4 101
CMO Maharashtra Tweets:
गणपती बाप्पा मोरया!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत (ब वर्ग) नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा गणेश मंदिरास (शमी विघ्नेश गणपती देवस्थान) 'ब' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. अशा मंगलमय वातावरणात आदासा गणेश मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे ही गणेशभक्तांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
आदासा गणेश मंदिर हे विदर्भातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठीच्या सोयी-सुविधा आणि यात्रास्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
#Maharashtra #Nagpur #AdasaGaneshTemple #GanpatiBappaMorya
12 сент., 08:20
