fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 209
مشترکین
+124 ساعت
-127 روز
-9530 روز
آرشیو پست ها

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027' सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करू. 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेला 2027' के शुरू होने से पहले सभी आवश्यक कार्य पूरे करेंगे| ( नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Building Nashik’s Future Through Education and Innovation! Delighted to inaugurate and unveil the stone plaque of the administrative building of Savitribai Phule Pune University’s Nashik Sub-Centre. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the New Education Policy is transforming India’s education landscape and the Nashik Sub-Centre marks an important step in this journey. The sub-centre serves 196 affiliated colleges and recognised institutions, along with 32 research centres. Pleased that its operations have now commenced from this new facility. The sub-centre will continue to be known as the ‘Savitribai Phule Pune University Nashik Sub-Centre’. Pune University’s strong academic legacy and growing global standing must be further strengthened through excellence in education, research and accreditation. Our education system must create capable, globally employable human resources. With AI and Data Science rapidly transforming the world, we must prepare our youth to continuously ‘Learn, Unlearn and Relearn'. Universities must now evolve into centres of research, innovation and incubation, with new academic programmes aligned to emerging opportunities. The Maharashtra Government will extend full support to this important endeavour. Nashik is also emerging as a major economic growth centre, with nearly ₹30,000 crore invested across various sectors. Minister Chandrakant Dada Patil, Minister Girishbhau Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Chhagan Bhujbal, Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University, Prof. Dr. Suresh Gosavi and other dignitaries were present. #Maharashtra #Nashik #SPPU https://x.com/Dev_Fadnavis/status/2093374364624490766?s=20

CMO Maharashtra Tweets: 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'- श्रद्धा, सेवा आणि सुव्यवस्थेचा दिव्य संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिक येथे 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उदघाटन पार पडले. 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'चा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणा ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या निमित्ताने उत्तम सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साधुग्रामची जागा ₹2500 कोटी खर्च करून कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या जागेचा उपयोग भविष्यातही कुंभमेळ्यासाठीच व्हावा, यासाठी त्याची योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. साधुग्रामच्या जागांबाबत काही नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास त्या संवेदनशीलतेने दूर करण्यात येतील. शक्य त्या सुधारणा करण्यात येऊन संबंधितांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी खर्च होणाऱ्या निधीतून नाशिक, त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात दीर्घकाळासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, याची जाणीव सरकारला असून कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक निश्चितपणे या कामांचे स्वागत करतील. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी मर्यादेत वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सहकार्याने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी दर्जेदार, पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करून हा कुंभमेळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रश्न विचारण्याची आणि नव्या विचारांचा स्वीकार करण्याची परंपरा होय. महाकुंभ या भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा मोठा आविष्कार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरातील विविध भक्ती परंपरांचा संगम नाशिकमध्ये अनुभवता येणार आहे. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत, राजस्थानपासून गुजरातपर्यंत तसेच पूर्वोत्तर भारतातील विविध भागांतील भक्ती परंपरांचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. भक्ती संगमाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात होत असून 31 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण होईल. साधूसंतांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या सहकार्याने 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027' निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी सिंहस्थ सहाय्यक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि ॲपचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच यावेळी 'आपला कुंभपर्व माझी जबाबदारी' ही प्रतिज्ञा घेण्यात आली. 'कुंभ दूत' उपक्रमाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार असल्याने प्राधिकरणामार्फत ‘कुंभ दूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सिंहस्थ महाकुंभबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासोबत नियोजनात विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. 'नाशिक-त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या व्यापक आयोजनात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्रत्यक्ष मोठ्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना गर्दी व्यवस्थापन, स्वयंसेवा, समन्वय, शिस्त आणि नागरिकांशी संवाद यांचा अनुभव घेता येणार आहे. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिंहस्थ संस्कृती' या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन केले. याप्रसंगी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा अमूल्य ठेवा उलगडणाऱ्या या प्रदर्शनाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार सरोज अहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

CMO Maharashtra हजारो वर्षांची परंपरा, कोट्यवधी मनांची श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव - सिंहस्थ महाकुंभपर्व नाशिकच्या पवित्र भूमीत साकारत आहे. कुंभपरंपरेचा इतिहास आणि महाकुंभाचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्यासाठी जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाकुंभपर्व घराघरात पोहोचविणाऱ्या या उपक्रमांची सविस्तर माहिती... #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'च्या उदघाटन कार्यक्रमात सिंहस्थ सहाय्यक समितीच्या सिंहस्थ कुंभपर्व, नाशिक-त्र्यंबकेश्वर, 2026-2027 या पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच संकेतस्थळ आणि ॲपचा शुभारंभ केला. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik