All Test Papers MPSC 📚
✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️ Hard work+consistency= Success🏆✌️ #Advt.Con. @Eager1S @Sachin2677 ✅Join: @testpapersmpsc
Больше📈 Аналитический обзор Telegram-канала All Test Papers MPSC 📚
Канал All Test Papers MPSC 📚 (@testpapersmpsc) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 44 300 подписчиков, занимая 4 029 место в категории Образование и 8 411 место в регионе Индия.
📊 Показатели аудитории и динамика
С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 44 300 подписчиков.
Согласно последним данным от 26 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 881, а за последние 24 часа — 26, при этом общий охват остаётся высоким.
- Статус верификации: Не верифицирован
- Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 38.56%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 14.18% реакций от общего числа подписчиков.
- Охват публикаций: В среднем каждый пост получает 17 077 просмотров. В течение первых суток публикация набирает 6 281 просмотров.
- Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 32.
📝 Описание и контентная политика
Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“✅🔰MPSC व इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध दर्जेदार मोफत प्रश्नपत्रिका व नोट्स उपलब्ध करून देणारा एकमेव ग्रुप All Test Papers Mpsc✔️
Hard work+consistency= Success🏆✌️
#Advt.Con. @Eager1S
@Sachin2677
✅Join: @testpapersmpsc”
Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.
राज्यसेवा मुख्य परीक्षा वास्तव: वर्णनात्मक विरुद्ध वस्तुनिष्ठराज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) असावी की वस्तुनिष्ठ (Objective), यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. "वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे केवळ घोकंपट्टी" हा एकमेव आरोप ही पद्धत नाकारण्यासाठी नेहमी केला जातो. परंतु, MPSC च्या परीक्षांचे खरे स्वरूप आणि काठिण्यपातळी समजून घेतल्यास या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट होते. यामागील वास्तव खालीलप्रमाणे आहे: 👉'घोकंपट्टी'चा गैरसमज आणि वास्तव: वर्णनात्मक परीक्षेत (उदा. UPSC) प्रभावी उत्तरे लिहिण्यासाठी, उत्तराला 'धार' आणण्यासाठी विविध सरकारी योजनांची नावे, कलमे, आकडेवारी ,संकल्पना ,व्याख्या आणि तज्ज्ञांची विधाने जशीच्या तशी पाठांतर करून आठवून लिहावी लागतात.याउलट, वस्तुनिष्ठ परीक्षेत पर्यायांच्या रूपाने उत्तर तुमच्या डोळ्यांसमोर असते.त्यामुळे पाठांतर एकवेळ कमी असले तरी उत्तर पर्याय समोर आल्यावर ते लक्षात येऊ शकते. त्यामुळे वस्तुनिष्ठ पर्याय मध्ये निव्वळ पाठांतरापेक्षा 'तर्कशुद्ध विचार' आणि अभ्यासाची समज अधिक महत्त्वाची ठरते. 👉प्रश्नांची काठिण्यपातळी आणि MPSC चे स्वरूप: जे लोक वस्तुनिष्ठ परीक्षेला घोकंपट्टी म्हणतात, त्यांनी बहुधा MPSC च्या प्रश्नांचे बदलते स्वरूप अनुभवलेले नाही.MPSC ची objective परीक्षा ही कोणत्याही सरळ ‘पाठांतर करा आणि पर्याय टिक करा’ प्रकारची परीक्षा नाही. प्रश्नांची भाषा, विधानांमधील सूक्ष्म फरक,प्रश्नांमध्ये संकल्पनांचा अप्रत्यक्ष वापर, बहु विधानात्मक पर्याय इ मुळे प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानासोबतच comprehension, application, logical reasoning आणि exam temperament यांचीही गरज असते. MPSC ची परीक्षा ही सरळसेवा किंवा पोलीस भरतीसारखी नसते, जिथे फॅक्ट्स पाठ करून ९०-९५% मेरिट लागते. MPSC चे कट-ऑफ ५० ते ६० टक्क्यांच्या घरात लागतात, कारण येथील प्रश्न थेट नसून बहुविधानात्मक (Multi-statement), संकल्पनात्मक आणि विचार करायला लावणारे असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी पाठांतरा पेक्षा विषयाचे सखोल आकलन आवश्यक असते. 👉UPSCच्या विद्यार्थ्यांचे MPSC मधील लक्षणीय यश: वर्णनात्मक परीक्षेचे समर्थन करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यसेवेच्या अंतिम निकालात दरवर्षी असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात UPSC (वर्णनात्मक) पासून केलेली असते. UPSC चे काही प्रयत्न, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिल्यानंतर ते MPSC कडे वळतात आणि थेट वर्ग-१ पदाला गवसणी घालतात. जर MPSC ची परीक्षा केवळ 'घोकंपट्टीची' असती, तर वैचारिक आणि संकल्पनात्मक अभ्यास करणाऱ्या UPSC च्या विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले नसते. 👉संतुलित आणि परिपूर्ण निवड प्रक्रिया: राज्यसेवा परीक्षेमध्ये ७०० गुणांची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपात व उर्वरित २०० गुणांची चाचणी (१०० गुण लेखी व १०० गुण मुलाखत).यात वस्तुनिष्ठ - वर्णनात्मक - मुलाखत या तिन्ही गोष्टी द्वारे परीक्षा घेतली जाते. म्हणूनच ही खऱ्या अर्थाने एक योग्य आणि संतुलित पद्धत म्हणता येऊ शकते. 👉मूल्यमापनातील पारदर्शकता आणि समानता (Uniform Evaluation): वर्णनात्मक पद्धतीत पेपर तपासणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनानुसार गुणांमध्ये तफावत येऊ शकते, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे 'सममूल्य मापन' होण्यात अडचणी येतात. याउलट, वस्तुनिष्ठ पद्धत सर्वांचे एकाच समान पातळीवर मूल्यमापन करते. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नसून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक तपासणी होते, पारदर्शकता राहते आणि निकालही त्वरित व वेळेत लावणे शक्य होते. निष्कर्ष: MPSC मध्ये अपयश आलेले असंख्य विद्यार्थी अनेकदा आपल्या अपयशाचे खापर आयोगावर फोडतात. "ही परीक्षा फक्त घोकंपट्टीची आहे", "आपल्या तसली घोकंपट्टी जमत नाही नाहीतर..." अशी अनेक कारणे देऊन ते स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करतात. यातूनच 'MPSC ची वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे केवळ घोकंपट्टी' हा गैरसमज नकळतपणे समाजात पसरवला जातो. थोडक्यात सांगायचे तर, फक्त पाठांतर करणारा विद्यार्थी MPSC ची वस्तुनिष्ठ परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी संकल्पनांची स्पष्टता आणि तार्किक विश्लेषणाची जोड असावीच लागते. त्यामुळे ‘वस्तुनिष्ठ परीक्षा = घोकंपट्टी’ आणि ‘वर्णनात्मक परीक्षा = विचारक्षमता’ हा समज चुकीचा असून, वस्तुनिष्ठ पद्धत ही खऱ्या अर्थाने अत्यंत शास्त्रशुद्ध, पारदर्शक आणि गुणवान अधिकारी निवडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. - ऋषिकेश कराळे🕊 https://t.me/mpscvastad https://t.me/mpscvastad https://t.me/mpscvastad
