Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 100
Подписчики
-524 часа
-137 дней
-2630 дней
Архив постов
4 099
CMO Maharashtra Tweets:
🔸 Inauguration of various flyovers under the Brihanmumbai Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis (Online).
✅ Vidyavihar east-west connecting railway overbridge.
✅ Flyover at Sion railway station.
✅ Flyover from Ratnagiri Junction to Santosh Nagar on the Film City road in Goregaon East as part of the Goregaon-Mulund Link Road (GMLR) project.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Mumbai Mayor Ritu Tawde, Deputy Mayor Sanjay Ghadi and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उड्डाण पुलांचे लोकार्पण (ऑनलाईन).
✅ विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वेपूल
✅ शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल
✅ गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंतच्या उड्डाणपूल
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से बृहन्मुंबई महानगरपालिका के विभिन्न फ्लाईओवरों का लोकार्पण (ऑनलाइन)।
✅ विद्याविहार पूर्व-पश्चिम को जोड़ने वाला रेलवे पुल
✅ सायन रेलवे स्टेशन स्थित फ्लाईओवर
✅ गोरेगांव-मुलुंड लिंक रोड परियोजना के अंतर्गत गोरेगांव पूर्व में रत्नागिरी जंक्शन से फिल्म सिटी मार्ग पर स्थित संतोष नगर तक का फ्लाईओवर
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मुंबई की महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.05pm | 22-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. २.०५ वा. | २२-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 099
CMO Maharashtra Tweets:
रसायन उद्योगाच्या विकासाला नवी गती; महाराष्ट्राचे स्वतंत्र धोरण लवकरच!
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे 'India Chem 2026' चे उदघाटन पार पडले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या रसायन उद्योगात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून राज्यात सुमारे 3600 उद्योग कार्यरत आहेत. देशाच्या रसायन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा 19%, तर निर्यातीत 17% वाटा असून राज्यात पेट्रोकेमिकल्स, विशेष रसायने, कृषी रसायने आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योगांची मजबूत परिसंस्था विकसित झाली आहे.
वाढवण बंदराच्या परिसरात पालघर येथे भव्य रसायन पार्क उभारण्यासाठी 2500 ते 5000 एकर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकार रसायन उद्योगासाठी स्वतंत्र आणि विशेष धोरण तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल. या धोरणातून उद्योगांच्या गरजा, भविष्यातील गुंतवणूक आणि उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीला प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारून औषधनिर्मिती क्षेत्रासाठी सक्षम औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याद्वारे जेनेरिक औषधनिर्मितीत भारताचे जागतिक स्थान अधिक बळकट करण्यासह मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तळोजा आणि नवी मुंबई येथे विशेष रसायने, पॉलिमर्स व औद्योगिक रसायने, तारापूर आणि पालघरमध्ये रासायनिक प्रक्रिया, औषधनिर्मिती व रंगद्रव्ये, तर पाताळगंगा आणि रोहा येथे पेट्रोकेमिकल्स व सेंद्रिय रसायनांशी संबंधित उद्योग विकसित झाले आहेत. तसेच लोटे परशुराम, कुरकुंभ आणि विदर्भातील बुटीबोरी येथेही रसायन उद्योगाची मजबूत परिसंस्था निर्माण झाली आहे. याशिवाय कोल गॅसिफिकेशनचे 5 महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रगत टप्प्यात असून बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित रसायन उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
राज्यात गुंतवणूकदारांना सुलभ सेवा आणि आवश्यक परवानग्या उपलब्ध करून देण्यासाठी ‘मैत्री’ एकल खिडकी प्रणाली आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. सध्या राज्यातील रसायन उद्योगातून सुमारे 3,00,000 रोजगार निर्माण होत असून योग्य धोरणांच्या माध्यमातून रोजगार दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे भारतासमोर नवीन संधी निर्माण झाल्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया, फिक्की राष्ट्रीय पेट्रोकेमिकल्स समितीचे अध्यक्ष, एचएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभ दास, यूपीएलचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026
4 099
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र सरकार रासायनिक उद्योगांसाठी विशेष आणि स्वतंत्र धोरण तयार करत आहे.
महाराष्ट्र सरकार केमिकल इंडस्ट्री के लिए एक विशेष एवं स्वतंत्र नीति तैयार कर रही है।
(India Chem 2026 का उदघाटन। मुंबई। 22-10-2026)
#Maharashtra #Mumbai #IndiaChem2026
4 099
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पालघरमध्ये भव्य रसायन पार्क प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाईल.
पालघर में भव्य रसायन पार्क परियोजना के लिए भूमि उपलब्ध कराई जाएगी।
( India Chem 2026 का उदघाटन | Mumbai | 22-10-2026)
#Maharashtra #Mumbai #IndiaChem2026
4 099
Full_Speech_बृहन्मुंबई_महानगरपालिकेच्या_विविध_उड्डाणपुलांचे_लोकार्पण.mp416.30 MB
4 099
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
GOLDEN HATTRICK FOR INDIA at the Asian Para Games 2026! 🥇🇮🇳
🥇 Heartiest congratulations to Suvarna Raj on winning Gold medal in the Women’s Discus Throw F54 Final.
🥇 Many congratulations to Toman Kumar and Sheetal Devi on clinching Gold medal in the Para Archery Compound Mixed Team event.
🥇 Congratulations to Sheetal Devi on winning Gold medal in the Para Archery Compound Women’s Individual event.
Their precision, teamwork and determination have brought immense pride to the nation.
#AsianParaGames2026 #TeamIndia #Cheer4Bharat
4 099
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उड्डाणपुलांचे लोकार्पण
🕝 दु. २.१७ वा. | २२-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/rk6oQmJ6Q8A?si=BjB6nvDnsofgP1CI
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1870944633889432
https://x.com/Dev_Fadnavis/status/2113191008213344731?s=20
4 099
CMO Maharashtra Tweets:
Union Minister J. P. Nadda and CM Devendra Fadnavis released the knowledge paper titled ‘How India Can Lead the Next Global Chemicals Growth Wave’ in Mumbai today.
CM of Madhya Pradesh Dr. Mohan Yadav, CM of Odisha Mohan Charan Majhi, Union MoS Anupriya Patel, MoS of Gujarat Praful Pansheriya and other dignitaries were present.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'हाऊ इंडिया कॅन लीड द नेक्स्ट ग्लोबल केमिकल्स ग्रोथ वेव्ह' या नॉलेज पेपरचे प्रकाशन केले.
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, गुजरातचे राज्यमंत्री प्रफुल पानशेरिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaChem2026
