खाली होत राहते. अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख. कधी यश, कधी अपयश. कधी भेटी, कधी विरह. कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे, त्या चढ-उतारांमुळेच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते, त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ-उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळणं नसतील तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे, कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट करू नका, त्याच्या rhythm वर प्रेम करायला शिका. कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं. ते प्रत्येक चढ-उतारात दडलं असतं. आणि जो त्या rhythm सोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थाने जगायला शिकतो.... 🤍🤍🤍❣🤍🤍🤍
171
17
*#ऊर्जामंत्र 🚩* _*धन संपन्न होण्यापेक्षा मन संपन्न होणे हे केव्हाही उत्तम. धन संपन्नता अहंकार निर्माण करु शकते तर मन संपन्नत
*#ऊर्जामंत्र 🚩* _*धन संपन्न होण्यापेक्षा मन संपन्न होणे हे केव्हाही उत्तम. धन संपन्नता अहंकार निर्माण करु शकते तर मन संपन्नता संस्कार…!*_ *#हर_हर_महादेव*🙏🏻🚩
144
18
आयुष्यात सर्व काही मिळवता येत मात्र एकदा गेलेला विश्वास कधीच कमवता येत नाही म्हणून कुठलही नातं जोडताना नक्कीच थोडा विचार करा
आयुष्यात सर्व काही मिळवता येत मात्र एकदा   गेलेला विश्वास कधीच कमवता येत नाही म्हणून कुठलही नातं जोडताना नक्कीच थोडा विचार करा पण एकदा का नातं निर्माण झालं की मग त्याचा कधीच विश्वासघात करू नका कारण शेवटी तुम्ही जोडलेली नाती कामात येतात तुमच्याकडची संपत्ती नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
3 908
19
अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण का ठरतं...?? 👉🏻 मित्रांनो, आजच्या काळात ज्ञान मिळवणे खूप सोपे झाले आहे... इंटरनेटवर लाखो लेख उपलब्ध आहेत, हजारो पुस्तके आहेत, असंख्य व्हिडिओ आहेत. कोणत्याही विषयाची माहिती तुम्ही अगदी काही मिनिटांत मिळू शकता. पण एक प्रश्न स्वतःला विचारून पाहा माहिती म्हणजेच ज्ञान का..?? आणि ज्ञान म्हणजेच अनुभव का..?? उत्तर आहे.....नाही 👉🏻 पुस्तकी ज्ञान तुम्हाला एखादी गोष्ट काय आहे हे सांगते, पण अनुभव तुम्हाला ती गोष्ट कशी जगायची हे शिकवतो... उदाहरणार्थ, 📌 पाण्यात पोहायचे कसे यावर शंभर पुस्तके वाचली तरी पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही... 📌 स्वयंपाकाच्या शेकडो रेसिपी पाठ असल्या तरी प्रत्यक्ष स्वयंपाक केल्याशिवाय चवदार जेवण बनत नाही... 📌 गाडी चालवण्याचे नियम वाचून समजतात, पण रस्त्यावर गाडी चालवताना मिळणारा आत्मविश्वास हा फक्त अनुभवातूनच मिळतो. म्हणूनच अनुभवाला पर्याय नाही... 👉🏻 आज खुप लोक पुस्तके वाचून, इंटरनेटवरील माहिती एकत्र करून किंवा इतरांचे विचार कॉपी करून लेख लिहितात, पुस्तके लिहितात,भाषणे देतात किंवा लोकांना मार्गदर्शन करतात. त्यात माहिती असते, शब्द असतात, उदाहरणेही असतात पण त्यात जिवंतपणा नसतो. कारण त्या शब्दांमागे त्यांचा स्वतःचा काहीच अनुभव नसतो... 👉🏻 पुस्तकी ज्ञान कोणालाही देता येते. पुस्तक वाचून त्यातील माहिती कॉपी करून कोणीही लेख लिहू शकते. पण अनुभवातून लिहिलेला प्रत्येक शब्द वेगळा असतो. त्यात सत्य असते, संघर्ष असतो, यश-अपयशाची चव असते आणि म्हणूनच तो थेट वाचकांच्या मनाला स्पर्श करतो... 👉🏻 जेव्हा एखादा शेतकरी शेतीबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दामागे वर्षानुवर्षांचा अनुभव असतो... एखादा उद्योजक व्यवसायाबद्दल सांगतो, तेव्हा त्याच्या यशाइतकेच त्याचे अपयशही त्याला शिकवून गेलेले असते. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, तेव्हा त्याने हजारो विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कामाचा अनुभव त्याच्या शब्दांना वजन देतो... म्हणून अनुभवातून आलेले ज्ञान अधिक प्रभावी, अधिक विश्वासार्ह आणि अधिक उपयोगी ठरते... याचा अर्थ पुस्तके महत्त्वाची नाहीत का...??? बघा... पुस्तके महत्वाची आहेत... 👉🏻 पुस्तके ही ज्ञानाची दारे उघडतात. ती विचार करायला शिकवतात. चुका टाळायला मदत करतात. नवीन कल्पना देतात. अनेक महान व्यक्तींच्या आयुष्याचा प्रवास आपल्या समोर आणतात. पण पुस्तक वाचून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरले नाही, तर ती फक्त माहिती राहते...📚 ज्ञानाचे रूपांतर शहाणपणात करण्याचे काम अनुभव करतो... 👉🏻 म्हणूनच प्रत्येकाने वाचन करावे, पण त्याचबरोबर कृतीही करावी. कारण कृतीशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभवाशिवाय व्यक्तिमत्त्व पूर्ण होत नाही... आज सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक प्रेरणादायी पोस्ट लिहितात. काहीजण यशाचे सूत्र सांगतात, काहीजण जीवनावर मोठमोठ्या गोष्टी लिहितात. पण त्या शब्दांमध्ये स्वतःचे जगलेले आयुष्य नसेल, तर ते शब्द काही वेळासाठी प्रभाव टाकतील मात्र कायमस्वरूपी प्रेरणा देऊ शकणार नाहीत... 📌 लोकं यशस्वी व्यक्तींची पुस्तके का वाचतात..?? 👉🏻 कारण त्या पुस्तकांमध्ये केवळ सिद्धांत नसतात तर प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष, चुका, अपयश, निर्णय आणि त्यातून मिळालेले धडे असतात. अशा पुस्तकांमधून वाचकाला फक्त माहिती मिळत नाही, तर दिशा मिळते... म्हणूनच अनुभव घेण्यासाठी पुस्तके वाचा पण अनुभव देणारे पुस्तक वाचा... अशा पुस्तकांची निवड करा जी लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून लिहिली आहेत. ज्यात फक्त उपदेश नाही, तर प्रत्यक्ष जगलेले आयुष्य आहे. कारण अनुभवातून लिहिलेले पुस्तक तुमचा वेळ वाचवते, चुका कमी करते आणि पुढे जाण्याची हिंमत देते... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इतरांचा अनुभव कितीही मौल्यवान असला, तरी तुमचा स्वतःचा अनुभव सर्वात मोठा गुरु असतो... 👉🏻 जीवनात पडाल, चुका कराल, अपयशी व्हाल, पुन्हा उभे राहाल याच गोष्टीतुन प्रक्रियेतून तुमची खरी प्रगती होईल. कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला असे काही शिकवतो, जे कोणतेही पुस्तक पूर्णपणे शिकवू शकत नाही... म्हणून ज्ञान मिळवा, भरपूर वाचा, नवीन गोष्टी शिका पण त्या प्रत्यक्ष कृतीत आणा. 👉🏻 कारण ज्ञानाला कृतीची जोड मिळाली की अनुभव जन्माला येतो, आणि अनुभवातूनच आत्मविश्वास, शहाणपण आणि यशाचा मजबूत पाया तयार होतो... 👉🏻 पुस्तके तुम्हाला मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याची हिंमत अनुभव देतो... माहिती तुमच्या मेंदूत साठते, पण अनुभव तुमच्या व्यक्तिमत्त्वात उतरतो. म्हणून फक्त पुस्तके वाचणारे बनू नका...अनुभव जगणारे बना... कारण जगाला केवळ माहिती सांगणाऱ्या लोकांची गरज नाही, तर अनुभवातून बोलणाऱ्या आणि कृतीतून प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची गरज आहे...💫 धन्यवाद.... 🙏🏻🌹😇 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697
126
20
आयुष्यात काही प्रसंग असे येतात की, आपण स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. जे घडलं त्यासाठी परिस्थितीला दोष द्यावा, लोकांना दोष द्यावा, की नशिबालाच मान्य करून पुढे जावं? पण एक गोष्ट मात्र प्रत्येक वाईट काळ शिकवून जातो. सुखाच्या दिवसांत जे आपल्या भोवती असतात, तेच खरे आपले असतात असं नसतं. खरी ओळख तेव्हा होते, जेव्हा काळ आपल्या विरोधात उभा राहतो. "मोठमोठे नकाब उतरले लोकांच्या चेहऱ्यावर, माझा वाईट काळ आल्यावर." जे कायम सोबत राहण्याच्या शपथा घेत होते, तेच सर्वप्रथम दूर गेले. ज्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, त्यांनीच शांतपणे साथ सोडली. आणि ज्यांना आपण आपले समजत होतो, ते फक्त परिस्थितीचे साथीदार निघाले. मात्र या सर्वातून एक अमूल्य शिकवण मिळाली—वाईट काळ माणसाला तोडण्यासाठी नाही, तर खऱ्या आणि खोट्या नात्यांमधला फरक दाखवण्यासाठी येतो. तो आपल्याला मजबूत बनवतो, स्वावलंबी बनवतो आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे शिकवतो. आजही त्या दिवसांची आठवण येते, पण मनात कोणताही राग नाही. कारण त्या कठीण काळानेच मला माझी खरी ताकद दाखवली आणि लोकांचे खरे चेहरेही. म्हणून आज एवढंच म्हणावंसं वाटतं... "माझ्या वाईट काळाचे आभार... कारण त्याने मला माझे आणि परके यांच्यातील फरक ओळखायला शिकवला. मुखवटे उतरले, नाती बदलली; पण मी मात्र अधिक मजबूत झालो." ✍@King_of_the_pen कलम का बादशह
140