Devendra Fadnavis
Open in Telegram
4 143
Subscribers
-224 hours
-117 days
-4230 days
Posts Archive
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्षे नवभारताच्या परिवर्तनाची : आत्मनिर्भर, सक्षम आणि विकसित भारताची
'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे आज मुंबई येथे प्रकाशन केले व उपस्थितांना संबोधित केले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 26 मे 2014 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतानाचा जो आवाज आपण ऐकला, तो आजही आपल्या सर्वांच्या कानात घुमत आहे. ही 12 वर्षे थक्क करणारी आहेत. एखाद्या देशाचा स्वाभिमान, शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करून परिवर्तन कसे घडवता येते, हे मा. पंतप्रधान मोदीजी यांनी दाखवून दिले. या 12 वर्षांत मा. पंतप्रधान मोदीजी यांनी केलेले कार्य नवभारताच्या वाटचालीचे प्रतीक आहे. त्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला गरीबकेंद्रीत अजेंडा. त्याचा परिणाम असा झाला की संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) प्रकाशित केलेल्या अहवालात मान्य करण्यात आले की, गेल्या 10 वर्षांत भारतातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यामुळे आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.
मा. मोदीजी यांनी स्पष्ट सांगितले की, अर्थव्यवस्था अशी असली पाहिजे की गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी निर्माण होतील. त्या संधींमुळे अर्थव्यवस्था विस्तारेल, देशाच्या तिजोरीत महसूल येईल आणि त्या महसुलाचा उपयोग गरीब कल्याणासाठी करून गरीबालाही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली जाईल. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या अंत्योदयाच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे काम मोदीजी यांनी केले.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत मा. पंतप्रधान मोदीजी यांनी भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून देशभर रस्त्यांचे जाळे निर्माण केले. रस्ते, भूमिगत मार्ग, पूल, बंदरे, विमानतळ आणि रेल्वे या सर्व क्षेत्रांत गुणात्मक आणि संख्यात्मक बदल घडवून आणले. तर, डिजिटल इकोनॉमीमध्ये भारताने घेतलेली झेप अभूतपूर्व आहे. यूपीआय हे भारताच्या डिजिटायझेशनचे मोठे आश्चर्य ठरले आहे. यूपीआयच्या माध्यमातून तयार झालेल्या पेमेंट प्रणालीकडे पाहून जगातील मोठमोठे देशही आश्चर्यचकित झाले.
परराष्ट्र धोरण आणि संरक्षण व्यवस्थेतही आज एक नवा भारत दिसतो. भारतावर विविध प्रकारचे व्यापार निर्बंध लादण्याचा प्रयत्न झाला; मात्र भारताने स्पष्ट सांगितले की, व्यापार करार होईल, पण त्यात भारतीय शेतकऱ्यांचे हित सुरक्षित असेल तरच तो स्वीकारला जाईल. शेवटपर्यंत भारताने कणखर भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेसोबतचा व्यापार करारही भारताच्या अटींवर झाला. जगातील प्रत्येक देश आज भारताला आपला विश्वासू मित्र मानतो. ही भूमिका कायम राखत 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या मोहिमांमधून भारताने आपली सामरिक शक्ती जगासमोर सिद्ध केली आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #RashtraNirman
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058972647262916971?s=20
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांत भारताचा GDP तीन पटीने वाढला आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में पिछले 10 वर्षों में भारत की GDP तीन गुना बढ़ी है।
('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #RashtraNirman
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्यामुळे कोट्यवधी नागरिक गरिबीतून बाहेर आले.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके गरीब कल्याण के एजेंडे के कारण करोड़ों नागरिक गरीबी से बाहर आए।
('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #RashtraNirman
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची 12 वर्षांची कामगिरी थक्क करणारी ठरली आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके 12 वर्षों का कार्यकाल अभूतपूर्व रहा है।
('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026)
#Maharashtra #RashtraNirman
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
This is extremely inspiring!
Each #PadmaAwardee story is available in every language with a beautiful video ,
DO WATCH !
https://instagram.com/padmaawards?igsh=aTNlcmJiYjE5a2d1
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058969605792731498?s=20
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation.
We performed Bhumipujan for it today.
Ganpati Bappa Morya 🙏🏽
#Mumbai
4 143
CMO Maharashtra Tweets:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाने प्रेरित होऊन पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांनी सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री सिद्धीविनायक मंदिर येथे या सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Siddhivinayak #StateBankOfIndia
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
