en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 708 subscribers, ranking 5 597 in the Education category and 11 970 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 708 subscribers.

According to the latest data from 06 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -81 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.92%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 344 views. Within the first day, a publication typically gains 1 068 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 708
Subscribers
-324 hours
-477 days
-8130 days
Posts Archive
🟪कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल) 🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन... 🔸जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे... 🔸वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील तर आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या... 🔸लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (1928)... 🔸या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले.त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मींवर प्रभाव... 🔸लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग व अटक.पण शाळा,महाविद्यालयांवर बहिष्काराची कृती त्यांना अमान्य होती.स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे,असे त्यांचे मत... 🔸महाविद्यालयात BKN राव या विमानचालकाशी परिचय व विवाह.माञ पुढे मतभेद व विभक्त... 🔸मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS (1938) तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण(1939)... 🔸चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला (1940).तिथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना... 🔸नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (1943).२ जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर... 🔸त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी,अशी इच्छा व्यक्त केली.. 🔸या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या,शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले... 🔸सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले... 🔸1944 पर्यंत 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500 ची पलटण झाली... 🔸जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले... 🔸‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य.मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली (1945).तेव्हा आझाद हिंद सेनेची माघार.. 🔸युद्धविरामापर्यंत कॅ.लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल... 🔸त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या.1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (1946).भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर सुटका... 🔸भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाह (1947).कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला... 🔸भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले... 🔸त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (1971)... 🔸बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या,वैद्यकीय मदत... 🔸भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा (1984).. 🔸दैदीप्यमान कर्तृत्वाबद्दल पद्मविभूषण (1998)... 🔸अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती निवडणूकीत पराभूत (2002)... 🔸2012-कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन... 🔸प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) या त्यांच्या धाकट्या भगिनी होत.

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!👍
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!👍

🟪सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन ‘सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक’ असे करतानाच, ‘काही चुकीचे घडेल, तेव्हा न्यायपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहील’ हे भारताच्या लोकांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी केले. केवळ लिखित घटना असणे एवढेच भारतीय न्यायपालिकेचे वेगळेपण नाही; तर लोकांची या यंत्रणेवर प्रचंड श्रद्धा आहे, यामुळेही ती वेगळी आहे, असे भारत-सिंगापूर मध्यस्थी परिषदेत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले. या परिषदेत त्यांच्यासोबत सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन हे प्रमुख वक्ते होते. ‘आपल्याला न्यायपालिकेकडून दिलासा व न्याय मिळेल याचा लोकांना विश्वास आहे. चुकीच्या गोष्टी घडतील तेव्हा न्यायपालिका आपल्यामागे उभी राहील हे त्यांना माहीत आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक आहे,’ असे न्या. रमण म्हणाले. ‘यतो धर्मस्ततो जया’ या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोधवाक्याला अर्थ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने, पक्षकारांना संपूर्ण न्याय देण्याकरिता घटना आम्हाला व्यापक अधिकार आणि अधिकारक्षेत्र देते, याचा सरन्यायाधीशांनी आवर्जून उल्लेख केला.

🟪अ‍ॅमेझॉनवीराची अवकाशवारी. अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझॉस यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या वतीने पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली. स्वत:च्या अवकाशयानातून सफर करणारे ते आठवडाभराच्या अंतरातील दुसरे अब्जाधीश ठरले. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक असलेल्या बेझॉस यांच्यासमवेत त्यांचे बंधू आणि इतर दोघे होते. ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेफर्ड असे नाव देण्यात आले होते. पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्रमोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला. नंतर सर्व जण तेथेच परतले. व्हर्जिन गॅलक्टिकचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अलीकडे अशाच प्रकारे न्यू मेक्सिकोतून अवकाशवारी केली होती. बेझॉस यांनी त्यांची योजना आधी जाहीर केलेली असताना ब्रॅन्सन यांनी त्यांची योजना मध्येच जाहीर करून आघाडी मारली होती. ब्रॅन्सन यांचे अग्निबाणयुक्त विमान होते, तर बेझॉस यांची कॅप्सूल होती; पण दोन्ही स्वयंनियंत्रित होते. ब्लू ओरिजिन यान ६६ मैल म्हणजे १०६ कि.मी. उंचीवर गेले होते. बेझॉस यांचे अवकाशयान १० मैल म्हणजे १६ कि.मी. जास्त उंचीवर जाऊन आले. साठ फूट बूस्टरच्या मदतीने मॅक ३ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ३ पट वेगाने कॅप्सूल अवकाशात गेले. नंतर विलग झाले. प्रवाशांना तीन ते चार मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभव घेता आला. त्यानंतर कॅप्सूल खाली जमिनीवर आले तेव्हा त्यांना सहापट गुरुत्व जाणवले. बेझॉस यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले. वॅली फंक या महिला वैमानिक त्यांच्यासमवेत होत्या. ऑलिव्हिएर डेमेन यांनी २८ दशलक्ष डॉलर्स भरून या सफरीत पर्यटक म्हणून स्थान मिळवले.

🟪भारतीय संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 19 जुलै 2021 पासून सुरुवात झाली. संसदेचे हे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. अधिवेशनात केंद्रीय सरकारने प्रस्ताव सादर करण्यासाठी 17 विधेयकांची यादी तयार केली आहे. त्यापैकी तीन विधेयके अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशांच्या जागी लागू केली जातील. त्या तीनमध्ये ‘आवश्यक रक्षा सेवा अध्यादेश 2021’ याचा देखील समावेश आहे, ज्याद्वारे संरक्षण सेवांमधील कोणालाही निषेध किंवा संपात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर, अध्यादेशाच्या जागी विधेयक 42 दिवस किंवा सहा आठवड्यात मंजूर करावे अन्यथा ते अकार्यक्षम ठरतील, असा नियम भारतीय संविधानात आहे. भारतीय संसद ▪️लोकसभा लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या 552 एवढी मंजुर करण्यात आली आहे. यामधील 530 सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, 20 पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर 2 सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात, जे राष्ट्रपतीकडून निवडून दिले जातात.

🟪ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल, भारताची ‘नॅशनल क्रश’ही चमकली. भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली. आता मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. १६ वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते. महिला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०३च्या सरासरीने २०६ धावा केल्या. या मालिकेत ती सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होती. २००५मध्ये ती पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरली होती. गेल्या आठवड्यात प्रथम क्रमांकाची फलंदाज ठरलेली वेस्ट इंडीजची स्टेफनी टेलर चार स्थानांनी घसरत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची लिजेल ली, ऑस्ट्रेलियाची एलिसा हेली आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. भारताची ‘नॅशनल क्रश’ म्हणजेच स्मृती मंधाना ७०१ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मिताली आणि मंधाना व्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळालेले नाही. गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी ही पहिल्या दहा क्रमांकात असणारी एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तिला पाचवे स्थान मिळाले आहे, तर दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर आहेत.

🟪मिशीगनची वैदेही डोंगरे ‘मिस इंडिया यूएसए’ मिशीगन येथील वैदेही डोंगरे या पंचवीस वर्षांच्या विद्यार्थिनीस मिस इंडिया यूएसए २०२१ किताबाने गौरवण्यात आले आहे. जॉर्जियाची आर्शी लालानी ही दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली असून नुकतीच ही सौंदर्य स्पर्धा झाली. डोंगरे ही मिशीगन विद्यापीठातून पदवीधर झालेली असून ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. ती एका नामांकित कंपनीत व्यवसाय विकास व्यवस्थापक आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच साक्षरता यावर भर देण्यासाठी आपण या स्पर्धेत भाग घेतला, असे तिने सांगितले. तिला कथकमधील चमकदार कामगिरीसाठी मिस टॅलेंटेड पुरस्कार मिळाला होता. लालानी (वय २०) हिनेही चांगली कामगिरी केली असून तिने दुसरा क्रमांक मिळवला. तिला मेंदूत गाठ असूनही तिने हे यश मिळवले आहे. उत्तर कॅरोलिनातील मीरा कासारी हिला तिसरा क्रमांक मिळाला. या वेळी १९९७ मधील मिस वर्ल्ड डायना हेडेन या प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या. तीस राज्यांतील ६१ जण या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी यापूर्वी मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए, मिस टीन इंडिया यूएसए स्पर्धांत भाग घेतला होता. या तीनही गटांतील विजेत्यांना मुंबईच्या प्रवासाची तिकिटे मोफत देण्यात आली आहेत. न्यूयॉर्क येथील अमेरिकी भारतीय धर्मात्मा व नीलम सरण यांनी जागितक सौंदर्य स्पर्धा म्हणून चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिस इंडिया यूएसए ही स्पर्धा सुरू केली होती.

🟪ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण IIT रोपार या संस्थेत विकसित वैद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडरचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक नवीन उपकरण रोपार (पंजाब) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे. संस्थेतील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण तयार करण्यात आले. ▪️ठळक बाबी. रुग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर सोडत असताना ऑक्सिजन पुरवठा रोखणारे हे नवीन उपकरण ऑक्सिजनची बचत करण्यात मदत करते. आतापर्यंत, श्वासोच्छ्वासाच्या दरम्यान, ऑक्सिजन सिलेंडर / पाईपमधील ऑक्सिजन वापरकरता श्वास सोडत असताना कार्बन डाय-ऑक्साईड सोबत बाहेर ढकलला जात असे. त्यामुळे दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा अपव्यय होत असे. नवीन उपकरणामुळे ऑक्सिजनचा अपव्यय टाळता येतो. AMLEX सहजपणे ऑक्सिजन पुरवठ्याची लाइन आणि रूग्णाच्या तोंडावरील मास्क याच्याशी जोडले जाऊ शकते. त्यात सेन्सरचा वापर करण्यात आला असून तो सेन्सर कोणत्याही पर्यावरणीय स्थितीत वापरकर्त्याचा श्वास आणि उच्छ्वास यातील फरक यशस्वीरित्या ओळखू शकते. हे साधन व्यावसायिकरित्या उपलब्ध कोणत्याही ऑक्सिजन थेरपी आणि मास्क यांच्या बरोबर कार्य करू शकते.

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+3

photo content
+8

photo content
+9

🟪 व्योमेशचंद्र बॅनर्जी (1844 ते 1906) 🔸28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज (बॉम्बे) या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते... 🔸जन्म कलकत्त्यातील एका ब्राह्मण कुटुंबात... 🔸वडील गिरीशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टात वकील... 🔸शिक्षण-कलकत्ता विश्वविद्यालयात... 🔸ते प्रथम कलकत्ता सुप्रीम कोर्ट मध्ये लिपिक... 🔸1864 मुंबईच्या जीजीभाई यांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शिक्षणासाठी लंडनला... 🔸1866 दादाभाई नौरोजींनी व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या (सचिव) सहकार्याने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था स्थापन... 🔸1868 बॅरिस्टर बनवून भारतात परतले व कलकत्ता हायकोर्टात नावाजलेले वकील बनले... 🔸लंडनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स चे निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले होते(माञ पराभूत)... 🔸पहिल्या अधिवेशन सोबतच 1892 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे देखील अध्यक्ष राहिले... 🔸1893 साली दादाभाई नौरोजी,व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दिन तय्यबजी द्वारा इंग्लंडमध्ये 'Indian Parliamentary Committee' ची स्थापना... 🔸त्यांनी देशात देशभक्ती जागृत करण्यासाठी 'शारदा उत्सवा'ची सुरुवात केली... 🔸यांचे तसेच गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते... 🔸21 जूलै 1906 लंडन येथे निधन.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪भारताला नेपाळसोबत जोडणारा ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड / IRCON) या कंपनीने भारत आणि नेपाळ या देशांच्या दरम्यान ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ तयार केला आहे. 18 जुलै 2021 रोजी या मार्गावर रेलगाडी चालवण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 34.50 किलोमीटर लांबीच्या या मार्गाने भारतातील जयनगर (मधुबनी जिल्हा, बिहार) आणि नेपाळमधील कुर्था ही गावे जोडली गेली आहेत. ▪️नेपाळ देश नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.

🟪राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पारितोषिकाची घोषणा मालवाहतूक क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय सरकारने ‘राष्ट्रीय मालवाहतूक सर्वोत्कृष्टता पारितोषिक’ याची नवीन योजना जाहीर केली आहे. दोन श्रेणीत ही पारितोषिके दिली जाणार आहेत; ते पुढीलप्रमाणे आहेत - पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतूकदार / सेवादाता विविध मालवाहतूक वापरकर्ता 🛑पारितोषिकाविषयी वापरकर्त्या उद्योगांकडून पुरवठा साखळीतील विविध सहभागींची यथायोग्य ओळख होण्याच्या उद्देशाने या पारितोषिकासाठी विस्तृत मूल्यांकन केले जाणार आहे. या पारितोषिकांमुळे मालवाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धती सहीत पद्धतीमधील सर्वसमावेशकता, प्रक्रिया मानकरीकरण, तांत्रिक अद्ययावतीकरण, डिजिटल रूपांतरण आणि शाश्वत प्रक्रिया यामधील उत्कृष्टता अधोरेखित होईल. या पारितोषिकाच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा पुरवठादारांपैकी ज्यांनी कामात उत्कृष्टता प्राप्त केली आहे. डिजिटल रूपांतरण आणि तांत्रिकता रुळवली आहे, तसेच ग्राहकोपयोगी सेवा पुरवठा आणि शाश्वत प्रक्रियांचा अवलंब, अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणे हा या पारितोषिकांमागील उद्देश आहे. वापरकर्त्या उद्योगांना या पारितोषिकामुळे पुरवठा साखळीचे रूपांतरण, पुरवठा पर्यावरणाचा विकास, कौशल्य विकास, ऑटोमेशन आणि अशा अनेक बाबींची ओळख होईल. मालवाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रक्रिया लॉजिस्टिक्स एक्सलन्स गॅलरी या नामाभिधानाखाली ‘https://excellenceawardslogistics.gov.in’ या संकेतस्थळावर आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील. या प्रकारे मालवाहतूक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धती एकत्रित नोंदवल्या जातील हा या पारितोषिकाचा मुख्य उपयोग असेल. पारितोषिक विजेत्यांची घोषणा 31 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात येईल.

🟪उच्च क्षमतेचा ‘मेटास्टेबल बीटा टायटेनियम’ मिश्रधातू DRDO संस्थेकडून विकसित संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) औद्योगिक पातळीवर उच्च क्षमतेचा ‘मेटास्टेबल बीटा टायटेनियम’ मिश्रधातू संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केला आहे. हा मिश्रधातू DRDOच्या हैदराबाद येथील संरक्षण धातूविषयक संशोधन प्रयोगशाळेतील (DMRL) संशोधकांनी विकसित केला आहे. वॅनेडीयम, लोखंड आणि अल्युमिनियम या धातूंच्या विशिष्ट मिश्रणातून “Ti-10V-2Fe-3Al” नामक मिश्रधातू तयार करण्यात आला असून त्याचा वापर विमानांतील विविध रचनात्मक भागांच्या औद्योगिक पातळीवरील निर्मितीसाठी होणार आहे. विमानाच्या भागांचे वजन कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या काही काळापासून अनेक विकसित देशांनी तुलनेने अधिक वजनदार आणि पारंपरिक अशा Ni-Cr-Mo संरचनात्मक पोलादाऐवजी या मिश्रधातूचा वापर सुरु केला आहे. ‘Ti-10V-2Fe-3Al’ या मिश्रधातूमध्ये क्षमता आणि वजन यांचे उच्च गुणोत्तर असल्यामुळे उत्तम घडणीचा गुणधर्म असल्याने हवाई वापरासाठीच्या यंत्रांमध्ये कमी वजनासह गुंतागुंतीच्या घटकांची घडण सोप्या रीतीने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मिश्रधातूपासून घडविता येणाऱ्या अनेक सुट्या भागांमध्ये स्लॅट/फ्लॅप ट्रॅक, लँडींग गीयर आणि लँडींग गीयर मधील ड्रॉप लिंक यांचा समावेश आहे. उच्च क्षमतेचा बीटा टायटेनियम मिश्रधातू त्याच्या अधिक क्षमता, लवचिकता, शक्ती आणि भंगविरोधी गुणांमुळे अत्यंत अद्वितीय झाला आहे आणि त्यामुळे विमानांचे विविध सुटे भाग घडविण्यासाठी अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. तसेच या धातूचा एकदाच करावा लागणारा तुलनेने कमी खर्च, पोलादापेक्षा अधिक गंजरोधक गुणधर्म यामुळे भारतात देखील या महाग मिश्रधातूचा वापर न्याय्य आणि व्यापारी दृष्ट्या अधिक प्रभावी ठरतो.