cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

HiSTORY by Hardikar

Show more
Advertising posts
1 484
Subscribers
+124 hours
+77 days
+1030 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
🆔 Channel : @IgSavenews 🤖 Bot : @IgSavesbot
200Loading...
02
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (जन्म १० ऑक्टोबर १८९९) यांचा आज स्मृतीदिन (मृत्यू-२२ मे १९९१) . डांगे, श्रीपाद अमृत : (१० ऑक्टोबर १८९९– २२ मे १९९१). एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन (१९२१) हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते (१९२४). या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत. डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले. डांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी (१९४९) व व्हेन कम्युनिस्ट डिफर (१९७०) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. संदर्भ : 1. Dange, Usha, S. A. Dange, Bombay, 1974. 2. Dutta, R. P. India Today, Bombay, 1970. केळकर, इंदुमति
1500Loading...
03
Media files
1310Loading...
04
आपल्या धर्मविषयक व ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा व उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्म समाजाची (ब्राह्मो समाजाची) स्थापना केली. कलकत्ता येथे राममोहनांनी रामचंद्रविद्यावागीष, उत्सवानंदविद्यावागीष, ताराचंद्र चक्रवर्ती इ. सहकाऱ्यांबरोबर ब्राह्मसमाजाची पद्धतीने उपासनेला प्रारंभ केला. या नवविचारप्रणालीची यथोचित कल्पना देणारे सार्वत्रिक धर्मनामक पुस्तक लिहिले. त्यात मूळ सिद्धांत असा सांगितला, की ईश्वर पूजा म्हणजे ईश्वराच्या गुणांचे चिंतन. तो अतर्क्य व अवर्णनीय आहे. सृष्टिक्रमावरून त्याचे आकलन होते. ज्या वेळी मन शांत असेल, त्या वेळी चांगल्या जागी, चांगल्या वेळी त्याची पूजा करावी. दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरता, त्याचप्रमाणे संतीबंदीच्या कायद्याविरुद्ध ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज विनंत्या येत असल्याने सरकारने सतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून १९ नोव्हेंबर १८३० या दिवशी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहाने खुष होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशात त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटला. त्यांच्या सभासमारंभातील भाषणांनी व चर्चा संवादांनी भारताचा प्रतिमा त्यांनी उजळून टाकली. याच वेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर व इतर सहकार्यांयनी कार्नोव्हेल येथे त्यांची समाधी बांधली. ब्राह्म समाजाच्या स्थापनेने हिंदी नवयुगाची प्रभात झाली. कन्या विक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इ. अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. सुंदर, भव्य, विद्वान, त्यागी व तपस्वी असा हा पुरूष इंग्रजी राज्याच्या स्थापनेनंतर लवकरच उदयास आ कॉपी पेस्ट
1140Loading...
05
मूर्तिपूजेचा ऊहापोह विशेष होऊ लागला कारण हिंदू धर्मात अगणित धर्मसंप्रदाय असले, तरी मूर्तीपूजा सर्वमान्य आहे. त्यामुळे मूर्तिपूजेची बाजू उचलून धरणारे बहुसंख्य लोक होते. मूर्तिपूजेचे समर्थक गौरीकांत भट्टाचार्य यांनी ज्ञानचंद्रिका हे पुस्तक लिहिले. ही सनातनी मंडली मतभेदांमुळे राममोहनांना विविध प्रकारे छळू लागली. पत्नी व मुले यांच्यासह गावात राहणे कठीण होऊ लागले. राममोहन यांनी राधानगराजवळ रघुनाथापूर येथे नवे घर बांधले. या घरासमोर त्यांनी ईश्वरोपासनेकरता एक वेदी उभारली. या घरातच त्यांच्या रामप्रसादनामक दुसऱ्या पत्राचा जन्म झाला. धार्मिक-मौलिक मतभेदांमुळे त्यांच्या मातेशी त्यांचे वितुष्ट आले. धाकटी दोन भावंडे मृत्यू पावली, म्हणून मातेच्या सांत्वनासाठी तिच्या भेटीला ते गेले. तशाही स्थितीत मातेने भेट घेण्याचे नाकारले. या घटनेने त्यांना फार दुःख झाले. तिच्या हट्टाकरिता कुलदेव राधागोविंद याच्या मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घातला व म्हटले, की ‘मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करतो’. राममोहन १८१४ साली कलकत्त्याला स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. आरंभी ‘आत्मीय सभा’ सुरू करून तीत भिन्नभिन्न विषयांवर चर्चा सुरू झाल्या. वेदान्तसूत्रे, उपनिषदे यांची बंगाली व इंग्रजी भाषांतरे छापून प्रसृत केली. सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानू लागला. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यात म्हटले, की या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा आणि हे समाजाकडून व आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद पाडावेत. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर जबरदस्त टीका करीत. त्यांच्याशी साधार चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहनांनी केले. कारण मूळ बायबल हिब्रू व ग्रीक भाषांत लिहिले आहे. हिंदू पंडितांना वाटले, की राममोहन ख्रिस्ती होणार परंतु लवकरच हिंदूंचा भ्रमनिरास झाला. १८२० साली राममोहनांनी द प्रिसेप्टस ऑफ जीझस, द गाइड टू पीस अँड हॅपिनेस (येशूच्या आज्ञा, शांती व सुखाचा मार्ग) या नावाने ७० पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. १८८१ साली नव्या करारातील चारही शुभवर्तमानांचे बंगालीत भाषांतर केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारावर व उपद्रव्यापांवर जोराचा हल्ला केला. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवादकौमुदी नामक एक साप्ताहिक बंगालीत सुरू केले. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांविषयक प्रश्नांचा आणि भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा व तक्रारींचा ऊहापोह करणारे भारतीयाने सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होय. भारतीय वृत्तपत्रव्यवसायाचा हा शुभारंभ होय. १८२२ साली मिरात-उल्-अखबार हे फार्सी साप्ताहिकही सुरू केले. यामधील भाषा आणि व्चार अतिशय प्रखर होते. याचवेळी सरकारने हुकूम काढला, की गव्हर्नर जनरलच्या परवान्याशिवाय कोणीही नियतकालिक काढू नये. हा हुकूम म्हणजे वृत्तपत्रस्वातंत्र्यावरील पहिले गंडांतर होय. राममोहनांना विस्मय वाटला व रागही आला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी सरकारदरबारी त्यांनी बराच काळ झगडा चालू ठेवला. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी झगडत असताना त्यांनी शिक्षणषयक प्रश्नाला हात घातला. याच वर्षी सरकारी शिक्षणखाते स्थापन झाले व कलकत्ता येथे शिक्षणखात्यातील मंडळींनी ही गोष्ट अमान्य झाली. भारताचा भाग्येदय होण्यास व पुढारलेल्या अन्य राष्ट्रांबरोबरीचा दर्जा भारतास प्राप्त होण्यास भारतीयांना आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. नुसत्या परंपरागत संस्कृत शिक्षणाने आजच्या नवीन ज्ञानाचा जो महान विस्तार झाला आहे., त्यापासून भारतीय लोक वंचित राहणार हे पाहून त्यांनी निक्षून सांगितले, की भौतिकी, रसायन, तंत्रज्ञान, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र इ. विद्यांचे शिक्षण भारतीयांना देणारी विद्यालयेच स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांनी संस्कृत महाविद्यालयाला विरोध केला, तरी स्वखर्चाने वेदान्त महाविद्यालयाची स्थापना केली (१८२५). १८२४ मध्ये बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांच्या वेदान्त ग्रंथ (१८१५) ह्या स्वतंत्र ग्रंथामुळे बंगाली गद्यलेखनाचा पाया घातला गेला. बंगाली गद्याचे ते जनक मानले जातात. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण (१८३३) हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे बंगाली भाषेला उत्कर्षाचे दिवस प्राप्त झाले.
990Loading...
06
समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचा आज जन्मदिन (जन्म २२ मे १७७२) , विनम्र अभिवादन (मृत्यू २७ सप्टेंबर १८३३) . . रॉय, राजा राममोहन : (२२ मे १७७२−२७ सप्टेंबर १८३३). आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला. कृष्णचंद्र बंदोपाध्याय हे त्यांचे प्रतितामह बंगालमधील नवाबाच्या नोकरीत होते. नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी त्यांना दिली. त्यांचे पितामह ब्रजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली. रामकांत रॉय यांच्या कुळात वैष्णव संप्रदात होते. राममोहनांची माता तारिणीदेवी यांचे माहेर राममोहन रॉय याचे पिता आणि पितामह हे परमधार्मिक होते. घरात देवपूजा आणि भागवताचे पठण नित्य चालत होते. राममोहन यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला. मुल्ला व मौलवी त्यांचा अरबी, फार्सी पांडित्याने विस्मित होत. इस्लाम धर्मातील आणि सूफी संप्रदायातील त्यांची पारंगतता पाहून मातापित्यांनी संस्कृत अध्ययनासाठी त्यांची वाराणसीला रवाना केले. श्रुतिस्मृती-पुराणांचा, कुराणाचा आणि बायबलचा सखोल अभ्यास त्यांनी केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्या वेळी तुलमात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे. कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे. त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. त्यांची मातापित्यावर श्रद्धा होती आणि विलक्षण भक्तीही होती. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. हिंदू समाज रचनेतील उच्चनीच जातिभेदही त्यांना अमान्य होता. त्यांनी भारतभर प्रवास केला. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला त्यासाठी तिबेटात गेले. तिबेटात प्रतिमापूजन, धर्मगुरुपूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा त्यांना दिसला. त्या कर्मकांडावर तेथील धर्मगुरूंशी त्यांनी वाद केले. तेथील बौद्ध लोक चिडले. राममोहनांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला. या वेळी सुदैवाने दयाळू स्त्रियांनी त्यांना प्राणसंकटातून वाचविले आणि स्वदेशी सुरक्षितपणे पोहोचविले. १९७० मध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता परंतु मातापित्यांची त्यांनी निराशा केली. त्यांची मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावादविरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालच्या सामाज सनातनी व रूढिनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. पिताजींनी त्यांना घराबाहेर काढले. तत्कालीन रीतीला अनुसरुन राममोहनांचे बालपणीच पहिले लग्न झाले होते. प्रथम पत्नीच लवकरच निवर्तल्यामुळे वडिलांनी १७८१ व १७८२ साली त्यांची दोन लग्ने लावून दिली. १८०० साली त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्राचे नाव राधाप्रसाद असे ठेवले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पतकारावी लागली. १८०३ मध्ये डाक्का येथील कलेक्टर टॉमस वुडफर्ड याचे दिवाणपद स्वीकारले. त्याच वेळी रामकांत रॉय निवर्तले. याच सुमारास राममोहनांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली. फार्सी भाषेत त्यांनी ‘ईश्वरभक्तांस देणगी’ (तुहफास-उल्-मुवहिद्दीन) या अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध प्रसिद्ध केला. त्याचे सार असे-सृष्टिकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे. हा सिद्धांत सर्व धर्माचा पाया होय. निरनिराळ्या धर्माच्या लोकांनी या धर्मतत्त्वावर भलभलत्या कल्पनांचा डोलारा चढवला त्यामुळे भिन्नभिन्न धर्मसंप्रदाय अस्तित्वात आले. धर्माचे खरे मूलभूत तत्त्व ठरविण्याकरिता खऱ्याखोट्याचा ऊहापोह केला पाहिजे. रामगड जिल्हा कोर्टाचे रजिस्ट्रार डिग्बी यांच्याशी १८०५ साली त्यांची मैत्री जमली. त्या वेळी वरिष्ठ इंग्रजी अधिकाऱ्यांपुढे भारतीय लोक हांजीहांजी करीत, गुलामासारखे वागत. राममोहन अनेक वरिष्ठ पदस्थ इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नोकरीत राहिले परंतु स्वतःच्या अंगच्या गुणांच्या बळावरच ते चढत गेले. डिग्बींच्या सहवासात असताना त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. इंग्रजीत भाषण, लेखन ते उत्कृष्टपणे करू लागले. बायबलचा व अनेक विषयांतील ग्रंथांचा व्यासंग त्यांनी सुरू ठेवला. राममोहनांनी १८१० साली सरकार नोकरी सोडली व रंगपूरच्या जवळ माहीगंज येथे स्वतःचे घर बांधून ते राहू लागले. तेथे लोकांना पाण्याची सोय व्हावी स्वखर्चाने एक तळेही बांधले. तेथे सुशिक्षित मंडळीबरोबर धर्मचर्चा सत्र सुरू केले. या मंडळींमध्ये विविध धर्मपंथांचे लोक भाग घेत.
1070Loading...
07
Media files
1030Loading...
08
इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर (जन्म: १६ मार्च १६९३) यांचा आज स्मृतीदिन (मृत्यू २० मे १७६६) . होळकर, मल्हारराव : (१६ मार्च १६९३–२० मे १७६६). मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक. त्यांचा जन्म होळ (जेजुरीजवळ) येथे धनगर घराण्यात झाला. वडील खंडूजी हे शेतकरी असून चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले (१७२१). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावांस खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी १७२५ मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली. तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली मात्र कंठाजी कदमबांडे यांच्या आश्रयाखाली आपला भाग्योदय झाला, ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी आपला स्वतःचा झेंडासुद्धा कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच केला. नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांस दिले (१७३५). बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले. १७४५ साली म्हणजे अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांकडे साडेचौऱ्याहत्तर लक्षांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी धनगर जातीचे अनेक लोक इंदूरमध्ये आणले. यांपैकी बुळे, लांबहाते वगैरे दहा-बारा लोकांनी तेथेच वास्तव्य केले. याशिवाय होळकरांच्या सरदारवर्गात काही ब्राह्मण घराणीही होती. गंगाधर तात्या चंद्रचूड अनेक दिवस मल्हाररावांकडे निष्ठेने राहिला. बाजीरावाने त्याला मल्हाररावांची फडणिशी दिली होती. मल्हाररावांस गुजरात, माळवा व खानदेश प्रांतांत सरंजाम खर्चास ११ परगणे पेशव्यांनी दिले होते. पुढे माळवा प्रांताची वाटणी २ होळकर, २ शिंदे आणि १ पवार या प्रमाणात झाली. बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या विनंतीप्रमाणे त्यांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने तीन लक्ष उत्पन्नाचा मुलूख खाजगीकडे नेमूनदिला (२० जानेवारी १७३४). मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायां-मध्ये भाग घेतला. त्यांपैकी १७२९ आणि १७३१ मध्ये गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव ही महत्त्वाची मानली जाते. मल्हाररावांनी १७३५–३८ दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोंकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. तत्पूर्वीच बाजीरावानेमल्हाररावांना ८२ परगणे जहागीर देऊन माळव्याची राज्यव्यवस्थाहीत्यांच्याकडे सोपविली होती. वरील दोन लढायांशिवाय १७३५ मध्येआग्रा आणि गुजरात, १७३६-३७ मध्ये अंतर्वेद व दिल्ली, १७३७ मध्ये वसई इ. ठिकाणी पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभागघेऊन शौर्य दाखविले. याच सुमारास रेवाकाठचा बराच मुलूख मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. १७४३ मध्ये सवाई जयसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत वारसा हक्काचे भांडण सुरू झाले, तेव्हा मल्हाररावांनी माधोसिंगांस मदत करून गादीवर बसविले. त्याबद्दल त्यांना ६४ लक्ष रुपये खंडणी, रामपुरा, भानपुरा, होडा व टोंक हे प्रांतमिळाले. दक्षिणेच्या सुभेदारीबद्दल झालेल्या निजामुल्मुल्कच्या मुलां-मधील तंट्यात पेशव्यांतर्फे शिंदे व होळकरांनी गाजीउद्दीनला मदतदेण्याचे ठरविले होते. १७५१ मध्ये मल्हाररावांनी रोहिल्यांविरुद्ध अयोद्धेच्या सफदरजंगास मदत केली. १७५४ मध्ये गाजीच्या मीरशिहाबुद्दीन नावाच्या मुलास जाटांविरुद्ध मदत करून जाटांच्या मदतीस आलेल्या दिल्लीच्याबादशहाचा मल्हाररावांनी पराभव केला या वेळी दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव हे त्यांचे एकुलते एक पुत्र तोफेचा गोळा लागूनमरण पावले (१७५४). त्या वेळी खंडेरावांची पत्नी अहिल्याबाई या सोडून अन्य भार्या सती गेल्या. या प्रसंगी मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली, ‘सुरजमल्लाचा शिरच्छेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, तरच जन्मास आल्याचेसार्थक नाही तर प्राणत्याग करीन ‘. दिल्लीच्या रघुनाथरावांच्या १७५५ च्या मोहिमेत मल्हारराव हे त्यांच्या सोबत होते. शिवाय १७५६-५७ तसेच १७६६ या राघोबादादांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यांमध्ये त्यांनी बरीच मदत केली.
1560Loading...
09
पानिपतच्या लढाईतील (१७६१) त्यांच्या कामगिरीबद्दल इतिहासाच्या अभ्यासकांत मतैक्य आढळत नाही. मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली. पहिल्या बाजीरावांनी मल्हाररावांस संधी देऊन संस्थानिकांच्या दर्जास आणून ठेवले आणि उत्तरेकडील चौथचे अधिकार त्यांना प्रदान केले पण बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे (कार. १७४०–६१) यांच्या काळात नानासाहेबांनी मल्हाररावांस लिहिलेली पत्रे उपलब्धआहेत. त्या पत्रांत जयाजी शिंद्यांसोबत त्यांनी माळव्यात चौथाईच्या संदर्भात काही सूचना दिल्या. माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ-रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळीमल्हाररावांचे निधन झाले. मल्हारराव निरभिमानी असून धाडसी व शूर होते. ते फक्त युद्धकलेतच निष्णात नव्हते, तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार व चाणाक्षहोते. आपल्या अंमलाखालील प्रांतांची त्यांनी वसूलनिहाय वर्गवारी करून व्यवस्था लावली होती. एकदा घेतलेला निर्णय ते सहसा बदलतनसत. माळव्यातील आपल्या मांडलिक राजांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंधहोते. त्या वेळच्या प्रसिद्ध सरदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असूनराजपुतांपैकी राघवगडचा राजा बलिभद्रसिंग व बागळीचा राजा गोकुळदासहे त्यांचे ऋणानुबंधी स्नेही होते. बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हाररावांना पित्यासमान मान देत. मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एकपुत्र म्हणजे खंडेराव होत. त्यांनी त्यांचा विवाह अहिल्याबाई शिंदे यांच्याशी लावून दिला होता (१७३३). खंडेराव खांदेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून मरण पावले (१७५४). त्यांच्या इतर भार्यांबरोबर अहिल्याबाई सती जाणार होत्या पण अहिल्याबाईंना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. मल्हाररावांच्या चार भार्यां-पैकी गौतमीबाई आधीच मृत्यू पावल्या होत्या द्वारकाबाई व बजाबाई सती गेल्या, तर हरकूबाई अहिल्याबाईस साथ देण्यास मागे राहिल्या. (संदर्भ-मराठी विश्वकोष)
1760Loading...
10
Media files
1290Loading...
11
आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा (जन्म: ३ मार्च १८३९) यांचा आज स्मृतीदिन (१९ मे १९०४ ) . भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे महान उद्योगपती सर जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या टाटा ग्रुप या मिश्र उद्योगसमूहाची स्थापना केली. गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये १८३९ साली पारसी कुटुंबात त्याचा जन्म झाला. आज ३ मार्च हा त्यांचा जन्मदिन. त्यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात... जमशेदजी टाटा यांनी मुंबईत येऊन वयाच्या १४व्या वर्षीपासूनच एका छोटया व्यापारातून आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. त्याचवेळी एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून कॉलेजने त्यांची पूर्ण फी त्यांना परत केली होती. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे १० वर्षांच्या हीराबाई दबू यांच्याशी लग्न लावण्यात आले. १८५८ मध्ये पदवीधर होऊन वडिलांच्या व्यापारी संस्थेत सह्भागी झाले. त्यावेळी इंग्रज सरकारने १८५७चा उठाव मोडून काढला होता. टाटांनी अशा परिस्थितीतही व्यापारातच कामगिरी करण्याचा निर्णय घेतला. १८५९ मध्ये ते हॉंगकॉंंगला गेले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी पुढच्या चार वर्षात तिथे टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय सुरु केले. टाटा कंपनीचा हळूहळू आशियात विस्तार करणारे ते पाऊल ठरले. आणि १८६३ पर्यंत जपान आणि चीनमध्येही कंपनीच्या शाखा सुरू झाल्या आणि ते युरोप यात्रेवर गेले. लंडनमध्ये त्यांनी भारतीय बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांना यश आले नाही. आशियामध्येही टाटा ग्रुपला मोठे नुकसान सहन करावे लागले. नंतर तिशीत येईपर्यंत जमशेदजींनी वडिलांसोबतच काम केले. १८६८मध्ये त्यांनी एक व्यापारी कंपनी सुरु केली. कॉटन मिल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लंडनमधील गिरण्या पाहून त्यांनी फक्त कापसाचा व्यापार न करता उत्पादनक्षेत्रात शिरावे, असा विचार केला होता. त्यांनी १८७४ मध्ये नागपूरला मिल स्थापन केली. त्यात त्यांना मोठा नफा मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या नावावरून त्यांनी आपल्या मिलचे नाव महारानी मिल ठेवले. नागपुरची ही मिल त्यांनी मोठ्या किमतीला विकली. जमशेदजींनी ‘अलेक्झांड्रा’ आणि १८७७ मध्ये नागपूरला ‘एम्प्रेस मिल’ सुरू केली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच मुंबईत ‘स्वदेशी मिल’, तर अहमदाबादला ‘अॅडव्हान्स मिल’ सुरू केली आणि उत्तम चालवली. पोलाद उद्योगात उतरण्याचे त्यांचे स्वप्न होते. १८८२ मध्ये त्यांनी कारखाना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मयूरगंज संस्थानात लोखंड व कोळशाचे साठे मिळाले, म्हणून त्यांनी तिथेच कारखाना काढण्याचं ठरवलं. त्या काळी त्यांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचं भांडवल ‘शेअर्स’ विकून मिळवलं. पण दुर्दैवानं ते लोखंडाची निर्मिती पाहण्यासाठी हयात राहिले नाहीत. कारखाना स्थापन केला. त्यांच्या योगदानाने आणि प्रेरणेने मोटारी, रसायने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कापड, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचे कारखाने उभे राहिले. ३ डिसेंबर १९०३ मध्ये त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी ताज महल हॉटेलची स्थापना केली. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारं ते एकमेव हॉटेल होतं. १९ मे १९०४ला त्यांचे निधन झाले. तोपर्यंत भारतीय उद्योगजगताचे पितामह म्हणून ते जगभर विख्यात झाले होते. (दैनिक सकाळ-०३ मार्च २०२०)
1921Loading...
12
Media files
1671Loading...
13
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर (०६ जानेवारी १८१२) , यांचा आज स्मृतिदिन (मृत्यू: १७ मे १८४६) त्यांचा जन्मदिन ०६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. . मराठी पत्रकारितेचे पितामह, 'दर्पण'कार, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (जन्म: ६ जानेवारी १८१२) यांचा आज स्मृतिदिन ! (मृत्यू: १८ मे, १८४६) . बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला. ब्रिटिशांनी भारतात येताच कोलकत्त्यामध्ये 'बेंगाल गॅझेट' नावाने इंग्रजी साप्ताहिक २९ जानेवारी १७८० रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालये सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. त्याकरिता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये, अशी त्यांची धारणा होती. परंतु कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो. ब्रिटिशांनी भारतात आपले बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संघर्ष निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळे भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळाले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडले. यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत, याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांचे आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली. ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतु जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होते. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या-येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावे, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली. इंग्रजी भाषेत वृत्तपत्रे निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रे का निघू नयेत, असा प्रश्न निर्माण झाला. कोलकत्त्ता येथे पहिले इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळे या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजाने नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली. जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट'च्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकाने म्हणजेच ५२ वर्षांनी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं 'दर्पण' च्या रुपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. मुंबईत जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमीत रुजण्यास सुरुवात झाली. एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या जांभेकरांना आपण दर्पणकार म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकीय सत्तेला उलथून टाकायचे असेल तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही, हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री हे कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रविश्वात नवी पहाट उगवली. दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्यावेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते. दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर हा वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.
2140Loading...
14
वृत्तपत्राची संकल्पना त्याकाळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रितीने साडेआठ वर्षे चालले आणि जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे. तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातूनच पुढे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.१८४० मध्येच त्यांनी दिग्दर्शन या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी 5 वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या सहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धि गणित आदी ग्रंथांची निर्मिती केली. साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्भूत ठरते. ०६ जानेवारी १८८२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख "आद्य समाजसुधारक" असा केला जातो. परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले येथे १८१२ च्या उत्तरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ मध्ये निधन झाले. . (संदर्भ-इंटरनेट)
2580Loading...
15
बाळशाश्त्री जांबेकर
2040Loading...
16
Media files
2330Loading...
17
१७ मे १८७२ इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला. . सालबाईचा तह हा १७ मे, इ.स. १७८२ रोजी मराठे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात महादजी शिंदे याच्या मध्यस्थीने झालेला एक तह होता. या तहामुळे सात वर्षे चाललेल्या पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची समाप्ती झाली.या तहाने इंग्रजांना ठाणे व साष्टी बेट देण्यात आले. राघोबाने पेशवाईच्या मोहापायी इंग्रजांची मदत मागितली होती. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाशी सुरतचा तह केला. त्यानुसार इंग्रजांनी राघोबाला पेशवाई मिळवून दिली आणि मोबदल्यात महत्त्वाचे प्रदेश व पैसे मागितले. इंग्रजांची मदत मिळाल्याने इंग्रज फौजेसह राघोबाने पुण्यावर चाल केली पण महादजी शिंद्याने त्यांना तळेगावपाशी हरवले. वॉरन हेस्टिंग्जला हे मान्य न होऊन त्याने बऱ्हाणपूर मुक्कामी असलेल्या गोडार्ड या इंग्रज सेनापतीस युद्धाचा आदेश दिला. आणि इ.स. १७८१ मध्ये पुन्हा युद्ध सुरू झाले. या वेळी गुजरातचा फत्तेसिंग गायकवाड इंग्रजांना मिळाला. तरीही इंग्रज मराठ्यांना हरवू शकणार नाहीत, हे लक्षात येऊन हेस्टिंग्जने महादजीमार्फत तहाचा प्रस्ताव मांडला. सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती. १)पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत करण्याचे ठरले. यात वसईचाही समावेश होता. साष्टी बेट आणि एलिफन्टा, कारंजा आणि हॉग या लहान बेटांचा अपवाद करण्यात येऊन ती बेटे इंग्रजांकडेच ठेवण्यात आली. २)ब्रिटिशांनी ग्वाल्हेरचा किल्ला आणि यमुनेच्या पश्चिमेकडील जिंकलेला शिंद्यांचा सर्व प्रदेश त्यांना परत केला. ३)ब्रिटिशांनी सवाई माधवराव पेशवे यांना अधिकृत पेशवा म्हणून मान्यता दिली आणि येथून पुढे राघोबाला साहाय्य न करण्याचे ठरविले. ४)गुजरातमधील जो प्रदेश, किल्ले आणि शहरे राघोबाने ब्रिटिशांना दिली होती किंवा त्यांच्याकडे गहाण ठेवली होती, ती सर्व पुणे सरकारच्या हवाली करण्यात आली. ५)राघोबाचे समर्थक फत्तेसिंह गायकवाड यांना पुणे येथील पेशव्याच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र शासक म्हणून मान्यता देण्यात आली. ६)या तहानुसार गायकवाड युद्धापूर्वी जी वार्षिक खंडणी पेशव्याच्या पुणे दरबारात देत होते ती त्यांनी यापुढेही द्यावी व पेशव्यांप्रती एकनिष्ठ राहून मराठा राज्याची पूर्वीप्रमाणेच सेवा करावी. मराठ्यांनी ब्रिटिश सोडून इतर कोणत्याही युरोपियन सत्तांशी संपर्क ठेवू नये व या मोबदल्यात ब्रिटिशांनी मराठ्यांच्या शत्रूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही मदत करू नये. ७)रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे. शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावे. (संदर्भ- मराठी विकिपीडिया)
2100Loading...
18
अनुताईंचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल, असेच आहे. .
1450Loading...
19
समाजसेविका अनुताई वाघ यांचा आज जन्मदिन (१७ मार्च १९१०) . (मृत्यू: २७ सप्टेंबर १९९२) .वाघ, अनुताई (Wagh, Anutai) : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या. १९२३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला; परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे किंवा पतीचे दर्शनही त्यांना झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले. अनुताई यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. १९२७ मध्ये त्या व्हर्नाक्यूलर अंतिम परिक्षेत नासिक जिल्ह्यात प्रथम आल्या. मराठी सातवी झाल्यावर १९२९ मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीस नासिक विभागातील चांदवड (पिंपळगाव) या खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९३३ मध्ये त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन १९३७ मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत मग्न झाल्या. म. गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशातून प्रेरणा घेऊन १९४५ साली मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. त्या वेळी ताराबाई मोडक (Tarabai Modak) यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला आणि अनुताईंच्या सर्जनशील गुणांना चालना मिळाली. त्यांतून त्यांचे ग्रामीण भागातील अध्यापनकार्याचे ध्येय साकारले. त्याच वर्षी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. तीत अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्या वेळेपासून सतत ४७ वर्षे म्हणजे त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. हे कार्य चालू असतानाच १९६१ मध्ये मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची बी. ए. परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. १९३३–१९४४ या काळात बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व १९४५–१९७३ या काळात कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात अनुताईंनी अध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर १९७४-७५ मध्ये कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस, १९७६–१९७९ या काळात राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या, अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षणसंस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. या परिसरात त्यांनी दहा पाळणाघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था, ठाणे, रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, मूकबधिर संस्था, डहाणू, आरोग्यकेंद्रे अशी अनेक संस्था स्थापन केल्या. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि तीतून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली. तसेच त्यांचा विस्तारही केला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपांत शैक्षणिक साधने तयार करावयाची; त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोचल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले.
1990Loading...
20
अनुताई वाघ
1490Loading...
21
Remembering a English physician and scientist who pioneered the concept of vaccines , Edward Jenner on his birth anniversary (born 17 May 1749) (Died 26 January 1823) #EdwardJenner #vaccination #vaccine
1590Loading...
22
केरुनानांनी शालेय पातळीवर, गणित व पदार्थविज्ञानावर सुबोध भाषेत क्रमिक पुस्तके लिहिली होती. अंकगणिताच्या पुस्तकात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादीचे व्यावहारिक ज्ञान समाविष्ट केलेले असून सरावासाठी दिलेला उदाहरणसंग्रह मुलांसाठी मनोरंजक भाषेत रचलेला आहे, तर पदार्थविज्ञानाची सुरुवात करताना, मुलांच्या मनांत निसर्गाबद्दल कुतूहल निर्माण होईल अशा ललित शैलीत आपल्या आजूबाजूला सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग-चमत्कार व पदार्थांचे गुणधर्म यांचे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. संवादरूपाने विषयाची मांडणी करून एकेक संकल्पना रंजक भाषेत विशद केलेली आहे. विशेष बाब म्हणजे, सोप्यासोप्या प्रयोगांसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी व त्यांच्या किमतीसुद्धा परिशिष्टात दिलेल्या आढळतात. स्वभाषेत शास्त्रीय विषय सुलभपणे मांडून ज्ञानप्रसार करण्यासाठी १८४८ साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘ज्ञानप्रसारक सभे’पुढे केरुनानांनी हवा, भरती-ओहोटी, कालज्ञान या विषयांवर निबंध वाचले. ‘हवे’वर तर एकूण १७ निबंध असून त्यांत आकृत्यांसह सृष्टीतील अनेक चमत्कारांचे चित्तवेधक वर्णन केलेले आहे. मुख्य म्हणजे अशा शास्त्रीय लेखनात परिभाषेसाठी केरुनानांची लेखणी कधी अडली नाही. उदाहरणार्थ, संवर्धन, स्नेहाकर्षण, केषाकर्षण, त्वरा, भरतीची समा, वातादिक दर्शक यंत्र, इत्यादी समर्पक, सुटसुटीत व अर्थवाही शब्द त्यांनी जागोजागी योजलेले आहेत. जन्मतिथीवरून इंग्रजी तारीख वा तारखेवरून तिथी काढण्यासाठी ‘कालसाधनांची कोष्टके’, तर पंचांग तयार करण्यासाठी ‘ग्रहसाधनांची कोष्टके’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. मात्र ते लिहिताना आपल्याकडील ज्योतिष परिस्थितीस बाधा येणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. या ग्रंथावरून भारतीय युद्धाच्या वेळची ग्रहस्थिती व महाभारतात त्याच्याशी तंतोतंत जुळणारे वर्णन, याचा पडताळा एका अभ्यासकाने घेतला होता. श्रीक्षेत्र काशीतील भूस्थिरवाद्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी ‘कुभ्रम निर्णय’ पुस्तक लिहिले, तर ‘पृथ्वीवर पडणारा पाऊस व सूर्यावरील डाग’ यांवर केरुनानांनी सार्वजनिक सभेत निबंध वाचला होता. केरुनानांचा ऐन उमेदीचा काळ वेधशाळेत सूक्ष्मयंत्रांच्या सहवासात गेल्याने, पंचांगातील गणितातून ऋतुकाळ व आकाशस्थ ग्रहांचा दृकप्रत्यय येण्याबद्दल ते आग्रही होते. शिवाय धर्मकृत्य करण्यासाठी पंचांगात दाखवलेल्या वेळा निर्दोष असाव्यात म्हणून त्यांनी बडोद्याच्या आबासाहेब पटवर्धनांच्या मदतीने शुद्ध पटवर्धनी पंचांग काढले. केरूनाना प्रागतिक विचारसरणीचे होते. ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते व स्रियांच्या सामाजिक सुधारणांस त्यांचा पाठिंबा होता, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्रियांच्या साप्ताहिक सभेस नियमित हजर राहून ते स्त्रियांचे शिक्षण करीत असत. ते स्रियांना गृहजीवनोपयोगी शिक्षण द्यावे, अशा मताचे होते. शास्त्रीय विषयांत रमणाऱ्या केरुनानांचे व्यक्तिमत्त्व एकसुरी नव्हते, हे त्यांना असलेल्या शास्त्रीय संगीत व नाटकांची आवड यांवरून दिसून येते. इतकेच नव्हे, तर किर्लोस्कर मंडळींच्या नाटकांच्या तालमींना हजर राहून गायक नटांना, नाटकात गाण्याचा अतिरेक न करण्याचा ते सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन कै. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ नाटक त्यांना अर्पण केलेले आढळते. ते दिवंगत झाल्यावर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांना ‘जर प्रो.छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळाले असते, तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते, यात मुळीच शंका नाही’, अशी श्रद्धांजली वाहिली होती. - प्रा. स. पां. देशपांडे
2250Loading...
23
आधुनिक गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांची आज जयंती (१६ मे १८२५) (मृत्यू: १९ मार्च १८८४) . छत्रे, विनायक लक्ष्मण गणितज्ञ प्रसिध्दी नाव : ​​​​​​​केरुनाना छत्रे जन्मदिनांक : १ जानेवारी १८२४ मृत्युदिनांक : १८८४ कार्यक्षेत्र : विज्ञान-तंत्रज्ञान जन्मस्थळ : अलिबाग . विष्णुशास्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, सुधारकाग्रणी आगरकर यांचे गुरु विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील नागाव येथे झाला. दुर्दैवाने आई-वडलांचे छत्र बालपणीच हरपल्यामुळे केरुनानांना शिक्षणासाठी कोकणातून मुंबईस, चुलत्याच्या आश्रयास यावे लागले. तेथे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो.आर्लिबार या व्यासंगी गुरूंच्या हाताखाली केरुनानांनी आधुनिक शिक्षणाचे धडे घेतले. गणितविद्येत त्यांचा एवढा लौकिक होण्याची पूर्वचिन्हे त्यांच्या विद्यार्थीदशेतच स्पष्ट दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल व पदार्थविज्ञानासारख्या अवघड शास्त्रांत त्यांना पुढे जी विलक्षण गती प्राप्त झाली, त्याचा स्रोत आर्लिबारकडून घेतलेल्या मूलभूत ज्ञानात होता. नंतर मात्र त्या शिदोरीवर या विषयातील मूल ग्रंथांचा बारीकसारीक तपशिलांसह सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी या शास्त्रावर प्रभुत्व मिळविले. लौकिक अर्थाने केरुनानांनी विद्यापीठाची (जे तेव्हा अस्तित्वात नव्हते) पदवी संपादन केलेली नव्हती, तरी पुढील आयुष्यात त्यांनी जी कर्तबगारी दाखविली, त्यावरून त्यांची असाधारण बुद्धिमत्ता दृग्गोचर होते. अंतरिक्षातील चमत्कारिक वाटणाऱ्या घटना व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी आर्लिबार यांनी १८४० साली मुंबईत कुलाबा येथे एक वेधशाळा सुरू केली. तेथे त्यांनी केरुनानांना ‘सहाय्यक’च्या जागी नेमले. अवघ्या सोळाव्या वर्षी दरमहा ५० रुपये पगारावर लागलेल्या या नोकरीत केरूनानांनी पुढील दहा वर्षे जागरूकपणे हवामानशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यामुळेच पुढील आयुष्यात कोणतेही शास्त्रीय तत्त्व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झाल्याशिवाय किंवा त्याच्या सत्यतेचा पडताळा घेतल्याशिवाय ते स्वीकारीत नसत. १८५१ मध्ये पुणे महाविद्यालयाच्या नॉर्मल स्कूल या विभागात केरोपंतांची सहाय्यक प्राध्यापकाच्या जागी नेमणूक झाली. तेथे ते गणित व सृष्टिशास्त्र हे विषय शिकवीत असत. पुढे नॉर्मल स्कूल, ज्यास तेव्हा ‘व्हर्न्याक्युलर कॉलेज’ म्हणजे पुढे ‘ट्रेनिंग कॉलेज’ म्हणत असत, ते पुणे महाविद्यालयापासून वेगळे झाल्यावर तेथे प्रथम ते अध्यापक व मग काही वर्षे मुख्य अधिक्षक होते. त्याला जोडून अभियांत्रिकी महाविद्यालयातसुद्धा काही काळ त्यांनी सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली होती. दरम्यान, अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काही काळ काढल्यावर १८६५ सालापासून परत पुणे महाविद्यालयात, ज्यास पुढे ‘डेक्कन महाविद्यालय’ म्हणू लागले, तेथे ते गणित व सृष्टिशास्त्राचे प्राध्यापक झाले. नंतर अल्पकाळ ते हंगामी प्राचार्य म्हणूनही नियुक्त झाले होते. अशी जबाबदारीची पदे सांभाळताना देखील त्यांनी आपल्या अध्यापनात कधी कसूर केली नाही, की खंड पडू दिला नाही. टिळक-चिपळूणकर-आगरकर या केरुनानांच्या प्रख्यात विद्यार्थ्यांच्या चरित्रग्रंथांमध्ये व खुद्द आगरकरांनी केरूनानांवर लिहिलेल्या मृत्युलेखात व्यासंग, शिकवण्याची विलक्षण हातोटी, स्वभावातील कमालीचे सौजन्य, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आधार देऊन प्रसंगी आर्थिक मदत करण्याची तत्परता, ह्या त्यांच्या विविध गुणांवरअधिक प्रकाश पडतो. एखाद्या विषयाच्या चिंतनात ते गढले म्हणजे त्यांना कशाचेच भान राहत नसे. याची प्रचिती म्हणजे एकदा एका कठीण उदाहरणाने त्यांना हैराण केले; त्या काळात त्यांना जेवण सुचेना की स्वस्थ झोप लागेना. अखेर पाच ते सहा दिवसांनी ते सुटले तेव्हा त्यांना झालेला अवर्णनीय आनंद सांगताना त्यांचा कंठ दाटून येत असे. मुलांना सहज कळेल, अशा रितीने गणित समजावताना आवश्यक तो शास्त्रीय संदर्भ ते पुरवीत असत. मुलांनी कितीही विचित्र प्रश्‍न विचारला तरी त्यांच्यावर न रागावता, हर प्रयत्नाने ते त्यांचे शंकानिरसन करीत असत. लहान-थोर असा भेदभाव न करता, ते सर्वांशी सारख्याच खेळीमेळीने व निगर्वीपणे वागत असत. विद्यार्थ्यांना केवळ शंकासमाधानासाठीच नव्हे, तर जेवणाखाण्यासाठी देखील त्यांच्याकडे मुक्तद्वार असे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी फी-पुस्तकांची मदत केलेली आहे. एकदा पहिल्या वर्षाच्या परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आगरकर एक नाटक लिहीत आहेत, असे केरुनानांच्या कानावर गेले. तेव्हा त्यांनी आगरकरांची फी भरून त्यांच्या हातातील नाटकलेखनाचे कागद काढून घेतले.
1800Loading...
24
केरू नाना छत्रे
1730Loading...
25
आज दि.१६ मे २०२४ आजच्या दिवशी (१६ मे १६६५) मध्ये पुरंदर किल्ला लढविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांनी प्राणार्पण केले.... . दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला, “अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !” पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
2000Loading...
26
Media files
1720Loading...
27
स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा आज जन्मदिन (२८ जानेवारी १८८९) (मृत्यू: १५ मे १९९३). Remembering, the first army chief of independent India Field Marshal K. M. Cariappa on his birth anniversary today (January 28, 1889) (Death: 15 May 1993)
2410Loading...
28
मलेरियाचा जंतू शोधून काढणारे " जन्माने ब्रिटीश भारतीय रोनाल्ड रॉस यांचा जन्म दिवस (१३ मे १८५७--१६ सप्टेंबर १९३२ ) *रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते.त्यांचा जन्म उत्तराखंड मधील अल्मोरा येथे झाला होता . **भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.ते भारतातील वास्तव्यात अंदमान ,बलुचिस्तान ब्रह्मदेश चेन्नई बंगलोर येथे राहिले होते **१८९५ मध्ये त्यांनी बंगलोर येथे मलेरियावर संशोधन केले"
2901Loading...
29
आज श्री आदि शंकराचार्य जयंती (वैशाख शुक्ल पंचमी), विनम्र अभिवादन.. . अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रविद्। षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनीरभ्यगत्॥ . भावार्थ :- वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदात पारंगत, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांत निपुण, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर (उपनिषदे, ब्रह्मसूत्र, गीता) भाष्य लिहिणारा हा श्रेष्ठ मुनी (आद्य शंकराचार्य) , हिंदू धर्म लयास जात असताना , पुन्हा भारतवर्षात चार ही दिशांना  मठ स्थापन करुन वैदिक संस्कृती पुनर्जीवित करत संस्कृती व हिंदू धर्माच्या महान कार्या चा विस्तार करुन बत्तीसाव्या वर्षी देह विसर्जन करते झाले.  . ................................................................................................................................................................................................................................................................................... मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश: न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव: न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
3501Loading...
30
Media files
2490Loading...
31
In other news, the kid defeated World No-1 Magnus Carlsen in the Poland Grand Chess Tour... Well done Champ @rpraggnachess 👏
2560Loading...
32
११ मे १९९८ २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या. . आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणूचाचणी! संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 11 मे म्हणजे आजच्याच दिवशी 1998 मध्ये पोखरणमध्ये अणू चाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने उचललेल्या या धाडसी पावलामुळेच देशाच्या प्रगतीला 'बूस्ट' मिळाला होता. जाणून घेऊयात या अणू चाचणीचा रंजक इतिहास... ११ मे ते १३ मे, १९९८... या तीन दिवसांच्या कालावधीत भारताने ५ स्फोट करून राजस्थानमधील पोखरणमध्ये चाचण्या घेतल्या होत्या. या चाचण्यांची तयारी कमालीची गोपनीय राखण्यात आली होती. संपूर्ण जगाची पोलिसगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या 'CIA'लाही या चाचणीचा सुगावा लागू शकला नाही, यातच भारताचे राजनैतिक आणि धोरणात्मक यश होतं, असं म्हणावं लागेल. ही मोहीम इतकी गोपनीय राखण्यात आली होती, की केंद्र सरकारमधील निवडक अधिकाऱ्यांनाच यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. किंबहुना, तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. या मोहिमेविषयी खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, वाजपेयींचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लष्करातील मोजके अधिकारी आणि या प्रकल्पावर काम करणारे 58 इंजिनिअर्स यांनाच या मिशनविषयी कल्पना होती. प्रत्यक्ष चाचण्यांपूर्वी दहा दिवस आधी या चाचण्यांची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी यंत्रे आणि इतर साहित्य मुंबईहून केवळ चार ट्रकमधून पोखरणमध्ये आणण्यात आले. अमेरिकी उपग्रहांची भारतावरील 'नजर' चुकवून ही सर्व तयारी करण्यात आली होती. चाचणी घेतल्याचं जाहीर केल्यानंतर केवळ इस्राईल या देशानेच भारताला पाठिंबा दिला होता. अमेरिकेसह अन्य इतर देशांनी भारतावर टीका केली होती. संतप्त अमेरिकेकडून तर भारतावर निर्बंधही लादण्यात आले होते. वाजपेयी सत्तेत येण्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्‍लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. मात्र, अमेरिकी उपग्रहांनी याची छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला चाचणी घेता आली नव्हती. १९९८ मध्ये वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. 'चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल', असा प्रश्‍न वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, 'तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या ३० दिवसांत चाचणी घेऊ!' त्या बैठकीत तारीख ठरली... ११ मे, १९९८! त्या काळात जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे नव्हती. तरीही भारताने धाडस करून हे पाऊल उचलले. या अणुचाचणीची घोषणा करतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभेत तीन महत्त्वाची विधाने केली. १. कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही. २. ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही, त्यांच्याविरोधात आम्ही त्यांचा वापर करणार नाही. ३. यापुढे भारत अण्वस्त्र चाचणी घेणार नाही. त्याकाळात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होती. अमेरिकन सॅटलाइट्सचे पोखरण रेंजवर बारीक लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटलाइटला देखील चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करुन दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कुणालाही कळू नये, यासाठी वैज्ञानिक देखील सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे. या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच...! भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींच्या नेतृत्वलाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिलं. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला. (संदर्भ-इंटरनेट)
2941Loading...
33
Media files
2660Loading...
34
रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ (जन्म: १० मे १९१८) यांचा आज स्मृतिदिन (२० जानेवारी २०२२). . Today is the death anniversary of (January 20, 2022) of Rameswarnath Kao (Born: 10 May 1918), founder chairman of the Research and Analysis Wing (RAW) of India.
3180Loading...
35
नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचा आज जन्मदिन (जन्म १० मे १८८०) (मृत्यू २४ एप्रिल १९६०) . भोपटकर, लक्ष्मण बळवंत राजकीय ग्रंथकार, पत्रकार प्रसिध्दी नाव : अण्णासाहेब भोपटकर जन्मदिनांक : १० मे १८८० मृत्युदिनांक : 2४ एप्रिल १९६० कार्यक्षेत्र : साहित्य भोपटकर, लक्ष्मण बळवंत अण्णासाहेब भोपटकर लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब भोपटकर हे प्रसिद्ध कायदेपंडित होते. स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग, वृत्तपत्रांचे संपादन, राजकीय, तसेच व्यायाम व कुस्ती या विषयांवर लेखन आणि ललित गद्य लेखन अशी विविधांगी कामगिरी त्यांच्या नावावर आहे. लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब हे उच्चशिक्षित होते. १९०४ साली त्यांनी एम.ए. व १९०७ साली एल्एलबी. या पदव्या संपादन करून ते वकिलीच्या व्यवसायात कार्यरत होते. ‘भाला’ या वृत्तपत्राचे संपादक, प्रसिद्ध फौजदारी वकील व फर्डे वक्ते म्हणून नावाजलेल्या भास्कर बळवंत उर्फ ‘भाला’कार भोपटकरांचे ते धाकटे बंधू होते. आपल्या बंधूप्रमाणेच तेही लोकमान्य टिळकांचे खंदे अनुयायी होते. लोकशाही स्वराज्य पक्ष व हिंदू महासभा या पक्षांमधून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. पुण्यातील सोन्या मारुती सत्याग्रहात व हैद्राबाद सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता; त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही घडला. गांधीहत्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. अण्णासाहेबांनी ‘मराठा’ साप्ताहिकातून राजकारण व तत्त्वज्ञानविषयक लेखन केले. वृत्तपत्रातील जहाल लेखनाबद्दल ‘भालाकार’ भोपटकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत अण्णासाहेबांनी ‘भाला’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. पुढे त्यांनी ‘लोकसंग्रह’ या दैनिकाचे संपादनही केले. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी महात्मा गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यांनी ‘पर्मनन्ट एलिमेन्ट्स ऑफ रिलिजन’ ही इंग्रजी लेखमाला लिहिली. बिपिनचंद्र पाल यांच्या व्याख्यानांचे, तसेच लाला लजपतराय यांच्या ‘माझ्या हद्दपारीची कहाणी’ या पुस्तकाचे अनुवाद त्यांच्या नावावर जमा आहेत. विशेष म्हणजे, ही दोन्ही पुस्तके इंग्रज सरकारकडून प्रक्षोभक ठरविण्यात आली व ती जप्त करण्यात आली होती. काँग्रेसचे कायदेमंडळ, स्वराज्याची मीमांसा, हिंदू समाज दर्शन, अशी राजकीय विचार मांडणारी पुस्तके त्यांनी लिहिली. अण्णासाहेबांना व्यायाम व कुस्ती यांमध्ये विशेष रस होता. ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘कुस्ती’, ‘दांडपट्टा’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ ही व्यायाम व कुस्तीच्या प्रकारांबाबत प्रबोधन करणारी व त्यांचा प्रसार करणारी पुस्तके त्यांनी लिहिली. राजकीय, तत्त्वज्ञानविषयक व कुस्तीविषयक पुस्तकांच्या तुलनेत त्यांचे वाङ्मयीन लेखन अल्प आहे. त्यांनी ‘नवरत्नांचा हार’ हे मराठा वीरांच्या शौर्यगाथा कथन करणारे प्रेरणादायी पुस्तक लिहिले. याशिवाय, ‘मृत्यूच्या मांडीवर’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीमध्ये वीर व करुण रसाचा आविष्कार आढळतो. - मनोहर सोनावणे (संदर्भ-महाराष्ट्रनायक)
2660Loading...
36
१० मे १९०७ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला १० मे १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता झाली
2000Loading...
37
परकीय सत्तेच्या अधिपत्याखाली असलेल्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग १० मे १८५७ रोजी पहिल्यांदा फुंकले गेले आणि संपूर्ण भारतवर्षाला एक नवी जाग आली, आशेचा नवीन किरण दिसला. या लढ्यात प्राणपणाने लढलेल्या आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना, भारतमातेच्या वीर सुपुत्रांना या उठावाच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
2430Loading...
38
Media files
2671Loading...
39
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची आज जयंती. (०९ मे १८१४) (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२) . तर्खडकर, दादोबा पांडुरंग : (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२). अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. मुंबई येथे जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते. ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे. भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मुंबई येथे ते निधन पावले. लेखक-मालशे, स. गं. संदर्भ-मराठी विश्वकोश
3291Loading...
40
दादोबा पांडुरंग
2371Loading...
00:07
Video unavailableShow in Telegram
🆔 Channel : @IgSavenews 🤖 Bot : @IgSavesbot
Show all...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (जन्म १० ऑक्टोबर १८९९) यांचा आज स्मृतीदिन (मृत्यू-२२ मे १९९१) . डांगे, श्रीपाद अमृत : (१० ऑक्टोबर १८९९– २२ मे १९९१). एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण नासिक येथे. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईचा विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पण गांधीच्या तत्त्वज्ञानाने भ्रमनिरास झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन (१९२१) हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते (१९२४). या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत. डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर्. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६–२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांति (१९२७) हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्यास अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. कलकत्ता येथील अखिल भारतीय कामगार व कृषी पक्षाच्या आधिवेशनास ते हजर राहिले (१९२८). १९२९ मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. १९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. १९४५ मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या कमिटीवरही त्यांची निवड झाली. त्यांनी १९४६ मध्ये यूरोपचा दौरा करून मॉस्को, लंडन, पॅरिस, वगैरे शहरांना भेटी देऊन तेथील कामगार नेत्यांशी चर्चा केली. लोकसभेत एक निर्भिड व सडेतोड संसदपटू म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळविली. तत्पूर्वी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाले व गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. १९६२ च्या भारत–चीन युद्धात त्यांनी नेहरू सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. पण नंतर कम्युनिस्ट पक्षात लवकरच फाटाफूट झाली (१९६४). त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष झाले. प्रथमपासून त्यांचा साम्यवाद रशियानुकूल असल्यामुळे चीन–रशिया वैचारिक संघर्षात त्यांनी रशियाची बाजू घेतली. १९७१ मध्ये पुन्हा त्यांची कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे ते अध्यक्ष झाले. डांगे हे व्यवहारी राजकारणपटू आहेत. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा अभ्यास सखोल असून त्यांचे ग्रांथिक आणि स्फुटलेखन विपुल आहे. इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी (१९४९) व व्हेन कम्युनिस्ट डिफर (१९७०) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. संदर्भ : 1. Dange, Usha, S. A. Dange, Bombay, 1974. 2. Dutta, R. P. India Today, Bombay, 1970. केळकर, इंदुमति
Show all...
Photo unavailableShow in Telegram