en
Feedback
काव्यमानसी..🖋️💕

काव्यमानसी..🖋️💕

Open in Telegram

!! चारोळी !! नेहमीच्या शब्दांना लेखणीतून उतरवले चारोळी-कवितेतूनी मनातलं ओठी आणते मी काव्यमानसी...! @ज्योत्स्ना ✍ स्वरचित चारोळी & कविता #माझेलेखन 🍁

Show more
454
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
August '24
August '240
in 0 channels
July '24
+7
in 0 channels
Get PRO
June '24
+4
in 0 channels
Get PRO
May '24
+5
in 0 channels
Get PRO
April '24
+14
in 0 channels
Get PRO
March '24
+2
in 0 channels
Get PRO
February '24
+12
in 0 channels
Get PRO
January '24
+16
in 0 channels
Get PRO
December '23
+22
in 0 channels
Get PRO
November '23
+22
in 0 channels
Get PRO
October '23
+24
in 0 channels
Get PRO
September '23
+18
in 0 channels
Get PRO
August '23
+22
in 0 channels
Get PRO
July '23
+20
in 0 channels
Get PRO
June '23
+17
in 0 channels
Get PRO
May '23
+15
in 0 channels
Get PRO
April '23
+15
in 0 channels
Get PRO
March '23
+18
in 0 channels
Get PRO
February '23
+20
in 0 channels
Get PRO
January '23
+21
in 0 channels
Get PRO
December '22
+49
in 0 channels
Get PRO
November '22
+28
in 0 channels
Get PRO
October '22
+14
in 0 channels
Get PRO
September '22
+10
in 0 channels
Get PRO
August '22
+15
in 0 channels
Get PRO
July '22
+16
in 0 channels
Get PRO
June '22
+50
in 0 channels
Get PRO
May '22
+10
in 0 channels
Get PRO
April '22
+38
in 0 channels
Get PRO
March '220
in 0 channels
Get PRO
February '22
+3
in 0 channels
Get PRO
January '22
+26
in 0 channels
Get PRO
December '21
+50
in 0 channels
Get PRO
November '21
+57
in 0 channels
Get PRO
October '21
+42
in 0 channels
Get PRO
September '21
+6
in 0 channels
Get PRO
August '21
+214
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 August0
05 August0
04 August0
03 August0
02 August0
01 August0
Channel Posts
!! चारोळी !! कसे विसरावे मी तुला तुझ्या नकळत तू पेरलेले स्वप्न जागे आहे माझ्या नकळत @ज्योत्स्ना

2
!! चारोळी !! सांगायचे आहे बरेच काही ऐकण्यास तू जवळ नाही मनाचा गाभारा भरलेला सांगण्यास आतुरले मी ही @ज्योत्स्ना
165
3
"!! अस्तित्व !!", वाचा प्रतिलिपि वर :, https://pratilipi.page.link/VPJxBfbyzaWcGQFv8 भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
305
4
!! करार !! भोवताली आहे माझ्या वसला सागर निळाशार घेऊन जा या वाटेवरून मला दूर त्या क्षितिजापार वाऱ्यासंगे गुज होई ना होई मनात काव्य संचार अंतरात उठते वादळ शब्दकाव्य झाले तडीपार तुझ्यासवे येण्यास नाव माझी झुरणी लागे अपार वादळाची नसे भीती तुझाच मला आधार मी रमणी वाट पाहत किंचित होऊनि अधीर वाटेवर रोखल्या नजरा अन मति झाली बधिर कोड्यात मज अडकवून मोडू नको आपला करार बेभरवशाच्या वागण्याने लागला जीव टांगणीस ठार ज्योत्स्ना
368
5
!! रातराणी मोहरताना !! रातराणी मोहरताना चांदण्यांची बरसात व्हावी शुभ्र फुलांच्या सुगंधात मनाची पाकळी खुलावी वाऱ्याच्या झुळूकीने डवरलेली फांदी झुलावी मुक्तहस्ते झालेली उधळण मी अलगद झेलावी श्वास भरून घेताना सुगंधाची धुंदी चढावी निरंतर मनाच्या पोकळीत हळवी भावना उरावी मंद वाऱ्याच्या चाहूलीने हळुवार त्याने मिठी मारावी गारव्याच्या स्पर्शाने कळी माझी आणखी उमलावी अवचित कवेत घेता स्पर्शाने लव शहारून यावी ओंजळभरल्या हातांनी हळूच गाली लाज झाकावी तुझे माझे प्रेम बघता रातराणी आणखी बहरावी फुलापरि सुगंधित प्रीत प्रेमाची आपली फुलावी #ज्योत्स्ना
322
6
!! तुला समजून घेताना !! तुला समजून घेताना कधी राग अनावर होतो तर कधी मी भावनेच्या भरात भरकटत जातो कधीतरी अलवार जिभेचा तोल सुटून समजवताना शब्दाने काहीबाही जातो बोलून संवाद असे किरकोळ अनर्थ निघतो ओघाने लक्षात येते गोष्ट नंतर दुखावले चुकून बोलाने चुकीचे शब्द पकडत घेतेस तू लगेच झेलून त्यात अवांतर चर्चा करत अशीच तग धरते पेलून आटोकाट प्रयत्न चाले माझे तुझ्या सुरात सूर घेण्याचा तुझा चंग मात्र असे माझ्या शब्दात मला फसवण्याचा लुटुपुटूच्या भांडणात अशी माझी होते सपशेल हार तुला समजून घेता घेता मलाच घ्यावी लागते माघार #ज्योत्स्ना
330
7
!! एक हुंदका !! मनाचा एक हुंदका अश्रूंनी उशीवर साठलेला हृदयातील मायेचा समुद्र हळूहळू आटलेला काळरात्र अशी पिसाटून मागे लागलेली की हास्याचा प्रयत्न करूनही चेहरा दिसे रापलेला खोल काळजाची खपली भरत असताना मोका पाहून घाव घालण्यास आहे टपलेला आठवेनासे वाटे आता सुंदर क्षण जगलेले इच्छा नसे कसली जीव स्वतःस विटलेला निरखून पाहता नजरेतून सुटेल तरी कसा अलवार भाव दिसेल डोळ्यात माझ्या लपलेला सांगण्याची उत्सुकता नाही अन ऐकण्याची उत्कंठा सारे काही नकोसे वाटे जीव माझा थकलेला #ज्योत्स्ना
313
8
!! राम उरला नाही !! कधी माझा नकार पचनी तुझ्या पडला नसेल पण समजून घे हरघडीचा डाव आपला नसेल तुला दुरावताना यातना भरल्या डोळ्यात  वाटते का शेवटच्या भेटीचा क्षण टिपला नसेल इथे क्षण क्षण आयुष्यात फुलणारे भाव कसा म्हणे माझ्या हृदयी फुलला नसेल कधी तू फिरकलास या आडवळणी वाटेवर  तर मनअंतरी आठवणींचा उजाळा नसेल आता तुला तरी ठाऊक असणार कसे मज वेदनेच्या गावात हुंकार भरला नसेल अखेरचे बोल माझे तेवढे घे उरात साठवून तुजविन जगताना जीवनी राम उरला नसेल #ज्योत्स्ना
309
9
!! आनंद घेतो !! मौनात आंतरिक सुख जरी साधते तारका डोळ्यांनी खुणावलेला साद असे बोलका मी ही क्षणभर पाहून जातो त्यात विरून कधी निरागस डोळ्यातील भाव घेतो वाचून कधी ढळतो तोल शब्दांचा तुझ्यासवे असताना सावरून घेतेस कशी तू नाजूक हळव्या क्षणांना दरवेळी तुझी ओळख होत राहते मला नव्याने दिवसागणिक तुझ्याशी होणाऱ्या मधुर संवादाने तुझ्या इतकीच झुरणी लागून राहते माझ्या मनाला कधीतरी म्हणशील बस ना घडीभर या सांजवेळेला दूर कुठे रानात कोकीळ मंजूळ सुरात गोड गाताना तुझ्यासवे माझ्याही हृदयाची सुरेल तार छेडताना सांगू का, संवित तुझ्या असताना मी न माझा राहतो अन डोळ्यातील स्वप्नांना हळूच कवेत घेऊन पाहतो तुझ्या गोड गुलाबी चेहऱ्यावरचे भाव टिपताना क्षणाचा आनंद घेतो मी आयुष्य पुरेसे जगताना #ज्योत्स्ना
310
10
!! बहर स्वप्नांचा !! बहर हा स्वप्नांचा तू जाताच ओसरला मनाची कळी खुलेना कोणत्या घडीला चांदणं खुलून आले हसतो चंद्र पुनवेला माझ्या अंगणी मात्र उजेड फिका पडलेला रुक्ष वाटे रात्रीचा प्रहर तुझ्या विना ढळलेला मनाने कितीदा सांगून भाव तुला न कळलेला हरेक क्षण जगले तुझ्या संगतीत घालवलेला पुन्हा एकदा सांगू का तुला क्षणोक्षण जगलेला सारे रिते तुझ्याविना अर्थ नसे आयुष्याला मिळून दूर सारू अमावस्या भरल्या रातीला ये तसाच माघारी फिरून दिसू दे नजरेला माझ्या स्वप्नांचा गाव वसलाय तुझ्याच वाटेला #ज्योत्स्ना
280
11
!! नाव माझेच कोरलेले !! शब्द तुझे वेधक भाव अंतरी पोहचलेले साद मिळे मनअंतरी त्यावर मी भाळलेले ठाऊक नव्हते तुला या शब्दांच्या किमयेने रेंगाळणाऱ्या जीवनास त्या पैलतीरी नेलेले टिपूर रातीच्या हळव्या क्षणांना जपूनही लिहिले गेलेच नाही कधी शब्द मनातले बेधुंद करते नजर तुझी तू सामोरी असता कशी रिक्त करून शब्द अडलेल्या ओठातले तुझ्या माझ्यातले क्षण दोघांनीही टिपताना तेच तुला सांगून मी पुन्हा वेडीने गिरवलेले तू माझा सांगाती होऊन येशील का एकदा नव्याने जगूया जोडीने क्षण होते जे निसटलेले कधी माझ्याच विश्वातून कशी बेछूट सुटून मी माझ्याही नकळत तुझ्या भावविश्वात रमलेले भ्रमात होते हृदयी माझ्या तूच तू पण पाहुनि थेट काळजात तुझ्या नाव माझेच कोरलेले #ज्योत्स्ना ( माझेलेखन )
345
12
पुन्हा एकदा भावनेच्या वादळाने घिरट्या घातल्या मनावरी आपलं माणूस असावं याची जाणीव करून दिली परोपरी #ज्योत्स्ना
297
13
!! प्रेम काव्य !! वेड लागता तुझे तगमग होते जीवाची सारी विसरून भान मी विसावलो येऊन तुझ्या दारी सखे, असं अलवार करू नकोस नजरेने घायाळ नाहीतर पुसले जाईल तुज मृगनयनेतील काजळ मधाळ तुझ्या शब्दांचा ओठी गोडवा येऊ दे तुझे प्रेम काव्य माझ्या कानी रुंजी घालू दे #ज्योत्स्ना
343
14
!! डोळे !! निरागस डोळ्यात तुझ्या झळके प्रतिबिंब माझेच काहींही न बोलता सांगतात हे डोळे तुझेच निर्मळ भासे अथांग शोध न लागे मला त्यात कित्येक निराळे भाव झळकून जाते क्षणात आकाशाची निळाई भरे सोनेरी कवडसे पाहून डोळ्यात तुझ्या नेहमी मुग्ध होत असे नजर तुझी मृगनयनी मजला घायाळ करणारी भुरळ पडते मनाला नजरेस माझ्या भिडणारी #ज्योत्स्ना
1
15
"!! दोष नसे कुणाचा !!", वाचा प्रतिलिपि वर :, https://pratilipi.page.link/yE3xSuCEotbctNFTA भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
357
16
Jyotsna Gawari "काव्यमानसी" ची पोस्ट, https://pratilipi.page.link/U2DnBuc9Gt5TPreFA भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
439
17
"तुझ्याविना… (भाग 8)", https://marathi.pratilipi.com/story/czpyxlcef7jn?utm_source=android&utm_campaign=text_share भारतीय भाष
"तुझ्याविना… (भाग 8)", https://marathi.pratilipi.com/story/czpyxlcef7jn?utm_source=android&utm_campaign=text_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
333
18
◆ असावे घर स्वप्नांतले ◆ असावे घर स्वप्नांतले आपले भारी टुमदार खेळता वारा घरादारात निवारा हवा कसा ऐटदार अवतीभवती जरा एकांती निर्जन ठिकाण हिरवेगार जगण्याची धावपळ नसावी राहू या आपण आरामशीर पावसाळी वातावरणात मजा घेऊ या थंडगार गरमागरम भजी खाऊ घालशील तू खुमासदार हिवाळ्यातील हुडहुडी जेव्हा भरेल अंगी कापरं अंगणात शेकोटी पेटवून मिळून घेऊ शेक ऊबदार उन्हाळ्यात करू भारी मज्जा रानातील फळे चाखू रसदार सगळे गणगोत येतील सुट्टीला चांदण्यात बसून जेवू मजेदार #ज्योत्स्ना
346
19
"तुझ्याविना… (भाग 1)", वाचा प्रतिलिपि वर :, https://pratilipi.page.link/mwqgxRVQDSrfJXWd8 भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
305
20
दरवेळी नव्याने तिची ओळख होत राहते दिवसागणिक तिच्याशी होणाऱ्या संवादाने #ज्योत्स्ना
294