en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Shabdankur - शब्दांकुर ✍️📚

Shabdankur - शब्दांकुर ✍️📚

Open in Telegram

This is Official Channel Created by Vivek Ambhore‼️ 📚All University's Exam Updates Available 📌 Only Serious Aspirants Allow Here! ♦️ Youtube Channel 👇 🔗https://youtube.com/@Shabdankur ☎️Contact Admin 👉 @Shabdankur_vivek

Show more
5 319
Subscribers
-224 hours
-117 days
-5430 days
Posts Archive
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा GR

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी आणि पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसंदर्भात शैक्षणिक अडचण असल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ किंवा जनसंपर्क अधिकारी ,विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे. विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी : 🔹मुंबई विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७). 🔹सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), तसेच अजय ठुबे (७५८८१६९१३४). 🔹शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), विद्यार्थी विकास संचालक अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०). 🔹पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. काळवणे (७०२०६३४५०२). 🔹स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७). 🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१). 🔹कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), विद्यार्थी विकास संचालक महाले (९८२३१९२८३१). 🔹संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४). 🔹राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), विद्यार्थी विकास संचालक डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५). 🔹गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९). 🔹एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संजय नेरकर (९९२२४४४४६७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९). 🔹यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), विद्यार्थी विकास संचालक महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).

अमरावती विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु #sgbaulhosteladmission #sgbauhostelfacility संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मुला-मुलींच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थीनींना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in - Hostel या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश अर्ज दि. 16 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत विद्याथ्र्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. ऑनलाईन प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जाची यादी दि. 18 जुलै रोजी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in - Hostel या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. ज्या विद्यार्थी - विद्यार्थीनींचे यादीमध्ये नांव नसेल, अशा विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 21 जुलै रोजी वसतीगृह कार्यालयात संपर्क साधावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थीनींची विभाग, गुणवत्ता व वर्गवारीनिहाय यादी दि. 28 जुलै रोजी मुला-मुलींच्या वसतीगृह कार्यालयामध्ये सूचना फलकासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिध्द करण्यात येईल. कागदपत्रांची पुर्तता न केल्यास किंवा ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी विद्यार्थीनींनी https://forms.gle/5VusguQPqrVX67BL7 या लिंकवर, तर विद्याथ्र्यांनी https://forms.gle/uazc8ZNy3L4HnhLZ7 या लिंकवर जावून विहित मुदतीत व वेळेत अर्ज सादर करून आपले प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी SEBC आणि OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांना 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींसाठी एक महत्त्वाची सूचना! 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' अंतर्गत आता 'एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख' (One Nation, One Student ID) ही संकल्पना राबवण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा १२ अंकी 'APAAR ID' तयार करून तो आधार आणि डिजीलॉकरशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि श्रेयांक डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतील. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ही नोंदणी १००% पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 15 मे तर विलंब शुल्कासह 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे. या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै 2026 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे 21 मे 2026 पर्यंत रक्कम भरावयाची असून 25 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करावयाच्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी 'बाटु' विद्यापीठाची परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर! राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेऊन, आज मी विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश दिले असून ही संपूर्ण प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर राबवून सर्व अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी एक ठोस कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंकडे आता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' उभारण्याचे आमचे व्हिजन आहे. विद्यार्थ्यांचे हित हेच शासनाचे मुख्य ध्येय असून, एकदा का परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्नीकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. #DBATU #EducationUpdate #StudentFirst #MaharashtraGovernment #highereducation CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar BJP Maharashtra

Shabdankur - शब्दांकुर ✍️📚 - Statistics & analytics of Telegram channel @shabdankur