es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Ir al canal en Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Mostrar más
7 508
Suscriptores
-424 horas
-227 días
-10130 días
Archivo de publicaciones
photo content

👆👆●Indian satellites and Sensors characteristics👇👇
👆👆●Indian satellites and Sensors characteristics👇👇

●Electro-magnetic Spectrum Remote SENSING-MIV(Microwave,Infrared,Visible range of energy used in RS)-Not x-ray Visible range-
●Electro-magnetic Spectrum Remote SENSING-MIV(Microwave,Infrared,Visible range of energy used in RS)-Not x-ray Visible range-(400-700nm)(Q150 2019)

●Elements of visual interpretation
●Elements of visual interpretation

photo content

●Basic concept of Remote sensing
●Basic concept of Remote sensing

11th NCERT (Practical work in geography) Ch.7 P.NO. 101
11th NCERT (Practical work in geography) Ch.7 P.NO. 101

Q 149 2019 2.8 a Fundamental of Remote sensing ●Image and False color composite 👇👇👇
Q 149 2019 2.8 a Fundamental of Remote sensing ●Image and False color composite 👇👇👇

*⭕️For Remote Sensing* NCERT मधील कामाचे फोटो 👇👇👇👇
*⭕️For Remote Sensing* NCERT मधील कामाचे फोटो 👇👇👇👇

⭕️For Descriptive Paper
⭕️For Descriptive Paper

⭕️CSAT QUALIFY बद्दल मला माहीत नाही. (हे कोणालाच माहीत नसते.) मी ज्योतिषी पण नाही. दुसरीकडे संपर्क करावा. ⭕️अभ्यासाशी संबंधित
⭕️CSAT QUALIFY बद्दल मला माहीत नाही. (हे कोणालाच माहीत नसते.) मी ज्योतिषी पण नाही. दुसरीकडे संपर्क करावा. ⭕️अभ्यासाशी संबंधित message करावे. मी नक्की Reply देईन.

⭕️नवीन विद्यार्थ्यांनी आमच्या चुकातून शिकावे येवढीच अपेक्षा आहे, प्रत्येक चूक स्वतः करून आमच्यासारखे 5 वर्ष MPSC मध्ये नका घा
⭕️नवीन विद्यार्थ्यांनी आमच्या चुकातून शिकावे येवढीच अपेक्षा आहे, प्रत्येक चूक स्वतः करून आमच्यासारखे 5 वर्ष MPSC मध्ये नका घालवू. एवढाच उद्देश वरील CSAT बद्दल लिहण्याचा आहे.

अशा पद्धतीने मी स्वतः मध्ये Improvement केली. माझा पेपर सोडवण्याचा क्रम: 1-Decision Making-(5-7 मिनिट Max) 2-Translation नसलेले उतारे(15 मिनिट) 3-Easy असलेले Maths and Reasoning चे Question(हे Practice ने समजते.) 4-राहिलेले 8 उतारे.(15 मिनिट-2 उतारे (काही english मधून काही मराठी मधून. English मधून नक्की फायदा होतो. जास्त english समजत नाही त्यामुळे double meaning आपण काढत नाही त्यामुळे.) 5-राहिलेले Maths and Reasoning चे Question ⭕️To Conclude: -वेळ लावून आयोगाचे पेपर नक्की solve करा. -त्याचे नीट analysis करा. -पूर्व परीक्षा Pass होण्यासाठी CSAT शिवाय पर्याय नाही. आणि CSAT ला PRACTICE शिवाय दुसरा पर्याय नाही. -अभ्यास करताना CSAT ला 50% TIME दोन-तीन महिने नक्की द्या. (फ्रेश TIME द्या, झोपेत CSAT ची PRACTICE नका करू.) -PRACTICE+ANALYSIS फ्रेश असताना करा. पेपर 3-5 या वेळेत सोडावा.* -महेश चोबे (3 MPSC MAINS:2018-19-20) ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️CSAT विषयी काय करावे? (पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने केले तरी चालेल.) -CSAT चे मार्क्स हे दोन गोष्टीवर अवलंबून असतात: 1-Attempt 2-Accuracy -CSAT मध्ये (130-150+)या Range मध्ये मार्क्स मिळू शकतात. ⭕️Year-Cut off-CSAT Avg Score(जे pre pass झाले) 2017-189-110(60% of cut off) 2018-247-145+(60% of cut off) 2019-197-110+(60% of cut off) 2020-203.5-110+(55% of Cut off) याचा अर्थ CSAT शिवाय PRE निघणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात.) ⭕️मग CSAT साठी काय करावे? 1-CSAT=PRACTICE हे कायम लक्षात असू द्या. 2-आयोगाचे झालेले Papers(2020-2013) स्वतः एकदा time न लावता सोडावा,त्याचे स्वतः analysis करा. ज्ञानदीप च्या book मधून analysis पाहून घ्या. 3-काही Gap नंतर परत वरील activity time लावून करा. 4-CSAT चा अभ्यास फ्रेश time मध्ये करा. दुपारी efficiency कमी झाल्यावर CSAT चा अभ्यास करणे योग्य नाही. फक्त WEEK मधून दोनदा 3-5 या वेळेत TIME लावून पेपर सोडवा पण PRACTICE आणि त्या पेपर चे ANALYSIS फ्रेश TIME लाच करा. (मी सकाळी 8 वाजता घड्याळात 3 चा TIME SET करून CSAT चा अभ्यास करायचो. FEEL पण येतो आणि जो विषय आपल्याला PASS करणार आहे त्यावर COMMAND पण येते. लक्षात असू द्या आपल्याला परीक्षा PASS करायची आहे, FEELING नाही घ्यायची.) 5-आयोगाचे पेपर सोडवून झाल्यावर प्रत्येक Class चे 3-4 पेपर time लावून सोडावा. (शक्यतो Analysis दिलेले classes चे पेपर सोडावा. सरस्वती झेरॉक्स पुणे वर सगळ्या classes चे पेपर मिळतात.) (कमीत कमी 20 पेपर नक्की सोडावा तुम्ही नवीन असाल तर, अगोदर pre pass असाल तर classes चे पेपर नका सोडवू.) 6-Maximum पेपर time लावून सोडवल्यावर तुम्हाला स्वतःला समजेल की कोणता Part अगोदर exam मध्ये घ्यावा जेणेकरून attempt वाढेल. (हा एकमेव उद्देश पेपर time लावून सोडवायचा असावा.) ⭕️उताऱ्या विषयी- -पूर्ण उतारा वाचूनच 5 च्या 5 question solve करा. आणि सर्व Question एकाच वेळी Circle करा. Q1 चे उत्तर Q5 मध्ये असू शकते. प्रत्येक Question वाचून परत passage नका वाचू otherwise attempt होणार नाही. -उतारा अवघड आहे की सोपा हे त्यावर विचारलेल्या Question वरून ठरते, त्यामुळे एकदाच उतारा वाचून सगळे Question पहा आणि जे लगेच जमेल ते Question पेपर वर मार्क करा, एखादा Question नसेल जमत तर परत उतारा नका वाचू. (परत उतारा वाचायला 3-4 मिनिट लागतात.) -दोन उतारे 15 मिनिट असा वेळ द्यावा. ⭕️Maths and Reasoning: -आयोगाचे झालेले पेपर आणि त्यात आलेले प्रश्न व त्या स्वरुपाची examples ची Practice करा. (R. S Agrwal मधून वेगवेगळ्या परीक्षेत आलेले फक्त Question एकदा स्वतः Solve करा.) -जेवढा जास्त सराव, तेवढे जास्त speed हा rule इथे लागू होतो. -वरील section सोडवताना Rule of 30 Seconds apply करा. (Thanks To Pranil Gilda Sir... या मुळे माझा स्वतःचा attempt 80 व्हायला लागला.) (एखादा problem 30 second मध्ये समजत नसेल तर तो लगेच skip करून पुढे जा.) ⭕️Decision Making: -प्रश्नात तुम्ही कोण आहात याला circle करा. तुमच्या Jurisdiction च्या बाहेरील Option cut करा. -राहिलेल्या Option मध्ये जिथे भारी keyword(गोंडस)ते उत्तर जास्त मार्क्स साठी असू शकते. समंजसपणा CSR NGO Involvement सबळ कारण सन्मान भारतीय संविधानाला धरून असलेला option सर्वेक्षण जागरूकता अशा गोष्टी कडे लक्ष द्या. -सगळ्यात महत्वाचे Over thinking नका करू, Over thinking always leads to negativity. जे पहिल्यांदा योग्य वाटेल तेच उत्तर असते. ⭕️माझा अनुभव... -2016 ला माझा attempt 42 होता मला 52 मार्क्स होते. (आयोगाचे पेपर न सोडवल्याने आणि Maths and Reasoning मध्ये Rule of 30 Second apply न केल्याने.) -2017-46 Attempt-55 मार्क्स (Practice काहीच केली नव्हती. स्वतःला CSAT खूप भारी येतंय असं मला वाटायचं. 10th चे maths चे 95/100 आणि 12th चे 96/100 मार्क्स यामुळे तसं वाटायचे तसेच Engineering चे Maths चे 80+ मार्क्स ) (पण CSAT आणि ENGINEERING याचा संबंध नाही. हे नंतर समजले.) -2018-74 Attempt-155 मार्क्स: आयोगाचे सगळे पेपर 3 वेळा TIME लावून सोडवले CLASSES चे 30-40 पेपर TIME लावून सोडवले दररोज सकाळी 3-4 तास Maths and Reasoning ची Practice केली. पेपर वेळी Rule Of 30 Second चांगला लक्षात ठेवला -2019-63 Attempt-117 मार्क्स 2018 ला चांगले मार्क्स आले म्हणून Practice केली नाही. फक्त आयोगाचे पेपर 2 वेळा सोडवले -2020 80 attempt 132.5 मार्क्स आयोगाचे पेपर एकदा सोडवले होते. एका ठिकाणी Maths and Reasoning व Decision making(आयोगाचे पेपर)यासाठी lecture घ्यायचे म्हणून प्रत्येक Question कमीत कमी वेळेत कसा सोडवता येईल यासाठी Practice केली होती. आणि त्यामुळे 80 attempt झाला.(काही Question Logically eliminate करून solve केले) 🙏महेश चोबे🙏 @MPSC_EXAMORIENTED

⭕️तुम्ही Polity चे किती पण बाप असू द्या तरीपण दररोज रात्री 2 तास Mains होईपर्यंत Laxmikanth book वाचायचे. 👉(Laxmikanth च वाचायचे जरी बाकीचे book किती पण भारी असले तरी.) (GS-II ला 110+ मार्क्स पाहिजे असतील तर.)

⭕️वरील Rule apply करून Study करा.2 तास एक विषय, एक तास Current, मग दोन तास अजून काही तरी असा प्रकार नका करू. ⭕️एक टार्गेट स्व
⭕️वरील Rule apply करून Study करा.2 तास एक विषय, एक तास Current, मग दोन तास अजून काही तरी असा प्रकार नका करू. ⭕️एक टार्गेट स्वतःला द्या आणि ते तडीस घेऊन जा. ⭕️MPSC च्या परीक्षा आणि News पेपर Reading याचा काडीचा ही संबंध नाही. Newspaper Reading हा अभ्यासाचा भाग नाही. Newspaper च्या नावाखाली time pass करू नये. (तुमचा view वेगळा असू शकतो.) ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

photo content

⭕️आकाश लिगाडे सर यांचे मराठी चे पुस्तक Descriptive पेपर साठी एकदा नक्की पाहणे. यामध्ये खूप चांगले निबंध दिलेले आहेत. Descriptive पेपर मधील मराठी हा Part त्यामध्ये Cover होतो. ⭕️मित्राचे घेऊन एकदा नक्की पाहून घ्या, नक्की फायदा होईल. 👇👇👇👇👇

*🛑राज्यसेवा मुख्य 2020* मराठी-इंग्रजी descriptive paper साठी मी केलेल्या सुधारणा. (यासाठी मला मा.अजय नष्टे सर, उपजिल्हाधिकारी आणि मा.मनोहर भोळे सरांनी मार्गदर्शन केले होते.) माझे या पेपरचे मार्क्स असे होते. वर्ष- मराठी+ इंग्रजी = एकुण 2017- 21+21=42 2018- 29+23=52 2019- 30+29=59 👉 सुरुवातीला मी UPSC ची तयारी करीत होतो त्यामुळे बऱ्याचदा विश्लेषणात्मक निबंध लिहायचो, सादरीकरणाकडे फारसं लक्ष नसायचं. अजय सरांनी हा फरक समजावून सांगितला की हा पेपर भाषेचा आहे त्यामुळे लिखाणात भाषिक कौशल्ये, शुद्धलेखन, सादरीकरण याला महत्त्व आहे. 👉लिखाणामध्ये सर्व विरामचिन्हांचा वापर केला (आपण एरव्ही पुर्णविराम सोडून दुसरं काही वापरतच नाही.) 👉 सुरूवात करण्यासाठी, शेवटी वापरण्यासाठी काही नेहमीच्या निबंध विषयांशी निगडित काही कविता, अभंग, श्र्लोक हे संग्रही ठेवणे. अगदी जुनी मराठी गाणी, गझल, पोवाडे यांतील पदंही वापरू शकतो. ( यामध्ये थोडंसं निवडक असावं आपली कविता, श्र्लोक खूप common नको.. जसं की यावेळी शेतकरी प्रश्नावर निबंध आला होता तर प्रत्येकाच्या निबंधात त्याच त्याच मोजक्या कवितांच्या ओळी होत्या, यामध्ये वेगळेपण दाखवता आलं पाहिजे. मी 'मला माणसाला शोधायचं आहे' या निबंधात 'वाट एकाकी तमाची हरवलेल्या माणसाची' ही 'हे सुरांनो चंद्र व्हा' या नाट्यगीतातील ओळ वापरली होती.) 👉 इंग्रजी मध्ये आपलं फारसं वाचन नसतं त्यामुळे फार common quotes आपण निबंधात वापरतो त्यापेक्षा एखादी short story, anecdote वापरणे हे करु शकतो सुरुवात करण्यासाठी. (Pal and Suri च्या पुस्तकातील sample essay नक्की अभ्यासावेत. हेच मराठीसाठी मो. रा. वाळिंबे मधील निबंध पहावेत.) 👉 इंग्रजी निबंध लिहिताना साधी सोपी भाषा वापरणे जेणेकरून व्याकरण विषयक फारशा चुका होणार नाहीत (किमान डोळ्यात भरतील अशा चुका आणि spelling mistakes प्रकर्षाने टाळावे) 👉 निबंधात कुठलंही पुन्हा सांगतो कुठलंही भडक, एकांगी किंवा उथळ विधान वापरु नये, मग विषय कुठलाही असो काही विषय संवेदनशील असतात जसं की २०१७ चा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि जातीय राजकारण किंवा २०१९ चा शेतकरी प्रश्नावरील निबंध इ. अशा वेळी आपण भावनिक होऊन चालत नाही, नेहमी लक्षात ठेवा हा भाषेचा पेपर आहे आपल्या विश्लेषण क्षमतेचा नाही. साध्या सोप्या भाषेत लिहावं. (काही जणांचं मत वेगळं असु शकतं याबाबत ) 👉 निबंधाचा विषय निवडताना ज्यामध्ये फारशी आकडेवारी, विश्लेषण हे न येता जास्तीतजास्त आपल्या भाषिक कौशल्यांचा कस लागेल असा निवडला तर चांगलं होतं हा माझा व्ययक्तीक अनुभव आहे. (2019 ला मी मराठी मध्ये 'मला माणसाला शोधायचे आहे' आणि इंग्रजी मध्ये 'pleasures of friendship' हे विषय निवडले होते.) 👉 भाषांतर हा घटक वाळिंबे सरांच्या पुस्तकातील samples अभ्यासुन करू शकतो (new edition) 👉 सारांश लेखन साठी वाळिंबे सरांच्या पुस्तकातील नियम व्यवस्थित वाचावेत आणि samples अभ्यासावेत. इंग्रजी साठी pal and Suri किंवा internet वरुन samples वाचावेत. 👉 सारांश हा घटक पहिल्या पेजवर असतो त्यामुळे तो व्यवस्थित लिहावा, नियम पाळावे, अक्षर व्यवस्थित असेल याकडे लक्ष द्यावे आणि शुद्धलेखन किंवा spelling mistakes टाळाव्यात. 👉 सादरीकरणाला खूप महत्त्व द्यावे. पेपरला जाताना स्केलपट्टी, घेऊन जावी शिर्षकाला underline करणे, box करणे, प्रश्र्न लिहुन झाल्यावर त्याखाली रेष ओढणे हे करू शकतो. फक्त यामध्ये अतिरेक नको. 👉सराव खूप महत्त्वाचा आहे. मेन्सच्या काळात दोन्ही भाषांचे किमान 7-8 पेपर(किमान निबंध तरी) सोडवावेत, यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका वापरू शकतो. हे पेपर तपासून घेणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय सुधारणा कळणार नाहीत मला अजय नष्टे सर आणि मनोहर भोळे सरांनी प्रत्येकी ३-४ निबंध तपासून दिले होते. (तुम्ही यासाठी चांगले गुण सातत्याने येणारे seniors आणि चांगले मार्गदर्शक यांची मदत घेऊ शकता. काही जण तर class पण घेतात यासाठी, अगदीच गरज असेल तर तेही करू शकता.) 👉 बरेच जण या पेपरला गृहीत धरून चालतात पण तसं करू नये मेन्सच्या काळात आठवड्यात एक दिवस यासाठी नक्की द्यावा, सातत्य खूप महत्त्वाचे आहे. फक्त या पेपरमुळे काहीजण जण निवडयादीच्या बाहेर पडतात. काहींची गट अ पोस्ट हुकते, तेव्हा काळजी घ्यावी. (मी माझ्या अनुभवानुसार हे लिहीतो आहे, यात काही उणीवाही असु शकतात तेव्हा इतर अधिकाऱ्यांचेही या विषयावरील मत जाणून घ्या आणि त्यानुसार strategy plan करा.) सर्वांना शुभेच्छा 💐💐💐 -निरंंजन कदम (निवड- तहसीलदार, गट अ, राज्यसेवा २०१९) ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️एक GS किती दिवसात करायचा? 👉Civils की तैयारी Syllabus देखकर की जाती है, time देखकर नही| (Same apply to all mpsc exams.) 👉एक GS Complete करूनच पुढचा सुरु करायचा.