en
Feedback
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Open in Telegram

Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Show more

📈 Analytical overview of Telegram channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (@life_lessons_learning) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 540 subscribers, ranking 10 699 in the Education category and 22 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 540 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -110 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 58.73%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 540
Subscribers
-1024 hours
-337 days
-11030 days
Posts Archive
आयुष्याच्या डायरीत काही क्षण असे असावेत की ज्यावेळी फक्त आणि फक्त मनोमन कृतज्ञता वाटली पाहिजे .. आपण आहोत त्याबद्दल,आपल्याकडे असणाऱ्या माणसांबद्दल आणि वेळेबद्दलही आणि संधीबद्दलही… माणसाच्या जगण्याला अभिशाप आहे सदैव रडण्याचा,तक्रार करण्याचा .. पण यापलीकडे जाऊन आपण जगतोय ते आयुष्य (not about पद,पैसा,प्रतिष्ठा) म्हणजे धडधाकट हातपाय ,जग पाहायला डोळे ,ऐकायला कान ,हाक मारायला आपलं माणूस ,सदैव पाठीमागे असणारे वडील,देवाकडे आपल्यासाठी मागणारी आई,सुखदुःखात साथ देणारे मित्र मैत्रीण.. यातली प्रत्येक गोष्ट महागडी आहे आणि यातलं काहीही आपल्याकडे असेल तर आपण नशीबवान आहोत असं म्हणत मनोमन कृतज्ञ वाटलं पाहिजे .. जगण्याचा भाग झाली पाहिजे ही कृतज्ञता .. सोप्पं नक्कीच नाही पण आयुष्य सोप्पं करेल एवढं नक्की..✨💯⚡️

महसुल विभागाला शासकीय वसुलीचे उद्दिष्ट दिले जातात.नियमित पदस्थापना मिळाल्यानंतरचा वसुली हा विषय पहिल्यांदा हाती आला यावर्षीच्या वसुलीमे आयुष्यासाठी महत्वपूर्ण असा आशादायी अनुभव दिला. तो म्हणजे -31 मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र टाकायचे नाहीत लढाई कितीही अवघड असली तरीही … वर्षभर हे वसुली टार्गेट achieve च होऊ शकत नाही याच confidence मध्ये असणारे आम्ही ..जेमतेम first class तरी मिळावा यासाठी शर्तीचे प्रयत्न सर्व टीमचे सुरु होते .. ३० मार्चला संध्याकाळी ५५% टक्क्यांवर असणारे आम्ही..फार धावपळ करत इकडून तिकडून फॅालोअप घेत होतो,उम्मीदे जिंदा थी. आणि शेवटच्या काही तासात दोन तीन मोठ्या प्रकल्पाच्या रक्कमा ३१ मार्च अखेर भरुन घेत केवळ first class च नाही तर थेट शंभरीच पार केली.. पंचावन्न टक्क्यांवरून १०७% वर जातांना विचार करा कसा अनुभव असेल…”अशक्य ते शक्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे” याचप्रमाणे “मेहनत तो करनी पडेगी” या टॅगलाईनवर काम करायला सांगणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांपासून ते अपेक्षित चेकची वाट पाहत बॅंकेचे दरवाजे अडवून बसलेले मामलेदार ते गाव पातळीवर जमीन महसुल गोळा करणारा ग्राम महसूल अधिकारी यांच्या सर्वांच्या टीमवर्कमधून अशक्य वाटणारं स्वप्नं पूर्णत्वास जाऊ शकले ..केवळ टीमवर्कमुळे.. आयुष्यभर शेवटपर्यंत आशा आणि प्रयत्न सोडू नये who knows god has already planned something great असाच हा प्रशासकीय अनुभव होता.✨ विचार करा की जर उद्दिष्टच मोठ्ठं दिलं नसतं तर दमछाक करत का होईना क्षमतांचा शोधही कसा लागला असता बरं .? स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी कधीतरी अशक्य स्वप्न पाहावं लागतं किंवा कुणीतरी ते अशक्य स्वप्न आपल्याला पाहायला तरी लावावं लागतं .. That’s why Aim High , Work Hard Grateful for this important lesson ✅ Life lessons through office work🌿💯

आपल्याला आपलाच वाटणारा आपला आत्मविश्वास हा केवळ आपला नसतो .. त्याला आत्मविश्वासाला खतपाणी घालणारे अनेक ज्ञात अज्ञात लोक आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत असतात आणि आपल्या आत्मविश्वासाला दृढ करुन टाकतात.अशी माणसं परिसापेक्षा कमी नाहीत.ती आवर्जून धुंडाळावी जगण्याच्या या धावपळीत.🌿💯

काल यवतमाळ महोत्सवमध्ये दोन तहसीलदार मैत्रिंणीसोबत प्रत्येक स्टॅालला भेट देत होतो. महिला बचतगटांच्या स्टॅालवर रेंगाळणं,काही खरेदी करणं माझं आवडीचं काम..पुण्याच्या भीमथडी जत्रेची आठवण झाली.. असचं एका स्टॅालवर थांबलो परसबागेत रोप लावण्यासाठी देशी बियाणे घेऊ लागलो पाहिजे ते बी घेऊन पैसे देतांना हळूच त्या स्टॅालधारकाला विचारले बी लागेल ना नक्की..? नाहीतर आम्ही घ्यायचो अन् बी उगवायचेच नाही त्यावर तो म्हटला ,”मॅडम अशी शंका नसते घ्यायची ,तणावरहित बिनधास्त लावुन टाकायचं ,उगवतं बरोबर..शंकाखोर वृत्तीनेच माणसाचं खूप नुकसान केलंय “ माझ्या एका प्रश्नावर त्याने पाजलेला हा डोस मलाही पटलाच.. परवाच एका मैत्रिणींशी बोलतांना चर्चा झाली… आयुष्यात अनिश्चिततेच्या काळात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्यता असतात पण आपल्या मनात जास्त जागा व्यापते ती नकारात्मकता..कारण सकारात्मकतेचं सुपीक पीक त्याच त्याचं उगवत नाही.. नकारात्मकतेचं तण मात्र काही न करता फोफावते अगदी शेतातल्या तणासारखं.. सकारात्मक शक्यता मनात रुजवायला प्रयत्नपूर्वक प्रयत्न लागतात.. नकारात्मक विचारांना वेळोवेळी खोडावं लागतं तर आणि तरचं सकारात्मकतचे सुपीक पीक तरारुन फुलतं… भविष्याची अनिश्चितता मनाला सैरभैर करेल तेव्हा तेव्हा आपल्याला optimistic राहता आलं पाहिजे कारण ते वाटतं तेवढं सोप्पं नाही पण शक्य आहे आणि आवश्यकदेखील.. माझा एका गोष्टीवर खूप जास्त विश्वास आहे ,देव/नियती द्यायला तयार आहे ,तू माग तरी खर मनापासून.. आणि बऱ्याचदा मागायलाच आपण कमी पडतो कारण तेच सकारात्मकतेच बीज कमी पडतं ना.. बऱ्याच सेल्फ हेल्प बुक्समधूनही हेच सांगायचा प्रयत्न केला जातो… सकारात्मकता अगदी सहज रुजवता आली असती तर सगळं जग किती आनंदी असतं पण तसं नाहीये . कारण सकारात्मकता efforts मांगती है बॅास … जे efforts घेता त्यांना कधी नाराज नाही करत नियती/देव.. So Efforts should be High✨💯🌿

कंबाईन मुख्यची तयारी करणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींसाठी ✅ Balance of GS and Language is very important ✅Active Reading should be there in order to avoid Silly mistakes ,प्रश्न वाचतांनाच कळावे ✅वेळ लावून Question paper solving महत्वाचे कारण तर आणि तरच आपली temperament build होईल ✅ 45 दिवसाचे अचूक नियोजन असावे,किमान तीन रिव्हीजनचे नियोजन ✅मागचे कटॲाफ्स डोळ्याला समोर दिसेल असे असावे ,मोबाईल /स्टडी डेस्क ✅Positive Selt-talk and Affirmations Everyday ✅ पूर्व ते मुख्यचा प्रत्येक दिवस तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ताकतीचा आहे याची जाणीव ठेवून utmost discipline and consistency #It's the possibility of having a dream come true that makes life interesting"

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर योग्य माणसं मिळणं हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही .. जर असं होतं असेल तर god is expecting something great from you .. त्यासाठी झिजता आलं पाहिजे आपल्याला ✨ God’s plan is always bigger than ours 🌿

विदर्भातल्या रखरखत्या उन्हाचा चटका सहन करत चैत्रपालवीचा बहर आलेली झाडं माणसालाही आयुष्याच्या उन्हाचा दाह सहन करुन चैतन्यपूर्ण
+3
विदर्भातल्या रखरखत्या उन्हाचा चटका सहन करत चैत्रपालवीचा बहर आलेली झाडं माणसालाही आयुष्याच्या उन्हाचा दाह सहन करुन चैतन्यपूर्णचैत्रपालवीची वाट पाहण्याचा संयम तर शिकवत नसतील ना..? निसर्ग खर्या अर्थाने जगण्याची कला शिकवतो.🌿

जबाबदारी घेणारी माणसं कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप गरजेची आहेत म्हणून जबाबदारी घेणार्या माणसांच कौतुक वाटतं नेहमी ✨💯 #Be the one who takes responsibility.💯

Women’s day special #letter to women aspirants 💯 झोकूनी आशा चालत रहा तू ✨
Women’s day special #letter to women aspirants 💯 झोकूनी आशा चालत रहा तू ✨

गोष्ट Aspirant A आणि B ची.. आपण कुठे आहोत? नक्की ऐका. #खणखणीत आवाजात झणझणीत अंजन बघा पटलं तरच घ्या !

आज बरोबर तीन वर्षांपूर्वी याच वेळी निकालाची पीडीएफ आली होती.. अख्खी वनामती गुलालात न्हाऊन निघाली.. “स्वप्नपूर्ती”ची ती पीडीएफ एका नव्या आयुष्याची नांदी सोबत घेऊन आली. प्रशासकीय ओळखीसोबतच स्वप्नपूर्तीचा अद्वितीय आनंद आयुष्यात घेऊन ती संध्याकाळ अजून मनाच्या गाभार्यात जपून ठेवली आहे .. कठीण काळात टिकून राहणं ,सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अट्टाहास तडीस नेता आल्याचे आभाळभर आत्मिक समाधान देणारा दिवस.. आयुष्याच्या डायरीतील काही खास क्षणांपैकी एक.. #Forever Grateful for Fabulous February🌿🙏💯

15 दिवसांनंतर हा मेसेज पाहण्यात आला आज.. खूप समाधान वाटतं कुणी असे निकाल कळवले की .. मागच्या काही महिन्यात चॅनेलला ॲक्टीव्ह र
15 दिवसांनंतर हा मेसेज पाहण्यात आला आज.. खूप समाधान वाटतं कुणी असे निकाल कळवले की .. मागच्या काही महिन्यात चॅनेलला ॲक्टीव्ह राहणं जमलं नाही पण आता पुन्हा नव्याने सुरुवात करु.. नियमित संवाद ठेवूयात.. जमेल तशी मदत करायला नक्की आवडेल.!

Hello Dear All कसे आहात.? काल राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लागला आहे ,पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐 आज दुपारी दोन वाजता Question Answer सेशन घेऊयात. प्रश्न असतील तर कमेंट बॅाक्समध्ये टाकून ठेवा..

पुणेकरांनी अभ्यासातून थोडी उसंत काढून जायला हरकत नाही असा कार्यक्रम💯👍
+3
पुणेकरांनी अभ्यासातून थोडी उसंत काढून जायला हरकत नाही असा कार्यक्रम💯👍

एखादं स्वप्न पाहतांना फार मनापासून पाहावं लागतं …त्यात कसले किंतू ,परंतु आणायचे नसतात..डोळस विचारांनी पाहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होतात त्यासाठी स्वतःवरती विेश्वास ठेवायलाही जमलं पाहिजे ..Until n unless आपली कष्ट घेण्याची तयारी आहे तोवर कसलीच चिंता करायची नाही . जे हातात नाही त्याचा विचार न करता हातात जे आहे त्यात १००% द्यायचे ,आपले प्रयत्न बघून बेस्ट देते नियती .जीवापाड प्रेम करता आलं पाहिजे आपल्या स्वप्नावर💯❤️

आज खूप दिवसांनी एक अप्रतिम मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला .. आज पाहिलेला चित्रपट भूतकाळातल्या अनेक आठवणी ताज्या करुन गेला .. चित्रपटाचे नाव “ क्रांतीज्योती विद्यालय “ मराठी माध्यम “.. चित्रपटाबद्दल सांगायला खरचं शब्द कमी पडतील..खिळवून ठेवणारी कथा ,विचार करायला लावतील असे संवाद आणि आपल्या अनेक मित्र मैत्रिणींची आठवण होईल असे कलाकार आणि सर्वात महत्वाचे चित्रपटाचा आणि त्या शाळेचा प्राण असणारे शिर्के सर पाहून तर मला माझ्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेत असणारे सर्व शिक्षक झरझर डोळ्याखालून गेले …खरंच आपणही मराठी किंवा सेमी मिडीयमच्या शाळेत शिकलो तर आपल्या आयुष्यात काहीच बिघडलं नाही ,उलट जाणिवा जीवंत असणारी पिढी म्हणून आपल्या पिढीची ओळख आहे ती मराठी शाळांमुळे …बाईंना फुल /गजरा आणण्यासाठी लागलेलीचढाओढ,श्रमदान ,गॅंदरिग,परीक्षेनंतर होणारी समोसा पार्टी ,शाळेच्या बाहेर मिळणारे बोरकुट,वाढदिवसाच्या दिवशी युनिफॅार्म सोडून रंगीत कपडे घालण्याचा आनंद (जो मला कधीच मिळाला नाही ),विविध स्पर्धा अन् त्यांची तयारी ….आयुष्यातल्या सुवर्णकाळ डोळ्यासमोरुन तरळत होता आणि त्या त्या वेळच्या साथीदारही…अभ्यासाची गोडी लावणार्या शाळेचे आणे शिक्षकांचे मानावे तेवढे आभार कमीच .. चित्रपटातील “स्वर्गात आकाशगंगा “ हे समुहगीत पाहून खरचं किती मागे सोडून आलो शाळा असचं वाटून गेलं क्षणभर .. आयुष्याच्या वाटेवर चांगल्या शाळा आणि शिर्के सरांसारखे दर्जेदार शिक्षक मिळाले नसते तर खरचं आयुष्य खरंच आजच्यासारखं सुकर असतं का.? खचलेल्या मनाला उभारी देणाऱ्या ,स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार्या आणि छोट्या शाळेतून मोठी स्वप्नं पाहून नानाविध क्षेत्रातील दिग्गजांना घडविण्यामागे मराठी शाळा आणि हाडाचे शिक्षक आहेत हे विसरुन चालणार नाही . जगण्याच्या या अवघड परीक्षेत टिकून राहण्याचे,स्वतःच्या क्षमता ओळखण्याचे आणि त्यातून स्वतः सिध्द करण्याचे बाळकडू देणाऱ्या सर्व शाळांना आणि शिक्षकांना सलाम आणि चित्रपट हे समाज मनाचा आरसा असतात हे हुबेहुब उतरवणाच्या अन् गहिरवलेल्या मनाला नवी उभारी देणाऱ्या सर्व टीमलादेखील मानाचा मुजरा.. #नक्की पाहावा असा चित्रपट

Joy of little things 🌼🍀 भव्यदिव्य लखलखत्या यशात आपला पणतीसारखा वाटा 🌟 हेही नसे थोडके ✨ “असाध्य ते साध्य करिता सायास कारण अ
+2
Joy of little things 🌼🍀 भव्यदिव्य लखलखत्या यशात आपला पणतीसारखा वाटा 🌟 हेही नसे थोडके ✨ “असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे “

बहुप्रतिक्षित निवड यादी आली .. नावापुढे पदाच लेबल आलं.. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटलेल्या Hardcore Aspirant साठीचा सोनियाचा दिनु वगैरे.. अभ्यासातून अधिकारी होण्याकडचा प्रवास इथे सुरु होतो.. आपल्या पदामुळे आपल्या आईवडिलांना जो आनंद होतो तो शब्दातीत.. आजच्या निकालात पदावर शिक्कामोर्तब झालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐