en
Feedback
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Open in Telegram

Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Show more

📈 Analytical overview of Telegram channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (@life_lessons_learning) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 540 subscribers, ranking 10 699 in the Education category and 22 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 540 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -110 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 58.73%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 540
Subscribers
-1024 hours
-337 days
-11030 days
Posts Archive
Today's session at 7.30 2025 mains paper discussion

Today’s session has been cancelled due to administrative reason. We will continue tomorrow 7pm.

Today’s session at 7.15 pm

Please put your questions here.! Session at 7pm Today Telegram Voicechat .

नमस्ते मंडळी कसे आहात.? आजचा कसा गेला.? आजचा पेपर बघून जरा चक्रावले असालाच दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचं दिव्य कठीण होतांना दिसतयं . या सगळ्यात सर्व नव्या जुन्या मित्र मैत्रिणींसाठी पुन्हा उभं राहावसे वाटते . बदलेल्या परीक्षा पध्दतीमुळे माझ्या strategy किती work होतील ते माहित नाही पण aspirant phase मध्ये टिकून राहण्यात नक्कीच मदत करता येईल. दर आठवड्याला तुमचा कान होता येईल. कधीकाळी केलेल्या upsc च्या अभ्यासातून कळालेल्या दोन गोष्टी शेअर करता येतील. सुरु करत आहोत आयुष्याच्या डायरीचा नवीन उपक्रम “Talk with Aspirants” स्वरूप - आठवड्यातून किमान तीन दिवस १ तास aspirants सोबत संवाद विषय- 1.स्पर्धा परीक्षा FAQs, 2.Do’s and Don’t , 3.महत्वाच्या विषयांचे orientation session , 4.PYQ analysis 5 Question Answer Session 6 required mindset etc वेळ-दर सोमवार मंगळवार बुधवार सकाळी साडेसात वाजता ७.३० उद्याचे मात्र पहिलेच सत्र असल्याने आणि आता उशीरा कळवल्याने पहिले सेशन उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता होईल . ( इतर दिवशी काही कारणास्तव बदल झाल्यास चॅनेलवर कळविण्यात येईल) उद्देश - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना moral support देणे ,परीक्षेविषयी clarity मिळवण्यास मदत करणे ,Study techniques शेअर करणे . भेटूयात मग उद्या संध्याकाळी सात वाजता.. #असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे .!

उद्या होणार्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐 All the very best to all of you✨ Calm and composed Mindset and Temperament✅

तब्बल तीन महिन्यांच्या गॅप नंतर पुण्यात यायचा योग आला.. कालच पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता.. वाघोली-खराडी बायपास-येरवडा करत ट्रॅव्हल्स धावत होती. ही नावं ऐकूनच मला जाग आली आणि मन भूतकाळात धावलं. मागचं संपूर्ण वर्ष २०२५ मी या मार्गांवर माझं रोजचं येणं जाणं होतं.. पुणे फक्त शहर नसून माझ्यासाठी एक भावना आहे .. स्पर्धा परीक्षेचे स्वप्न घेऊन याच स्पर्धा परीक्षा पंढरीत एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून येणं. आयोगरुपी पांडुरंगाने भरभरून पदरात दान टाकावी तशी हवी ती पदं टाकली .. या सगळ्यात माझा दगडूशेठ बाप्पा नेहमी सोबतीला होता . मला अजूनही आठवते २०१८ साली नगरपरिषद TAO च्या परीक्षेत थोडक्यात निकाल हुकला म्हणून मी त्याचेकडे पहिल्यांदा रडले होते ,नंतरही प्रत्येक यशापयशातील साथीदार तो होताच..नुसतं माझ्यासाठीच नाही तर उदयसाठीही वेळोवेळी त्याच्याकडे जायचे आणि तो प्रयत्नांना यश द्यायचा.. नंतर याच स्वप्ननगरीत प्रशासनाचे पहिले धडे शिकण्याची संधी मिळाली .. ज्या शहरात तयारी केली त्या शहराचा सुध्दा चार्ज महिनाभर सांभाळायला मिळाला.शनिवारवाड्याच्या दिमाखदार महाराष्ट्र दिनाचे नियोजन करता आले.. आयुष्याचा जोडीदार म्हणून ज्याला निवडले त्याच्या सोबतच्या संस्मरणीय आठवणींने भरलेले शहर पुणे.. परिविक्षाधीन कालावधीत मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खूप काही करता आले..भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले .. सदाशिव पेठ ,JP library ,मेस ,रुम पासुन सुरु झालेला प्रवास प्रांत ॲाफिस,कलेक्टर ऑफिस,आयुक्त कार्यालय,क्वार्टर ,गाडी ,बैठका इथे पर्यंत या पुण्यातच झाला आणि आता सासर म्हणून पुन्हा पुण्याला आश्रय दिला.. केवळ मीच नव्हे तर माझ्यासारख्या अनेकांना पुण्याने भरभरून दिले. इथल्या रस्त्यावरून नुसतं फिरुन आलं तरी आठवणींची पानं चाळली जातात. विदर्भाच्या ४५ डिग्री उष्णलाटेतून पुण्याच्या नंदनवनात आल्यावर दुसरे काय होणार .? मन हे पाखरासारखे जुन्या पानांवर रेंगाळते अन् मनोमन कृतज्ञता ओसंडून वाहते पुणे इज ❤️💕✨🌟

“स्वप्नाळू आणि धडपडणारी” तरुणाई राष्ट्रांच, कुटुंबाच भवितव्य आहे. परवाच्या दिवशी चॅनेलवर हा मेसेज मी टाकला होता, एका रेग्युलर स्टुंडटने मेसेज केला. “मॅडम, तुम्ही पास होऊन २-३ वर्ष झाली तरी तुम्हाला Aspirant साठी काहीतरी लिहाव ,करावे वाटणे हे फार विशेष आहे यावर त्यावेळी मी त्याला विशेष उत्तर देऊ शकली नाही. परंतु आज निवांत यानिमित्ताने विचार केला. दोन प्रसंग नवे नमुद करावे वाटतात —पहिला प्रसंग सोमवारी, युवासंवाद कार्यक्रमातील IFoS यांचे सत्र संपल्यानंतर मी माझ्या केबिनकडे निघाले. जिन्यात एका विद्यार्थ्याने मला विचारले, “मॅडम, पुढचे सत्र ठीक वेळेवर सुरु होईल की थोडे लेट होईल .? मी म्हटले वेळेवर होईल तुम्ही कुठून आलात? त्यावर त्याने सांगितले, “मॅडम, मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एका खेड्यातून आलो.” वणी ..? त्याचे उत्तर ऐकून मी थोडं थक्क झाले, कारण वणी म्हणजे जवळजवळ चंद्रपूरची सीमा. एवढ्या शेवटच्या टोकावरून तो मुलगा यवतमाळ वणीच्या रणरणत्या उन्हात एका सत्रासाठी येतोच ,मला त्याचे मनोमन कौतुक वाटले.गावातील कृषी केंद्रात पार्ट टाइम जॅाब करत तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोः दुसरा प्रसंग कालचा, कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे ॲाफिसला जाण्याआधी Hospital ला भेट दिली. मी मास्क लावलेला, तरीपण एक मुलगी धावत माझ्याकडे आली. “पुनम मॅडम ना? मी आयुष्याच्या डायरीची रेग्युलर फॉलोअर आहे. मी या हॉस्पिटलमध्ये Part time जॉब करते, दुपारनंतर सुट्टी झाली की मी इथे लायब्ररीमध्ये अभ्यास करते.”यवतमाळ तालुक्यातील एका खेड्यातून रोज शहरात येऊन नोकरी करून तिची मेहनत सुरू आहे. या प्रवासात तिला दोन मेन्ससुद्धा दिल्या आहेत. वरील दोन्ही प्रसंगातून आपल्याला समजते, परिस्थितीसमोर हार न मानता, मोठी स्वप्नं पाहणारी आणि स्वप्नांसाठी झिजणारे Aspirant पिढ्यांपिढ्या श्रीमंतीचा वारसा मिरवणाऱ्या spoon feeding generation पेक्षा नक्कीच सरस ठरतील. “स्वतःची ओळख” निर्माण करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची वृत्ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे, शिवाय यात तक्रारीचा सूर नाही की प्रतिकूलतेचे भांडवल नाही. आहे फक्त मनाशी ठेऊन दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वप्नांचा ठाव आणि मेहनतीचे भांडवल. परिस्थितीपुढे न झुकणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या सर्व Hardcore Aspirant नक्कीच माझं एवढंच सांगणं आहे की :— — सावलीत बसून पुन्हा वाचणं आयुष्यातील तुमच्या संघर्षापुढे नक्कीच सोप्पं आहे. तुमच्यातील जिद्द,चिकाटी नक्कीच तुम्हाला नक्कीच यशाचा मार्ग दाखवतील. फक्त तुम्ही परिस्थितीसमोर give up करू नका कारण तुमच्या प्रवासातून उद्या तुमच्या सारख्या अनेकांना पुढचा मार्ग सापडणार आहे . जोपर्यंत जिंकत नाही तोवर मैदान सोडायचं नाही दोस्तांनो. आज दहावीचा निकाल लागला ,माझे दहावीचे एक सर नेहमी हा शेर म्हणायचे “ खुदी को कर बुलंद इतना, कि खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है" अगदी याप्रमाणे आपल्याला स्वतःला बुलंद करायचे आहे.. तुमचा दिवस नक्की येईल जसा आमच्यापैकी अनेकांचा आला तसाच.. #kudos to your struggle and hardwork

आयुष्याच्या डायरीची पाळेमुळे महाराष्ट्रभर रुजली आहेत याचा अनुभव जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खरचं मनापासून समाधान वाटतं .. शनिवारी रविवारी गावी लग्नाला गेले तिथे एकजण भेटला आपल्या डायरीचा सदस्य आणि सध्या कुठल्यातरी सरकारी नोकरीत.. काल कलेक्टर सरांकडे महत्वाच्या विषयात सुनावणीसाठी गेली तर बाहेर waiting area मध्ये एकजण भेटला,मला भेटायला आले आणि मीच समोर दिसल्यावर त्यांना खूप आनंद झाला .भावाच्या लग्नाची अगदी हक्काने पत्रिका देत आमंत्रित केले तसेच डायरीवरील रिलेट होणाऱ्या गोष्टींबाबत मनापासून अभिप्राय दिला.. आज दुपारी माझ्याच जिल्ह्यातील परंतू नोकरीनिमित्त यवतमाळ येथे नुकताच रुजू झालेला एक सदस्य भेटला.. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्या सर्वांशी इतके दृढ संबंध झालेत याचे छान वाटते. साधारण दोन ते अडीच वर्ष सातत्याने तुमच्या संपर्कात होते मध्ये काही दिवस तेवढे सातत्य नव्हते परंतु नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावेसे वाटते डोक्यात आयडिया सुध्दा आहे बघूया लवकरच घेऊन येते कारण तुमच्याशी जोडण्यासाठी सातत्याने संवाद हा हवाच .🔜✨🌟

From Self doubt To Proving Yourself… ऐन उमेदीच्या दिवसात आपण स्पर्धा परीक्षेला करियर निवडतो खरंतर निवड करणं सोप्पं असतं पण दर दिवशी त्या निर्णयाला योग्य ठरवणं मात्र जिकिरीचं असतं . डोंगराएवढा सिलॅबस,जीवघेणी स्पर्धा,बोटावर मोजाव्या इतक्या जागा .अनिश्चितता या सगळ्यात आपण टिकणार का.? हा प्रश्न अगदी साहजिक.. काल परवा युवासंवाद कार्यक्रमानंतर एका मुलाने हा प्रश्न विचारला,”मॅडम तयारी सुरु केली तेव्हा Self Doubt तर आलाच असेल ना.?” मन थोड भुतकाळात गेलं ..एवढे विषय,एवढी पुस्तक,परीक्षेची काठिण्य पातळी , मातब्बर स्पर्धक इत्यादी सुरुवातीच्या काळात कावरे-बावरे होतोच आपण पण याचं उत्तर कशात आहे तर आपल्या शिस्तीत,सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नात . आपली sincerity आपल्याला अभ्यासाचा आवाका समजून सांगायला मदत करते. आपली consistency डोंगर्याएवढ्या सिलॅबसला छोट्या छोट्या तुकड्यात विभागून टाकते.. आपली शिस्त आपल्याला सोशल मिडियाच्या झगमगाटापासून आणि फेक मोटिवेशनपासून दूर ठेवते.. आपली इच्छाशक्ती बारा चौदा तास एका जागी बसून अभ्यास करवून घेते. आपली सदसदविवेकबुध्दी परीक्षेला इमोशनली न बघता स्कोअरच्या आकड्यात आपल्याला समीकरण जुळवायला शिकवते.. बरं एवढं करुनही लगेचच यश मिळेल असं नाही .. अपयशाचाही पाहूणचार पदरी पडतोच पण केवळ अपयशाला कुरवाळून जमत नाही ,आत्मपरीक्षण करावे लागते ,चुकांचा मागोवा घ्यावा लागतो आणि प्रयत्नपूर्वक सुधारणा करावी लागते . बर्याचवेळा संघर्ष इतका लांबतो की आपल्या स्वप्रतिमेस तडाखे बसू लागतात,आपण आपलं सामाजिक अस्तित्व नाकारून अलिप्तता प्रेफर करु लागतो .दर महिन्याला लागणाऱ्या मेसच्या पैशाच गणित जुळवत जुळवत नाकी नऊ येऊ लागतात.मोठी स्वप्नं पोटापाण्यासाठीच्या नोकरीवर येऊन सुद्धा थांबतात पण म्हणतात ना शर्यत जिंकण्याच्या अंतिम टप्प्यात जास्त असहाय वाटतं तसाच हे सगळं … आणि मग slow but steady म्हणत म्हणत वर्षामागून वर्ष संपतात पण हातातलं पुस्तक ,मनातील जिद्द आणि लायब्ररीची वेळ सुटत नाही . आणि मशिनप्रमाणे सेट झालेल्या रुटीन दिवसासारखाच तो एक दिवस असतो पण तो दिवस आपली सगळी मेहनत फळाला लावतो .. चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल २०२२ रोजी राज्यसेवा २०२० परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि जून २०१७ ते एप्रिल२०२२ अशा प्रदीर्घ संघर्षाला यशाच लेबल मिळालं होतं.. कमालीचा असतो तो एक दिवस .. वर्षानुवर्षे ज्या दिवसासाठी आपण झुरलो आणि झिजलेलो असतो त्या सर्व क्षणांना आनंदाश्रूत भिजवणारी दिवस. आईवडिलांच्या डोळ्यात अभिमान पाहण्याची आसुसलेल्या डोळ्यांचे पारणे फिटणारा क्षण.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे SelfDoubt च्या चारी मुंड्या चित करुन मी स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं म्हणत Self Confidence ला मिळालेला बूस्टर डोस… आयुष्यात जेव्हाही कधी self doubt वाटेल ना तेव्हा आयुष्याच्या डायरीतील लहानपणापासूनचे असेच छोटे मोठे वर्तुळ आठवायचे.. लहानपणी सायकल चालवतांना पोटात धस्स व्हायचे पण नंतर तीच सायकल आपण सुसाट पळवायचो तसंच काही या स्पर्धा परीक्षेच.. पण त्यातल्या मधल्या कसोट्या फार कस लावणार्या असतात एवढं मात्र नक्की .. त्यात टिकता आलं पाहिजे✨💯

Repost from N/a
आज अनेक ग्रामीण विद्यार्थी मोबाईलवर वेळ घालवतात, तुलना करतात, स्वतःला कमी समजतात. अशा प्रत्येक विद्यार्थ्याने हेमकृष्ण यांची कथा ऐकायला हवी. कारण त्यांनी सिद्ध केले की यशासाठी महागडे शहर, मोठी ओळख किंवा मोठे पैसे लागत नाहीत. लागते ती जिद्द, शिस्त आणि स्वप्नासाठी वेड. “ज्याच्याकडे कारणं जास्त असतात, त्याच्याकडे यश कमी असतं.” “ज्याच्याकडे जिद्द जास्त असते, त्याच्याकडे इतिहास असतो.” “थकलात तर थोडं थांबा, पण थांबून जाऊ नका.” आज हेमकृष्ण पिसदे हे एका गावाचे नाव नाहीत, तर संघर्षातून यश मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाचे प्रतीक आहेत. चिचेवाडा गावातून निघालेला हा तरुण आज हजारो विद्यार्थ्यांना सांगतो — “मी करू शकतो, तर तुम्हीही करू शकता.” आणि म्हणूनच आपल्या युवा संवादातील दुसरे वक्ते, आपल्या मातीतून घडलेले अधिकारी, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे दीपस्तंभ..... हेमकृष्ण पिसदे सर!

Repost from N/a
हेमकृष्ण पिसदे — आपल्या मातीतला विद्यार्थी, संघर्षातून घडलेला अधिकारी, आणि युवा संवादातील प्रेरणेचा दुसरा वक्ता. हेमकृष्ण पिसदे यांची यशोगाथा ही केवळ एका विद्यार्थ्याची कथा नाही, तर ग्रामीण भारतातील लाखो स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची प्रेरणादायी कहाणी आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचेवाडा या छोट्याशा गावातून निघालेला हा तरुण आज UPSC सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवून हजारो विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे. मर्यादित साधने, साधी पार्श्वभूमी, ग्रामीण परिस्थिती आणि संघर्षमय जीवन या सगळ्यांवर मात करत त्यांनी सिद्ध केले की, यशासाठी शहराची गरज नसते, गरज असते ती मोठ्या ध्येयाची आणि अटळ जिद्दीची. हेमकृष्ण यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटुंब म्हणजे मेहनत, कष्ट, संयम आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची सवय. लहानपणापासून त्यांनी घरातील संघर्ष जवळून पाहिला. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात आर्थिक चढउतार असतात, कधी पाऊस तर कधी दुष्काळ, कधी उत्पन्न तर कधी नुकसान. पण या सर्व गोष्टींनी त्यांना खचवले नाही, उलट आयुष्यात मोठं काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. गावात शिक्षण घेत असताना त्यांनी अनेकदा अशा अडचणी अनुभवल्या ज्या शहरातील विद्यार्थ्यांना कदाचित कधीच समजणार नाहीत. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, स्पर्धा परीक्षांची माहिती कमी, अभ्यासासाठी संसाधने मर्यादित, इंग्रजीची भीती, आणि स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका — पण या प्रत्येक अडथळ्याला त्यांनी संधी बनवले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुढे वाटचाल केली. शिक्षण घेत असतानाच त्यांचा कल UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वाढू लागला. त्यांनी समजून घेतले की प्रशासनात जाऊन समाजासाठी मोठे काम करता येते. गावातील, शेतकऱ्यांच्या, वंचितांच्या समस्या जवळून पाहिलेल्या असल्यामुळे अधिकारी होऊन बदल घडवण्याची त्यांची इच्छा अधिक दृढ झाली. UPSC ची तयारी म्हणजे संयमाची परीक्षा असते. दिवसाचे अनेक तास अभ्यास, वर्तमानपत्र वाचन, नोट्स, टेस्ट सिरीज, मुलाखत तयारी, मानसिक ताण आणि अनिश्चित भविष्य — हे सर्व प्रत्येक UPSC विद्यार्थी अनुभवतो. हेमकृष्ण यांनीही हे सर्व अनुभवले. पण त्यांची सर्वात मोठी ताकद होती सातत्य. ते एक-दोन प्रयत्नांमध्ये यशस्वी झाले नाहीत. अनेकदा अपयश आले. काहीवेळा अगदी थोडक्यात संधी हातातून गेली. २०२३ मध्ये ते फक्त ८ गुणांनी अंतिम यादीतून बाहेर राहिले. एखाद्या विद्यार्थ्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. अनेकजण येथे हार मानतात, स्वतःला दोष देतात, स्वप्न सोडून देतात. पण हेमकृष्ण यांनी अपयशाला शेवट मानले नाही. त्यांनी त्या अपयशातून धडा घेतला. “पराभव म्हणजे संपणे नाही, तर पुन्हा उभं राहण्याची संधी आहे.” त्यांनी आपल्या चुका शोधल्या, अभ्यास पद्धती सुधारली, मानसिक ताकद वाढवली आणि पुन्हा तयारी सुरू केली. शेवटी त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय ८४९ वा क्रमांक मिळवून यश मिळवले. हे यश अचानक आले नाही; ते हजारो तासांच्या मेहनतीचे, अनेक वर्षांच्या संयमाचे आणि न हार मानणाऱ्या वृत्तीचे फळ होते. यापूर्वी त्यांनी MPSC मधूनही यश मिळवले होते. Labour Officer आणि तहसीलदार यांसारख्या पदांवर त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली. म्हणजेच त्यांनी राज्यसेवा आणि केंद्रीय सेवा दोन्ही ठिकाणी स्वतःचे सामर्थ्य दाखवले. हेमकृष्ण पिसदे यांची कथा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. कारण अनेक ग्रामीण विद्यार्थी स्वतःबद्दल कमीपणा बाळगतात. त्यांना वाटते की UPSC ही फक्त शहरातील, इंग्रजी माध्यमातील किंवा श्रीमंत विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. पण हेमकृष्ण यांनी सिद्ध केले की हे चुकीचे आहे. “गाव लहान असलं तरी स्वप्न मोठं असू शकतं.” “परिस्थिती गरीब असू शकते, पण विचार श्रीमंत असले पाहिजेत.” “यश त्यालाच मिळतं, जो स्वतःवर विश्वास ठेवतो.” ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कथेतून काही मोठे धडे मिळतात: १. परिस्थिती नव्हे, निर्णय भविष्य घडवतो घरची परिस्थिती कशीही असो, निर्णय मोठा असेल तर भविष्य बदलू शकते. २. अपयशाला घाबरू नका UPSC/MPSC मध्ये अपयश येणे सामान्य आहे. पण प्रयत्न थांबवणे ही खरी हार आहे. ३. सातत्य ठेवा दररोज थोडा अभ्यास केला तरी सातत्य ठेवल्यास मोठा परिणाम होतो. ४. स्वतःवर विश्वास ठेवा लोक काहीही बोलतील. पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर यश जवळ येते. ५. मार्गदर्शन घ्या, पण मेहनत स्वतः करा कोचिंग, क्लास, शिक्षक मार्ग दाखवतात; चालायचे मात्र स्वतःलाच असते. हेमकृष्ण यांची कथा ही फक्त स्पर्धा परीक्षेची नाही, तर जीवनाची शाळा आहे. त्यांनी दाखवले की शांतपणे, सातत्याने, निष्ठेने केलेली मेहनत एक दिवस मोठे फळ देते.

पुस्तकांनी घडवलेले मस्तक कधी कुणाचे हस्तक होत नाही आणि एक दिवस असा येतो की सगळे जग त्यासमोर नतमस्तक होते . डॅा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे “ तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक खरेदी करा कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल” योग्य वेळी योग्य माणसं सर्वांनाच मिळणं दुर्मिळ असू शकतं परंतु योग्य वेळी योग्य पुस्तक मात्र ठरवून करता येण्यासारखी गोष्ट आहे .. पुस्तक माणसाला घडवतात या थिअरीवर आजही प्रचंड विश्वास आहे आणि राहील.. आमच्या सोसायटीच्या पार्किंगमधील एका चार चाकीच्या मागे लिहिलं आहे “पर्याय आहे ..शिक्षण” अगदी तीन शब्दात परिस्थितीला दिलेले उत्तर. आणि या शिक्षणात सुद्धा पुस्तक आली. अनेकदा पुस्तक वाचतांना आपल्याला आपण गवसतो.. आत्मविश्वास गमावून बसलेल्या मनाला पुन्हा लढण्याची उभारी मिळते .. वास्तवाचे भान आणि स्व चा शोध सोप्पे करणारे निःस्वार्थ मित्र म्हणजे पुस्तके .. लहान असतांना तीन रुपये ला मिळणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकापासून ते आज स्वतःच्या पगारातून किंमतीचा विचार न करता खरेदी करता येणाऱ्या सर्व पु्स्तकांनी भरभरून दिलं.. आयुष्याच्या वाटेवर तुम्ही दिलेलं दान सदैव जगण्याची ओंजळ समृद्ध करत राहील यात शंका नाही . #जागतिक पुस्तक दिन स्पेशल #कृतज्ञ✨

रणरणत्या उन्हात पाणवठा असा घामाघूम चेहऱ्यावर तुषार जसा पानगळीतील चैत्रपालवी अशी रोजच्या जगण्यातील उमेद जशी अस्तित्वासाठी लढाई
+3
रणरणत्या उन्हात पाणवठा असा घामाघूम चेहऱ्यावर तुषार जसा पानगळीतील चैत्रपालवी अशी रोजच्या जगण्यातील उमेद जशी अस्तित्वासाठी लढाई जरी रोजची माय-बाप अन् भावंड धरी छाया मायेची वाघापासून वाचण्याचे रोजचे कसब तरीही जगण्यात मात्र आहे वेगळीच जरब जंगलाचे राजे नसले म्हणून काय झालं पदरी पडलं ते आयुष्य मनमुराद जगणं .? हेच तर नसेल जंगलाच माणसाला सांगणं ..?

यवतमाळ शहरात आणि जिल्ह्यात तयारी करणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.✨⚡️
यवतमाळ शहरात आणि जिल्ह्यात तयारी करणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.✨⚡️

Repost from Uddesh's blogs💌
#uddeshblogs OPTOUT का ?🌿 एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर. उरतात ४ हजार रुपये गणिताचा पदवीधर आहे मी हा हिशोब अजून लागलेला नाहीय माझी डिग्री काय कामाची. पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय ३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर. शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय. बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी. आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं. एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते… ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे.. आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂 ©उद्देश