🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏
Открыть в Telegram
2 427
Подписчики
-224 часа
-67 дней
-3430 дней
Архив постов
बैल पोळ्याच्या सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
जय जय राम कृष्ण हरी
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज श्रावण दर्श अमावस्या विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, गुरुवार, दि.१०_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर,
श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩
🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा ।
अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥
प्रेम सुख देई प्रेम सुख देई ।
प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥
रांडवेनें जेविं शृंगार केला ।
प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड ।
अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
:- संत एकनाथ सुर्यनारायण कुलकर्णी (सुर्यवंशी)
🌺🙏🌷🪷🪷🪷🌷🙏🌺
🐂 बैलपोळा व वृषभ पूजन 🐂
दर्श पिठोरी अमावास्या प्रारंभ सकाळी १०:३३ नंतर
बेलीचा महादेव मंदिर,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग, श्रीक्षेत्र पंढरपूर
चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज श्रावण कृष्णपक्ष एकादशी, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, सोमवार, दि.०७_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर,
श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩
🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔
हरि उच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणें तेथें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
:- संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली)
🌻☘☘☘☘☘☘☘☘🌻
अजा एकादशी व्रत
चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार
शिव पूजन (शिवामुठ - गहु)
अजा एकादशी व श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
उद्या सोमवार, दि.०७-०९-२०२६
श्रावण कृष्णपक्ष एकादशी
अजा एकादशी व्रत
व
शेवट श्रावणी सोमवार
अजा एकादशी व श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज श्रावण कृष्णपक्ष अष्टमी, विश्वावसु संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, शुक्रवार, दि.०४_सप्टेंबर_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व काकड आरती दर्शन.!!❁
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर,
श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩
🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीचा ॥ध्रु.॥
कृष्ण माझी माता पिता बहिण बंधू । चुलता गोविंद सोयरा असे ॥१॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
: - संत तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)
🌻☘☘☘☘☘☘☘☘🌻
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी सोहळा
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास
श्रीकृष्ण जन्माष्टमी व ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा....
हाती, घोडा, पालखी जय कन्हैयालाल कि..
ज्ञानराज माऊली तुकाराम...
विठ्ठल ऊब आहे, पांडुरंग माउली आहे
व्हिडिओ : boystalk...
(Program : आरपार)
