en
Feedback
मराठी जोक्स Marathi jokes 😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

Open in Telegram

मराठी/हिंदी जोक्स and mems 𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧- @Marathi_joke_bot कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या. 😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊

Show more
4 067
Subscribers
No data24 hours
+167 days
+3530 days
Posts Archive
गणेशोत्सव मधील सूक्ष्म निरीक्षण.... तुमचा मुलगा अचानक .... प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला . . तर समजावं की...... . . . . . . . . . . तुमची होणारी सून आरतीला आलेली आहे! 😂😂😂😂😂😂😂

हसा चकटफु लग्नाला ४० वर्षे पूर्ण होणार म्हणून, पोरांनी पुन्हा लग्न करण्याचा घाट घातला.. त्यासाठी हॉल बुक करुन सगळं साग्रसंगीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याचे योजीले. मी या गोष्टीला कडाडून विरोध केला नि म्हणालो,"लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तेच पैसे, माझ्या व हिच्या जॉईन्ट अकाउंटला टाका व वारस म्हणून नातवाचं नाव टाका!" पण पोरं हट्टालाच पेटली होती, ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. माझी कुचंबणा होत होती, ही मात्र शांत होती. अचानक सौ. म्हणाली, "४० वर्षांनंतर पुन्हा लग्न लावायचा घाट घालतच असाल तर माझी तयारी आहे, पण मी या माणसाशी पुन्हा लग्न करणार नाही!" घरात पीनड्रॉप शांतता पसरली, माझा चेहरा बघण्यालायक झालेला, सर्वांच्याच लक्षात आले... विषय तिथंच संपला... एकांतात वेळ मिळाल्यावर मी हिला विचारले, "खरंच तू नाही करणार माझ्याशी परत लग्न?" ही म्हणाली: सात जन्म तुमच्यासारखा पती मिळु दे, म्हणून मी नवस केलेला, पण अनाठायी होणाऱ्या खर्चामुळे, तुमची होत असलेली कुचंबणा माझ्या लक्षात आली, म्हणून विषय मुळापासुन बंद करण्यासाठी 'मी तसं बोलले'." मी सुखावुन म्हणालो, "म्हणजे अजुन ६ जन्म तु मला साथ देणार तर..." सौ.: नाही... हाच सातवा जन्म आहे... मोठा मिश्किल स्वभाव आहे...हिचा....🤭😂🤭

एका गाडीच्या मागच्या काचेवर फक्त "शि" लिहिलेले होते. मला उत्सुकता लागली की असे का?? शेवटी गाडी थांबवून मी विचारले तसा तो जरा भडकूनच तो म्हणाला, "सगळे इंग्रजीत (L)" for Learning लिहीतात "मी मराठीत लिहिलय शि (शिकतोय)" गाडी अर्थातच कुठली होती ते सांगायला नको... 🤣🤣🤣

☆सायकल चालवणे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी (जीडीपी) अत्यंत हानिकारक आहे.☆ हे हास्यास्पद वाटेल, पण हे खरे आहे... सायकलस्वार ही देशासाठी मोठी आपत्ती आहे कारण... •तो कार खरेदी करत नाही, •तो कर्ज घेत नाही, •तो कारचा विमा काढत नाही, •तो तेल खरेदी करत नाही, •त्याला कारची सर्व्हिसिंग ची गरज नसते. •तो कार पार्क करण्यासाठी पैसे देत नाही, •तो वाहतूक दंड भरत नाही, आणि…. •विशेष म्हणजे तो लठ्ठ होत नाही. आणि अशी निरोगी व्यक्ती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही, कारण… •तो औषधे खरेदी करत नाही, •तो रुग्णालये आणि डॉक्टरांकडे जात नाही, •तो देशाच्या जीडीपीमध्ये काहीही योगदान देत नाही. ○●○याउलट, एक फास्ट फूड शॉप 30 नोकऱ्या निर्माण करतो... □हृदयाचे डॉक्टर १० □ दंतवैद्य१० □वजन कमी करुन देऊ असे आश्वासन देणारी जिम व तेथील कर्मचारी = १० टीप:- चालणे तर यापेक्षाही धोकादायक आहे, कारण चालणारा माणूस सायकलही विकत घेत नाही...!! 🤔😜😆

🤣😄🤣😄🤣😄 पत्रकाराने पारावर बसलेल्या आजोबांना विचारले, "2024 मध्ये तुम्हाला नवीन पंतप्रधान म्हणून कोण आवडेल...? पवार, केजरीवाल, अखिलेश, उद्धव की राहुल......." चष्मा साफ करत आजोबा म्हणाले.. "तुम्ही देशाचं वाटोळं करायचं ठरवलंच आहे तर मग गौतमी पाटील काय वाईट आहे...?" 😄🤣😄🤣😄🤣

😜😜😜😜😜😜😜😜😜 बायको: तुम्हाला झाडावर चढता येतं का? नवरा: नाही... बायको: तुमच्यापेक्षा माकडं बरी... हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो... नवरा: आता मला झाडावर चढता येतं.... बायको: मग तुमच्यात आणि माकडात फरक काय...?? बायको ती बायकोच! 🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂

बायको ... एक अवघड प्रकरण गेली अनेक वर्षे माझी एक वाईट सवय होती.... दात घासताना मी टुथपेस्टला टोपण परत लावायच विसरायचो आणि यावरुन बायकोची सारखी बोलणी खायचो. शेवटी ठरवलं लग्नाच्या येत्या वाढदिवसापासुन टूथपेस्टला आठवणीने टोपण लावायचे आणि बायकोला खुश करायचे. गेले आठवडाभर मी टुथपेस्टचे टोपण लावतोय पण बायकोची काहीच प्रतिक्रिया वा शाबासकी नाही. शेवटी काल रात्री झोपताना अचानक माझ्याकडे वळुन तिने मला विचारले.. "काय हो, तुम्ही हल्ली दात का घासत नाही? 🙆‍♂️😀 कसंही वागा बायको बोलणारच......😞😞 😅😅🤣🤣🤣

35 मिनिटे पेट्रोल पंप च्या रांगेत स्कुटर घेऊन उभी राहिली होती ती... तो अधून मधून तिच्याकडे पाहून 🙂🙂 'स्माइल' करायचा.. ती पण छानशी लाजायची.... 😍 त्याला काहीतरी सांगायचे होते...😇 शेवटी..... नंबर आल्यावर तो तिच्या जवळ आला .. त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आले .. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले .. तिच्या अंगावर रोमांच उभे राहीले 💘... तो पुटपुटला ..... *"तुझी स्कुटर इलेक्ट्रिक आहे!* ⚡😳🙄🤦🏻‍♂️😂😂

वीज कडाडली कि हिरॉईन घाबरून हिरोला मिठी मारते हे मी पिक्चर मध्ये अनेकदा बघितले होते... काल बस स्टॉपवर उभा होतो. माझ्या दोन्ही बाजूला दोन तरुण मुली उभ्या होत्या. आणि... . . . *अचानक वीज कडाडली...!* ⚡⚡⚡⚡ . . मी मोठ्या आशेने त्यांच्याकडे चमकून बघितले... क्षणात दोघी म्हणाल्या... *"काका, तूम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही आहोत !!"* 🤔 🤦🏻‍♂️ 😔

*स्थळ पुणे* *बायको नवर्याला सहज म्हणाली,* *"तुम्हाला नाही वाटत का?* *पावसाळा आहे आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या...गाणं गुणगुणावं.."* *नवरा म्हणाला,* *"पावसाळा आला की, बेडकांना असच वाटतं..!"* *संपला विषय..* 😂😂😂😂

😞😞😞😞एक मला कळत नाही मी जर काम केले तर मला सरकारला माझ्या उत्पन्नातील काही हिस्सा कर म्हणून द्यावा लागतो😡😡😡😡😡 🙂‍↔🙂‍↔🙂‍↔ आणि मी जर काही कामच केले नाही तर सरकार मला पैसे देते हे गणितच कळत नाही😜😜😜😜 तुम्हाला कोणाला कळालं तर नक्की कळवा☹️☹️☹️☹️

🔹 *वाहन चालवत असताना मधेच अचानक जर रस्ता आला तर गांगरून जाऊ नका , आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड द्या !* *काही सेकंदात परत खड्डा येईल !!* 😝😂😂 *सदैव सेवेशी तत्पर

लाडका बेवड़ा योजना ....🥃 या योजने अंतर्गत खालील फायदे मिळतील दर महीना 2 खम्बे . 1 किलो खारे दाणे 10 मुग दाल पैकेट 2 किलो चिकन 15 सोडा बोटल्स पीउन पडल्यावर मोफत उपचार पात्रता :- किमान दहा वर्षांचा पिण्याचा अनुभव जास्त पिउन झोकांडया देत आपल्याच घरी येतो याचे बायको कडून प्रमाणपत्र 7 वाजेनन्तर इंग्रजी येणे आवश्यक तरी या योजने चा लाभ घ्यावा 🤏

*आमदार भरती जाहीरात2024🧑‍? ? महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत, सुवर्ण संधी आपली वाट पाहात आहे, फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही, कोणत्याही अनुभवाची गरज नाही, अशिक्षीत असलात तरी चालेल, कोणताही गुन्हा केलेला असेल तरी चालेल, कामकाज नाही केले तरी चालेल, अनुभवाची गरज नाही, कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी ₹ १,९०,०००/- पगार, राहणे साठी मोफत निवास स्थान मिळेल, कॅंटीन मध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये, फोन साठी १५०००/- भत्ता, विनामूल्य ३ टेलिफोन, ५०००० युनिट्स मोफत वीज, ४००० लिटर पाणी फुकट, कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य, मोफत पेट्रोल, पहिल्या एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी, एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास, प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन, कपडे धुवायला रोज ६०० रूपये, रोजचा भत्ता रू २०००, फर्नीचर साठी एक लाख रुपये, ऑफिस खर्च ६०,०००/- महीना तसेच इतर अनेक फायदे ... निवड २०२४ पासून सुरू होईल, अंतिम यादी तयार होईल, आमदार व्हा आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्वल करा, जनहितार्थ...😂🤪*😁😄

बाहेर मस्त पाऊस पडत होता. रेस्टाँरंटमध्ये चहा घेत होतो. बाजूचाच एक मुलगा त्याचे चहाचे पैसे देऊन निघण्याच्या तयारीत होता... इतक्यात त्याचे लक्ष बाजूला ठेवलेल्या छत्री वर गेले.. "दादा, पाच मिनिटे छत्री घेऊ का.. लगेच आणून देतो". मला ना इतक्या आदराने कुणी विचारले की अजिबात रहावतच नाही. "घेऊन.. जा, पण लवकर ये हो." मी बोललो. पाच मिनिटे झाली... दहा मिनिटे… पंधरा मिनिटे झाली. ना छत्री आली, ना तो मुलगा आला. शेवटी त्याची वाट पाहून मी ही बिल देऊन तिथून काढता पाय घेतला. गाडीत बसेपर्यंत डोक्यात फक्त एकच विचार येत होता. …. …… ….. *"नशीब ती छत्री माझी नव्हती."* 😳🙄🫣🤫🤐

*# पुणे वाक्प्रचार:* 🙂😇 आयुष्याचा *नवले ब्रीज* होणे अर्थ: आयुष्यात नवनवीन संकटे सतत येत राहणे आयुष्याचा *चांदणी चौक* होणे. अर्थ: आयुष्यात खूप कन्फ्यूजन्स असणे. आयुष्याचा *युनिव्हर्सिटी चौक* होणे अर्थ: आयुष्यात कधीही काहीही न सुधारणे आयुष्याचा *झेड ब्रीज* होणे.. अर्थ: पुन्हा एकदा 'ती सध्या' आयुष्यात येणे... आयुष्याच्या *भिडे पुल* होणे... अर्थ: काम कमी पण प्रत्यक्षात गवगवाच जास्त होणे… आयुष्याचा *लक्ष्मी रोड* होणे… अर्थ: सुबत्ता येणे .. 😊 आयुष्याचा *एफ.सी रोड* होणे… अर्थ: मैत्रिणींची वानवा नसणे… आयुष्याचा *सिंहगड रोड* होणे. अर्थ: आयुष्य ला अर्थ न रहाणे… आयुष्याचा *कर्वे रस्ता* होणे. अर्थ: आयुष्य सुखकर होणे… आयुष्याचा *पौड रस्ता* होणे. अर्थ: आयुष्यात सुखासवे समृद्धी येणे… आयुष्याचा *टिळक रस्ता* होणे... अर्थ: बुद्धिमान लोकांबरोबर काळ व्यय होतेय असे वाटणे… आयुष्याचा *मेन स्ट्रीट* होणे. अर्थ: परदेशात गेल्याचे समाधान मिळणे… आयुष्याचा कल्याणीनगर होणे.. आयुष्य पूर्ण बरबाद होणे. 😂😂 *_सर्व पुणेकरांना पाठवा_* 🤗👍🏻

स्टेट बँक ऑफ इंडियानी विजय माल्याचा विलेपार्ले येथील बंगल्याचा लिलाव दि.३०/०६/२०२४रोजी करायचा ठरवला आहे... जागा - ३५,००० स्क्वे. फु. पहिल्या बोलीची रक्कम - रु. ४५०कोटी, फक्त. आपल्या ग्रुपमध्ये कोणाला घ्यायचा असेल तर कृपया नोंद घ्यावी. *मी रद्द केलंय ....*? कारण तिथे कामवाली बाई मिळत नाही... ३५,००० स्क्वे. फुट रोज कोण झाडणार, म्हणतात! तुम्हाला कळवणे माझे कर्तव्य होते म्हणून सांगितले. मला नकोय तर आपल्या ग्रुप मधील कोणाच्या तरी पदरात पड़ावा एवढीच माझी इच्छा आहे.. ???? 😜😜😜😜😜😜😜😂😂😂😂😂😂😄😄😄😄😊

😂😂😂😄😄😄 पुरुषांसाठी असा एक सण पाहिजे होता की *ह्याच जन्मी* *सात बायका मिळू दे* आई शप्पथ सांगतो.. वडाला लटकले असते दिवसभर...आपले अ‍ॅडमिन 🤗 😄🤪😄🤪😄🤣🤣🤣