Shabdankur - शब्दांकुर ✍️📚
Открыть в Telegram
This is Official Channel Created by Vivek Ambhore‼️ 📚All University's Exam Updates Available 📌 Only Serious Aspirants Allow Here! ♦️ Youtube Channel 👇 🔗https://youtube.com/@Shabdankur ☎️Contact Admin 👉 @Shabdankur_vivek
Больше5 744
Подписчики
-424 часа
-277 дней
-10230 день
Архив постов
राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींसाठी एक महत्त्वाची सूचना!
'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' अंतर्गत आता 'एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख' (One Nation, One Student ID) ही संकल्पना राबवण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा १२ अंकी 'APAAR ID' तयार करून तो आधार आणि डिजीलॉकरशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि श्रेयांक डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतील.
सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ही नोंदणी १००% पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 15 मे तर विलंब शुल्कासह 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे.
या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै 2026 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे 21 मे 2026 पर्यंत रक्कम भरावयाची असून 25 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करावयाच्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी 'बाटु' विद्यापीठाची परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!
राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेऊन, आज मी विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश दिले असून ही संपूर्ण प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर राबवून सर्व अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी एक ठोस कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.
परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंकडे आता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' उभारण्याचे आमचे व्हिजन आहे.
विद्यार्थ्यांचे हित हेच शासनाचे मुख्य ध्येय असून, एकदा का परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्नीकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत.
#DBATU #EducationUpdate #StudentFirst #MaharashtraGovernment #highereducation
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar BJP Maharashtra
🌟 Magical March Opportunities special ✨
#ApplyNow to learn, lead, and impact!
🫶
1. SBI Youth for India Fellowship https://youthforindia.org/
2. CMGG Fellowship by Indian Institute of Management Raipur https://lnkd.in/gKxFqNWs
3. YPs Programme for Legal Empowerment- Centre For Social Justice, India https://lnkd.in/gg3JUYUU
4. National Child Rights Research Fellowship-CRY - Child Rights and You https://www.cry.org/ncrrf/
5. NCPEDP Javed Abidi Fellowship https://lnkd.in/gzWBmeYz
6. The Inlaks Shivdasani Foundation Scholarships https://shorturl.at/ywyGq
7. TribesforGOOD Fellowship https://lnkd.in/g4iCs525
8. District Collector Fellowship Narayanpur, Chhattisgarh https://lnkd.in/gZ8dSEsg
9. PRISM National Fellowship- Project EduAccess https://lnkd.in/eUpNWYQu
10. Touching Lives Welfare Trust - India Fellowship https://shorturl.at/BjHUP
11. Young Ambassador (Technology and Society Program)- Carnegie India https://lnkd.in/g9JMyEPQ
12. SWIFTBharat Fellowship-ConveGenius.AI https://lnkd.in/gd8S7tQz
13. Community Organising Fellowship-The Community Library Project https://lnkd.in/gwYJRNiu
14. Civic Fellows Program-Anubhuti Organisation https://lnkd.in/gWnbWGRN
15. 200 Fellows-The Eka Fellowship Suraj Moraje https://lnkd.in/dtskB7yA
16. Eklavya Foundation Fellowship https://shorturl.at/bN3B9
17. Tribal Leadership Programme-Tata Steel Foundation https://lnkd.in/gcrbNpF6
18. Jijivisha Fellowship-Slam Out Loud https://tr.ee/W5n2lvR6q0
19. Savitribai Phule Leadership program-Karta Initiative India Foundation https://lnkd.in/gvZjPCyX
20. Atlas Corps Leadership Institute https://lnkd.in/dRdAMjRT
21. Akikaran Fellowship by Northeast Centre for Equity Action on Integrated Development (NEAID) https://lnkd.in/gsaFhpbg
22. International Innovation Corps India Fellowship https://lnkd.in/gqMbunpP
23. Fulbright-Nehru Fellowships Fulbright Commission in India https://lnkd.in/dB5_BRRp
24. The Antara Foundation Fellowship https://lnkd.in/gBq6p6sP
25. 07 YPs-Ministry of Education https://lnkd.in/d-mK4zY9
26. 150 Fellows–Field Implementation-Bharat HR Services https://lnkd.in/gnqkxwW5
27. YPs-National Book Trust, India https://shorturl.at/SmSso
28. Research fellow- IKAAI INDIA https://lnkd.in/gEuyAi5z
29. Gandhi Fellowship-Piramal Foundation https://lnkd.in/gdU2DtaU
30. Teach For India Fellowship https://lnkd.in/gR2PfxVr
31. Bhumi Fellowship- Bhumi https://lnkd.in/de2xys_x
32. Young India Fellowship at Ashoka University https://bit.ly/YIF_LI
33. NIRMAN For Youth Workshop https://lnkd.in/dDsby4Jq
Regards
Team Helping Hand ✋
आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम (GSP) – ट्रायबल कोहोर्ट 2025 साठी अर्ज सुरू!
महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आणि एकलव्य इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारा आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम (GSP) – ट्रायबल कोहोर्ट 2025 साठी अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे!
मागील तीन बॅचेसच्या उत्तम यशानंतर, आंतरराष्ट्रीय शिक्षणात स्वप्ने पूर्ण करण्याची संधी आता आणखी विस्तृत होत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेंटॉरशिप कोहोर्ट तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन, तयारी, आणि आवश्यक सर्व समर्थन दिले जाईल.
दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी 40 पूर्णशिष्यवृत्ती उपलब्ध करून देतो. या शिष्यवृत्तीत समावेश आहे:
• शिक्षण शुल्क
• राहणे व जेवण
• प्रवास व व्हिसा खर्च
• आरोग्य विमा
शिष्यवृत्तीची एकूण रक्कम अभ्यासक्रम (UG/PG/PhD) आणि विद्यापीठानुसार ₹30 लाख ते ₹3 कोटी पर्यंत असू शकते.
आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/oF6rPsbCyYTo5qm86
अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी भेट द्या: https://whatsapp.com/channel/0029VbBM3gt0lwgi2B9mhV2a
विनंती अर्ज
प्रति,
वैद्यकीय अधिकारी,
प्रा. आ. केंद्र, माळीनगर
विषय:- Internship साठी परवानगी देणे बाबत!
अर्जदार :- शामल भगवान आंभोरे
महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज सादर करते की, मी B. Pharmacy पदवीधर असून मला आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनुभवासाठी तीन महिन्याची करण्याची इच्छा आहे तरी मला परवानगी द्यावी आणि इंटरनशीप झाल्यानंतर एक्स्पिरियन्स सर्टिफिकेट द्यावे ही विनंती.
आपण नक्कीच योग्य ती कार्यवाही कराल अशी आशा आहे.
सोबत :-
1) Degree Certificate
2) Marksheet
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
