cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

HiSTORY by Hardikar

Show more
Advertising posts
1 475
Subscribers
No data24 hours
-17 days
+1830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

आज श्री आदि शंकराचार्य जयंती (वैशाख शुक्ल पंचमी), विनम्र अभिवादन.. . अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रविद्। षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनीरभ्यगत्॥ . भावार्थ :- वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदात पारंगत, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांत निपुण, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर (उपनिषदे, ब्रह्मसूत्र, गीता) भाष्य लिहिणारा हा श्रेष्ठ मुनी (आद्य शंकराचार्य) , हिंदू धर्म लयास जात असताना , पुन्हा भारतवर्षात चार ही दिशांना  मठ स्थापन करुन वैदिक संस्कृती पुनर्जीवित करत संस्कृती व हिंदू धर्माच्या महान कार्या चा विस्तार करुन बत्तीसाव्या वर्षी देह विसर्जन करते झाले.  . ................................................................................................................................................................................................................................................................................... मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश: न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव: न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥ अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
Show all...
In other news, the kid defeated World No-1 Magnus Carlsen in the Poland Grand Chess Tour... Well done Champ @rpraggnachess 👏
Show all...
११ मे १९९८ २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या. . आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणूचाचणी! संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 11 मे म्हणजे आजच्याच दिवशी 1998 मध्ये पोखरणमध्ये अणू चाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने उचललेल्या या धाडसी पावलामुळेच देशाच्या प्रगतीला 'बूस्ट' मिळाला होता. जाणून घेऊयात या अणू चाचणीचा रंजक इतिहास... ११ मे ते १३ मे, १९९८... या तीन दिवसांच्या कालावधीत भारताने ५ स्फोट करून राजस्थानमधील पोखरणमध्ये चाचण्या घेतल्या होत्या. या चाचण्यांची तयारी कमालीची गोपनीय राखण्यात आली होती. संपूर्ण जगाची पोलिसगिरी करणाऱ्या अमेरिकेच्या 'CIA'लाही या चाचणीचा सुगावा लागू शकला नाही, यातच भारताचे राजनैतिक आणि धोरणात्मक यश होतं, असं म्हणावं लागेल. ही मोहीम इतकी गोपनीय राखण्यात आली होती, की केंद्र सरकारमधील निवडक अधिकाऱ्यांनाच यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. किंबहुना, तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. या मोहिमेविषयी खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, वाजपेयींचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लष्करातील मोजके अधिकारी आणि या प्रकल्पावर काम करणारे 58 इंजिनिअर्स यांनाच या मिशनविषयी कल्पना होती. प्रत्यक्ष चाचण्यांपूर्वी दहा दिवस आधी या चाचण्यांची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी लागणारी यंत्रे आणि इतर साहित्य मुंबईहून केवळ चार ट्रकमधून पोखरणमध्ये आणण्यात आले. अमेरिकी उपग्रहांची भारतावरील 'नजर' चुकवून ही सर्व तयारी करण्यात आली होती. चाचणी घेतल्याचं जाहीर केल्यानंतर केवळ इस्राईल या देशानेच भारताला पाठिंबा दिला होता. अमेरिकेसह अन्य इतर देशांनी भारतावर टीका केली होती. संतप्त अमेरिकेकडून तर भारतावर निर्बंधही लादण्यात आले होते. वाजपेयी सत्तेत येण्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्‍लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. मात्र, अमेरिकी उपग्रहांनी याची छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला चाचणी घेता आली नव्हती. १९९८ मध्ये वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. 'चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल', असा प्रश्‍न वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, 'तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या ३० दिवसांत चाचणी घेऊ!' त्या बैठकीत तारीख ठरली... ११ मे, १९९८! त्या काळात जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशाकडे अण्वस्त्रे नव्हती. तरीही भारताने धाडस करून हे पाऊल उचलले. या अणुचाचणीची घोषणा करतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभेत तीन महत्त्वाची विधाने केली. १. कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही. २. ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही, त्यांच्याविरोधात आम्ही त्यांचा वापर करणार नाही. ३. यापुढे भारत अण्वस्त्र चाचणी घेणार नाही. त्याकाळात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होती. अमेरिकन सॅटलाइट्सचे पोखरण रेंजवर बारीक लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटलाइटला देखील चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करुन दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कुणालाही कळू नये, यासाठी वैज्ञानिक देखील सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे. या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच...! भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींच्या नेतृत्वलाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिलं. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला. (संदर्भ-इंटरनेट)
Show all...
रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ (जन्म: १० मे १९१८) यांचा आज स्मृतिदिन (२० जानेवारी २०२२). . Today is the death anniversary of (January 20, 2022) of Rameswarnath Kao (Born: 10 May 1918), founder chairman of the Research and Analysis Wing (RAW) of India.
Show all...
नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचा आज जन्मदिन (जन्म १० मे १८८०) (मृत्यू २४ एप्रिल १९६०) . भोपटकर, लक्ष्मण बळवंत राजकीय ग्रंथकार, पत्रकार प्रसिध्दी नाव : अण्णासाहेब भोपटकर जन्मदिनांक : १० मे १८८० मृत्युदिनांक : 2४ एप्रिल १९६० कार्यक्षेत्र : साहित्य भोपटकर, लक्ष्मण बळवंत अण्णासाहेब भोपटकर लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब भोपटकर हे प्रसिद्ध कायदेपंडित होते. स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग, वृत्तपत्रांचे संपादन, राजकीय, तसेच व्यायाम व कुस्ती या विषयांवर लेखन आणि ललित गद्य लेखन अशी विविधांगी कामगिरी त्यांच्या नावावर आहे. लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब हे उच्चशिक्षित होते. १९०४ साली त्यांनी एम.ए. व १९०७ साली एल्एलबी. या पदव्या संपादन करून ते वकिलीच्या व्यवसायात कार्यरत होते. ‘भाला’ या वृत्तपत्राचे संपादक, प्रसिद्ध फौजदारी वकील व फर्डे वक्ते म्हणून नावाजलेल्या भास्कर बळवंत उर्फ ‘भाला’कार भोपटकरांचे ते धाकटे बंधू होते. आपल्या बंधूप्रमाणेच तेही लोकमान्य टिळकांचे खंदे अनुयायी होते. लोकशाही स्वराज्य पक्ष व हिंदू महासभा या पक्षांमधून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. पुण्यातील सोन्या मारुती सत्याग्रहात व हैद्राबाद सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता; त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही घडला. गांधीहत्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. अण्णासाहेबांनी ‘मराठा’ साप्ताहिकातून राजकारण व तत्त्वज्ञानविषयक लेखन केले. वृत्तपत्रातील जहाल लेखनाबद्दल ‘भालाकार’ भोपटकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत अण्णासाहेबांनी ‘भाला’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. पुढे त्यांनी ‘लोकसंग्रह’ या दैनिकाचे संपादनही केले. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी महात्मा गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यांनी ‘पर्मनन्ट एलिमेन्ट्स ऑफ रिलिजन’ ही इंग्रजी लेखमाला लिहिली. बिपिनचंद्र पाल यांच्या व्याख्यानांचे, तसेच लाला लजपतराय यांच्या ‘माझ्या हद्दपारीची कहाणी’ या पुस्तकाचे अनुवाद त्यांच्या नावावर जमा आहेत. विशेष म्हणजे, ही दोन्ही पुस्तके इंग्रज सरकारकडून प्रक्षोभक ठरविण्यात आली व ती जप्त करण्यात आली होती. काँग्रेसचे कायदेमंडळ, स्वराज्याची मीमांसा, हिंदू समाज दर्शन, अशी राजकीय विचार मांडणारी पुस्तके त्यांनी लिहिली. अण्णासाहेबांना व्यायाम व कुस्ती यांमध्ये विशेष रस होता. ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘कुस्ती’, ‘दांडपट्टा’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ ही व्यायाम व कुस्तीच्या प्रकारांबाबत प्रबोधन करणारी व त्यांचा प्रसार करणारी पुस्तके त्यांनी लिहिली. राजकीय, तत्त्वज्ञानविषयक व कुस्तीविषयक पुस्तकांच्या तुलनेत त्यांचे वाङ्मयीन लेखन अल्प आहे. त्यांनी ‘नवरत्नांचा हार’ हे मराठा वीरांच्या शौर्यगाथा कथन करणारे प्रेरणादायी पुस्तक लिहिले. याशिवाय, ‘मृत्यूच्या मांडीवर’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीमध्ये वीर व करुण रसाचा आविष्कार आढळतो. - मनोहर सोनावणे (संदर्भ-महाराष्ट्रनायक)
Show all...
१० मे १९०७ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला १० मे १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता झाली
Show all...
परकीय सत्तेच्या अधिपत्याखाली असलेल्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग १० मे १८५७ रोजी पहिल्यांदा फुंकले गेले आणि संपूर्ण भारतवर्षाला एक नवी जाग आली, आशेचा नवीन किरण दिसला. या लढ्यात प्राणपणाने लढलेल्या आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना, भारतमातेच्या वीर सुपुत्रांना या उठावाच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Show all...