ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 207
Подписчики
-124 часа
-167 дней
-8930 день
Архив постов
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अहिल्यानगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होत भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला! #Maharashtra #HarinamSaptah

CMO Maharashtra Tweets: लाखो भाविकांच्या साक्षीने घुमला श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संदेश! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर येथे 'श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगात सर्वात प्राचीन आहे. हजारो वर्षांत आक्रमकांनी भारतावर अनेक आक्रमणे केली, तरीही वारकरी, हरिनाम, सनातन आणि हिंदू परंपरांमुळे आपल्या देशाची संस्कृती, सभ्यता आणि आपल्या मनातील ईश्वराचे स्थान बदलले नाही. आपली गुरुपरंपरा आणि सद्गुरूंनी दिलेले विचार व संस्कार यांमुळे कोणीही आपल्याला मानसिकदृष्ट्या गुलाम करू शकले नाही. श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धेने हरिनामाचे पठण सुरू आहे. यामुळे ‘मीपणा’ दूर होतो आणि प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते. या माध्यमातून आपली आध्यात्मिकता आणि संस्कार जिवंत ठेवून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य सातत्याने सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारने सरला बेटाचा विकास आराखडा तयार करून त्यानुसार कामे सुरू केली आहेत. तेथील सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच रस्ते, पूरसंरक्षण व सौरऊर्जा प्रकल्पाचे कामही हाती घेतले आहे. येत्या काळात सरला बेट हे भाविकांसाठी एक सुंदर आणि ऊर्जादायी आध्यात्मिक केंद्र बनेल. सरला बेटाचा प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता. त्यानुसार 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहोत. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सध्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत आहे टप्प्याटप्प्याने 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. पुढील काळात वर्षभर 12 तास मोफत वीज दिली जाणार आहे. शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकीही माफ केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या सर्वांगीण हितासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #HarinamSaptah

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सरला बेटाचा महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास केला जाईल. श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज इनके आशीर्वाद से सरला द्वीप का महाराष्ट्र के प्रमुख तीर्थस्थल के रूप में सर्वांगीण विकास किया जाएगा। (179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर | 25-8-2026) #Maharashtra #HarinamSaptah

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Celebrating Excellence in Education Honouring the remarkable contributions, 21 educators from across India have been recognised for their significant contributions to higher and polytechnic education and selected for this year’s National Teachers’ Award. Honourable President Smt. Droupadi Murmu Ji will be felicitating these award-winning educators on 5 September 2026, on the occasion of Teachers’ Day. Distinguished educators from Maharashtra: 🏆Dr. Vikram Vishal – IIT, Mumbai 🏆Dr. Sandipann Narote – Government Polytechnic, Solapur 🏆Dr. Amar Taksande – JNMC, Wardha Their dedication to education and their contribution towards shaping the future of our youth are truly commendable. Heartiest congratulations to them and to all the awardees across the country. #Maharashtra #NationalTeacherAward2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: गोदावरी धामचे मठाधिपती पूज्य महंत श्री रामगिरी महाराजजी यांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करून टाकू. गोदावरी धाम के मठाधीश पूज्य महंत श्री रामगिरी महाराज जी इनको धमकियां देने वालों को नेस्तनाबूद कर देंगे। (179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर | 25-8-2026) #Maharashtra #HarinamSaptah

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी उभा केलेला संप्रदाय महाराष्ट्राच्या सज्जन शक्तीचे प्रतीक म्हणून कार्य करीत आहे. श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज इनके द्वारा स्थापित संप्रदाय महाराष्ट्र की सज्जन शक्ति के प्रतीक के रूप में कार्य कर रहा है। (179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर | 25-8-2026) #Maharashtra #HarinamSaptah

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content