काव्यमानसी..🖋️💕
Open in Telegram
!! चारोळी !! नेहमीच्या शब्दांना लेखणीतून उतरवले चारोळी-कवितेतूनी मनातलं ओठी आणते मी काव्यमानसी...! @ज्योत्स्ना ✍ स्वरचित चारोळी & कविता #माझेलेखन 🍁
Show more454
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
!! व्यक्त करताना !!
कधी कधी मनातील व्यक्त करताना
सारे भाव एकवटून माघार घेतात
मनाच्या गाभाऱ्यातील थोडं बोलून
बाकीचं मोजकं राखून मागे ठेवतात
#ज्योत्स्ना
Repost from N/a
"!! अबोल मनाच्या भावना !! भाग ७० (समाप्त)",
https://marathi.pratilipi.com/story/y3qmuda3xuu6?utm_source=android&utm_campaign=text_share
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
संवाद साधून ही तुला माझ्या मनाच्या भावना समजणार नसेल तर माझं अबोल राहणंच ठीक राहील...!
#ज्योत्स्ना
!! नाते जडावे !!
सुख पळू पाहते आहे टाकून मला पाठीशी
दुःख कधीच बांधले गेलंय पदराच्या गाठीशी
दुःख डोहाचा खोल काळजात भरून साचते
उथळ पाण्यावानी माझे सुख खळखळ वाहते
नको वाटे जगाशी आता कसले नाते जडावे
आभाळभरले सुख माझ्या ओंजळीत पुरावे
जीव रमता इथे सुखासुखी भय नसे कसले
पाहुनि सुख माझे एकांती दुःख निपचित पडले
#ज्योत्स्ना
#बोनस #काव्य #माझेलेखन #काव्यमानसी #poem
https://www.instagram.com/reel/C2e5oA2voIP/?igsh=MTc4MmM1YmI2Ng==
!! गुपित !!
जाणावे भाव तू थोडे
माझ्या बोलक्या नजरेचे
अबोल मनाच्या भावनेने
मग सांगावे गुपित मनाचे
#ज्योत्स्ना
!! सांगण्यावाचून !!
जपणारे नाव ओठी तुझेच जपत राहते
सांगण्यावाचून कधी भाव मुके राहून जाते
जाणून घ्यावी तू ही अबोल मनाची भावना
एकमेकांच्या संगतीने फुलेल आपले गोड नाते
#ज्योत्स्ना
!! सारे काही !!
वाऱ्याने येऊन कानाशी
हितगुज मला ऐकवावे
तुझ्या प्रेमभरल्या मिठीत
येऊन मी सारे काही सांगावे
#ज्योत्स्ना
!! दोष !!
अथांग लाटा घेती वेध
कधी अबोल क्षितीजाचा
थांग पत्ता न लागे सागरास
दोष काय तो किनाऱ्याचा
#ज्योत्स्ना
!! गुपित !!
तुझ्या आठवात मी
अश्रू ठेवलेले दडवून
डोळे माझे जुलमी गडे
गुपित दाखवले उघडून
#ज्योत्स्ना
!! फसवले !!
तुझ्या मनाचं पाखरू
दुरूनच खुणावते असे मला
ओढ कशी नकळत लागली
अन फसवले गेले मनाला
#ज्योत्स्ना
!! फसवले !!
तुझ्या मनाचं पाखरू
दुरूनच खुणावते असे मला
ओढ कशी नकळत लागली
अन फसवले गेले मनाला
#ज्योत्स्ना
!! तुझ्याभोवतीच !!
झेप घ्यावी उंच आकाशी
वाहत्या वाऱ्याला बिलगावे
पण मन माझे होऊनि भुंगा
तुझ्याभोवतीच भिरभिरावे
#ज्योत्स्ना
!! ओंजळ पुरेना !!
तुझ्या नजरेतील जादू
आज डोळ्यात मावेना
लाजरा चेहरा लपवताना
हातांची ओंजळ पुरेना
#ज्योत्स्ना
हॅलो ट्रेडर्स
खास मराठी लोकांसाठी.....हा शेअर मार्केट इंडिकेटर तयार केला आहे....🙏
शेअर मार्केट चे प्रॉपर ज्ञान नसल्यामुळे खूप जण लॉस करतात...
तो लॉस व्हायला नको म्हणून आपण हा इंडिकेटर तयार केला आहे....
स्वतः ट्रेड घ्या इंडिपेंडंट व्हा...🤩
या इंडिकेटर मध्ये तुम्हाला
१)सपोर्ट रेसिस्टन
२) सप्लाय डिमांड
३) मागल्या दिवसाचा High Low
४)Buy Sell signal...
५)sideways Tracker
आणि बरेच काही....😇
या इंडिकेटर चे PDF ani video दिले जातील..😇
हा इंडिकेटर तुम्हाला 3 दिवस फ्री दिला जाईल...
जर तुम्ही आमच्या लिंक द्वारे धन मध्ये अकाउंट ओपन केले तर 1 महिना फ्री दिला जाईल..🤑
कॉन्टॅक्ट - @irahul_g
वापरून बघा...मगच घ्या...🙏🙏
!! अशी वेळ येते !!
जसे मनात भाव चालू असतात तसे
का अक्षर शब्दात गुंफले जातात?
का भावना दूर सारून ते सहज
सुंदर कोऱ्या कागदी उमटत नाही?
लेखणीद्वारे धार धार होऊन मनात
दडवलेले शब्द नकळत मांडतात
खोल काळजातले गुपित जगजाहीर
करून आपल्याच भावनेशी खेळतात
अशी वेळ येते कधी मिटल्या डोळ्यांनी
शब्द प्रहारात स्वतःस निशब्द करतात
#ज्योत्स्ना
