🙏 Vitthal Rukmini Mandir 🙏
前往频道在 Telegram
2 470
订阅者
+224 小时
+27 天
-430 天
帖子存档
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली असून, टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले.
इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला.
संजीवन समाधी मंदिरात झालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे परंपरा जपत सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले.
आषाढी यात्रा पायी पालखी प्रस्थान सोहळा २०२६
आषाढी यात्रा २०२६
निज ज्येष्ठ कृष्णपक्ष अष्टमी
बुधवार, ०८-०७-२०२६
संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा, श्रीक्षेत्र आळंदी , जि.पुणे
आषाढी पायी पालखी सोहळा २०२६
आषाढी यात्रा २०२६
+4
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६, श्रीक्षेत्र देहू
आषाढी पायी पालखी सोहळा २०२६
आषाढी यात्रा २०२६
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज निज ज्येष्ठ कृष्णपक्ष अष्टमी, पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, बुधवार, दि.०८_०७_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व दर्शन.!!❁
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर,
श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩
🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔
रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥
बहुता सकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥
सर्व सुखाचें आगरु ।
बापरखुमादेविवरु ॥३॥
: - संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
🌺🙏🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🙏🌺
आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, जि. पुणे
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ३४१ वा पायी पालखी प्रस्थान सोहळा...
मंगळवार, दि.०७-०७-२०२६
आषाढी यात्रा पालखी सोहळा २०२६ 🙏🚩
जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा २०२६
आषाढी यात्रा २०२६
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज निज ज्येष्ठ कृष्णपक्ष सप्तमी, पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५३, मंगळवार, दि.०७_०७_२०२६ रोजीची, असंख्य भक्तांच आराध्यदैवत श्रीहरी, पंढरीनाथ, पांडुरंग श्री विठ्ठल आणि आईसाहेब रुक्मिणी देवी यांची नित्य पुजा व दर्शन.!!❁
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता मंदिर,
श्रीक्षेत्र पंढरपूर !! 🚩
🪔 !! जय जय राम कृष्ण हरी !! 🪔
पंढरीची वारी आहे माझे घरी।आणीक न करी तीर्थव्रत॥
वारी एकादशी मंगळवार नेम।
निरंतर प्रेम विठोबासी॥
संतसंगती सदा हा सोहळा।
नामे गळा माळा तुका म्हणे॥
: - संत तुकाराम महाराज देहुकर
🌺🙏🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🙏🌺
आज जगतगुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान, श्रीक्षेत्र देहू, जि. पुणे
श्रीक्षेत्र देहू येथील
आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (दुपार पर्यंत)
सोमवार, दि.०६-०७-२०२६
व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
श्रीक्षेत्र देहू येथील
आजची इंद्रायणी नदीची पुरस्थिती (सकाळी)
सोमवार, दि.०६-०७-२०२६
व्हिडीओ : @shri_kshetr_dehu
अत्यंत महत्त्वाचे
पालखी प्रस्थान सोहळ्या विषयी सुचना
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२६
श्री गणेशा शारदा, करीशी गाथना
आम्ही वारांगणा रमे ऐसा धृ
येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय
स्वर्गीचे सुरवर बंदिती पाया १
ज्याच्या गायनाने तटस्य शंकर
तयापरी पार नाही तुझे २
तुका म्हणे आम्ही किंकरते किती
इंद्राची मस्ती नागविती ३
: संत तुकाराम महाराज देहूकर
ॐ गं गणपतये नमः
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रोदय रात्री ०९:४१ वा.
शिवराज्याभिषेक (शिव स्तुती)
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥१॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि छत्रपती । प्रौढ प्रताप ॥२॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥३॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणें सुशील । सकळ गुणें ॥४॥
दैत्यकुळ-नाशक । धर्म-रक्षक ।
म्लेंच्छ-क्षय-कारक । क्षत्रियकुलावतंस ॥५॥
सकळ सुखांचा सागर । रघुनाथीं निरंतर ।
विजयी आणि निर्धार । श्रीमंत योगी ॥६॥
:- समर्थ रामदास स्वामी
हिंदू साम्राज्य दिवस अर्थात श्री शिव छत्रपती राज्याभिषेक सोहळ्या निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
