fa
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
742
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1330 روز
آرشیو پست ها
प्रशासनातला प्रोटोकॉल कळायला अभ्यास लागतो, स्टंटबाजी नाही! मार्केटमध्ये आलेल्या नव्या 'पप्पू'ची हीच ती बालीश वृत्ती.

लक्षात घ्या सीजेपी हे जे नाव आहे ना याला तुम्ही केवळ एखादी छोटीशी संघटना समजू नका सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताऊ प्रोग्राम आहे काँग्रेस जिताऊ प्रोग्राम आणि या प्रोग्राम मध्ये हे जे तुम्हाला चार-पाच पोरं समोर दिसतायत युवा हे नाही तो बस मोहरे है. तुम्ही बघा यांच्या बैठकांना कोण आहेत

राम मंदिराला यांनी विरोध करून पाहिला उलट राम मंदिराला विरोध केल्यामुळे जनतेने यांना घरी बसवलं आता यांच्या लक्षात आलं आयडओलॉजीला विरोध करून फायदा नाहीये इशू शोधून काढावा लागेल मग यांनी राम मंदिरामध्ये दुर्दैवाने जे काही त्या ठिकाणी दानपेटीमध्ये जो काही थोडा घोटाळा झाला जो काही झाला असेल मग लगेच 1800 कोटीचा घोटाळा त्यांना विचारलं दाखवा कुठून 1800 कोटी आले कोणी सांगायला तयार नाही 1800 कोटीचा घोटाळा जणू काही संपूर्ण राम मंदिर लुटून खाल्लं अशा पद्धतीचं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला

भारत जोडो लक्षात असेल लोकसभेचा नरेटिव्ह काँग्रेसचा नव्हता 180 संस्था होत्या वेगवेगळ्या एनजीओज होत्या मी विधानसभेमध्ये पुराव्यासहित दाखवलं या 180 पैकी अनेक संस्था अशा होत्या की ज्या संस्थांना यूपीएच्या सरकारनं अर्बन नक्षल म्हणून लोकसभेच्या पटलावर सांगितलं होतं अशा 180 संस्था एकत्रित आणून भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नरेटिव्ह त्यांनी तयार केला

भारताच्या 25% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या 22% यूनिकॉर्न यूनिकॉर्न म्हणजे जो स्टार्टअप हा 10,000 कोटी रुपयाचा झालेला आहे 95,000 कोटीचा म्हणजे बिलियन डॉलरचा झालाय त्याला युनिकॉर्न म्हणतात देशातले सगळ्यात जास्त युनिकॉर्न हे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत

आज सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येतीय आज एफडीआय देशाचा 39% एफडीआय महाराष्ट्रात येतो या देशामधली सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते आहे सर्वात जास्त एमओयू महाराष्ट्रात होत आहेत आणि देशामध्ये एमओयू च इन्व्हेस्टमेंट मध्ये परिवर्तित होण्याचं प्रमाण हे ही सर्वात जास्त महाराष्ट्राचं आहे

सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी त्यांचे कच्चे बच्चे कर्नाटकला जात नाहीत. हिमाचल प्रदेशला जात नाहीत. तेलंगणाला जात नाहीत. त्या ठिकाणी झारखंडला इतका मोठा आंदोलन झालं पण यांच्यापैकी कोणी गेलं नाही. हे येऊन महाराष्ट्रामध्ये बोलतात. हे या ठिकाणी सांगतात शिक्षण पद्धत चा कसा बोजवारा वाजलाय आज या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी परदेशी युनिव्हर्सिटीला शिक्षणाची दारखुली झाली सर्वात जास्त परदेशी युनिव्हर्सिटीज या महाराष्ट्रामध्ये आलेल्या

बंधू-भगिनींनो या ठिकाणी मात्र आपण बघा जे आपण चांगलं करतोय त्याच्याबद्दल बोललं जात नाही ही जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम जे काही वाईट आहे ते दाखवण्याचं काम करतं त्यांचं ते काम आहे ते करणार आहेत माझा सवाल आहे जे चांगलं होतय ते आपण जनतेपर्यंत नेणार आहोत की नाही मगाशी संजय कुटेनी सांगितलं आमच्याकडे किती डॉक्टर तयार होत होते आज किती डॉक्टर तयार होत आहेत किती आयआयटीएस तयार होते आज किती होतायत साध्या आमच्या आयटीआय ची संख्या किती होती ती आज किती झालेली आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या

पुढची अर्थव्यवस्था ही युवा या ठिकाणी जे इन्व्हेन्शन्स करतील त्याची आहे. पण आपल्या देशात नीतीही नव्हती आणि स्टार्टअपही नव्हते. अनेक देश पुढे निघून गेले होते. पण केवळ दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नीतीमुळे आम्ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम झालो. अमेरिका चीन नंतर भारत झालाय आणि आता पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये आम्ही जगातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम होणार आहोत

दुर्दैवाने मला असं वाटतं की हे जे काही राहुल गांधी बोलताय आहेत निश्चितपणे ते रोज खोटं बोलतील पण ते कितीही खोटं बोलले तुम्ही आणि आम्ही सत्य घेऊन जर जनतेमध्ये गेलो तर जनतेला माहिती आहे महिलांचा खरा कैवारी कोण आहे अरे ज्या महिलांकरता स्वातंत्र्यानंतर साधी शौचालय तुम्ही बांधली नव्हती बारा कोटी घरांमध्ये शौचालय बांधणारे नरेंद्र मोदी आहेत

माननीय मोदीजींवर अरे मोदीजी एकदा जे ठरवतात. ते करून दाखवतात. आणि त्यामुळे आकाश पाताळ एक करून मोदीजी 2029 ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही

"प्रश्न आज निर्माण काय झाला? 2026 पुन्हा बिल का आणावं लागलं ते याकरता आणावं लागलं की कोविड मुळे आपलं सेन्सस पुढे गेलं जनगणना पुढे गेली आणि मोदीजींच्या लक्षात आलं की जनगणनेचे आकडे 2028 च्या आधी मिळू शकत नाहीत कारण जनगणना केल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन असतात. तीन टप्पे त्याचे असतात ते स्टॅच्युटरी टप्पे आहेत त्यामुळे 2028 पर्यंत जर हे आकडे मिळाले नाहीत तर 2029 च्या निवडणुकीमध्ये आपल्याला महिला आरक्षण देता येणार नाही

यांना माझा प्रश्न आहे. 2023 हे बिल आलं हा कायदा आला काय होतं या कायद्यामध्ये? दोनच गोष्टी होत्या पहिली गोष्ट होती. महिला ना 33% आरक्षण आणि हे आरक्षण देण्याकरता दोन कंडिशन होत्या पहिली कंडिशन सेन्सस पूर्ण करून आकडेवारी घ्यायची आणि दुसरी कंडिशन डी लिमिटेशन त्या आकडेवारीच्या आधारावर करायचं माझा सवाल आहे राहुल गांधींना सवाल आहे सुप्रिया ताईंना माझा सवाल आहे सकाळच्या भोंग्याला माझा सवाल आहे मला सांगा 2023 ला तुम्ही ज्या कायद्याकरता मतदान केलं होतं त्या कायद्यामध्ये डी लिमिटेशन होतं की नव्हतं

मगाशी आमच्या चित्राताईंनी खरा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न हाच आहे काँग्रेस पक्षाला राहुल गांधीना की राहुल जी सांगा जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांना संधी देण्याची वेळ होती तर प्रियंकाजींना संधी तुम्ही का दिली नाही हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींना देखील त्या ठिकाणी सांगावं लागेल

वंदे मातरम. वंदे मातरम पेक्षा मातृसत्ता पद्धतीचं दुसरं कुठलं प्रतिक नाही. ही दुर्गा दशपहरण धारिणी. हे सुरू झाल्याबरोबर सोनियाजींनी थयथयाट चालू केला आणि वंदे मातरम गीत थांबायला लावलं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अरे तेच वंदे मातरम गीत आहे. ज्या गीताला त्या ठिकाणी गात गात अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी फाशीवर गेले आणि गळ्यात फास होता. तरी देखील घाबरले नाहीत वंदे मातरम म्हणत राहिले वंदे मातरम