सोहम करिअर अकॅडेमी,मोहोळ ,जिल्हा-सोलापूर
Open in Telegram
1 281
Subscribers
No data24 hours
-27 days
-730 days
Posts Archive
सदानंद वसंत दाते NIA चे महासंचालक नियुक्त
▪️आयपीएस सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️सदानंद दाते NIA चे विद्यमान महासंचालक दिनकर गुप्ता यांची जागा घेतील.
▪️महासंचालक म्हणून कार्यकाळ : 31 डिसेंबर 2026 पर्यंत.
▪️IPS सदानंद वसंत दाते :
▪️ते 1990 चे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
▪️महाराष्ट्र ATS चे प्रमुख म्हणून काम
▪️2015 मध्ये CRPF मध्ये IG पदावर बढती.
▪️राष्ट्रीय तपास संस्था (NIA) :
▪️ही भारतातील विशेष दहशतवादविरोधी कायदा अंमलबजावणी एजन्सी आहे.
▪️स्थापना : 2009
▪️ मुख्यालय : नवी दिल्ली
▪️महासंचालक : सदानंद वसंत दाते
▪️हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
सोनम वांगचुक यांनी लडाख मधील लोकांच्या मागणीसाठी 0℃ च्या खाली तापमानात लोकांनी हे आंदोलन केले
⭐️उपोषणाला सुरवात : 6 मार्च 2024
⭐️उपोषण सोडले : 26 मार्च 2024
⭐️तब्बल 20 दिवस उपोषण केले , 21 व्या दिवशी उपोषण सोडले
🧐 मागण्या काय आहेत ?
◾️लडाख ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा
◾️स्थानिकांसाठी नोकरीच्या संधी आणि लडाखमधील लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी लोकसेवा आयोगाची स्थापना करावी
◾️लेह आणि कारगिल साठी संसदेमध्ये एक एक सीट मिळावे
◾️लडाख ला सहावी अनुसूची मध्ये सामील केले जावे
⛰ लडाख बद्दल माहिती 🌆
⭐️दर्जा : केंद्रशासित प्रदेश
⭐️31 ऑक्टोबर 2019 पासून
⭐️जिल्हे : लेह आणि कारगिल ( दोन)
⭐️लेफ्टनंट गव्हर्नर बिडी मिश्रा
⭐️क्षेत्रफळ : 59,143 Km2
⭐️लोकसंख्या 2,74,289 (2011 नुसार)
जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा मंजूर झाल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाखची स्थापना भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून करण्यात आली
चालू घडामोडी :- 30 मार्च 2024
◆ पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे पुरस्कार 2024 'डॉ. अनिल गजभिये' यांना जाहीर झाला आहे.
◆ इंडिया employment रिपोर्ट 2024 'अनंत नागेश्वरन' यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे.
◆ इंडिया Employment रिपोर्ट 2024 "इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि आंतरराष्ट्रिय कामगार संघटना" संयुक्तपणे तयार केला आहे.
◆ इंडिया Employment रिपोर्ट 2024 नुसार भारतातील बेरोजगारी मध्ये तरुणांचे प्रमाण 83 टक्के आहे.
◆ आंतरराष्ट्रिय हॉकी फेडरेशनच्या एथलीटस समितीच्या सहअध्यक्षपदी 'पी. आर. श्रीजेश' या भारतीय हॉकी पटू ची निवड झाली आहे.
◆ ISRO या संस्थे द्वारे एप्रिल-मे महीन्यात START-2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
◆ अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच बेल्जियम या देशात पार पडली आहे.
◆ लुईस माँटेनेग्रो यांची पोर्तुगाल या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
◆ निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून cVIGIL ॲप सुरू करण्यात आले आहे.
◆ सदानंद दाते यांनी पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर 'वर्दीतील माणसांच्या नोंदी' हे पुस्तक लिहिलं आहे.
◆ व्ही.ओ. चिदंबरनार बंदराचे ग्रीन हायड्रोजन हबमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.
◆ शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांद्वारे SWAYAM प्लस प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले.
◆ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे स्वामीनारायण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले.
◆ इजिप्तमध्ये झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वचषकात विनयचे सुवर्णपदक जिंकले.
◆ पंचकुला येथे सुरु असलेल्या भारतीय मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्राच्या नाहिद दिवेचाने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
◆ डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी मरियम मॅमेन मॅथ्यू यांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
चालू घडामोडी :- 29 मार्च 2024
◆ राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या प्रमुख पदी पियूष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRF ची स्थापना 2006 या वर्षी झाली आहे.
◆ हैद्राबाद संघाचा खेळाडू अभिषेक शर्मा याने आयपीएल मध्ये सर्वात कमी 16 चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे.
◆ ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा 5वा क्रमांक आहे.
◆ थायलंड देशाने विवाह समानता विधेयक मंजूर केले. कायदा लागू झाल्यानंतर थायलंड आशियातील तिसरा देश ठरणार आहे.
◆ सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल अमेरिका देशात आहे.
◆ उत्तराखंड राज्यातील चीपको आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाले आहेत.
◆ भारताच्या लोकपाल पदी नुकतीच ऋतुराज अवस्थी, पंकज कुमार, अजय तिर्की या तीन सदस्यांनी शपथ घेतली.
◆ इंटरनॅशनल अस्ट्रोलॉजिकल युनिट ने एका लघुग्रहाला जयंत मूर्ती या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे.
◆ POEM-3 मोहिमेद्वारे झिरो ऑर्बिटल डेब्रिज मिशन पुर्ण झाले आहे. हे मिशन ISRO या संस्थेद्वारे राबविण्यात आले होते.
◆ अभय ठाकुर यांची म्यानमार या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे.
◆ राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालक पदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे NIA मध्ये नियुक्ती झालेले महाराष्ट्र कॅडर चे दुसरे अधिकारी ठरले आहेत.
◆ आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे NIA च्या महासंचालक पदावर 2026 पर्यंत राहणार आहेत.
◆ पोलीस संशोधन व विकास ब्युरो च्या महासंचालक पदी निवड झालेले राजीव कुमार हे राजस्थान राज्याच्या कॅडर 1990 बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत.
◆ उत्तर प्रदेश कॅडरचे पीयूष आनंद यांची एनडीआरएफच्या प्रमुख पदी नियुक्ती केली.
◆ सौदी अरब हा देश इतिहासात पहिल्यांदाच विश्वसुंदरी स्पर्धा अर्थात मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. [देशाचे प्रतिनिधित्व :- अलकाहतानी]
चालू घडामोडी :- 28 मार्च 2024
◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती' सुरू केले.
◆ SEBI ने वैकल्पिक आधारावर T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती मंजूर केली.(SEBI ची स्थापना 21 फेब्रुवारी 1992 रोजी वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.)
◆ काश्मीर खोऱ्यात, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन अधिकृतपणे लोकांसाठी खुले करण्यात आले.
◆ श्रीजा अकुलाने WTT फीडर स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
◆ मित्तलबेन पटेल यांनी लिहिलेल्या 'सरनामा वगर्ण मानवियो" या पुस्तकावर आधारित गुजराती चित्रपट "भारत म्हारो देश चे" ने गुजरात सरकारद्वारे आयोजित 'गुजरात राज्य पुरस्कार 2021 मध्ये 6 पुरस्कार जिंकले आहेत.
◆ मुंबई ने बिजिंग या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे.
◆ हुरून रिसर्च 2024 च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील अब्जाधिश शहराच्या यादीत मुंबई शहर तिसऱ्या स्थानावर पोहचले आहे.
◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत न्युयॉर्क हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.
◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत चीन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.
◆ भारतीय वंशाचे डॉ. टी एन सुब्रमण्यम(गणित तज्ञ) यांचे निधन झाले. ते 'जनरल मोटर्स' वाहन कंपनीचे संस्थापक होते.
◆ महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 या श्रीलंका देशात खेळवल्या जाणार आहेत.
◆ स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते 2017 या वर्षी रामकृष्ण मिशन चे अध्यक्ष(16 वे) झाले होते.
◆ भारताचा आघाडीचा टेबल टेनिस पटू जी. साथीयान जागतिक क्रमवारीत 60व्या स्थानी पोहचला आहे.
◆ लोकसभा निवडणुक 2024 साठी केंद्रिय निवडणुक आयोगाने दिव्यांगासाठी 'सक्षम' हे ॲप लाँच केले आहे.
◆ जागतिक रंगभूमी दिवस दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
◆ 27 मार्च या दिवशी 1961 पासून जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो.[पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला]
'अबेल पुरस्कार-2024' गणिताचा ऑस्कर
✅ नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने ॲबेल पारितोषिकासाठी मिशेल टालाग्रांड या फ्रेंच गणितज्ञांची निवड केली आहे, जे म्हणतात की गणित "तुम्हाला पंख देते".
✅ 72 वर्षीय मिशेल यांची संभाव्यता सिद्धांत अंतर्गत यादृच्छिक घटनांच्या अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे.
✅ नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल यांच्या नावावर असलेला हा पुरस्कार नॉर्वे सरकारने तयार केला आहे. पाच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त गणितज्ञांच्या समितीद्वारे विजेत्याची निवड केली जाते आणि त्याला 7.5 दशलक्ष क्रोनर (£858,941) चा धनादेश प्राप्त होतो.
अब्जाधीशांच्या यादीत मुंबई आशियात अव्वल आणि जगात तिसरी
👉 अब्जाधीश यादी
1) न्यूयॉर्क [119 अब्जाधीश],
2) लंडन [97 अब्जाधीश],
3) मुंबई [92 अब्जाधीश],
4) बिजिंग [91 अब्जाधीश]
शांघायस्थित हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने अब्जाधीशांचा अहवाल प्रसारित केला आहे.
अब्जाधीशांच्या संख्येत न्यूयॉर्क जगात अव्वलस्थानी असून मुंबई आशियात पहिल्या आणि जगात तिसऱ्या स्थानी आहे.
जगातील अब्जाधीशांच्या यादीत दिल्लीने प्रथमच दहावे स्थान पटकावले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये समावेश असून, भारतामध्ये ते अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
गौतम अदानी यांचे जगातील अब्जाधीशांच्या यादीत 15 वे स्थान असून, भारतात ते दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत.
शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
▪️संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला.
▪️महासंगणकाचे जनक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
▪️कोणा तर्फे : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे
▪️स्थापना/सुरुवात : 1989
▪️पुरस्काराचे स्वरूप :
स्मृतिचिन्ह आणि रूपये 2 लाख रोख
▪️पुरस्कारचे वैशिष्ट्य :
सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह
▪️संस्थेचे अध्यक्ष : डॉ. सतीश देसाई
▪️पहिला पुण्यभूषण पुरस्कार : पंडित भीमसेन जोशी
चालू घडामोडी :- 27 मार्च 2024
◆ IPL मध्ये एका सामन्यात जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक वेळा 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 20 वेळा 3 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा 3 विकेट घेण्याच्या लसिथ मलिंगा(19 वेळा) विक्रमाला मागे टाकले आहे.
◆ इंडियन बँक्स असोसिएशन च्या अध्यक्ष पदी एम. व्ही. राव यांची निवड झाली आहे.
◆ गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिग महोत्सव मार्च महिन्यात साजरा करण्यात येतो.
◆ 2024 चा अबेल पुरस्कार मिळवणारे Michel Talagrand हे फ्रान्स या देशाचे गणित तज्ञ आहेत.
◆ अबेल पुरस्कार दरवर्षी गणित क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येतो.
◆ अबेल पुरस्कार देण्याची सुरवात 2003 पासून झाली आहे.
◆ गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्ष पदी गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ पोखरा ही नेपाळ या देशाने पर्यटन राजधानी घोषीत केली आहे.
◆ अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलिया देशात SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
◆ टी 20 क्रिकेट मध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
◆ स्वित्झर्लंड येथील जिन्हिव्हा येथे होत असलेल्या आंतर संसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व 'हरिवंश नारायण सिंह' करत आहे.
◆ ब्रिटन देशाचा ख्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे.
◆ पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 बिना अगरवाल आणि जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात आला आहे.
◆ आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक स्वित्झलँड या देशात होत आहे.
चालू घडामोडी :- 24 मार्च 2024
◆ 1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार.(RBI ची स्थापना :- 1 एप्रिल 1935)
◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतान देशाच्या 'ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पाहिले विदेशी व्यक्ती ठरले आहेत.
◆ बिहार राज्यात सुपौल जिल्ह्यात कोशी नदीवर देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येत आहे.
◆ बिहार राज्यात 10.2km लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे.
◆ इस्रो कडून भारताच्या पहिल्या पुष्पक या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे.
◆ इस्रो ने पुष्पक या अवकाश यानाची यशस्वी चाचणी कर्नाटक राज्यातील चीत्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे.
◆ हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन इंद्रावती' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ भारत सरकारने हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सूरू केले आहे.
◆ खगोशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला 'शिव आणि शक्ती' नाव दिले आहे.
◆ डॉ. विजय भटकर यांना संगणक शास्त्र या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
◆ Google Deepmind या कंपनीने SIMA AI मॉडेल लाँच केले आहे.
◆ शांघाय ऑपरेशन ऑर्गायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन भारत या देशात करण्यात आले होते.
◆ इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी डॉ. नीरज मित्तल यांनी निवड झाली आहे.
◆ भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट अरुणाचल प्रदेश या राज्यात सूरू करण्यात आले आहे.
◆ उत्तर प्रदेश राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषीत केला आहे.
चालू घडामोडी :- 23 मार्च 2024
◆ चांद्रयान- 3' मोहिमेसाठी अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक पुरस्कार' इस्रोला मिळाला आहे.
◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये समिती स्थापन केली होती.
◆ 18 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान, पूर्व समुद्रकिनाऱ्यावर, अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) युद्धसराव पार पडणार आहे.
◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये भारताच्या पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम अँड ॲक्वेदिक सेंटरचे अनावरण केले.
◆ झोमॅटोने 'शुद्ध शाकाहारी (प्योर व्हेज) डिलिव्हरी फ्लीट सुरु केला आहे. जो ग्रीन डिलिव्हरी बॉक्समध्ये 'शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्समधून ऑर्डर घेईल.
◆ दक्षिण कोरियाकडून 'लोकशाहीसाठी AI जोखीम इशारा परिषदेचे आयोजन करण्यात आले.(दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष :- यून सुक योल)
◆ मिझोरामचे माजी मुख्य सचिव लालमलसावमा यांची लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ भरत नाट्यममधील योगदानाबद्दल डॉ. उमा रेळे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ राजस्थानने धरणे, जलाशय आणि कालव्यांमधील पाण्याची पातळी आणि उपलब्धतेची वास्तविक- वेळ माहितीसाठी एक समर्पित पोर्टल सुरु केले आहे.
◆ UN अहवालानुसार "प्लॅनेट ऑन द ड्रिंक: 2014-2023 है रेकॉर्डवरील सर्वात उष्ण दशक ठरले.
◆ भारत निवडणूक आयोगाने भूषण गगराणी यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ नयना जेम्सने तिसऱ्या इंडियन ओपन जंपमध्ये सुवर्णपदक जिंकले.(चंद्रशेखरन नायर स्टेडियमवर पहिली इंडियन ओपन जंप स्पर्धा झाली.)
◆ मुस्तफा सुलेमान यांची मायक्रोसॉफ्टचे नवे एआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.(AI लॅबचे सह-संस्थापक :- मुस्तफा सुलेमान)
◆ 2024 मध्ये पॅरिस याठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 'शरथ कमल'(खेळ :- टेबल टेनिस) खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे.
◆ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून 'मेरी कोम' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ सौमेंदु बागची यांच्या इराण या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ चिली देशात भारताचे राजदूत म्हणून अभिलाषा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ टी. आर्मस्ट्रांग चांगसन यांची क्युबा या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चालू घडामोडी :- 22 मार्च 2024
◆ चेन्नई सुपकिंग्ज पुरुष IPL संघाचे नेतृत्व (कॅप्टन्सी) ऋतुराज गायकवाड करणार.
◆ ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे.
◆ अंतरराष्ट्रिय वन दिवस 21 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
◆ जगात भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीत 10वा क्रमांक आहे.
◆ आंतरराष्ट्रिय वन दिन 2024 ची थीम "वन आणि नवसंशोधन: चांगल्या जगासाठी नवीन उपाय' आहे.
◆ अमेरीका या देशातील कंपनी एनविडियाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबट तयार केला आहे.
◆ ब्राझील देशातील 'रियो डी जेनेरो' येथे या दशकातील सर्वाधिक(62.3°C) तापमानाची नोंद झाली आहे.
◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत भारताचा 126वा क्रमांक आहे.
◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत फिनलंड हा देश प्रथम स्थानावर आहे.
◆ जगात सर्वाधिक आनंदी देशाच्या यादीत फिनलंड सलग सातव्यांदा प्रथम स्थानावर आहे.
◆ जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत अफगाणिस्तान हा देशाचा क्रमांक सर्वात शेवटी आहे.
◆ संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 20 मार्च या दिवशी जागतिक आनंदी अहवाल सादर केला जातो?l.
◆ राईजिंग भारत संमेलनाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
◆ ICC टी-20 फलंदाजी क्रमवारीत "सूर्यकुमार यादव" हा खेळाडू प्रथम स्थानावर आहे.
◆ मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने "भारतीय रेल्वे" सोबत करार केला आहे.
◆ 'मेगन' हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलिया या देशात आले आहे.
◆ तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन दक्षिण कोरिया या देशात करण्यात आले आहे.
◆ अमेरिका आणि जर्मनी या दोन देशांना 10 वर्षात पहिल्यांदा जागतिक आनंदी देशांच्या यादीत पहील्या 20 मध्ये स्थान मिळाले नाही.
चालू घडामोडी :- 21 मार्च 2024
◆ विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी "सखी" बहुउद्देशीय ॲप विकसित केले आहे.
◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम आणि जलचर केंद्राचे अनावरण केले.
◆ भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवानीचा चीनच्या शंगराओ सिटी येथील जागतिक बिलिर्डस संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे.
◆ NVIDIA ने Humanoid रोबोट्ससाठी प्रोजेक्ट GROOT फाउंडेशन मॉडेल जाहीर केले.
◆ शास्त्रज्ञांनी मंगळावर 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेल्या 'नोक्टिस ज्वालामुखी या प्रचंड ज्वालामुखीचा शोध लावला आहे.
◆ विनय कुमार, 1992 बॅचचे IFS अधिकारी, यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ 1997 च्या बॅचचे IFS अधिकारी टी. आर्मस्ट्राँग चांगसान यांची क्युबातील भारताचे पुढील टराजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ झारखंडचे टराज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
◆ 'जागतिक चिमणी दिन' दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो.
◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील 'कलिंगा स्टेडियम' येथे भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्रांचे उद्घाटन केले.
◆ भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एक्स टायगर ट्रायम्फ-24’ सुरू झाला आहे.
◆ गयानाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.
◆ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे नवे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ निवडणूक आयोगाने ‘नो युवर कॅन्डीडेट’ ॲप लाँच केले आहे.
◆ IQAIR च्या अहवालानुसार बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.
◆ नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा ही देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे.
◆ ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ ने आपला 37 वा स्थापना दिवस साजरा केला.
◆ कुमार व्यंकटसुब्रमण्यम हे P&G इंडियाचे नवे सीईओ बनले आहेत.
◆ मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवयित्री ‘प्रभा वर्मा’ यांना सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.
◆ ‘नॉर्थ ईस्ट गेम्स 2024’ ची तिसरी आवृत्ती नागालँडमध्ये सुरू झाली आहे.
◆ उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘त्रिनेत्र 2.0’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.
🎯जगातील सर्वाधिक प्रदूषित " शहरे "
◾️बेगुसराय (भारत)
◾️गुवाहाटी (भारत)
◾️दिल्ली (भारत)
◾️मुल्लनपूर (भारत)
◾️लाहोर (पाकिस्तान)
◾️सिवान (भारत)
◾️सहर्सा (भारत)
◾️गोसाईगाव (भारत)
◾️कटिहार (भारत)
🔖जगातील सर्वाधिक प्रदूषित " देश "
◾️बांगलादेश ७९.९
◾️पाकिस्तान
◾️भारत
◾️ताजिकिस्तान
◾️बर्किना फासो
◾️इराक
◾️अमिराती
◾️नेपाळ
◾️इजिप्त
स्वित्झर्लंडमधील IQ Air या संस्थेने 2023 या वर्षात जागतिक स्तरावर हवेचा दर्जा कसा याबाबत संशोधन करून एक अहवाल तयार केला आहे.
व्लादिमीर पुतिन हे सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले
▪️व्लादिमीर पुतिन यांनी निकोले खारितोनोव्ह यांचा पराभव करून रशियाती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
▪️15-17 मार्च रोजी झालेल्या मतदानात पुतिन यांना 88% मते मिळाली.
▪️पुतिन यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ :
पहिली टर्म (2000-2004)
दुसरी टर्म (2004-2008)
तिसरी टर्म (2012-2018)
चौथी टर्म (2018-2024)
रशिया :
▪️क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.
▪️राजधानी: मॉस्को
▪️अधिकृत भाषा: रशियन
▪️अध्यक्ष: व्लादिमीर पुतिन
▪️पंतप्रधान: दिमित्री मेदवेदेव
चालू घडामोडी :- 20 मार्च 2024
◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.
◆ लाडा मार्टिन मार्बानियांग यांची बेळगावच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रेक्जेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण आइसलँडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
◆ आइसलँडमध्ये एकुण 33 सक्रिय ज्वालामुखी प्रणाली आहेत, जी युरोपमधील सर्वाधिक संख्या आहे.
◆ जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट एटना (3,350 मीटर) आहे, जो आफ्रिकन आणि यूरेशियन भूपट्टादरम्यान स्थित आहे.
◆ डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.
◆ 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन' दरवर्षी 19 मार्च रोजी साजरा केला जातो.[Note :- 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन]
◆ 19 मार्च 2010 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
◆ DHL कनेक्टेडनेस इंडेक्समध्ये भारताला '62 वे' स्थान मिळाले आहे.
◆ व्लादिमीर पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
◆ प्रसिद्ध कन्नड संगीतकार 'टीएम कृष्णा' यांना प्रतिष्ठेच्या 'संगीत कलानिधी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ तमिलिसाई सुंदरराजन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.
◆ जयदीप हंसराज यांची ‘वन कोटक’ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ प्रख्यात आदिवासी नेते आणि बौद्ध भिक्षू लामा लोबझांग यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
◆ भारतातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झाला आहे.
◆ केंद्रीय मंत्री 'अनुराग सिंह ठाकूर' यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.
◆ अमेरिकेतील प्रसिद्ध पियानोवादक 'बायरन जेनिस' यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
◆ तामिळनाडू राज्य सरकारने ‘पीएम श्री योजना’ लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.
◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.
◆ WPL 2024 स्पर्धेत दीप्ती शर्मा(यूपी वॉरियर्सने) ही खेळाडू मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ठरली आहे.
◆ WPL 2024 स्पर्धेत सोफी मोलिनक्स(RCB - ऑस्ट्रेलिया) या महिला खेळाडू ला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
चालू घडामोडी :- 19 मार्च 2024
◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली.
◆ 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'ने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ भारतातील पहिले 'आयुर्वेदिक कॅफे' नवी दिल्लीत सुरू झाले.
◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.
◆ केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी E-NAM (National Agriculture Market) मोबाईल ॲप लाँच केले आहे.
◆ हैदराबादमध्ये नुकताच ‘वर्ल्ड स्पिरिच्युअली फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.
◆ केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.
◆ प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी "नवनीत कुमार सहगल" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ देशातील बंगळुरू या ठिकाणी 75 शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात लांब डोसा तयार केला असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे.
◆ केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी 'इथेनॉल-100' या इंधनाचा प्रारंभ केला आहे.
◆ लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने "C vigil" हे ॲप विकसित केले आहे.
◆ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या मुख्य महासंचालकपदी 'शेफाली सरन' यांची निवड झाली आहे.
◆ लमीतीए-2024 हा संयुक्त युद्धसराव सेशेल्स या देशात होत आहे.
◆ सेशेल्स या देशात लमीतीए हा युद्ध सराव 2001 वर्षा पासून होत आहे.
◆ अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन सारंग यांची निवड झाली आहे.
◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या संघाने पटकावले आहे.
◆ महीला आयपीएल 2024 चे उप विजेतेपद "दिल्ली कॅपिटल" या संघाने पटकावले आहे.
◆ महीला आयपीएल 2024 स्पर्धेमध्ये एलिस पेरी ही खेळाडू ऑरेंज कॅप ची वेजेती ठरली आहे.
◆ WPL 2024 स्पर्धेत श्रेयंका पाटील ही खेळाडू पर्पल कॅप ची विजेती ठरली आहे.
◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
◆ भारतात केरळ या राज्यात "Lyame Disease" चा पहिला रुग्ण आढळला आहे.
◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.
महिला प्रीमियर लीग (WPL) :- 2024
आयोजित :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI द्वारे
कालावधी :- 23 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024
TATA WPL 2024 म्हणून देखील ओळखली जाते.
महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 :- पाच संघ सहभागी[WPL 2023 :- 5 संघ सहभागी]
1] दिल्ली कॅपिटल्स
2] गुजरात जायेट्स
3] मुंबई इंडियन्स
4] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
5] पटना वॉरियर्स
WPL 2023 चा विजेता संघ :- मुंबई इंडियन्स
WPL 2024 चा विजेता संघ :- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (बंगळूरु फ्रेंचायझीचे हे पहिलेच जेतेपद ठरले.)
सुमन बीएसएफची पहिली महिला स्नायपर
▪️सुमन कुमारी यांची सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️सुमन कुमारी :
▪️सुमन सध्या बीएसएफच्या पंजाब युनिटमध्ये सब इन्स्पेक्टर (एसआय) आहे.
▪️सेंट्रल स्कूल ऑफ वेपन टेक्निक (CSWT), इंदूर येथे प्रशिक्षण घेतले.
▪️SNIPER प्रशिक्षण घेतलेल्या ५६ पुरुषांच्या बॅचमध्ये सुमन या एकमेव महिला होत्या.
▪️आठ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याला बीएसएफमध्ये स्नायपर बनवण्यात आले.
चालू घडामोडी :- 18 मार्च 2024
◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.
◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान या देशात करण्यात येणार आहे.
◆ कर्नाटक राज्याने माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
◆ महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता "ई-टेक्सटाईल" पोर्टल तयार करण्यात येत आहे.
◆ महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी ICICI बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे.
◆ भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे 'नवी दिल्ली' येथे सुरू झाला आहे.
◆ नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविला जाणार आहे.
◆ 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहेत.
◆ ICC ने क्रिकेट मध्ये 'स्टॉप क्लॉक' हा नियम 01 जून 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 तेलंगणा राज्यात आयोजित करण्यात येत आहे.
◆ हैद्राबाद येथे आयोजित जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ जगातील पहिली 3 डी प्रिंटेड मस्जिद "सौदी अरेबिया" या देशात बांधण्यात आली आहे.
◆ मोहम्मद मुस्तफा यांची फिलिस्तीन देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
◆ शरिंग तोग्बे हे 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले भूतान या देशाचे पंतप्रधान आहेत.
