मराठी रहस्यकथा (Marathi book and pdf)
Open in Telegram
The Purpose of these Marathi Books Telegram channels is To Provide you Marathi Books and Ebook & PDF for Free Download
Show more2 291
Subscribers
No data24 hours
+197 days
+26730 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
December '24
December '24
+9
in 0 channels
November '24
+23
in 0 channels
Get PRO
October '240
in 0 channels
Get PRO
September '24
+250
in 0 channels
Get PRO
August '24
+2 065
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 21 December | 0 | |||
| 20 December | 0 | |||
| 19 December | 0 | |||
| 18 December | +3 | |||
| 17 December | 0 | |||
| 16 December | 0 | |||
| 15 December | 0 | |||
| 14 December | +1 | |||
| 13 December | +2 | |||
| 12 December | +1 | |||
| 11 December | 0 |
Channel Posts
Repost from Free Marathi books pdf
पुस्तकं वाचायची इच्छा आहे पण वेळ नाही मिळत, नवीन शिकायची इच्छा आहे पण वेळ कुठेय ... 🤷
आता पुस्तकं वाचू नका ऐका आणि सहज समजून घ्या, १००० हून जास्त मराठी - हिंदी - इंग्लिश पुस्तकं आणि त्यांच्या समीक्षा वर्षभर ऐका फक्त ०.५० पैसे प्रतिदिन पेक्षा कमी, आजच डाउनलोड करा KUKU FM आणि मिळवा ५०% सूट (₹.३९९ = ₹.१९९/ Year 😍)
डिस्काउंट कोड - FXUMJ3090
(टीप : PayTm वरून अजून ₹.५० कॅशबॅक मिळेल.)
मोफत पुस्तक सुद्धा उपलब्ध 👇
https://kukufm.page.link/HSVvEQNSqLLZF6Q78
| 2 | पाटलांनी पुढे बोलायला सुरुवात केली,
" ती भयंकर घटना पाहून सारा गाव हादरून गेला होता. आणि मुख्य म्हणजे भिमाने पाहिलेले ते कलेवर या घटने मागचे प्रमुख कारण होते. मला मुळीच घाई करून चालणार नव्हती. मी कालावधी उलटू दिला. हळूच प्रकरणात पोलिसांचा शिरकाव केला. आणि त्या क्रूरकर्माना चांगलीच अद्दल घडवून कायमचे यमसदनी धाडून दिले.
पण एक समस्या संपत नाही तर दुसरी उगवली. वाड्यात मौल्यवान वस्तू असतील याच्या लालसेने भुरटे चोर वाड्यात शिरकाव करू लागले होते. पुन्हा नव्याने ही माझ्यासाठी डोकेदुखी बनली होती. मी तिच्यावर काही उपाय काढणार तेवढ्यात. अफवेच्या वादळाने भुतांची भीती पसरवली. आणि माझं काम सोपं झालं.
परंतु तिसरा झटका याच्यापेक्षा अधिक घातक होता. वाड्यावर नजर ठेवून असलेल्या माणसाचा मला माझ्या मोबाईलवर संदेश मिळाला होता. जो मी भिमाची घटना ऐकून नजरेखालून घातला.
त्यातल्या त्यात भीमाने हे दोन प्रकार अनुभवले असल्यामुळे भिमाच्या मनाच्या कप्प्यात तयार झालेल्या भीतीनेमला गोंधळवून टाकले होते. नकळत मी माझे रूप पालटले. वाड्यात प्रवेश केला. त्याच्या अंगावर थोडेसे पाणी शिंपडले. साक्षात रघुनाथ चा मुलगा माझ्यासमोर उभा होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपले ' स्वप्न ' सांगायला सुरुवात केली. मी पुन्हा एकदा पूर्णपणे चक्रावून गेलो. पण क्षणात माझे विचार चक्र गरगर फिरू लागले. मला कळून चुकलं. त्याच्या मनातील नकारात्मक विचार, लहानपणीच्या वाड्यातील घातक आठवणी जागृत झाल्या असल्यामुळे त्याच्या मनाने एक नवीन कल्पना विश्व निर्माण केले. एका अनामिक भीतीचे ' चक्रव्यूह ' त्याला घेरून बसले. मी त्याला काल्पनिक गुरुजी म्हणून सावरले. त्याची भीती ओसरली. तो भयमुक्त झाला. आणि मी समाधानाचा सुस्कारा सोडत संकटांचा त्रिकोण यशस्वी पद्धतीने थोपवून धरला पुढे त्याला सावरूदेत मग आपण त्याला सर्व काही सांगणार च आहोत ! "
पाटलांनी आपले अखंडीत बोलणे थांबवले. दीर्घ श्वास घेऊन सर्वांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली. प्रत्येकाचा चेहरा आश्चर्यमिश्रित आनंदाने झळकत, होता. कुणालाही काहीच बोलावसं वाटलं नाही.
मध्यरात्र उलटून पहाटेने हलकेच आकाशात पाऊल ठेवले होते. पाखरे मंद चित्कार करू लागली होती. अंधाराचे सावट दूर होऊन पुन्हा प्रकाश वाट झळकत होती. आणि संकटांचे काळेकुट्ट मेघ कुठे तरी दूर पळून गेले होते.
_ समाप्त_ | 7 453 |
| 3 | तीच लालभडक डोळ्यांची, अक्राळविक्राळ चेहरा माझ्यावर रोखला गेला असल्याची जाणीव मला अजूनही होती आहे! म्हणजे माझी बुद्धी, तिची विचार करण्याची क्षमता हे थरारक स्वप्न पाडून कमकुवत करत; माझा बळी घेण्याची योजना तर नव्हती ना त्या तत्वाची! माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ताण वाढू लागला. मी माझी नजर समोर वळवताच एक तेजस्वी मुद्रा माझ्या नजरेत पडली. ' होय!!! हेच आहेत ते. जे माझं संकट दूर करू शकतात... " माझ्या अंतर्मनाने करून दिलेली जाणीव कोण जाने का पण मला सत्य वाटली. त्यांना बघताक्षणीच माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगावा असं मला वाटलं. आणि मी तसं केलं सुद्धा. त्यांचे ते धीराचे बोल पुन्हा माझ्या कानी पडले. मी वर्तवलेल्या त्या जीवघेण्या योजनेचा अंदाज खरा ठरला...
पण आता मात्र काहीच धोका नव्हता. कुठलासा काळा धूर त्या वाड्याच्या बाहेर पडतोय असं मला जाणवलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. हे सुद्धा त्यांचेच काम असावे असे मला वाटत होते. सध्या तरी ते माझ्यापर्यंत कसे पोहोचले? त्यांना ही माहिती कोणी दिली? या सर्व प्रश्नांना दूर सारत त्यांच्याच आज्ञेनुसार माझ्यावरील अतिरिक्त तणाव दूर करण्यासाठी मी पुन्हा एकदा निद्रेच्या अधीन झालो. यावेळी मात्र या माझ्या आरामात कुठलेही संकट दडलेले नव्हते. होती ती फक्त चिरविश्रांती...
आपले काम फत्ते झाल्यावर ' ते " त्या वाड्यातून बाहेर पडले. भिमाचे मुख ' त्यांना " प्रश्न विचारण्यासाठी खुले झाले; ते खुले च राहिले. आपल्या चेहऱ्यावरील रंगरंगोटी दूर करून. एक आकृती भिमाच्या नजरेला नजर भिडवत शांतपणे उभी होती. आणि भिमाच्या मागून दोन थंडगार हात त्याच्या खांद्यावर येऊन विसावले होते. भीमा जागच्या जागीच गोठून गेला होता.
संकट एका वेगळ्या स्वरूपात, एका ' वेगळ्याच " व्यक्तीला आपल्या विळख्यात बंद करून बसले होते...
**
काहीतरी अकल्पित, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, गोंधळून टाकणारी स्थिती आपल्यासमोर उभी राहावी. आणि तिच्या विळख्यात आपण अडकून पडावं. स्तंभित होऊन... तशीच काहीशी स्थिती भिमाची झाली होती. मुळात हे असं होऊच कसं शकतं? याचे राहून राहून भीमाला आश्चर्य वाटत होते. त्याच्या मनात अनेक प्रश्न रुंजी घालत होते. तो चांगलाच गर्भगळीत होऊन समोर उभ्या असलेल्या पाटलांकडे टक लावून बघत होता. आपली मान मागे वळवताच त्याच्या नजरेत जोशी गुरुजी यांची मुद्रा पडली. भीमा चांगलाच गोंधळून गेला होता. घटित प्रकार त्याच्या पचनी पडत नव्हता. त्याची अशी अवस्था पाहून पाटील उद्गारले,
" काळजी करू नकोस भीमा!!! जे काही घडले. ते तुझ्या बरोबरच गुरुजींना सुद्धा ऐकायच आहे. "
पाटील पुढे काही बोलणार तेवढ्यात गुरुजी बोलले,
" अहो मग वाट कशाची बघताय! सांगा की एकदाचं काय घडलं ते??? तुम्ही त्याला वाचवलं कसं??? तो व्यक्ती नेमका कोण??? "
गुरुजी पुढे काही प्रश्न उपस्थित करणार तेवढ्यात पाटील चटकन बोलायला लागले,
" तर ही गोष्ट सुरू होते जवळपास वीस वर्ष आधी...
रघुनाथ देसाई... माझा चांगलाच जिवलग मित्र. स्वतःच्या मेहनतीवर कष्ट केले. आणि गावात भरपूर जमीन उभारली, प्रचंड आदर कमावला, आणि त्याच्याच साथीला एक टोलेजंग वाडा सुद्धा विकत घेतला.
पण कुणाच्याही आयुष्यात संकट येणार नाही. असं होऊच शकत नाही मुळात! त्यातल्या त्यात जर एखादा व्यक्ती यशाच्या उंच शिखरावर असेल. मग तर विचारायलाच नको!!! त्याचीच पुनरावृत्ती इथे सुद्धा झाली. आज सुद्धा ती काळ रात्र आठवली की सारा गाव थरारून जातो.
दिवसासारखा दिवस होता. पण त्याच दिवसात अंधकारमय, मृत्यूचे सावट असलेली भयंकर काळरात्र त्यांचा दबा धरून बसली होती. कुठलातरी संकी माथेफिरू त्यांच्या वाड्यात शिरला. आणि अतिशय क्रूर पद्धतीने त्याच्या परिवाराची कापाकापी करून एखाद्या घोंगावत्या वादळासारखा बाहेर निघाला सुद्धा...
रघुनाथ चा भाऊ. आणि त्याच्या मुलाच नशीब बलवत्तर ते दोघेही वाचले. ते लहान मूल तर ही क्रौर्याची परिसीमा पाहून चांगलेच बिथरून गेले होते. मी तडक त्या दोघांना शहराकडे धाडलं. ते कधीही इथे पुन्हा न येण्यासाठी...
मग मी माझ्या परीने त्या गुंडांचा बंदोबस्त लावलाच म्हणा! "
पाटलांनी काही वेळासाठी आपलं बोलणं थांबवलं. त्यांच्या चेहर्यावर प्रथम आनंदाचे, कौतुकाचे, अभिमानाचे भाव झळकत होते. पण ते क्षणात बदलून वेदनामय, प्रचंड संताप व्यक्त करणारे, कठोर, स्थिर, थंडगार होऊन. पुन्हा एकदा त्यांचा चेहरा निर्विकार झाला होता. भीमा आणि जोशी गुरुजी दोघेही पाटलांना प्रश्न विचारू शकत नव्हते. त्याचे एक कारण तर त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव होते. आणि दुसरे म्हणजे या रहस्यमय प्रकाराची गुंत त्यांच्यापुढे हळूहळू उलगडत होती. आणि त्या जाणिवेमुळे ते कमालीचे थरथरत होते. | 6 731 |
| 4 | ' काय रे भीमा! इथे काय करतोयस? आणि एवढा घाबरलेला का आहेस? काय झालं काय? ".
पाटलांनी भीमावर प्रश्नांचा जोरकस मारा केला. पण भीमा मात्र पाटलांच्या या भेटीमुळे चांगलाच सुखावला होता. त्याच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते आता समाधान पसरले होते. भीतीची काळोखी छाया दूर होऊन आता त्याच्या मनःपटलावर चिंतेचे सावट घोंगावत होते. भीमाने आपल्या सोबत घडून गेलेला सर्व प्रकार कथन केला. पुन्हा एकदा त्या ' अमानवी तत्वाचे " ते भीतीदायक इरादे आणि त्यानंतर कोण्या अनोळखी ' व्यक्तीची" झालेली अशी दुर्दैवी अवस्था पाहून पाटील चांगलेच चिंतातुर झाले. वेळ अर्थातच खूप कमी होता. जे काही करावं लागणार होतं ते अतिशय तात्काळ करावं लागणार होतं. एकवेळ मानव मृत्यूला चकवा देऊन परत येईल. परंतु वेळ मात्र निघून गेल्यावर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आणखी काहीच करता येणार नव्हते. पाटलांचा मेंदू वेगाने कार्य करू लागला. त्यांनी झटकन आपला मोबाईल बाहेर काढला. त्यावर कुठल्यातरी ' सीक्रेट " नावाच्या व्यक्तीकडून आलेला संदेश वाचण्यात पाटील गर्क झाले होते. गावच्या आधुनिकतेचे ठसठशीत उदाहरण पाटलांच्या रूपात समोर उभे होते. पण या आधुनिकतेचे वरदान स्वीकारतांना गावची परंपरा मात्र अद्याप कायम होती. अजूनही पाटलांना, त्यांच्या वंशजांना गावात तोच मान होता. अर्थात या घराण्याचे चांगले व्यक्तिमत्व हेच त्यामागचे कारण होते.
तो संदेश वाचून पाटील थोडेसे सुखावले. अगदी अल्प काळापर्यंत ते सुख त्यांच्या चेहऱ्यावर होते. जणू कोणीतरी अगदी खोल अंधाराच्या गर्तेत बुडून जावं. हलकीशी प्रकाशरुपी आशा त्याच्या नजरेत पडावी आणि मग क्षणार्धात लुप्त होऊन जावी. अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. पाटलांनी त्वरेने निर्णय घेतला.
' ऐक भीमा! तू काही वेळ इथेच थांब... मी येईपर्यंत इथून हलू नकोस. आपल्या गावात खूप मोठे मांत्रिक राहायला आलेत म्हणे! मी चटकन जोशी गुरुजींना विचारून येतो... ".
असे म्हणत भीमाच्या बोलण्याची वाट सुद्धा न बघता पाटील झपाझप चालत निघून गेले. पुन्हा एकदा भिमा त्या घनगर्द काळोखाच्या विळख्यात सापडला होता. त्याला प्रचंड भीती जरी वाटत असली तरी मालकाच्या आज्ञेचे पालन करणे त्याचे परम कर्तव्य होते. मधूनच एखाद्या झाडीतून कसलासा आवाज व्हायचा आणि भीमा अंतर्बाह्य थरारून जायचा. त्याला राहून राहून रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते प्रेत आठवत असायचे, त्या अमानवी शक्तीचे ते लालभडक डोळे पुन्हा पुन्हा आठवत तो कमालीचा थरारून जायचा. एकंदरीत त्याची अवस्था अतिशय बिकट होती. अशा या परिस्थितीत दोन डोळे त्याच्यावर रोखले गेले आहेत असा त्याला भास झाला. --- नक्की भासच होता ना तो? का पुन्हा नव्याने ती अमानवी जाणीव. ---. भीमा चांगलाच गांगरून गेला. आणि दुसऱ्याच क्षणाला त्याच्या खांद्यावर दोन हात येऊन आदळले. त्याने गरकन आपली मान मागे वळवली. क्षणार्धात सर्व भीती, काळजी, चिंता, व्यथा, तणाव विरून जाऊन आता उरली होती ती फक्त प्रसन्नता...
संकटांच्या खोल अंधकारात स्वतःचे अस्तित्व लुप्त होत असताना एक तेजस्वी प्रकाश आपल्या मदतीला धावून यावा. अगदी तसंच भीमाला वाटत होतं. त्या महान व्यक्तीची मुद्रा त्याच्या नजरेत पडताच त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि त्याला अंदाज सुद्धा आला की बहुदा पाटलांनी त्यांना संकटांचे हे काळेकुट्ट मेघ दूर पळवण्यासाठी बोलावलं आहे ते. भिमा त्यांना पुढे काही सांगणार तेवढ्यात:
' सांगण्याची तसदी घेऊ नकोस! मला सर्व प्रकार कळून चुकलाय... इच्छा असेल तर त्या वाड्यावर माझ्यासोबत येऊ शकतोस. आणि हो! पाटलांना मी मंदिरावर थांबवलं आहे. जरुरी काम आहे त्यांच्यासोबत... ".
भिमाच्या सर्व प्रश्नांची उत्तर, त्यांनी एका झटक्यात देऊन टाकली होती. भीमाला एक तर कळून चुकलं होतं की समोरील व्यक्ती बहुदा कमी बोलत असावी. बोलण्यापेक्षा कृतीतून काहीतरी करून दाखवण्यावर त्या व्यक्तीचा विश्वास असावा. भीमा मूकपणे त्यांच्या मागे चालत होता. तो पुन्हा त्या वाड्यासमोर येऊन पोहोचला. समोरील व्यक्तींनी वाड्याबाहेर थांबण्याची भीमाला खूण केली. भीमाची सुद्धा आत प्रवेश करण्याची इच्छा नव्हती म्हणा! यावेळी सुद्धा भीमाच्या सोबतीला काळोख होता, त्या भयंकर आठवणी होत्या परंतु भीतीची छाया मात्र दूर पळून गेली होती...
****
माझ्या चेहऱ्यावर पुन्हा काहीतरी थंडगार पडत आहे असा भास मला झाला. क्षणभर तो सैतानी स्पर्श तर नसेल ना असं मला वाटून गेलं. पण माझ्या वेदना मात्र कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. मला क्षणात समजलं माझ्या चेहऱ्यावर थंडगार जलधारा बरसत होत्या. हळूहळू त्या सुद्धा थांबल्या. मी हळूच डोळे किलकिले केले. काही अवधीनंतर ते पुर्ण उघडले. भोवताली नजर फिरवली. मी ज्या वाड्यात स्वतःचे अंग झोकून दिलं होतं तिथेच मी होतो. म्हणजे... म्हणजे ते माझे स्वप्न होते तर! मला थोडं हायसं वाटलं.. ' पण... पण मला वेदना तर जाणवत आहेत! ती.. | 6 293 |
| 5 | आणि बघताबघता तो क्षण जवळ आला. भीमा ' त्या " वाड्या समोर उभा होता. तिथे येऊन पोहोचल्यावर अगदी त्याच्याच नकळत त्याचे हृदय जोरात धडकत होते. त्याने आपल्या स्मृतीपटलावरच्या रेषा कितीही पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. तरी त्या आठवणीच्या संबंधित एखादा सुगावा त्यांना लागला की, त्या झरझर वर येत होत्या. आणि भीमाला व्याकूळ करून सोडत होत्या. शेवटी कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी भीमाला त्या दोन भयानक घटना आठवल्या... जणू याच्यावर त्याचंही नियंत्रण नव्हतं.
- ' नियंत्रण नव्हतं! का मुद्दामून तसं घडवण्यात आलं होतं? "--
भीमाला या वाड्यासमोर काही वर्षांपूर्वीचा आपला प्रवास आठवत असताना वाड्यात शिरलेल्या एका भुरट्या चोराची ती दयनीय अवस्था पाहून, त्याच्या अंगावर शिरशिरी आली. त्याच्या अंगाच गाठोड करून त्याला वाड्याबाहेर पडलेल्या अवस्थेत सर्वप्रथम त्यानेच पाह्यलं होतं. आणि दुसरा... दुसरा प्रकार त्याहीपेक्षा अतिभयानक होता. भीती नेमकी काय असते, याची जिवंत जाणीव भीमाला झाली होती. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा ते चित्र जसंच्या तसं उभ राहाल.
****
भिमाचा नुकताच तारुण्यात प्रवेश झाला होता. त्याच्याजवळ हिम्मत ही जोरकस होती. धाडस तर थोडं जास्तच होतं. म्हणून की काय! पाटलांनी लाख वेळा बजावल्यावर सुद्धा भीमाला रात्री शेताकडे जायचं होतं. आणि तो निघाला सुद्धा! त्याला बिचार्याला काय माहित होतं की हाच आपला शिरस्ता बनणार आहे ते! आणि हेच अति धाडस आपल्यावर कुठली विपदा घेऊन येणार आहे ते! भीमा अखंडपणे पायवाट तुडवत होता. तो त्याच्याही नकळत ' त्या " वाड्यासमोर येऊन थांबला. एवढ्या रात्री वाड्याचे दार उघडे असणे त्याच्यासाठी आश्चर्यकारक होते. तो त्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला. ' टप !!!!! " कुठल्यातरी ओलसर थेंबाने त्याच्या डोक्यावर जागा मिळवली होती. क्षणात दुसरा थेंब त्याच्या हातावर पडला. त्याने बॅटरीच्या प्रकाशात त्याचं निरीक्षण केलं. आणि समोरचा प्रकार पाहून तो अंतर्बाह्य थरारला. ते ठळक लाल रंगाचे रक्त होतं. हा झटका कमी होता की काय! ' धाड " एक प्रचंड आवाज झाला. आणि वाड्याच्या वरच्या मजल्यावरून आलेलं एक प्रेत त्याच्यासमोर येऊन पडलं. त्याच्या पाया समोरच एक भला मोठा दगड होता. त्या दगडावर त्या देहाचं डोकं पडून रक्ताचे अनेक शिंतोडे भीमाला भिजवून गेले .
मग पुढे उडालेली त्याची धावपड त्याला आठवायची नव्हती.
सध्यातरी घडत असलेल्या गोष्टींवर त्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं होतं. त्याला पुन्हा एकदा द्या वाड्याचा दरवाजा उघडा दिसला. नेहमीप्रमाणे या वेळीसुद्धा आपल्याला काहीतरी विशेष बघायला मिळणार याची उत्सुकता आणि तितकीच भीती भीमाच्या मनात निर्माण झाली होती. तो आतून किती जरी घाबरत असला तरी त्याची नको ती उत्सुकता काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. भीमाने हलकेच त्या दाराला आत ढकलले. त्याची नजर आसपासच्या गोष्टींचा वेध घेत होती. आधीचे दोन भयानक प्रकार त्याने अनुभवले असल्यामुळे तो आता चांगलाच सावध होता. त्याने दबक्या पावलांनी आत प्रवेश केला. क्षणात त्याला वाड्याची ती उघडी खोली दिसली. आणि समोरचा प्रकार पाहून त्याचं काळीज गोठून गेलं. त्याचा श्वास पूर्णपणे अडकून गेला. कुठल्यातरी व्यक्तीच्या पाठीवर प्रत्येकाला लक्षात येईल असा वेश धारण केलेली एक अमानवी आकृती, तिची लालबुंद नजर, आणि तिचा तो महाभयानक अवतार त्याच्या नजरेत पडला.
मिनिटभर स्थिर राहून झाल्यावर भीमा धडपडत, हळूच दबक्या पावलांनी वाड्याच्या बाहेर पडला. आणि मग सुसाट गतीने पाटलांच्या वाड्याकडे झेपावला... आशेचा नवा किरण पुन्हा एकदा जागृत होत होता का? सर्व काही भीमावर अवलंबून होतं...
****
त्या घनगर्द काळोखात, भीतीच्या सावटाखाली असलेला भीमा आपले सर्व कसब पणाला लावून जोरदार गतीने पळत होता. त्याने घ्टित प्रकाराचा चांगलाच धसका घेतलेला दिसत होता. काहीही करून पाटलान पर्यंत ह्या प्रकाराची माहिती पोहोचवणे हे त्याचे ध्येय दिसत होते. त्या भीतीने चांगलाच व्याकुळ झाला असल्यामुळे भिमाच्या स्मृतिपटलावर च्या आठवणींच्या रेषा पुसट झाल्या होत्या. भीतीचे सावट हळूहळू कमी होत गेले, भिमाच्या धूसर झालेल्या स्म्रुती पुन्हा एकदा त्याच्या अंतर्मनातून बाहेर डोकावू लागल्या. आणि भिमाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. या सर्व धामधुमीत तो हे विसरूनच गेला होता की आपल्या सोबत पाटील सुद्धा येणार आहेत ते! अर्थातच त्याची ही फुकटची धडपड, व्यर्थ घालवलेली ऊर्जा वाया गेली होती. भीमाने आपल्या गतीवर ताबा मिळवन्याआधीच तो कोणालातरी जाऊन धडकला. समोरील आकृतीच्या हातांनी त्याला स्वतः पासून वेगळे केले, त्या आकृतीची करडी नजर भीमावर रोखली गेली. आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या नजरेतील भाव झरझर बदलत गेले. अति सावधानतेची जागा आता चिंतेने घेतली होती. भीमा आणखी थरारून जाण्याआधीच एक दिलासादायक स्वर त्याच्या कानावर पडला: | 5 750 |
| 6 | ज्यांच्याकडे मी मदत म्हणून पाहत होतो तेच पाटील माझ्याकडे चेहर्यावर खुनशी हास्य ठेवून पाहत होते.
आता नेमकं करावं काय? कसं दूर पळवू या संकटाला? सर्व प्रश्नांची उत्तर काळाने पडद्याआड लपवून ठेवली होती...
अनेक संकट यावीत. आणि त्यांनी मला वाचण्याची संधीसुद्धा न देता माझ्यावर घणाघाती वार करावेत, भयंकर क्रौर्याचे प्रदर्शन करत... निर्दयीपणे. अशीच काहीशी अवस्था माझी झाली होती. बल प्रदर्शन, आणि बुद्धी चातुर्याचा विळखा मला एका अजस्त्र अजगरासारखा घेरून बसला होता. माझ्या शरीराची पहिली हालचाल तर व्यर्थ ठरली होती. परंतु त्याच क्षणी माझ्या हाताच्या केलेल्या दुसऱ्या हालचालीमुळे आशेचे किरण जागृत झाले होते. अंधाराच्या खोल गर्तेत बुडून जावं. आणि प्रकाश किरणांची एक हलकीशी तिरीप दृष्टिपटलावर यावी यापेक्षा आणखी उत्तम ते काय!
त्या तत्त्वाला माझ्या हाताने दुसऱ्या क्षणी जोरदार धक्का दिला. त्याला माझ्याकडून अशा प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसावी बहुतेक. तो थोडासा मागे हटला. आणि हीच माझ्यासाठी सोनेरी संधी होती. आणि या सोनेरी संधीच सोनं कसं करायचं हे मला चांगलंच ठाऊक होतं. एक हलकीशी चूक गवसली का अशक्य ते शक्य करण्याचा मार्ग खुला होतो याची मला चांगलीच प्रचीती आली होती. माझ्या मेंदूने झटपट काम केले. ते तत्व मागे हटल्या वर मी मागचा पुढचा विचार न करता सुसाट पळत सुटलो. मला या वाड्याच्या. नव्हे! या गावाच्या बाहेर निघून जायचं होतं. कारण आतापर्यंत दोन ठिकाणी माझी आशा पार भुईसपाट झाली होती. त्यामुळे मी तिला तिसऱ्यांदा जागृत करू इच्छित नव्हतो. मी त्या खोलीबाहेर पळ काढण्यात यशस्वी झालो. नंतर वाड्यातून बाहेर पडण्याचा दरवाजा मला दिसला. एक कडी सरकवली कि खुला होणार होता माझ्यासाठी संपूर्ण प्रकाश...
माझं घाबरलेल अंतर्मन सावरलं. आपण वाचणार आहोत या नुसत्या कल्पनेनेच ते आनंदी होत होतं. मी माझा हात पुढे सरसावला, दाराच्या कडीला माझ्या हाताचा स्पर्श झाला, जणू मृत्यूच्या रेषेला हुलकावणी देत आपण जीवन रेषेला स्पर्शत आहोत अशी मंगल भावना माझ्या मनात आली, मी ति कडी खसकन बाहेर ओढली, दार उघडलं. पण पुन्हा एकदा माझ्या नशिबाने गिरकी घेत माझ्या आशांचा चुराडा करून टाकला...
' खट!!!! " माझं डोकं कशावर तरी दाणकन आपटल . समोर बघतो तर काय! ज्या खोलीत मी बंदिस्त होतो तिथेच. त्याच दारावर माझं डोकं ठेचून घेऊन आता मी भुईसपाट झालो होतो. काय घडतंय हे माझ्यासोबत?? का घडतय हे माझ्यासोबत??? माझ्याच प्रश्नांमध्ये मीच गुरफटून गेलो होतो. ही, ही आपली कल्पना तर नाही ना? ' नाही असं कसं? पायाला थकवा जाणवतोय. मग. मग हे असं कसं घडलं! "
मी चांगलाच व्याकूळ झालो होतो. कितीही प्रयत्न करू देत. यश माझ्यापासून दूर पळत होतं. माझ्या डोक्यात मला प्रचंड वेदना जाणवत होती. मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो. आणि तेवढ्यात त्या अमानवी तत्त्वाने जबरदस्त गर्जना केली. त्याला आता राहवत नसाव बहुतेक. त्याच्या संयमाने आपली परिसीमा गाठली असावी कदाचित. काहीतरी धपकन माझ्या पाठीवर येऊन पडलं. होय तोच होता तो! माझा मृत्यू... माझे सर्व प्रयत्न करून झाले होते. मी जगण्याची आशा जवळजवळ सोडूनच दिली होती. काय व्हायचे ते होऊ देत! आता मला नाही परवा त्याची! मी मनातल्या मनातच चिडून घेतलं. आता दुसरं करायला तरी काहीच नव्हतं माझ्याजवळ!
ते लाल बटबटीत डोळे माझ्यावर खिळून होते, त्या राक्षसाच्या मुखातून चिकट द्रव माझ्या अंगावर कोसळत होता, ही तर फक्त सुरुवात होती! मला कळून चुकलं. त्याची लांब सळसळती जीभ बाहेर पडली, त्याचे ते मंद गुरगुरणे आता अधिकच भयावह वाटत होते, त्याचे अजस्त्र काटेरी पंजे माझ्या मानेवर येऊन पडले, त्यांचा माझ्या मानेवरील दाब वाढत गेला, तेवढ्यात एक ओलसर, थंडगार, रखरखीत स्पर्श मला जाणवला, रक्ताची उडालेली हलकीशी चिळकांडी त्याने साफ केली होती, आता मृत्यू माझ्यापासून दूर नव्हता. तो फक्त वेदनामय नसावा हीच काय ती माझी शेवटची इच्छा! मी त्याच्या प्रतिक्षेत माझे डोळे मिटून घेतले. कुठल्याही क्षणी माझी चेतना हरवणार होती. जे काही घडणार होतं. त्याला फक्त काही क्षणांचा अवधी बाकी होता...
**
गर्द काळोखात, रातकिड्यांच्या आवाजाच्या सावटाखाली असलेल्या त्या सुनसान रस्त्यावरून पाच सहा फुटांची शरीरयष्टी असलेला, एका हातात टॉर्च "विजार "-, आणि दुसऱ्या हातात भली मोठी काठी घेऊन असलेला बलदंड भीमा एकटाच प्रवास करत होता. वातावरणात काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. मधूनच एखादा कुत्रा गळा काढायचा आणि भीमा सारखा मस्त गडी सुद्धा त्या आवाजामुळे थरारून जायचा. त्याच्याच पायांचा होणारा ' चर्र्र चरर !!!!! " असा पालापाचोळा चिरडल्या मुळे होणारा आवाज त्यालाच थरारून सोडत होता. त्याची पावले अधिक त्वेषाने आणि तितकीच झपाझप पडत होती. हातात आलेलं काम त्याला शक्य तितक्या लवकर पूर्ण करायचं होतं. त्या भयाण रात्री त्याच्या मनात एका अनामिक भीतीने घर केलं होतं. | 5 625 |
| 7 | जेवण आटोपल्यावर चेहर्यावर पहिल्यांदाच असं समाधान पसरलं होतं. सध्यातरी घटित प्रकार मी पूर्णपणे विसरून गेलो. आणि रात्रीच्या हवेचा तो गारवा अंगावर झेलत विसावलो.. शांतपणे.. तणावरहित स्थितीत....
****
नुकताच सूर्योदय झाला होता. पक्षी आपल्या मंजूळ आवाजात प्रसन्न पहाटे ची जाणीव करून देत होते. दुरूनच कुठून तरी टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर कानी पडत होता. थंड हवेची हलकेशी झुळूक मला स्पर्शुन गेली. आणि क्षणातच माझ्या डोळ्यावरील झोप खाडकन उडून गेली. आयुष्यात कधी नव्हे ती एवढी प्रसन्नता, शांततेचा मी अनुभव घेत होतो. सुखाचे दोन क्षण कधीच आपल्या ओंजळीतून निसटून जाऊ नयेत असं मला प्रकर्षाने वाटत होतं. सर्व आवराआवर करून, न्याहारी करून मी गावा बाहेर पडलो. पाटलांचा मुलगा सत्या सोबत गावातला पूर्ण परिसर नजरेखालून घातला.
संध्याकाळ पर्यंतचा सर्व दिवस मी असाच घालवला. ना मी पाटलांना त्या वाड्या विषयी काही सांगितलं! ना त्यांनी मला! ...निदान मला तरी तिथं जायचंच नव्हतं. अजूनही ते क्षण आठवले की अंगावर असा काही शहारा उभा राहतो किबस!!!! परंतु कधी पर्यंत या भीतीपासून दूर पडणार? या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर मला जाणून घ्यायचेच नव्हते. काही होऊ देत आता नको ते. मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं. परंतु कधी पर्यंत! कधी ना कधी तरी मला या प्रसंगाचा उलगडा त्यांच्यासमोर करावाच लागणार होता. संकटा पासून दूर पडण्यापेक्षा त्याचा धिटाईने सामना केलेला बरा. असं माझं अंतर्मन मला कळवळून सांगत होतं. परंतु आता तरी माझ्या विचारांवर त्या भीतीचा घट्ट पगडा बसला होता. मी पुन्हा एकदा निद्राधीन होण्याच्या मार्गावर होतो. दुसऱ्याच क्षणाला मी माझे अंग पलंगावर झोकून दिले...
**
घड्याळात रात्रीचे बारा साडे बारा वाजले होते. वातावरणात स्थिर शांतता पसरली होती. मंद हवेची झुळूक, रातकिड्यांचा भयंकर चित्कार वातावरणाला भीतीदायक बनवत होता. त्या हवेच्या झुळकी मुळे त्या खोलीच्या खिडकीच्या पटलाची मंद हालचाल होत होती. त्यापासून निर्माण होणाऱ्या वेगळ्याच आवाजाने वातावरणात हलकासा थरार निर्माण केला होता. आणि याच भयावह परिस्थितीत पाटलांनी एका खोलीचे दार उघडले. त्या खोलीतून एका सावलीने हलकेच बाहेर प्रवेश केला. गर्द अंधार असल्यामुळे ते नेमकं काय होतं हे कळायला मार्ग नव्हता. परंतु एक मात्र होतं पाटलांनी ' त्याला " मुक्त केल्यावर पाटील सुद्धा थरथरत होते. चेहर्यावर घर्मबिंदु जमा झाले होते. पाटील आणि ' ते " त्या खोली समोर येऊन उभे ठाकले.
' सावज... माझं सावज:!!!
ही ही ".
त्या चिरेबंद वाड्यात तो धारदार आवाज मृत्यू सारखा घुमला. ती सैतानी किंकाळी ऐकून संपूर्ण वाडा थरारला. त्या आवाजातून डोकावत होता साक्षात मृत्यू... पाषाण हृदयी पाटील सुद्धा ती जबरदस्त गर्जना ऐकून एका क्षणासाठी थरारून गेले. आपण काहीतरी चुकीचा तर निर्णय घेत नाही आहोत ना? असं फक्त क्षणभरच... क्षणभर त्यांना वाटलं. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर विकट हास्य तरळलं. ते दार खाडकन उघडल्यावर त्या अमानवी तत्वाच्या नजरेत डोकावत होती शिकारीची प्रचंड आस, भुकेची लालसा, आणि बरच काही. त्या दारात आज साक्षात मृत्यू अवतरला होता. एका वेगळ्याच रुपात... जो घेणार होता एक बळी हृदयद्रावक पद्धतीने...
**
आपल्या गोबऱ्या आवाजात असा चित्कार करत त्या ' अमानवी तत्त्वाने " एका झटक्यातच ते दार खसकन वेगळे केले. पहिले त्याचा तो आवाज, आणि दार भिंतीवर आदळल्यामुळे निर्माण झालेला दुसरा आवाज. त्यामुळे मी खडबडून उठून बसलो.
आणि समोर... माझ्यासमोर वेगळच काहीतरी होतं. ते प्रचंड गतीने माझ्याजवळ येत होतं. त्याचे लांब सडक पंजे, लालबुंद नजर, काटेरी सुळे माझ्याकडे भुकेल्या नजरेने बघत होते. आतापर्यंत फक्त कथा-कादंबऱ्या मध्ये असलेला प्रकार मी प्रत्यक्षात माझ्या डोळ्यासमोर बघत होतो. मी नुसताच पलंगावर बसून होतो. त्याच्या नजरेत तीच धार होती. जशी धार मी त्या वाड्यात अनुभवली होती. माझा आता मृत्यु होणार का? त्या नुसत्या कल्पनेनंच मी थरारून गेलो. काय करावं! तो सैतान मला त्याच्या मगर मिठीत घेऊन कायमचा यमाच्या मिठीत पाठवण्यास आतुर दिसत होता. आणि तो मृत्यू सुद्धा साधासुधा नव्हता. त्याच्या काटेरी पंजात जखडून, मला असीमित वेदना देऊन, माझा अंत होणार होता. आणि पुढे सुद्धा कोण अंदाज करणार? काय सांगता येत होतं. माझ्या आत्म्याला अजून काय काय भोगावे लागणार आहे ते! गंमत म्हणजे हे विचार मी फक्त दोन-तीन क्षणात करून चुकलो होतो.
आपल्याला मृत्यू येत आहे . काहीतरी करावं लागणार. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा शरीर स्वतः मेंदूचं न ऐकता स्वतः कृती करत . मला प्रत्यक्षात त्याची प्रचिती आली होती. माझा मेंदू गोंधळलेला असताना माझा जबडा आपोआप उघडला गेला. आणि मी जोरदार किंकाळी फोडली. पण आज नशीब माझ्या बाजूनेच नव्हतं. | 5 549 |
| 8 | मला प्रकर्षाने वाटत होतं, माझ्या पाठीमागून एका अजस्त्र, अमानवी सावलीचे दोन लाल भडक, भिर भिर त्या सावजाच्या शोधात असलेले, तप्त निखार यासारखे दोन बटबटीत डोळे.
नेमकं काय होतं ते? मी एका क्षणासाठी अनुभवलं आणि थरारून गेलोय संपूर्ण... काय करावं! जावं का त्या वाड्यात? की पत्ता विचारून भेटूया पाटलांना?
माझ्या अंतर्मनाने उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या गराड्यात मी अडकून पडलो होतो...
****
तो भयानक शहारा, ती निश्चल भीती, ती जीवघेणी थंडगार लहर, आणि अमानवी शक्ती असल्याची दांडगी जाणीव. हा सर्व प्रकार अनुभवल्यावर मी फार चक्रावून गेलो होतो. या क्षणी त्या वाड्याचा तो दरवाजा मला मृत्यूचा दरवाजा वाटत होता. परंतु दुसर्याच क्षणाला मी सावरलो. कोण जाणे का? परंतु मला आणखीनच अशक्त वाटत होतं. शरीरभर संपूर्ण त्राण निघून गेल्यासारखं. त्यावेळी माझी संवेदना हरवली होती, विचार करण्याची शक्ती बोथट झाली होती, मला कशाचंच भान नव्हतं. माझ्यासोबत नेमकं काय घडत होतं मलाही माहित नव्हतं. मी यंत्रवत हालचाल केली आणि तो दरवाजा अखेरचा उघडला, मुख्य म्हणजे किल्लीने आपले काम पूर्ण केले. माझ्या शरीराचा तान, अशक्तपणा ने माझ्या विचारांवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. मला कुठल्याही परिस्थितीत आराम करायचा होता. चटकन कुठल्यातरी खोलीत शिरावं आणि निपचित पडून राहावं असं मला वाटत होतं. पुन्हा यंत्रवत हालचाल करतच मी खोलीत शिरलो.
जणू कोणीतरी माझ्या मेंदुवर, त्याच्या विचार करण्याच्या शक्तीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं. मी काय करतोय! कुठली कृती माझ्यासाठी उपयुक्त ठरत आहे! याचं मला भान उरलं नव्हतं. आणि गंमत म्हणजे ही जाणीव मला माझ्या अंतर्मनाच्या कुठल्यातरी कप्प्यातून पूर्णपणे अनुभवता येत होती. आपल्या सोबत काहीतरी चुकीचं घडत आहे हे तर मला माहित होतं! परंतु ते घडू नये यासाठीच कुठलेही पाऊल मी उचलू शकत नव्हतो. ती खोली पहायला नीटनेटकी होती, पण धुळीचा थर मात्र तिथे अद्याप कायम होता. माझी निरीक्षणशक्ती हळूहळू कमकुवत झाली होती. आपल्या संवेदना, आभास, विचार, जाणिवा कुणीतरी हळूहळू काबीज करत आहे याची पूर्वसूचना मला मिळत होती. त्या रहस्यमय ठिकाणी प्रवेश केल्यावरच असे बदल माझ्यात घडले होते.
तिथे काहीशा सुस्थितीत असलेल्या पलंगावर मी स्वतःला धाडकन झोकून दिलं! का माझ्याकडून तसं करून घेतल्या गेलं---???
' आले सावज;
घडली शिकार;
रक्ताचा घोट घ्यायला- मी झालो तयार!!!
ही, ही ही ".
माझी अखेरची संवेदना जागृत असेपर्यंत तो भयकंपित करणारा आवाज मला माझ्या कानावर पडल्यासारखा वाटला.
**
कुठल्याशा आवाजाने मला जाग आली. आपण इथे कशासाठी आलो होतो? आपण सध्या कुठे आहोत? आपल्यासोबत काय प्रकार घडून गेला आहे याची जाणीव मला थोड्या काळानंतर झाली. माझ्या डोक्यात वेदनेची प्रचंड कळ उठत होती. वातावरणात अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्या सुनसान वाड्यात मी एकटाच होतो. पाटलांची भेट घेऊन काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया असा निर्धार मी माझ्या मनाशी केला. मी ताडकन उठून बसलो. मला थोडा वेळ सुद्धा या जागेवर थांबायचं नव्हतं. स्वतःची स्थिती जरा ठीक केली आणि जोरकस वेग पकडला. त्या वाड्यापासून चांगलं अर्ध अंतर पार केल्यावर माझी गाडी, सामान तिथेच राहिले याची मला जाणीव झाली. परंतु आता त्याची पर्वा करायची वेळ मुळीच नव्हती. गावच्या लोकांसोबत थोडेफार बोलून मी पाटलांच्या घराचा पत्ता काढला. आणि थेट तिथेच येऊन धडकलो. आता कुठे मला हायसं वाटत होतं. आता पुन्हा नको तो अनुभव! पुन्हा नको ती थरारक संवेदना! पुन्हा नको ती मती गुंग करणारी स्थिती! अशी प्रार्थना मी चांगलाच व्याकूळ होऊन करत होतो.
मी पाटलांची भेट घेतली, आमची औपचारिक चर्चा आटोपली, माझ्या येण्याचं प्रयोजन त्यांना सांगितलं. आणि आतापर्यंत मी जे अंदाज वर्तविले होते ते पूर्णपणे खरे ठरले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मावत नव्हता. त्यानंतर आमच्यात पुन्हा बरीच चर्चा झाली. आम्ही गाठलेले यश त्याला असलेली कष्टाची जोड ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. या गावात सुद्धा आमची बरीच शेतजमीन आहे. याची मला तेव्हा माहिती पडली. कारण काका असताना त्यांनी कसोशीने प्रयत्न करून मला या गोष्टीपासून दूर ठेवलं होतं. आणि याची किंचितअशी प्रचिती मला येऊन चुकली होती. काय करावं? सांगावा का त्यांना घडलेला प्रकार? जाऊ देत. आत्तातरी नकोच ते! मी स्वतःशीच ठरवून टाकलं. आणि माझ्या प्रवासातील त्या भेटीचा उल्लेख मी पूर्णपणे वगळला.
त्यांनीसुद्धा आता तरी त्या वाड्याचा उल्लेख केला नव्हता. अपेक्षेप्रमाणे तिथे राहण्याचा, भोजनाचा आस्वाद घेण्याचा प्रेमळ आग्रह मला झाला होता. आणि मी तो टाळू शकत नव्हतो. अनेक ठिकाणी प्रवास केला, अनेक लोकांकडून आग्रह सुद्धा झाले पण त्यात असा हक्क, प्रेम, आपुलकी नव्हती. होता तो फक्त काहीतरी मिळवण्याचा उद्देश, स्वार्थ. कुठेतरी ते प्रेम, ते कौतुक मी इथे अनुभवू शकत होतो. | 5 594 |
| 9 | snighdha:
चक्रव्यूह . दीर्घ कथा .
©® पार्थ wankhade .
वातावरणातील उन्हाची दाहकता कमी व्हायला लागली होती. प्रखर सूर्यप्रकाश सौम्य झाला होता. हळूहळू सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. मी गाडीची गती आणखी हळू केली. दुसऱ्याच क्षणाला परिचित गावाचे फलक माझ्या नजरेत पडले. दोन क्षण माझी नजर तिथेच खिळून बसली. मी हलकेच माझ्या गाडी सोबत त्या गावात प्रवेश केला.
शहरी कोलाहलापासुन, त्याच कामापासून, तिथल्या कोरड्या, शुष्क, अनौपचारिक वातावरणापासून मला काही काळ दूर राहायचं होतं. काही काळासाठी सोडून दिला होता मी सर्व ताण. जगायचं होतं फक्त स्वतःसाठी... ही कारणं तर मी आधीच ठरवलेली होती. परंतु मूळ कारण तर काही वेगळंच होतं. लहानपणापासून आई वडिलांचे छत्र मी गमावले होते, या जगात कोणीतरी ' आपलं " म्हणावं असे फक्त माझे काका होते. आणि मी त्यांच्यापासून सुद्धा दुरावलो होतो. ते सुद्धा निघून गेले होते मला कायमचे या जगात एकटे सोडून... तेव्हा पासून मन अगदी अस्वस्थ झालं होतं. एका मोठ्या कंपनीचा मालक आहे मी. तेसुद्धा त्यांच्याच कृपेने. हे सुद्धा त्यांच्या कष्टाचं फळ. आणि माझ्या उंच भरारी मागे सुद्धा त्यांचाच धीरगंभीर पाठिंबा, त्यांचेच मार्गदर्शन पर आशीर्वाद...
त्यांच्या अशा अचानक जाण्याने मला प्रचंड धक्का बसला होता. आज एवढं ऐश्वर्य असून सुद्धा माझं मन मात्र होतं निराशेच्या खोल गर्तेत... नेहमीप्रमाणे हे दुःख सुद्धा टिकणार नव्हतं फार काळापर्यंत. आणि याची मला पूर्ण जाणीव होती. परंतु कंटाळुन गेलो होतो मी त्या औपचारिक संदेशांना, वरून दुःख व्यक्त करणाऱ्या दुटप्पी माणसांना, त्याच शुष्क, अनोपचारिक, सांत्वनाला. याला सुद्धा काही सन्माननीय अपवाद होतेच म्हणा!
परंतु काही काळ विसावा घेण्यासाठी इथे थोडेफार राहण्याचा, इथल्या गोष्टी अनुभवण्याचा निश्चयच केला होता मी...
पण मला काकांचं एक वागणं नेहमी कोड्यात टाकत आलं होतं. मुळात माझे आई-वडील माझ्यापासून कसे दुरावले? गावी एवढी मोठी शेतजमीन, भव्य वाडा असतानासुद्धा आपण येथे नव्याने कष्टकरी का करावे? त्या वाड्यावर एकदा जाऊन पाहायला काय हरकत आहे? असे एक ना अनेक प्रश्न विचारून बघितले होते मी... परंतु उत्तर मात्र मला मिळालं नाही. ते गाव कुठे आहे, त्या वाड्यापर्यंत कसं पोहोचायचं हे जरी मला त्यांनी सांगितलेलं असलं. तरी निदान ' मी असेपर्यंत तरी तिथे जाऊ नकोस! " अशी शपथ घ्यायला लावली होती त्यांनी मला... त्यामुळे तेव्हा तरी माझा नाईलाज झाला. परंतु तिथे जाण्या मागचं आणखी एक उद्देश सुद्धा नव्याने निर्माण झाला होता.
अखंड प्रवास करत राहिल्यामुळे मी कमालीचा थकलो होतो. त्यातल्या त्यात संकटांची भर म्हणून गाडीचं काम निघालं होतं. आणि जखमांवर मीठ लावायला गावचे जबरदस्त हादरे बसवणारे रस्ते तर होतेच. गर्मिन माझा जीव व्याकुळ झाला होता. त्या नागमोडी वाटांच्या प्रवासामुळे माझ्या शरीराची दुरावस्था झाली होती. त्यामुळे मी पूर्णपणे दमून गेलो होतो.
माझे वडील हयात असताना या गावचे पाटील माझ्या वडिलांचे जिवलग मित्र होते असे म्हणतात! काकांचे त्यांच्याशी संबंध अजूनही कायम असावेत असं मला वाटतं. तिथे गेल्यावर त्यांची भेट घेऊन, वाड्याची परिस्थिती जाणून घेऊन मगच काय तो निर्णय घ्यावा असं मी ठरवून टाकलं होतं. परंतु या निर्णयात माझं शरीर मात्र मला साथ देत नव्हतं त्याला आरामाची नितांत आवश्यकता होती.
बघता बघता या माझ्या प्रवासाचा शेवट अखेरीस त्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचला. मी गाडीचं दार उघडलं आणि वाड्यावर नजर फिरवली. मी जशी अपेक्षा केली होती तसं इथे काहीच नव्हतं. वाडा सुस्थितीत होता, थोडा कालावधी उलटल्यानंतर त्याची साफसफाई सुद्धा होत असावी बहुतेक. मी काकांकडून त्या वाड्याच्या किल्ल्या घेतल्या होत्या. त्या इथे काम करतील की नाही याची जरा मला शंकाच होती. पण एक खात्री सुद्धा झाली होती. किंवा अंदाज तरी आला होता की गावचे पाटील आम्हाला परिचित असावेत. नाहीतर त्यांच्या शिवाय हे सगळं कोण करू शकत होतं?
मी गाडीतून खाली उतरलो. वाड्याच्या भरभक्कम दरवाजा पुढे येऊन उभा राहिलो. दुःखापासून मुक्त होण्यासाठी, अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, हरवलेला आनंद मिळवण्यासाठी, कधी काळी माझे आई-वडील जिथे राहत होते तिथे राहून त्यांना अप्रत्यक्षपणे अनुभवण्यासाठी मला या वाड्यात राहायचं होतं. माझा उद्देश तर ठरला होता. परंतु त्याच्या विपरीत सुद्धा काही घडणार होतं का?????
अजस्त्र दारावर विसावलेल्या त्या कुलपा ला हलकासा स्पर्श केला. आणि तेवढ्यात एवढा महाभयंकर उकाडा असून सुद्धा थंडगार; काटेरी हवेची झुळूक मला स्पर्शुन गेली. आतापर्यंत शेजारच्या झाडावर शांतपणे विसावलेला कावळा ओरडत होता, आणि.... आणि मला झाली ती जाणीव पुन्हा एकदा... ' कुणीतरी बघतोय का आपल्याकडे? " जरी माझ्या नजरेला काही दिसत नसलं तरी तो भासच मला करून देत होता एक विलक्षण भयंकर, काटेरी जाणीव... | 6 676 |
| 10 | "पण मी मंदीरात कसा आलो.."अस म्हणत सुजितने रात्री घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली..
"माझी आई तुम्हाला तेच सांगत होती,आज अमावस्या हाय.अमावस्येला त्या माळावर भूत फिरत्यात.त्यातून सहसा कोणी वाचत नाय..पण तुमी गावच्या वेशीत आला होता.तुमाला गावच्या राखणदारान वाचवल आणि मंदीरात आणून ठेवल.तो माळावरच्या भुतांना गावाच्या वेशीत येऊ देत नाय.."
सुजितला मंदीरातील ती राखणदाराची मूर्ती आठवली..तिच्यात आणि रात्री आपण ज्याच्या अंगावर कोसळलो त्याच्यात खूप साम्य होते..त्याने मनात राखणदाराचे आभार मानले.
दुसर्या दिवशी सकाळी त्याने आपले सामान पॅक करुण ठेवले.या गावात राहणे आता त्याला शक्य नव्हते.एका पांढर्या कागदात राजीनाम्याचा अर्ज लिहून तो बाहेर पडला.त्या प्रसंगातून तो वाचला असला तरी त्याचा भयानक परिणाम त्याच्या मनावर झाला होता.मनात असलेली भीती कधीच जाणार नव्हती.शाळेतील नोकरीचा राजीनामा देऊन त्याने गाव सोडले.परत एकदा त्याच्या नशिबी नवे गाव नवे रस्ते येणार होते.
समाप्त
(काल्पनिक कथा..) | 9 141 |
| 11 | "खुशात हसत खिदळत चाललाय मुलाची काय काळजी आहे कि नाही...?"पुढे चालणार्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवीत सुजितने विचारले.तसे ते दोघे मागे वळाले..बाईने लगबगीने डोके आणि चेहरा पदराने झाकला..
"कोण हाईस बाबा तू,काय पायजेल तुला.."त्या माणसाने विचारले.
"मुलाची काही काळजी आहे कि नाही.."
"कोण मुलगा...."
"हा काय..."अस म्हणत सुजितने खाली पाहिले तर तो मुलगा जागेवर नव्हता.त्याने आसपास पाहिले तर तो कुठेच नव्हता..
"अहो आताच तर माझ्यासोबत होता..."अस म्हणत त्याने जोडप्याकडे पाहिले तर ते दोघे पण जागेवर नव्हते.तो एकटाच ऊभा होता,थरथरत्या हाताने चेहर्यावर आलेले पाणी त्याने पुसले.तो पाय ऊचलणार तोच त्याला रडण्याचा आवाज आला.त्याने खाली पाहिले तर तोच मुलगा होता.
"मी चुकलोय...मला आई बाबाकडे जायचय..." अस म्हणत तो भेसूरपणे रडू लागला.
"कोण मुलगा..."या आवाजाने त्याने समोर पाहिले तर मघाचेच जोडपे ऊभे होते..
"ईथ असले भास नेहमीच होत्यात...."अस म्हणत ती दोघ हसू लागली.त्याच्या शरीराचा थरकाप ऊडाला.मागे न पाहता तो पळू लागला.त्या दोघांच्या हसण्याच्या आवाजात त्या मुलाचाही आवाज मिसळला..पळत असताना तो दोन वेळा चिखलात पडला.अखेर दमूण गुडघ्यावर बसला..पावसातही त्याच्या घशाला कोरड पडली.मघाशी घडलेला प्रसंग अजून मनाते घर करुन होता,तो घाबरला..
समोर काहीतरी चमकले त्याने पाहिले तर काही अंतरावर एक झोपडी होती..त्यात लावलेला दिवा चमकत होता.त्या दिशेने तो चालू लागला...
"ओ पाव्हण तिकड जाऊ नका...ईकड या माझ्या घरी...?"काही अंतरावरावरुन त्याला आवाज आला.पण त्याला आता ती झोपडीच सुरक्षित वाटत होते..त्या दिशेला पाहिल तर एक पांढरी आकृती त्याच्याजवळ येत होती.आकृतीपासुन दूर पळत तो झोपडीजवळ गेला.वळूण पाहिले तर मागे कोणच नव्हत.सुजितने दरवाजावर थाप मारली...थोडा वेळ गेला आणि त्याने आवाज दिला..
"कोणी आहे का घरात..?"
झोपडीतून पैजणांचा आवाज आला आणि दरवाजा ऊघडला गेला..समोर हातात दिवा घेतलेली एक मध्यमवयीन स्त्री ऊभी होती.दिव्याच्या प्रकाशात तिचा चेहरा ऊजळून निघाला होता..क्षणभर तो घडलेला प्रकार विसरुन गेला.तिचा गोरापान चेहरा..गालावर आलेली केसांची बट..घारे डोळे..तिच्या ऊंच आणि प्रमाणबध्द शरीराकडे तो पाहतच राहिला..
"काय हवय.."तिने हसत विचारले...
"मी रस्ता चुकलोय..आज रात्री राहायची सोय होईल का...?त्याने संकोचाने विचारले..
"न व्हायला काय झाल..आत या.."तिने बाजूला सरकत त्याला आत घेतले.तिच्या मागे तो झोपडीत शिरला.आतमधील हवा ऊबदार होती.झोपडी लहान होती,एका कोपर्यात अंगावर मळलेली चादर घेऊन कोणीतरी झोपले होते..
"ते माझे वडील आहेत.."सुजितकडे पाहत ती म्हणाली..त्याने एकदा अंगावरच्या कपड्यांकडे पाहिले..ईस्त्री केलेला शर्ट चिखलाने माखला होता.पॅन्टची आणि बुटांचीही तिच अवस्था होती.
"एवढ्या रात्री कुठे गेला होता.."वडीलांच्या अंगावरील चादर व्यवस्थित करीत तिने विचारला.सुजितने घडलेला सगळा प्रकार सांगितला..
"ईथे असे भास नेहमी होतात,बर झाल तुम्ही ईथ आलात.."त्याच्या अगदी जवळ येत ती म्हणाली.सुजितचा हात तिने हातात घेतला.त्याचे लक्ष जमीनीवर झोपलेल्या माणसाकडे गेले.फाटक्या चादरीखाली त्याच्या शरीराच्या पांढर्या अस्थी दिसत होत्या..चादरीखाली एक सांगाडा होता..म्हणजे हे घर आणि ही बाई पण..त्याच्या कपाळावर घाम साचला...
"थोड पाणी मिळेल प्यायला..."हात सोडवत तो म्हणाला.ती पाणी घ्यायला मागे वळली..तेवढ्यात धाडकन दरवाजा ऊघडीत तो बाहेर पळाला..
"थांब तू वाचणार नाही...."तिचा संतापलेला आवाज आला..त्याने वळूण पाहिले तर झोपडीतून निघालेला काळा धूर त्याच्या मागे वेगाने येत होता.
"ओ पाव्हण सांगितल होत ना तिकड जाऊ नका...ईकड या माझ्या घरी.."काही अंतरावरावरुन येणार्या आवाजाकडे त्याची पावले वळली.ती पांढरी आकृती हळूहळू स्पष्ट दिसू लागली.पांढरा शर्ट आणि धोतर घातलेला माणूस तिथे ऊभा होता.सुजित त्याच्या जवळ जाणार तोच त्याच्या लक्षात आले,तो माणुस विहीरीच्या कठड्यावर ऊभा आहे.ती विहीर हेच त्याचे घर आहे.त्याने मार्ग बदलला..पण आता त्याच्या पायाचा वेग मंद झाला,डोळ्यासमोर अंधारी आली..मागे वळून पाहिले तर काळ्या रंगाच्या कित्येक सावल्या त्याच्या मागे येत होत्या.आज आपल्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे याबद्दल त्याची खात्री पटली..समोर आडव्या आलेल्या एका माणसाच्या अंगावर तो आदळला..त्याची पांढरी दाढी आणि गळ्यातील तुळशीच्या माळेकडे बघतच त्याची शुध्द हरपली..
त्याला जाग आली तेव्हा सगळे अंग ठणकत होते.सुजित चांगदेवच्या घरी त्याच्या खोलीत होता.तो ऊठणार पण समोर बसलेल्या चांगदेवने त्याला झोपवले..आपण ईथे कसे आलो ते त्याला काहीच आठवत नव्हत.पण काल रात्री घडलेल्या प्रसंगातून तो वाचला होता..
"मी ईथे कसा आलो.."
"काल सकाळी तुम्ही मारुतीच्या मंदीरात बेशुद्ध अवस्थेत सापडला.लय वाईट अवस्था होती तुमची..एक दिवस बेशुध्द होता..."चांगदेव त्याला म्हणाला.. | 6 667 |
| 12 | सकाळी ऊठून शाळेत जायचे.रात्री काहीतरी वाचत बसायचे.असा त्याचा रोजचा दिनक्रम बनला,दिवस जात होते.सुजित लवकरच मुलांचा आवडता शिक्षक बनला.त्याची शिकवण्याची पध्दत वेगळी होती.त्याच्या तासाला सगळी मुल हजर असायची.गावाबाहेरील राखणदाराची मूर्ती दिसल्यावर त्याचे हात आपोआप जोडले जायचे. रात्री चांगदेव त्याच्याशी गप्पा मारत बसायचा.त्याच्या बायकोशी सुजितच जाता येता बोलण व्हायच.त्याची आई मुकी आसल्याने ती हातवारे करत बोलायची.तिची भाषा काही सुजितला समजायची नाही.गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.अचानक आभाळ भरुण यायचे विजा चमकायच्या पण पाऊस काही पडत नव्हता.दहावीची मुल रात्री शाळेत अभ्यास करायला यायची.त्यांना काही शंका आली तर ती सोडवायला रोज एक शिक्षक त्यांच्यासोबत शाळेत असायचा.रात्री सात ते दहा त्यांची अभ्यासाची वेळ होती.त्या रात्री सुजितचा नंबर मुलांसोबत थांबण्याचा होता.सकाळी आवरुण तो बाहेर पडला.चांगदेव आणि त्याची बायको दोघेही शेतात गेले होते.त्याची मुकी आई नातवाला खेळवत होती.
"आज रात्री घरी यायला मला ऊशीर होईल.अकरा तरी वाजतीलच..."त्याने चांगदेवच्या आईला सांगितले.तसे तिने डोळे मोठे करुन त्याच्याकडे पाहिले.हातवारे करत काहीतरी सांगू लागली.तिने भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडकडे बोट केले.त्यावर असलेली आजची तारीख दाखवू लागली.तारीख पाहिल्यावर त्याला समजले आज अमावस्या आहे.याचे सुजितला विशेष काही वाटले नाही,ती काय सांगू पाहत होती,त्याला काही समजत नव्हते.हातावरील घड्याळाकडे ईशारा करत खूप ऊशीर झालाय,असे त्याने सांगितले.घराबाहेर आल्यावर वळून मागे पाहिले,तर चांगदेवची आई तोंडावर पदर ठेऊन त्याच्याकडे पाहत होती.शाळेच्या दिशेने जाताना गावाबाहेरील मूर्तीकडे पाहूण आपोआप त्याचे हात जोडले जातात..
दहावीच्या मुलांनी रात्रीचा वर्ग खच्चून भरला होता.मुल शांतपणे अभ्यास करीत होती.बाहेर वातावरण ढगाळ होत.अधुनमधून विजा चमकत होत्या,मुसळधार पावसाची लक्षण होती.दहा वाजले आणि एक एक करत मुल घरी निघून गेली.शाळेच्या शिपायाने लाईट घालवून वर्ग बंद केला.
"सर पावसाळी वातावरण आहे.कधीही पाऊस पडेल,आज रात्री माझ्या घरी थांबा.."सुजितकडे पाहत शिपाई म्हणाला..
"नाही नको मी जातो..."
"ठिक आहे..जर पाऊस चालू झाला तर परत या. गेटसमोरील खोली तुमच्यासाठी ऊघडी ठेवतो...."अस म्हणत शिपाई निघून गेला.
सुजित शाळेच्या बाहेर आला आणि नेहमीच्या पायवाटेवरुन चालू लागला.सोसाट्याचा वारा सुटला होता.त्या माळरानावर दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंत गवत वाढले होते.पावसाची चाहूल लागल्याने त्यातून बेडकांचे आवाज येत होते.अंधारामुळे चालण्यास हवा तेवढा वेग मिळत नव्हता.अंधार पाहूण त्याला आठवले आज तर अमावस्या आहे.तोच आकाशात लखकन एक विज चमकली पाठोपाठ ढगांचा गडगडाट झाला.घाबरुण तो जागेवरच ऊभा राहिला.काळ्याकुट्ट ढगातून पावसाचे मोठे थेंब पडू लागले.मुसळधार पाऊस पडत होता..अगोदरच अंधार त्यात पाऊस चालू झाल्यामुळे समोर गडद अंधाराचा पडदा पसरला.डोळे फाडून पाहिले तरी समोरचे काही दिसत नव्हते.
क्षणभरातच तो ओलाचिंब झाला कपड्यातून पाणी गळू लागले.समोरच्या वाटेवर पाणी साचून चिखल झाला.शेवटी निसर्गापुढे आपण काय करणार असा विचार करत तो पुढे चालला.पाय ऊचलुन चालला तर तो लवकर पोहोचणार होता.पण आता पाय ऊचलत नव्हता.बुटांना चिखल लागल्याने तो जड झाला होता.गुडघ्यापर्यंत पॅन्ट चिखलाने भरली होती.अंदाज घेऊन तो पाय टाकत होता.थोडा वेळ सरळ चालत राहिला.समोरची पायवाट कधी संपली ते त्याच्या लक्षातच आल नाही.या भागात तो अगोदर कधीच आला नव्हता.गावात जायचा रस्ता कुठे दिसत नव्हता.अचानक त्याचा एक पाय गुडघाभर चिखलात रूतून बसला.तो बाहेर काढायच्या नादात सगळ्या कपड्यांना चिखल लागला.कसलासा आवाज आला म्हणून तो शांत उभा राहिला.लक्ष देऊन आवाज ऐकू लागला.तो एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज होता.तो त्याच्या अगदी जवळून येत होता.त्याने खाली पाहिले आणि एकदम दचकला.त्याच्या पायाला पकडून एक मुलगा रडत होता.
"कोण रे तू ईथे काय करतोय..."सुजितने त्याला विचारले.
"मी चुकलोय मला आई..बाबांकडे जायचय.."
"कुठे आहेत ते..."
"आम्ही घरी चाललो होतो.पण पाऊस आला आणि चुकलो..."
आता याच्या आईबापाला कुठे शोधायच..तो आधीच वैतागला होता.त्या मुलाला शांत करीत पुढे चालू लागला.सुजितच्या बोटाला पकडून तो मुलगा चालत होता.चिखलात रूतलेले पाय मोठ्या प्रयासाणे बाहेर काढावे लागत होते.या मुलाचे आईवडील सापडले तर त्यांना गावाला जाणारा रस्ता विचारता आला असता.थोड्या अंतरावर दोन अंधुक आकृत्या चालताना दिसल्या.त्याच्या पुढेच एक जोडपे एवढ्या पावसातही हसत चालले होते.
"तुझे आई-बाबा आहेत का ते..?"त्याच्याकडे पाहत सुजित म्हणाला..यावर त्या मुलाने नुसतीच मान हलविली...त्याला घेऊन सुजित दोघांजवळ गेला. | 5 893 |
| 13 | एका रात्रीची थरारक कथा
नवे गाव नवे रस्ते
एस.टी घाटाच्या खाली आल्यावर सुजितला जाग येते.खडबडीत रस्त्यावर ड्रायव्हर सफाईदारपणे गाडी चालवत होता.बाहेर सगळीकडे अंधार पसरला होता.दूर कुठेतरी एकदोन घरातील दिवे चमकत होते.रस्त्याच्या कडेला असणार्या झाडाच्या फांद्या गाडीला घासत होत्या.खिडकीतून येणार्या थंड हवेच्या झोताने त्याला हुशारी येते.व्यवसायाने शिक्षक असलेल्या सुजितची गेल्या तीन वर्षातील ही तिसरी बदली होती.सतत होणार्या बदलीमुळे तो कंटाळला होता.त्याच्या आयुष्यात स्थिरता नव्हती.या वर्षी त्याची बदली काळेवाडी नावाच्या गावात झाली होती.त्याला लवकरात लवकर कामावर हजर राहण्याबाबत कॉल आला होता.कंडक्टरने बेल वाजविताच काही अंतर जाऊन एस.टी थांबते..
"मास्तर काळेवाडी आली घ्या उतरून...."त्याने सुजितला आवाज दिला.आपली पुस्तकांनी भरलेली अवजड बॅग ऊचलीत तो खाली ऊतरला.तो ऊतरताच कंडक्टरने डबलबेल वाजविली आणि एस.टी धूरळा ऊडवित निघून गेली.
"परत एकदा नवे गाव नवे रस्ते..सुजित पाटील घ्या आता त्याच्याशी पण जुळवून.."अस म्हणत त्याने घड्याळाकडे पाहिले जास्त वेळ झाला नव्हता.त्याची राहण्याची सोय गावातील चांगदेव नावाच्या एका माणसाकडे केली होती.गाव तसे लहानच होते,पत्ता विचारीत सुजित त्याच्या घरासमोर आला.त्याला पाहताच घरातून एकजण बाहेर आला..
"नमस्कार मी चांगदेव आपण सुजित पाटील का...?"
"हो मीच तो..."त्याला नमस्कार करीत सुजित म्हणाला..
"या ना आत..."त्याला घेऊन चांगदेव घरात आला.जुन्या पध्दतीचे ते एक कौलारु घर होते.समोरच एक मोठे अंगण होते.अंगणात बांधलेल्या गोठ्यातून गायी-म्हशींच्या हंबरण्याचे आवाज येत होते.गोठ्याच्या बाहेर त्यांना लागणारी वैरण एकावर एक रचून ठेवली होती.घरातील एका कोपर्यात शेतीची अवजारे दिसत होती.घरात चांगदेवची आई,बायको आणि लहान मुलगा एवढे जण होते.चांगदेवच्या आईला बोलता येत नव्हते.सुजितला दिलेली खोली लहान असली तरी एकट्यासाठी पुरेशी होती.त्याने आत जाऊन सामान ठेवले.बाहेर येऊन चांगदेवशी घरभाडे..जेवणाचे पैसे याबद्दल चर्चा केली..
"पैसे द्यायची काही गरज नाही..."चांगदेव त्याच्याकडे पाहत म्हणाला..
"पण मला तसे राहिलेले आवडणार नाही..."
"तुम्ही ईथे राहिला तर मला फायदाच होणार हाय.मी शेतकरी हाय,मला कधीकधी रातीच शेतात जाव लागत.तेव्हा घरी कोणी गडीमाणूस असला तर काळजी राहत नाही.."
शेवटी होय नाही करता चांगदेवने पैसे घ्यायचे ठरले.जेवण करुण सुजित त्याच्या खोलीकडे झोपायला जाणार तोच लाईट गेली.
"रोजची कटकट आहे..सुनिता दिवा लाव.."चांगदेवने बायकोला आवाज दिला.
शाळेतील पहिला दिवस म्हणून तो सकाळी लवकर ऊठला.सगळे आवरुण खोलीच्या बाहेर पडला..बाहेर ऊभ्या असलेल्या चांगदेवने त्याला आवाज दिला.
"पोरांने हे तुमचे नवीन मास्तर यांना जवळच्या रस्त्याने शाळेत घेऊन जा.."
चांगदेव एकदोन मुलांना सांगत होता.मुलांबरोबर तो शाळेच्या दिशेने चालू लागला.गावाच्या बाहेर असलेल्या एका मंदीरातील मूर्तीला सगळी मुल नमस्कार करीत पुढे जात होती.छोट्याशा दगडी मंदीरात ती मूर्ती होती.सुजितनेही हात जोडून नमस्कार केला.जवळचा रस्ता म्हणजे एक साधी पायवाट होती.दोन माणस चालू शकतील एवढ्या रूंदीची..तिच्या दोन्ही बाजूला गुडघाभर गवत वाढले होते.पण एकंदरीत गावचे वातावरण प्रसन्न होते.पावसाळा जवळ आल्यामुळे शेतात नांगरणीची काम चालू होती.कडक ईस्त्रीच्या कपड्यातील सुजितकडे शेतात काम करणारी लोक बघत होती.दोन किलोमीटर चालल्यावर शाळेची इमारत दिसू लागली.पहिला दिवस सर्व मुलांच्या ओळखी करण्यात निघून गेला.त्याचे सहकारी शिक्षक आणि मुल साधी आणि चांगली होती.पहिला दिवस तर मस्त गेला.शाळा सुटल्यावर परत गावात यायला खूप ऊशीर झाला.
"कसा गेला पहिला दिवस ..."तो आल्यावर चांगदेवने विचारल.
"खूपच छान..पण गावाच्या बाहेर कोणत्या देवाची मूर्ती आहे...?"
"ते काय माहित नाय.गावचा राखणदार म्हणत्यात त्याला,खूप वर्षापासून ती मूर्ती गावाच्या बाहेर ऊभी हाय.आमच्या पणजोबांच्या जन्माच्या पण अगोदरची,जातायेता हात जोडत जा..."चांगदेवच्या या बोलण्याचे सुजितला नवल वाटले.. | 5 927 |
| 14 | आतली खोली जरा जास्तच काळोख आणि..... मला नक्की सांगता येत नाही पण..... तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे कुलूप लावले होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकांचे काही सामान होते. त्यांनी ती रूम स्वतःकडे च ठेवली होती..... जाम गूढ, भीतीदायक असे वाटायचे..... असे वाटे या काळ्या दरवाज्यामागे गूढ रहस्य दडलेले आहे.
माझा धाकटा भाऊ मेडिकल ला होता. तो माझ्याकडेच होता. पण जास्त करून हाँस्टेल वर असायचा.... मला तो नेहमी काही सांगायचा.... आज प्रॅक्टिकल ला बाँडी आणली.... आज चेहरा फाडला..... मला इतकी भीती वाटायची की बस्.... तो बोलायचा अग भुते नसतात. पण मी जाम घाबरत असे... अशीच एक दुपार.... दुपारी/रात्री 12 ते 3.... ही वेळच वाईट असते.... मी शाळेतून आले. साडी बदलली.. आणी बाथरुम कडे हातपाय धुवायला जाणार... तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला... खूप कावळे ओरडत आहेत... भटजी मंत्र म्हणत आहेत... नकारात्मक... उदास मी डोके गच्च दाबून धरले.... समोरच तो काळा दरवाजा... हो तिथूनच हा आवाज असावा... मी भारल्यासारखी तिकडे चालत गेले.... तर दरवाजातच.... ती बसलेली... काळी साडी... चेहऱ्यावर नाक, डोळेच नाही त.... फक्त भोके... केस मोकळे सोडलेले..... चेहऱ्यावर भोकेच भोके मी जोरात किंचाळले... किचनमधे गेले. तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले... अहो आल्यावर बाहेर आले. अहोंना सांगितले... त्यांनी पाहिले तर तसे काहीच नव्हते.... एक तर त्यांचा विश्वास नाही.... आणी मी प्रुफ करु शकत नव्हते....
एकदा तर रात्री भाऊ आला होता.... तो टी. व्ही बघत बाहेरच झोपला होता... रिमोट त्याच्या हातात असूनही टीव्ही कुणीतरी बंद करत होते.... त्याने उठून पाहिले तर टीव्हीची वरची बटणे पण बंद होती....
त्याने आंम्हाला ऊठवले.... पण मुले झोपली होती... आंम्ही पण गाढ झोपलो... घरात कुणीच नाही... मग वरची बटणे कुणी आँफ केली.....
घरात काहीतरी अमानवी अशुभ, वावरत होते. माझ्यावर
कुणी विश्वास ठेवणार नाही.... मला काय करावे.... सुचत नव्हते. कधीकधी.... रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते वाईट एकाच गोष्टीचे की...... भुते सगळ्याना... का दिसत नाहीत.... मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले.
दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती. म्हणतात नं 'भित्यापाठी ब्रम्हराक्षस'... तसे मला सारखे भास व्हायला लागले... घरात हालचाली जाणवू लागल्या. कुणीतरी आहे याची तर खात्रीच पटायला लागली....
शनिवार.... सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती. आणी यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती. या अशा कातरवेळी... खूप हुरहूर वाटते.... अगदी डोळे भरून येतात... हो कारण यावेळी.... निशाचरांचा वावर असतो. म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात. उदबत्ती लावतात.... धूप, कापूर...... जाळतात.... शुभंकरोती म्हणतात.... त्यामुळे निशाचर पळून जातात.... मी पण सांजवात लावली. शुभंकरोती म्हणाले... देवाला नमस्कार केला.....
शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचाच...... रात्री मुले झोपली. मी अहो, आणि भाऊ पिक्चर बघत होतो. लाईट बंद होते
मी सगळ्यांना काँफी केली.
भाऊची बडबड सुरु होती. तो खूप विनोदी आहे. तो सांगत होता.... आज प्रप्रॅक्टिकल ला जाम मजा आली. एका वीस बावीस वर्षाच्या मुलीची डेडबॉडी आली. खूप वाईट वाटले..... कुणी फसवले असेल.... मुलगी सुंदर होती.... आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले.... मी पुढे झालो.... आणी अचानक....
आंम्ही हसत होतो.... "गप रे तु!!!"मी बोलले मी हळूहळू चेहरा फाडला.... आणि अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले "तो चेहरा..... असा दिसत होता????"
मी वर पाहिले.... समोर ती ऊभी होती. काळी साडी... केस मोकळे सोडलेले.... चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ या जागी फक्त भोके होती... मी जोरात किंकाळी फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शुध्दीवर आले तर घरातील सामान ट्रकमधे भरत होते.... आंम्ही परत आमच्या घरी आलो.... अगदी गळत होते तरी ताडपत्री प्लॅस्टीक लावून राहीलो.... आता कुणीच कुणाशीही त्याबद्दल बोलत नाही.. कारण सगळ्ळ्यांना च ती दिसली होती. विश्वास बसला होता.... हो भुते असतात. मला प्रुव्ह करायची गरज नव्हती. काही दिवसांनी... त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या. त्यांच्या कडून समजले.. घरमालकांची मुलगी होती.... नेहमी एकच एक काळी साडी नेसून दारात बसायची.... ती वेडी होती... तिचा खून झाला तिच्या डोक्यात दगड घालून मारलेडोळे नाक, तोंड ठेचले होते. ओळखता येत नव्हते.... कुणी तिला फसवले??? कुणी मारले???? काही च माहीत नाही.... वेडी असली तरी सगळ्याच इच्छा अत्रुप्त राहिल्याने..... ती भूत बनून परत आली.... त्या घरात कोणीही राहत नाही.
हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाज्या मागचे रहस्य आज मला कळले. समाप्त
निशा सोनटक्के. | 6 057 |
| 15 | काळ्या दरवाज्या मागिल रहस्य... (भयकथा)
निशा सोनटक्के
***
पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅट वरती बिल्डिंग ची गच्ची.... घरात खूप पावसाचे पाणी आले... आणि... ताबडतोब... घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे...... वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता.... कुबट वास भरलेला होता. पण... आमचे अहो..... त्यांच्या पुढे कुणाचेही चालत नाही.... मी घर साफ केले. सामान लावले....देवाची पूजा केली. दिवा लावला. उदबत्ती लावली..... पण घरात उदासीनता भरून राहीली होती. मनच रमत नव्हते. मी विचार केला.... पावसाळ्याचे चार महिने तर काढायचे आहेत.... मी शाळेत टीचर होते. सकाळी सात ते दुपारी साडेबारा मी शाळेत.... आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच मुले शाळेत.... आणी अहो आँफीसमधे.... असे आमचे रूटीन होते.
या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचा जरा अभावच होता. त्यामुळे कदाचित ऊदास वाटते. असे मला वाटले. | 6 062 |
| 16 | रॉबीन्सन_क्रूसो_रावजी_शास्त्री_गोडबोले.pdf | 15 274 |
| 17 | लेखक – डॅनियल डफो
पृष्ठसंख्या – २९६
मूल्यांकन – ४ | ५
रॉबिन्सन क्रूसो ही १७१९ मध्ये लिहिली गेलेली कादंबरी. ह्याच दरम्यान युरोपात औद्योगिकरणाचे वारे नुकतेच वाहू लागले होते. या काळात जवळजवळ प्रत्येकालाच ‘आपणही काहीतरी करून दाखवावं ‘ असं वाटतं होतं. त्याला कथेचा नायक रोबिन्सन क्रुसो हा अपवाद कसा असेल?
आजवर रोबिन्सन क्रुसो हा इंग्लंडमधील अत्यंत सुखवस्तू पालकांच्या छत्रछायेत वाढलेला असतो. काही विशिष्ट लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, आणि त्यांच्या प्रभावामुळे रोबिन्सन समुद्र सफरीसाठी निघण्यास सज्ज होतो. निश्चितच त्याचे पालक याला नकार देतात, परंतु तरीसुद्धा त्यांना न जुमानता क्रुसो समुद्रसफर पूर्ण करण्यासाठी जातोच. पहिल्या दोन वेळेस तो सफलही होतो.
धीरगंभीर शांत समुद्र त्याला अगदी जवळच्या सवंगड्या सारखा वाटू लागतो. समुद्रात दूरच दूर जाण्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही. याच मुळे तो आपल्या तिसऱ्या समुद्र सफारी साठी निघतो. परंतु तिसर्या वेळेस भलतंच घडतं. समुद्राने चांगलाच रुद्रावतार धारण केलेला असतो, आणि त्यातच रोबिन्सन क्रुसो हा एका भयंकर वादळाच्या तडाख्यात सापडतो. आणि इथून पुढे कथा प्रत्येक पानागणिक जास्तच रोमांचक होत जाते. वादळाच्या तडाख्यात सर्व काही बरबाद होऊन जातं. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने रोबिन्सन क्रुसो मात्र एका अनभिज्ञ बेटावर जाऊन पडतो , तेही तब्बल 28 वर्षांसाठी.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे रोबिन्सन क्रुसो त्या बेटावर आयुष्य कसे काढतो? तिथे तो एकटाच असतो की अजून कोणी त्याला साथ देतं? कोणकोणत्या नवीन गोष्टी तो शिकतो? आपल्या पूर्वायुष्यात तो परत जाऊ शकेल की नाही? हे सगळेच प्रश्न वाचकाला राहतात. धाडस,संयम,भय या सगळ्यांचा संगम या कादंबरीत आहे. पहिल्यांदा प्रकाशित झाल्यानंतर अगदी तीनशे वर्षानंतर सुद्धा या पुस्तकाची वाचकांच्या मनावर असलेली पकड अगदी घट्ट आहे. रोबिन्सन क्रुसो चा प्रवास फार विस्मयकारक भासतो आणि पुस्तक वाचताना रोबिन्सन क्रुसो च्या जागी आपण असतो तर काय केलं असतं अशा काही गोष्टी मनात येत राहतात. त्यामुळेच रोबिन्सन क्रुसो चा विस्मयकारक आणि रंजीत जीवन प्रवास समजून घ्यायचा असेल तर रोबिन्सन क्रुसो नक्की वाचा. | 11 929 |
| 18 | image_2024-05-12_22-20-48.png | 9 165 |
| 19 | समांतर - सुहास शिरवळकर.pdf | 10 175 |
| 20 | लेखक – सुहास शिरवळकर
पृष्ठसंख्या – १९६
प्रकाशन – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
मूल्यांकन – ४.० | ५
रहस्यमय कादंबरीवर समीक्षा लिहिण्याचा हा पहिलाच योग. ‘समांतर’ नावाची वेब सिरीज रिलीज झाली. वृत्तपत्रात वेब सिरिजच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून हि वेब सिरीज सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ ह्या कादंबरीवर आधारित आहे हे कळलं. वेब सिरीज पाहण्याआधी ती कादंबरीच वाचण्याचा मोह झाला आणि मग तिला शोधण्याचा प्रवास सुरू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुक स्टॉल अथवा ग्रंथालयास भेट देणे शक्य नसताना असे पुस्तक वाचायला मिळणे म्हणजे भाग्यच.
समांतर हि कथा कुमार महाजन ह्या पात्राभोवती फिरते, अर्थातच तो कथेचा नायक आहे. आपल्या आयुष्यात घडत असलेले प्रसंग कोणाच्याच आयुष्यात आजवर घडले नसतील, असं त्याचं ठाम मत असतं. स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार आपला मित्र वाफगावकर ह्याच्या समवेत एका स्वामीमहाराजांकडे जातो. तिथे त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट कळते ती म्हणजे, ‘सुदर्शन चक्रपाणी’ नामक इसम आणि ‘कुमार’ ह्या दोघांच्या हस्तरेषांमध्ये विलक्षण साम्य आहे. मग इथून सुरू होतो कथेतील गुढ व्यक्तिमत्व (सुदर्शन चक्रपाणी) ह्याला शोधण्याचा प्रवास. तिथून पुढे मग त्याचा शोध, शोध घेत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना; वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना आणि कुमारच्या आयुष्यात घडत असलेल्या घटना थोड्या फार फरकाने सारख्याच असतात. त्याचा शोध घेत कुमार मध्य प्रदेश येथील ‘पलान’ ह्या गावी जाऊन पोहोचतो. तिथे त्याला चक्रपाणी भेटतो. आणि तिथूनच कथा नवीन वळण घेते.
कथा वाचत असता शब्दांमध्ये एक कमालीची गुढता जाणवते. कथेत सुदर्शन चक्रपाणीचा जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची उत्सुकता लागून राहते. कादंबरीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळा ह्या परिसराचं केलेलं वर्णन.
वेब सीरिजमुळे ही कादंबरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुळ कथेचा गाभा तसाच ठेवून कथेत थोडा बदल सिरीजच्या निर्मात्यांनी केला आहे. सुहास शिरवळकर ह्यांनी लिहिलेली रहस्यमय कादंबरी एकदातरी नक्की वाचावी अशी आहे.
– सौरभ नायकवडी | 10 386 |
