मराठी रहस्यकथा (Marathi book and pdf)
Open in Telegram
The Purpose of these Marathi Books Telegram channels is To Provide you Marathi Books and Ebook & PDF for Free Download
Show more2 291
Subscribers
No data24 hours
+197 days
+26730 days
Posts Archive
लेखक – वसंत वसंत लिमये
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या – ५२३
मुल्यांकन – ४.५ | ५
रहस्यमय कथा वाचनाची आवड असल्यामुळे पुस्तकांचा फडशा पाडत असतानाच हातात आली वसंत वसंत लिमये लिखित ‘विश्वस्त’ कादंबरी, आणि मग काय कहरच! ज्ञात इतिहासाला कुठेही धक्का न लावता त्याचा आगळा वेगळा अन्वयार्थ लावण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न वाचकांना जागीच खिळवून ठेवण्यात पूर्णतः यशस्वी झालेला आहे.
पुण्यातील कॅफेत अड्डा जमवणारा JFK ग्रुप ही म्हणजेच ही 5 मुले, जी गिर्यारोहणाचा छंद व इतिहासाबद्दलच्या असलेल्या आकर्षणामुळे एकत्र येतात व गड किल्ले फिरता फिरता असे काही पुरावे गोळा करतात ज्यामुळे गूढ इतिहासाची उकलच होते की काय असे वाटते. कथानकाचा पाया आहे श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका व तेथील अगणित संपत्ती. द्वारका बुडताना संपत्तीचे काय झाले? श्रीकृष्णाने संपत्ती वाचविण्यासाठी काही प्रयत्न केले का? की मिळालेले हे सारे वैभव भविष्याच्या हवाली करत असताना, जन कल्याणासाठी उपयोग करणार्या निर्मोही, सत्पात्री वारसदाराच्या हाती पडण्यासाठी काही तजवीज केली होती का? अखेर ती योजना पूर्ण झाली का? अशा अनेक घटनांचा संदर्भ घेत, या गोष्टींचा शोध घेण्याचा अथक प्रयत्न JFK टीम घेत होती.
एकीकडे हा खटाटोप चालू असताना इतिहासातले अनेक संदर्भ, वर्तमानातल्या चालू घडामोडी समोर येतात. टीमला अगदी परदेशातून होणार्या हल्ल्यांना देखील तोंड द्यावे लागते. राजकीय वावटळ, वाईट प्रवृत्ती ह्या सगळ्यांचा निकराने प्रयत्न करत असताना अखेर JFK टीम यशस्वी होते का, वाघा – निर्मोही व सत्पात्र वारसदार बनतो का, हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचलेलीच उत्तम!
मराठी मध्ये ‘डॅनियल ब्राऊन’चा अनुभव यावा अशी ही कादंबरी एकदा हातात घेतली की पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवूच वाटत नाही. इतिहास, सत्य आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर राहून कथानक उलगडत असतानाही इतिहासाचे विकृतीकरण कोठेही होऊ न देता, आवर्जून वाचावी अशी कादंबरी लेखकाने वाचकांच्या हाती सुपूर्द केली आहे.
– प्रज्ञा कडलग
लेखिका – सुधा मूर्ती
अनुवाद – प्रा. ए. आर. यार्दी
पृष्ठ संख्या – १००
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्यांकन – ४.२ | ५
‘अस्तित्व’ म्हणजे नेमकं तरी काय? याच प्रश्नाच्या शोधातून सुरू झालेली एक उत्कंठावर्धक कहाणी! स्वतःचा जन्म, स्वतःची ओळख, पात्रता, कुटुंब आणि या साऱ्यांपलीकडची एक विस्मयकारक कथा! जी वाचल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. माणुसकीचं उच्च दर्जाच दर्शन घडवून देणारी सुधा मूर्तींच्या विवेचक लेखणीतून उतरलेली कादंबरी म्हणजेच अस्तित्व.
‘सुधा मूर्ती’हे नाव कानी पडताच सुरेख, सुरेल शब्दांची गुंफण आणि शब्दांची सरलता पण गूढ अर्थ यांचा अनुभव येतो. साध्या, सोप्या भाषेत जीवनाचा सार मांडायला सुधा मूर्तींकडूनच शिकायला हवं. सुधा मूर्ती हे नाव माझ्यासाठी अत्यंत जवळचं आणि तितकचं जिव्हाळ्याचं!त्यांच प्रत्येक पुस्तक माझ्यासाठी एक पर्वणीच असते. मूर्तींच प्रत्येक पुस्तक म्हणजे एक नवी प्रेरणा आणि उमेदच!!
सुखसमाधानात आयुष्य जगणाऱ्या, आनंदी असणाऱ्या आपल्या सारख्या एका व्यक्तीला जर अचानक कळलं कि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारे आपले आई-वडील आपले नाहीतच; किंबहुना आपणच त्यांच्या रक्ताचे नाहीत, तर काय होईल? विचार तरी केलाय का असा कधी? बसेल का विश्वास या गोष्टीवर?नाही ना!! पण अशाच अनपेक्षितपणे आणि अचानक उठलेल्या वादळामुळे पार आयुष्य बदलून गेलेल्या मुकेश ची ही कहाणी…
अचानक उठलेलं एक वादळ, आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतं. एक छोटीशी गोष्ट आपल्याला आपल्या कुटुंबापासून खरंच वेगळं करू शकते का याचा विचार करणाऱ्या मुकेशच्या डोक्यात अनेक प्रश्न फेर धरून नाचू लागतात अन् याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सुरू होतो स्वतच्याच अस्तित्वाचा शोध! मुकेशच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी, त्याच्या मनाची झालेली घालमेल, व्याकुळता अन् स्वतः च अस्तित्व शोधण्यासाठी केलेली धडपड नकळतच आपल्याला हरवून जाते. जणू आपणच या अस्तित्वाच्या प्रवासात त्याचे साथीदार, सोबतीला आहोत, याची जाणीव मनाला हुरळून टाकते.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील निरागस, शांत, संयमी पात्र आणि त्यांचे व्यक्तिस्वभाव, जे वाचकांना आपल्याकडे अलगद ओढून नेतात आणि आपोआपच वाचकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती जाणवू लागते, ही खरी जादू आहे सुधा मूर्तींच्या शब्दांची! पोटच्या पोरापेक्षा मुकेशवर जास्त प्रेम करणारी अम्मा, मुन्ना मुन्ना म्हणत नेहमी सोबत असणारी, पाठराखण करणारी बहिण नीरजाआणि या सर्वांपासून दूर काहीच माहिती नसलेली अनभिज्ञ मुकेशची पत्नी वासंती!! प्रत्येक नात्यातून बाहेर पडणारं एक वेगळचं रसायन वाचकाला मोहित करून टाकते.
खरंच, कोण असेल मुकेश? काय असेल त्याच खरं नाव? कोण असतील त्याचे खरे आई-वडील? कुठे असतील? कुठे जन्माला आला असेल तो? काय असेल त्याचा भूतकाळ? आणि काय असेल त्याच्या आई-वडिलांची कहाणी ज्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या मुलाला असं दुसऱ्याच्या ओटीत घातलं. फक्त विचार अन् विचारच घोंघावत राहतात! खरंच, असंही असू शकेल का याची जाणीव पुस्तक वाचताना वेळोवळी येते. आपल्याही बाबतीत असं काही घडलं असेल का असा विचार क्षणभर डोकावून जातो.
मला काय लिहू, किती लिहू आणि किती नको असं होतयं. सुधा मूर्तींच्या जादूई लेखणीतून उतरलेली ही एक अविस्मरणीय कलाकृती आहे! जणू एक आश्चर्याचा धक्का देणारा सुखद चित्रपटच! जितकं बोलावं तितक कमीच! पण जेव्हा कधीही वाटेल ना की आयुष्याचा सार कशात आहे हे जाणून घ्यायचं आहे, मानलेली नाती खरी की रक्ताची नाती श्रेष्ठ याची प्रचिती घ्यायची आहे तर नक्कीच वाचा! नाही तुमचं भान हरवायला भाग पाडलं तर नवलच! म्हणून तुम्ही हे पुस्तक नक्की आर्वजून वाचाचं. कृतज्ञपणा म्हणजे काय हे समजेल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलेल अन् आयुष्य आणखी सुंदर आणि आनंदी वाटेल. त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुमचं ‘अस्तित्व’ काय आहे ते.
– तन्वी पाटील
लेखक – नारायण धारप
प्रकाशक – साकेत प्रकाशन
मूल्यांकन – ४.५ | ५
भयकथा गूढकथा यांचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप हे आताच्या पिढीसाठी नवीन लेखक आहेत. आपल्या रहस्यमय लेखनाने धारपांनी एकेकाळी मराठी मनावर राज्य केले.
माणसाला नेहमीच रहस्य जाणून घ्यायला आवडते. गूढ रहस्य जाणून घेण्याची मूळची उत्कंठा आणि उत्सुकता ‘सावधान’ कथासंग्रह पूर्ण करतो आणि समाधान मिळतं. आजच्या काळात मराठी भाषेत भय कथा विज्ञान कथा (सायन्स फिक्शन) लिहिणारे खूपच कमी लेखक आहेत विज्ञान कथेला भयाचे किनार देऊन त्याची एक वेगळी शैली आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळते. या पुस्तकातील कथा या सायन्स फिक्शन प्रकारातील भयकथा आहेत कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला कथेत गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर वाचकाला त्या रहस्यमय वातावरणाचा भाग बनविण्याचे कसब हे पुस्तक पूर्ण करते. या पुस्तकातील कथा वाचकाला गुंतवून तर ठेवतातच; त्याचबरोबर रहस्यमय गूढ शक्ती मानवी आकलना पलीकडील त्याचे विश्लेषण त्याचे भव्य प्रदर्शन वाचकांची मती गुंग करतात.
यातील “काळाला तिरका छेद” सारख्या कथा या काळातील प्रवास अथवा टाईम ट्रॅव्हल सारख्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत या कथांचे कथानक मांडताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी लेखकाने पुरेपूर घेतलेली आहे.
या सारखेच अजून एक कथा म्हणजे “आकाशात तरंगणारा डोळा” ही तरच विज्ञान कथाच…!!!
विज्ञानातील संकल्पनांच्या तार्किक आधाराने बनवलेली गूढ वातावरणातील ही कथा धारपांच्या लेखणीची चुणूक दाखवते यासारख्या अनेक कथा या वाचकांना खिळवून ठेवतात.
ह्या कथा जेवढ्या रहस्यमय तेवढ्याच रटाळ होणार नाहीत याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतलेली आहे.
या जगात मानवाला न समजणार्या अगम्या नैसर्गिक गोड शक्ती आहेत त्यांचे भयप्रद अनुभव या कथांमध्ये वाचायला मिळतील.
नारायण धारप यांचा हा कथासंग्रह रहस्यमय गूढ कथांची मेजवानी ठरतो. यातील सर्व कथा नवीन जुन्या मराठी वाचकांसाठी नक्कीच आकर्षक ठरतील यात शंकाच नाही.
– आदित्य लोमटे
तुमच्या मित्रांना या चॅनलचे लिंक शेअर करा.
https://t.me/marathibooks7
Repost from Free Marathi books pdf
बुक रिक्वेस्ट करण्यासाठी हा ग्रुप जॉईन करा.
https://t.me/+D9DOJflDXn45YzBl
तुम्हाला मराठी पुस्तके वाचायला आवडतात का?
तुम्हाला PDF स्वरूपात शेकडो मोफत डिजिटल मराठी पुस्तके मिळवायची आहेत का?
जर होय, तर आजच ह्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा आणि उत्तमोत्तम मराठी साहित्याचा आनंद घ्या!
हा ग्रुप मराठी पुस्तक प्रेमींचा समुदाय आहे जो त्यांची आवडती पुस्तके, लेखक आणि शैली शेअर करतो आणि चर्चा करतो.
तुम्हाला क्लासिक, कादंबरी, कथा, कविता, इतिहास, संस्कृती आणि बरेच काही यासारख्या विविध श्रेणींमधील पुस्तके मिळू शकतात.
तुम्ही शोधत असलेल्या पुस्तकांचीही विनंती करू शकता आणि आम्ही तुमच्यासाठी ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
या गटात सामील होण्यासाठी, फक्त या लिंकवर क्लिक करा
(https://t.me/+D9DOJflDXn45YzBl)
आणि सूचनांचे अनुसरण करा.
तुम्हाला आमच्या मराठी पुस्तकांच्या लायब्ररीत झटपट प्रवेश मिळेल आणि इतर वाचकांशी संभाषणात सामील व्हाल.
मराठी भाषा आणि साहित्याच्या सौंदर्याने तुमचे मन आणि आत्मा समृद्ध करण्याची ही संधी सोडू नका.
आता सामील व्हा आणि तुमच्या मित्रांनाही आमंत्रित करा!
Repost from Free Marathi books pdf
सुहास शिरवळकर यांची पुस्तके 👇👇👇
तुम्हाला हवे असलेल्या पुस्तकावर क्लिक करा.
१) संशय : सुहास शिरवळकर
२) जाता-येता : सुहास शिरवळकर
३) सनसनाटी : सुहास शिरवळकर
४) थोडक्यात असं : सुहास शिरवळकर
५) शेड्स: सुहास शिरवळकर
६) खूनी पाऊस : सुहास शिरवळकर
७) झलक: सुहास शिरवळकर
८) ऑपरेशन बुलेट :सुहास शिरवळकर
९) गाफील : सुहास शिरवळकर
१०) स्पेल बाऊंड: सुहास शिरवळकर
११) समांतर: सुहास शिरवळकर
१२) क्षण क्षण आयुष्य- सुहास शिरवळकर
१३) संदेह : सुहास शिरवळकर
१४) मास्टर प्लॅन: सुहास शिरवळकर
१५) स्टुपिड : सुहास शिरवळकर
१६) अनुभव: सुहास शिरवळकर
१७) जीवघेणा:सुहास शिरवळकर
१८) जाणीव: सुहास शिरवळकर
१९) निराकार: सुहास शिरवळकर
२०) न्याय अन्याय: सुहास शिरवळकर
२१) बंदिस्त: सुहास शिरवळकर
२२) बरसात चांदण्याची : सुहास शिरवळकर
२३) नॉट गिल्टी : सुहास शिरवळकर
२४) गढूळ: सुहास शिरवळकर
२५) प्राक्तन: सुहास शिरवळकर
26) कलंक : सुहास शिरवळकर
२७) वेशीपलीकडे : सुहास शिरवळकर
२८) चक्रव्यूह - सुहास शिरवळकर
29) झूम - सुहास शिरवळकर
३०) कथापौर्णिमा - सुहास शिरवळकर
३१) म्हणून - सुहास शिरवळकर
३२) वंडर ट्वेल्व - सुहास शिरवळकर
३३) शॅली शॅली - सुहास शिरवळकर
३४) थरारक: सुहास शिरवळकर
३५) मर्डर हाऊस: सुहास शिवळकर
३६) सैतानघर: सुहास शिरवळकर
३७) अंमल: सुहास शिरवळकर
३८) मरणोत्तर: सुहास शिरवळकर
३९) ऑर्डर ऑर्डर: सुहास शिरवळकर
४०) दुनियादारी: सुहास शिरवळकर
४१) इलेवंथ अवर: सुहास शिरवळकर
४२) असह्य: सुहास शिरवळकर
४३) लटकंती: सुहास शिरवळकर
४४) कणाकणाने: सुहास शिरवळकर
४५) ओ गॉड: सुहास शिरवळकर
४६) ज्वाला: सुहास शिरवळकर
४७) तलाश: सुहास शिरवळकर
४८) इज्जत: सुहास शिरवळकर
४९) काळबेर: सुहास शिरवळकर
५०) हिंदुस्ता हमारा: सुहास शिरवळकर
५१) इन्सानियत: सुहास शिरवळकर
५२) सलाम : सुहास शिरवळकर
५३) टेरिफिक: सुहास शिरवळकर
५४) सॉरी सर: सुहास शिरवळकर
५५) सायलेन्स प्लिज: सुहास शिरवळकर
५६) टॉवर हाऊस: सुहास शिरवळकर
५७) अंतिम: सुहास शिरवळकर
५८) कट्टर: सुहास शिरवळकर
५९) चूक भूल द्यावी घ्यावी: सुहास शिवरकर
६०) सहज : सुहास शिरवळकर
६१) स्वीकृत: सुहास शिरवळकर
६२) कोवळीक: सुहास शिरवळकर
६३) पहाटवारा: सुहास शिरवळकर
६४) कळप: सुहास शिरवळकर
६५) कोसळ: सुहास शिरवळकर
६६) जाई: सुहास शिरवळकर
६७) मंत्राजगर: सुहास शिरवळकर
६८) प्रतिकार: सुहास शिरवळकर
६९) माध्यम: सुहास शिरवळकर
७०) फलश्रुती: सुहास शिरवळकर
७१) गोल्ड हेवन: सुहास शिरवळकर
Repost from Free Marathi books pdf
सुहास शिरवळकर यांची पुस्तके 👇👇👇
तुम्हाला हवे असलेल्या पुस्तकावर क्लिक करा.
१) संशय : सुहास शिरवळकर
२) जाता-येता : सुहास शिरवळकर
३) सनसनाटी : सुहास शिरवळकर
४) थोडक्यात असं : सुहास शिरवळकर
५) शेड्स: सुहास शिरवळकर
६) खूनी पाऊस : सुहास शिरवळकर
७) झलक: सुहास शिरवळकर
८) ऑपरेशन बुलेट :सुहास शिरवळकर
९) गाफील : सुहास शिरवळकर
१०) स्पेल बाऊंड: सुहास शिरवळकर
११) समांतर: सुहास शिरवळकर
१२) क्षण क्षण आयुष्य- सुहास शिरवळकर
१३) संदेह : सुहास शिरवळकर
१४) मास्टर प्लॅन: सुहास शिरवळकर
१५) स्टुपिड : सुहास शिरवळकर
१६) अनुभव: सुहास शिरवळकर
१७) जीवघेणा:सुहास शिरवळकर
१८) जाणीव: सुहास शिरवळकर
१९) निराकार: सुहास शिरवळकर
२०) न्याय अन्याय: सुहास शिरवळकर
२१) बंदिस्त: सुहास शिरवळकर
२२) बरसात चांदण्याची : सुहास शिरवळकर
२३) नॉट गिल्टी : सुहास शिरवळकर
२४) गढूळ: सुहास शिरवळकर
२५) प्राक्तन: सुहास शिरवळकर
26) कलंक : सुहास शिरवळकर
२७) वेशीपलीकडे : सुहास शिरवळकर
२८) चक्रव्यूह - सुहास शिरवळकर
29) झूम - सुहास शिरवळकर
३०) कथापौर्णिमा - सुहास शिरवळकर
३१) म्हणून - सुहास शिरवळकर
३२) वंडर ट्वेल्व - सुहास शिरवळकर
३३) शॅली शॅली - सुहास शिरवळकर
३४) थरारक: सुहास शिरवळकर
३५) मर्डर हाऊस: सुहास शिवळकर
३६) सैतानघर: सुहास शिरवळकर
३७) अंमल: सुहास शिरवळकर
३८) मरणोत्तर: सुहास शिरवळकर
३९) ऑर्डर ऑर्डर: सुहास शिरवळकर
४०) दुनियादारी: सुहास शिरवळकर
४१) इलेवंथ अवर: सुहास शिरवळकर
४२) असह्य: सुहास शिरवळकर
४३) लटकंती: सुहास शिरवळकर
४४) कणाकणाने: सुहास शिरवळकर
४५) ओ गॉड: सुहास शिरवळकर
४६) ज्वाला: सुहास शिरवळकर
४७) तलाश: सुहास शिरवळकर
४८) इज्जत: सुहास शिरवळकर
४९) काळबेर: सुहास शिरवळकर
५०) हिंदुस्ता हमारा: सुहास शिरवळकर
५१) इन्सानियत: सुहास शिरवळकर
५२) सलाम : सुहास शिरवळकर
५३) टेरिफिक: सुहास शिरवळकर
५४) सॉरी सर: सुहास शिरवळकर
५५) सायलेन्स प्लिज: सुहास शिरवळकर
५६) टॉवर हाऊस: सुहास शिरवळकर
५७) अंतिम: सुहास शिरवळकर
५८) कट्टर: सुहास शिरवळकर
५९) चूक भूल द्यावी घ्यावी: सुहास शिवरकर
