व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
📈 تحلیل کانال تلگرام व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
کانال व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) (@whitegoldtrust) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 576 مشترک است و جایگاه 998 را در دسته طبیعت و حیوانات و رتبه 31 460 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 576 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 04 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -160 و در ۲۴ ساعت گذشته برابر -4 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 39.87% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 10.68% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 5 015 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 1 343 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“शेतीविषयी माहिती साठी संपर्क 8888167888”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته طبیعت و حیوانات تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 05 سپتامبر | 0 | |||
| 04 سپتامبر | 0 | |||
| 03 سپتامبر | 0 | |||
| 02 سپتامبر | 0 | |||
| 01 سپتامبر | 0 |
| 2 | بدون متن... | 1 630 |
| 3 | بدون متن... | 1 621 |
| 4 | بدون متن... | 1 612 |
| 5 | https://youtube.com/live/v5JylCUtd1c?feature=share | 1 810 |
| 6 | https://www.youtube.com/live/jJVXlshehJQ?si=i5fCzxxgZdi5QPtW | 2 925 |
| 7 | 🌱तुरीबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी तुरीचा पेरा वाढला आहे सध्या तुरीची अवस्था वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे.
👉 खोडावर डाग पडून फांद्या व नंतर झाड वाळणे याला फांदीमर किंवा फायटोप्थोरा असे म्हणतात. या रोगाला थांबवण्यासाठी खोडावर रिडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स (म्हणजे मेटलॅक्सिल + मँकोझेब) या संयुक्त बुरशीनाशकाचा दाट फवारा अवश्य द्यावा. जमिनीत ओलावा असल्यास काही औषध जमिनीवर सुद्धा पडेल असे फवारावे. या रोगाचा प्रादुर्भाव नसल्यास भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक ट्रायकोडर्माची आळवणी करावी.
👉 तुरीला फांद्याची संख्या जास्त असल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे योग्य वाढ असल्यास तुरीचे 25, 50 व 75 दिवसाला शेंडे खुडावे. दोन वेळा शेंडे खुडायचे असल्यास 30-60 दिवसादरम्यान व एकाच वेळेस शेंडे खुडायचे असल्यास 75 दिवसापर्यंत कधीही एकदा शेंडे खुडू शकता.
👉 पानांचे गुच्छ होऊन त्या झाडात जास्त हिरवेपणा राहून फुलं व शेंगा न लागणे म्हणजे हा रोग वांझ रोग आहे, म्हणजे स्टेरिलिटी मोझॅक. याचा प्रादुर्भाव झालेले झाडे सतत उपटत राहावे व याला पसरवणारा कोळी किडीचा नियंत्रण ओमाईट, मॅजिस्टर किंवा ॲबामॅक्टिन फवारून प्रतिबंधात्मक नियंत्रण करावे.
👉 तुरीला खताची मात्रा लागवडीपासून 60 दिवसापर्यंत सुद्धा देता येते व दुसरी मात्रा गरजेनुसार सोयाबीन निघाल्यानंतर सुद्धा देऊ शकता.
👉 तुरीच्या खोडावर गाठी तयार होत असल्यास हा स्टेम कॅंकर नावाचा रोग आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्या भागावर कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचे बुरशीनाशक फवारावे.
👉 तुरीवर पानं गुंडाळणारी किंवा पानं खाणारी अळी हे जास्त प्रमाणात असल्यास पांडा सुपर किंवा इमान या अळीनाशकाचा फवारा द्यावा. | 3 173 |
| 8 | 🟢श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला🟢
🌱सोयाबीनबद्दल माहिती🌱
👉 बहुतांश ठिकाणी सोयाबीनमध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याचा ताण पडत असल्यास व सिंचनाची व्यवस्था असल्यास त्वरित हलके सिंचन करावे.
👉 सोयाबीन ताण सहन करण्यासाठी 13:0:45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रति पंप वापर करावा.
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरण असल्याने सोयाबीनवर अळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
👉 ऊन धरलेल्या सोयाबीनवर फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी दुपारी फवारणी टाळावी.
👉 फवारणीमध्ये ताण पडलेला असल्यास फुलं वाढणाऱ्या किंवा दाणा मोठा करणाऱ्या संजीवकाचा वापर टाळावा.
👉 ओलावा योग्य असेल म्हणजे पाऊस पडला किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनवर अळीच्या नियंत्रणासाठी विटारा प्लस किंवा सिंजो वापरावे. बुरशीनाशकामध्ये नॅझो सुपर किंवा विसल्फ वापरू शकता. तसेच विद्राव्य खतामध्ये बिग बी किंवा 13:0:45 घेऊ शकता. योग्य ओलावा असेल तरच भरारी सारख्या संजीवकाचा वापर करावा.
👉 पांढरी माशी जास्त असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा ॲसिटामाप्रिड किंवा पांडा सुपर सुद्धा यात घेऊ शकता.
👉 काही ठिकाणी यलो मोझॅकमुळे काही झाडं पिवळी पडत आहे, ते झाडं सतत उपटत राहावी व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.
👉 या वर्षीच्या पेरणी नंतरच्या पावसाच्या खंडामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. खोड पोखरल्यामुळे शेंगा गळणे, शेंगा कमी लागणे, सोयाबीन पिवळं पडणे, झाडं सुकणे हे प्रकार सध्या काही ठिकाणी दिसत आहे. मात्र आता या अळीच्या नियंत्रणावर खर्च करून फारसा फायदा होत नाही. फक्त विद्राव्य खते फवारून वरच्या वर अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा. शेंगात दाणा भरतांना साधारणतः 60 दिवसा दरम्यान 0:52:34, नंतर 10 दिवसांनी 13:0:45 व शेवटी 10 दिवसांनी बिग बी अशा विद्राव्य खतांचा फवारणीतून किमान दाणा भरण्यास मदत होईल असे फवारे करावे.
👉 काही जागी लाल कोळ्याचा प्रादुर्भाव वाढल्याने पानं पांढुरके होऊन निस्तेज झाली आहे, अशा जागी सल्फर WDG थंड वातावरण असल्यास वापरावे.
🌱कापसाबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरणामुळे मावा, तुडतुडा भरपूर वाढला. ताण पडलेल्या भागात फुलकिडा सुद्धा वाढून पानं निस्तेज, पांढुरकी व कडक झाली आहे; तर कुठे पांढरी माशी सुद्धा वाढली आहे.
या रसशोषक किडींच्या एकत्रित नियंत्रणासाठी कमी कीड असल्यास तपूस किंवा नोव्हेक्ट हे कीटकनाशक व जास्त प्रमाण असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा रोनफेनचा फवारणीत वापर करावा.
👉 लाल कोळी व फुलकिडा किंवा दोन्हीपैकी काही असल्यास सोबत सल्फर डब्ल्यूडीजी 20 ग्रॅम वापरू शकता.
👉 गुलाबी बोंडआळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी बोंड लागण्यापूर्वी व लागलेल्या फुलांची तपासणी करा. पाकळ्या बंद असलेल्या फुलांमध्ये आळी असते ते तोडून नष्ट करा. पाते लागण्यापासून शेतात लाईट ट्रॅपचा वापर करा व प्रत्येक फवारणीत पाते लागल्यानंतर अळीनाशक आणि अमावस्या नंतरच्या फवारणीत अंडीनाशक सरेंडरचा अवश्य वापर करा.
👉 ज्या ठिकाणी कमी वाढ आहे तिथे पाण्याचा ताण असल्यास एक सरीआड सिंचन करावे. फवारणीत टॉपअप किंवा रिफ्रेशचा वापर करावा, ओलावा असल्यास खतांचा वापर करावा व ओलावा असल्यास शक्य असल्यास प्रति एकर अर्धा किलो एनपीके बूस्ट Dx, दीड लिटर रायझर अधिक तीन किलो 19:19:19 ची आळवणी करावी.
👉 पातेगळ अनेक कारणांमुळे होते त्यापैकी पातेआळीने दिलेल्या डंकामुळे असल्यास अळीनाशक फवारावे, ताण पडल्यामुळे असल्यास सिंचन करावे, नैसर्गिक असल्यास प्लॅनोफिक्स 4 मिली प्रति पंप फवारावे, अन्नद्रव्याच्या कमतरतेने असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.
👉 जमिनीत ओलावा असेल किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तरच रासायनिक खताचा वापर करावा, कोरड्यात रासायनिक खते देणे टाळावे.
👉 शेवटची डवरणी डवऱ्याला दोरी बांधून करून त्या तासात पुन्हा दोरी सोडून मोकळे डवरे चालवून माती मोकळी करावी.
👉 कापसाची उभाट किंवा जास्त वाढ होत असल्यास चार-साडेचार फुटावर कापसाचा शेंडा खोडावा. | 2 918 |
| 9 | https://youtu.be/dtwmqzUCRyQ | 2 495 |
| 10 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२६
🌦 हवामान अंदाज 🌦
👉 या आठवड्यात सुद्धा सध्या असलेल्या हवामानात फारसे बदल अपेक्षित नाही. कोणताही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने राज्यात सर्वत्र दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता या आठवड्यात नसून स्थानिक परिस्थितीनुसार दुपार नंतरचा विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो; ज्याचे प्रमाण पूर्व विदर्भात तुलनात्मक अधिक, पश्चिम विदर्भात मध्यम व राज्यातील इतर भागात कमी राहू शकते. तसेच राज्यात ऊन व ढग यांचा लपंडाव सम्मिश्र प्रमाणात राहू शकतो.
👉 पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे व गरजेनुसार करावा. सिंचनाची व्यवस्था असल्यास गरजेनुसार ताण पडण्यापूर्वी सिंचन करावे. जिथे शक्य आहे तिथे पिकांमध्ये अंतरमशागत करावी. काही काळ पाण्याचा ताण सहन करण्यासाठी 13:0:45 या विद्राव्य खताचा फवारणीत वापर करावा. शक्यतो फवारणीचे कामे भर उन्हात न करता सकाळी किंवा संध्याकाळी करावे ताण असलेल्या पिकांना खते देणे तूर्त टाळावे. | 2 561 |
| 11 | 838291 (1525×1950) | 3 070 |
| 12 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ.संभाजीनगर🔴
दिनांक: २४ ऑगस्ट २०२६
🌦हवामान अंदाज🌦
👉 सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी विदर्भात काही जागी विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित आठवड्यात हवामानात विशेष बदल नसून कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता राज्यात कुठेही नाही.
परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतरचा काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, तसेच ढग व ऊन असे मिश्रित वातावरण राहू शकते.
👉 सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा ताण बसण्यापूर्वीच पिकांना सिंचन करावे. पाण्याचा ताण बसल्यानंतर सिंचन केल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते. शक्य असल्यास पिकांवर ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:०:४५ या विद्राव्य खताचा फवारा द्यावा.
👉 शक्य असल्यास हलकी आंतरमशागत करत राहावी, ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. फवारणीची कामे ही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. दुपारी ऊन असल्यास फवारणीची कामे करू नयेत. फवारणीत जहाल कीटकनाशकांचा वापर करू नये.
👉 आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे २० लीटरच्या पंपाचे आहे. पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे. शक्यतो विषबाधा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. | 5 606 |
| 13 | بدون متن... | 5 550 |
| 14 | بدون متن... | 5 084 |
| 15 | بدون متن... | 4 468 |
| 16 | https://youtu.be/L3H3Mq6u08o | 6 793 |
| 17 | ➡️ तुरीची विरळणी व शेंडा खुडणी
योग्य अंतरावर दोन ओळींतील योग्य अंतर असेल तर तुरीची लागवड केली असल्यास दोन झाडांमधील अंतर योग्य ठेवण्यासाठी विरळणी करून दोन झाडांमध्ये १ ते २ फूट अंतर ठेवून इतर झाडे २५ दिवसादरम्यान उपटून टाकावीत. जे झाड ठेवले त्यांचे योग्य अंतर असल्यास शेंडे खुडावे. पहिले शेंडा खुडणी २५, दुसरी ५० व तिसरी ७५ दिवसाला करावी. दोनच शेंडे खुडण्या करायच्या असल्यास ३५ व ७५ दिवसादरम्यान कराव्यात. सोयाबीन-तूर पेरणी अंतर २ फोटांपेक्षा कमी असल्यास तुरीचे शेंडे खुडू नयेत.
➡️ तुरीमधील पिवळेपणा
तूर सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत पिवळी दिसते ते तिचे वैशिष्ट्य आहे, त्यासाठी फारसा खर्च करू नये. योग्य वेळी हिरवी होते. फारच पिवळेपणा वाढत असल्यास फक्त साधा १९:१९:१९ चा फवारा द्यावा.
➡️ वांझ रोगाला प्रतिबंधात्मक उपाय
भविष्यात तुरीवरील वांझ रोग रोखण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी एक-एक वेळा तुरीवर कोळीनाशक डायकोफॉल, ओमाइट, मॅजिस्टर, ॲबामॅक्टिन, इथेनॉल यासारख्या कोळीनाशकाचा प्रतिबंधात्मक फवारा द्यावा.
➡️ तुरीमधील इतर महत्त्वाच्या बाबी
👉 तुरीच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
👉 छाटणीनंतर पावसाळी वातावरण असेल तर शेंड्यावर बुरशीनाशकाचा फवारा द्यावा.
👉 पाने गुंडाळणाऱ्या अळीचा फारसा उपद्रव नसल्यास फवारणीची घाई करू नये.
👉 पेरणीसोबत किंवा दीड महिन्यापर्यंत कधीही तुरीला खताचा वापर करू शकतो.
👉 ट्रायकोडरमा सोबत शक्य असल्यास NPK बूस्ट DX किंवा चांगल्या जिवाणू खताचा वापर आळवणीमध्ये करावा. | 6 204 |
| 18 | ➡️ रस शोषक किडींचे नियंत्रण
यावर्षी हवामान हे रस शोषक किडीस अत्यंत पोषक असल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातही काळा मावा ही कीड काही जागी जास्तच प्रमाणात आहे. जेव्हा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा फवारणी करताना पूर्ण झाड ओले होईल असा फवारा द्यावा. शक्यतो पानांच्या मागच्या बाजूवर सुद्धा फवारणी जाईल असे फवारावे. शक्यतो फवारणीत स्टिकरचा वापर करावा.
एका फवारणीत सर्वच किडींचे पूर्ण नियंत्रण होणे शक्य नसल्यामुळे, औषध बदलून पुन्हा ८ ते १० दिवसांनी फवारणी करावी. फवारणीमध्ये लहान कापसावर मोनो, असिफेट, रिहांश पैकी एक अधिक लॅम्बडा-सायलोथ्रिन किंवा कराटे किंवा क्विनालफॉसचा वापर करावा. पाते-फुले लागलेल्या कापसावर ओढाची एक्स्ट्रा, एसएलआर किंवा त्यासारखे कीटकनाशक व त्यासोबतच सरेंडर, पांडा सुपर किंवा क्विनालफॉस याचा संयुक्तिक वापर करावा. फवारणीनंतर कीड नियंत्रित झाल्यावरही पाने सुधारण्याला काही वेळ लागत असतो.
➡️ कापसाची कमी वाढ
कमी ओलावा, जास्त कीड किंवा खतांचा जमिनीच्या सुपीकतेचा अभाव असल्याने काही जागी कापसाची अपेक्षित सुदृढ वाढ नाही. त्यासाठी फवारणीमध्ये रिफ्रेश किंवा टॉप अप यासारख्या संजीवकांचा वापर करता येतो. मात्र सुदृढ वाढीसाठी मुळांचे पोषण व अन्नद्रव्याचा पुरवठा तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यासाठी जमिनीतून एकरी अर्धा किलो जिवाणू खते NPK बूस्ट DX, १.५ लिटर रायझर किंवा तत्सम व गरज असल्यास ३ किलो १९:१९:१९ ची प्रति एकर आळवणी सुद्धा करावी, ज्यामुळे सुदृढ व सर्वांगीण वाढीस मदत होईल. या सोबतच संतुलित खतांचा वापर करावा. ताण बसत असल्यास ठिबक, तुषार किंवा एक सरी आड पाटपाणी द्यावे.
➡️ संतुलित खतांचा वापर
कापसाला थोडे थोडे पण सारखे सारखे खत पेरून किंवा कोरून द्यावे. साधारणतः पेरणीसोबत २५ दिवसाला, ५० दिवसाला व ७५ दिवसाला अशी खतांची मात्रा ४ भागात विभागून द्यावी
👉 लागवडीबरोबर: भरपूर १०:२६:२६, ८:२१:२१, ९:२४:२४ किंवा DAP अधिक पोटॅश.
👉 २५ दिवसाला: आधी कमी दिले असल्यास, यापैकी एक अधिक युरिया व सल्फर WDG २ किलो.
👉 ५० दिवसाला: फक्त युरिया किंवा युरिया उपलब्ध नसल्यास अमोनियम सल्फेट किंवा २०:२०:०:१३ व स्फुरद अधिक पालाश या अगोदर कमी दिले असल्यास DAP अधिक पोटॅश किंवा १०:२६:२६ असे द्यावे.
👉 ७५ दिवसाला: अगोदर स्फुरद-पालाश योग्य प्रमाणात दिले असल्यास फक्त युरिया द्यावा.
➡️ गुलाबी बोंडआळीचे नियंत्रण
गुलाबी बोंड आळीच्या नियंत्रणासाठी त्रिसूत्री राबवावी:
👉 प्रथम कापसाला फुलांची सुरुवात झाल्याबरोबर फुले तपासून त्यातील डोमकळ्या किंवा आळी असलेले फुले तोडून नष्ट करावीत.
👉 पाते-फुलांना सुरुवात झाल्यावर लाईट ट्रॅपचा वापर अवश्य करावा.
👉 अमावास्ये नंतर ४ दिवसाच्या आत सरेंडर अंडीनाशकाचा किंवा त्यानंतर आळीनाशकाचा प्रत्येक फवारणीत वापर या तीन गोष्टी अवश्य कराव्यात.
➡️ दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धत
दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धतीमध्ये ५० दिवसा दरम्यान कापसाची योग्य वाढ असल्यास खोडापासून १ इंचावर गळफांदी छाटावी. गळफांदीवर उपफांद्या असतात, ती आकाशाकडे वर वाढते व पहिल्या कांड्याला पात्याऐवजी पान असते. ती ओळखून खालच्या १-२ किंवा ३ गळफांद्या कापून घ्याव्यात.
➡️ तणनाशकांचा वापर
कापसामध्ये तणनाशकांचा जास्त वेळा किंवा अतिरेकी वापर करू नये. त्यामुळे कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतात. गरज असेल तरच जमिनीत ओलावा असतानी एखाद्या वेळेस योग्य प्रमाणात वापर करावा. शक्यतो निंदण, अंतरमशागतीला जास्त प्राधान्य द्यावे.
➡️ कापसामध्ये इतर महत्त्वाच्या गोष्टी
👉 शेवटच्या डवरणीला दोरी बांधून डवरणी करून तासातील माती मोकळी होण्यासाठी पुन्हा तासात डवरणी करावी.
👉 सिंचन करायचे असल्यास एक सरी आड किंवा ठिबकने हलके सिंचन करावे.
👉 फवारणीमध्ये गरज असेल तेव्हाच संजीवकांचा व बुरशीनाशकांचा वापर करावा, विनाकारण वापरून खर्च वाढवू नये.
👉 सुदृढ वाढ असल्यास पाते-फुलांसाठी झेप किंवा फॅन्टॅक प्लस वापरावे, एखाद्या फवारणीत एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा.
👉 बजेट असल्यास खतासोबत रायझर व जिवाणू खतांचा वापर करावा.
👉 फवारणीमध्ये शक्यतो रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास बेस्टिकर किंवा चांगल्या स्टिकरचा अवश्य वापर करावा.
🌱तुरीबद्दल माहिती🌱
➡️ खोडावरील डाग फायटोप्थोरा व मर
यावर्षी खूप लवकरच तुरीच्या खोडावर डाग पडून तूर मरत किंवा सुकत आहे. त्याला तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी खोडावर व जमिनीवर रिडोमिल गोल्ड (मेटलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब) या संयुक्त बुरशीनाशकाचा ४० ग्रॅम प्रतिपंप असा दाट फवारा द्यावा. त्यासाठी रासायनिक नियंत्रण महत्त्वाचे आहे. मात्र प्रतिबंधात्मक फायटोप्थोरा व फ्युजॅरियम मर रोखण्यासाठी ट्रायकोडरमा किंवा ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलोची आळवणी करावी. जास्त मर होत असल्यास शेतात ही आळवणी दोन वेळा सुद्धा करू शकता. | 5 028 |
| 19 | 🟢श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला🟢
🌱सोयाबीनबद्दल माहिती🌱
या वर्षीच्या अनियमित पाऊस, कीड रोगास पोषक हवामान व एकंदरीत विपरीत परिस्थिती यामुळे काही ठिकाणी हे पीक संकटात आहे. व वेगवेगळ्या वेळेत पेरणी झाल्याने वेगवेगळ्या अवस्था व परिस्थितीत पीक असल्याने गरजेनुसार उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
➡️ कमी पाऊस
काही ठिकाणी अजूनही पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हलक्या जमिनीत पिके दुपारी ऊन धरत आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल त्यांनी लगेच हलके स्प्रिंकलर किंवा जोड ओळ पद्धतीने सोड ओळ पद्धतीने पाणी द्यावे. ताण पडत असलेल्या पिकाला हलकी अंतरमशागत करावी. शक्य असल्यास पिकावर पाण्याचा किंवा १९:१९:१९ चा फवारा द्यावा. अशा पिकांमध्ये फवारणी करताना साधे अळीनाशक वापरावे व दुपारची फवारणी टाळून सकाळी लवकर किंवा ४ वाजेनंतर फवारणी करावी. ताण पडत असलेल्या सोयाबीनवर जास्त फुले काढणाऱ्या संजीवकांचा फवारा शक्यतो देऊ नये.
➡️ कमी वाढ
काही जागी विविध कारणांमुळे सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही, अशा सोयाबीनला वाढीसाठी रिफ्रेश किंवा टॉप अप किंवा इसाबियान आणि टाटा बहार अशा संजीवकाचा फवारणीत वापर करावा. शक्यतो कमी वाढ असलेल्या सोयाबीनवर जास्त फुले लागणाऱ्या संजीवकाची संजीवकांची फवारणी करू नये.
➡️ खोडाळी व चक्रीभुंगा
यावर्षी खोड अळी व चक्रीभुंग्याचे प्रमाण अपेक्षे पेक्षा प्रमाण जास्त आहे. खोडात गेलेल्या अळ्यांच्या नियंत्रणाचा फारसे मागे लागून विशेष फायदा होत नाही. फक्त यापुढे नुकसान टाळण्यासाठी रावडी, सिंजो, विटारा प्लस अशा अळीनाशकांचा फवारणीत वापर करावा. जास्त प्रादुर्भाव असलेल्या पिकात सतत विद्राव्य खतांचा पीक अवस्थेनुसार वापर करावा.
➡️ पिवळेपणा (येलो मोझॅक) व लीफ रिन्कल व्हायरस
पाण्याचा ताण, पाणी साचणे, खोड अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्याने पिवळे पडलेल्या ठिकाणी १९:१९:१९ चा फवारणीत वापर करावा. चुनखडी किंवा पांढऱ्या जमिनीत पिकावर झिंक ईडीटीए व फेरस ईडीटीए प्रत्येकी २० ग्रॅमचा फवारा द्यावा. येलो मोझॅक किंवा लीफ रिन्कल व्हायरस असल्यास अशी झाडे उपटून व्हायरस पसरवणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी चांगले कीटकनाशक किंवा ओढाची एक्स्ट्रा ४० मिली फवारावे.
➡️ अळ्यांचे नियंत्रण
सध्या सोयाबीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आहेत. यासाठी उत्कृष्ट अळीनाशके आलटून-पालटून वापरावीत, ज्यामध्ये रावडी २० मिली, सिंजो १२ मिली, विटारा प्लस ४० मिली किंवा मस्केट ४० मिलीचा वापर आलटून-पालटून करावा. व अळीचा प्रादुर्भाव जास्त किंवा सोयाबीनची दाटणी जास्त झाली असल्यास या सोबतच पांडा सुपर किंवा धुरीजन्य क्रिया असलेले कीटकनाशक घ्यावेत. काहींना या मुळे फुले गळतील असे वाटते, मात्र योग्य प्रमाणात वापरल्यास फुले गळत नाहीत.
➡️ रोगांचे नियंत्रण
सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांमध्ये एरिअल लीफ ब्लाइट म्हणजे वरचे पान एकदम भाजल्यासारखे होणे हा रोग किंवा सर्वच रोगांसाठी नॅझो सुपर २० मिली किंवा करपा, तांबेरा, लीफ स्पॉट या रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विसल्फ ५० ग्रॅम किंवा प्रोपिको २० मिली किंवा सुखई हेक्झाकोनाझोल ४० मिलीचा प्रति पंप वापर करावा.
➡️ संजीवकांचा व विद्राव्य खतांचा योग्य वापर
ताण पडलेल्या पिकावर शक्यतो संजीवकाचा वापर करू नये. कमी वाढ किंवा कमी फुटवे असल्यास टॉप अप ५० मिली किंवा इसाबियान ५० मिली अधिक १९:१९:१९ फवारणीत घ्यावे. योग्य वाढ व पुरेसा ओलावा असल्यास व फुलांची अवस्था असल्यास झेप किंवा फन्टॅक प्लस १५ ते २० मिली अधिक १२:६१:० फवारणीत वापरू शकता. चलप किंवा शेंगा भरणे अवस्थेमध्ये भरारी किंवा डबल अधिक १३:०:४५ किंवा बिग बी याचा वापर करू शकता.
➡️ सोयाबीन मधील इतर महत्त्वाच्या बाबी
सोयाबीनला फुले लागल्यानंतर शक्यतो तणनाशकांचा वापर टाळावा, तसेच अंतरमशागत सुद्धा शक्यतो करू नये. मात्र ताण पडलेल्या पिकात हलकी अंतरमशागत करावी. तण मोठी असल्यास उपटावी किंवा निंदण करावे, मोठ्या तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळावा.
* फूल व दाना भरणे या नाजूक अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास सिंचन करावे. जास्त वाढ होत असल्यास प्रोपिको किंवा प्रोपिकोनाझोल २५ मिली फवारणीत घ्यावे.
* हुमणी अळीची सुरुवात असल्यास ओलाव्यात जैविक कीटकनाशक मेटारायझियम १ लिटर अधिक बिव्हेरिया १ लिटरचा एका एकरात आळवणी करावी.
* बोरोनच्या कमतरतेमुळे पाने खरबड किंवा वेडीवाकडी झाल्यास त्यावर बोरोन २० ग्रॅम फवारणीत वापरावे.
➡️ चारकोल रॉट व फायटोप्थोरा
शेतात काही खरगे किंवा पॅचेस अचानक पिवळे पडून खोड खालच्या बाजूला तांबडे-लाल होऊन झाड सुकत असल्यास हे चारकोल रॉट किंवा फायटोप्थोराचे लक्षण आहे. अशा भागात व त्याच्या आजूबाजूला मेटलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब म्हणजे रिडोमिल गोल्ड अशा बुरशीनाशकाचा खोडावर व जमिनीवर दाट फवारा द्यावा. प्रमाण वाढत असल्यास सर्व शेतात हे फवारावे.
🌱कापसाबद्दल माहिती🌱 | 4 291 |
| 20 | https://youtu.be/Qe1URJFIL7c | 3 556 |
