en
Feedback
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

Open in Telegram

A political front of the youth, by the youth, for the youth.

Show more
The country is not specifiedThe category is not specified
8 852
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
कोण काय करत आहेत याबद्दल इथे चर्चा करू नका, तुमच्याकडे काही स्पष्ट मुद्दे असतील तर इथे मांडा. Last warning.

Sir लेखनिक घोटाळा pn bagha sir

Pn lgn jamalyat tri konache pora single martat

आपल्या प्रमुख मागण्या या मागे पडताना दिसत आहेत..... १) mpsc आयोग बरखास्त झालं पाहिजे २) 2022 पासून झालेल्या सर्व परीक्षा रद्द झाल्या पाहिजेत... याशिवाय दुसऱ्या मागण्या ठेवून काहीही साध्य होणार नाही...सरकार आपल्यापुढे कोणत्याही गोष्टी आणणार नाही ...हे सर्वांना कळलं पाहिजे... या आंदोलनाला राजकीय रंग लागला नाही पाहिजे....हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

SR टॉपर लोक शिक्षक मंडळी यांच्यासोबत मिळून ऑब्जेक्टिव्ह चा घाट घालत आहेत अशी शंका येत आहे, कम्बाईन 2025 ची चौकशीची मागणी न करता हे ऑब्जेक्टिव्ह ची मागणी करत आहेत

Online exam cha ghaat ghatlay, karodo chi kamai aahe, asach nahi sodnar te pad, khup motha ladha aahe ha, pan haar nahi manaychi.

Sir ata ganpati yetil tycha aadhi andolan zala tr bara hoil..

मी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ ची उमेदवार असून, सदर परीक्षेच्या निकालानंतर प्राप्त झालेल्या गुणांबाबत मला तसेच अनेक उमेदवारांना गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धात्मक परीक्षा असून, एका-दोन गुणांचाही उमेदवाराच्या पुढील संधीवर निर्णायक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मूल्यमापन प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व असणे अत्यावश्यक आहे. प्रमुख मागण्या : १. उत्तरपत्रिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका, स्कॅन प्रत, मूल्यमापनाशी संबंधित डिजिटल नोंदी, गुणपत्रके व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्यात यावेत आणि चौकशी/पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये कोणताही अनधिकृत बदल होणार नाही याची खात्री करावी. २. संपूर्ण गुणांकनाची पुनर्पडताळणी करावी सर्व संबंधित उत्तरपत्रिकांवरील प्राप्त गुण, प्रत्येक पेपरचे गुण आणि अंतिम एकूण गुण यांची पुनर्पडताळणी करण्यात यावी. ३. सर्व प्रश्न तपासले आहेत का याची खात्री करावी प्रत्येक उत्तरपत्रिकेतील प्रत्येक उत्तराचे मूल्यमापन झाले आहे का, कोणतेही उत्तर/पान/प्रश्न तपासणीविना राहिले नाही ना, याची पडताळणी करावी. ४. गुणांची बेरीज व हस्तांतरण तपासावे उत्तरपत्रिकेवरील गुण → डिजिटल नोंद → पेपरनिहाय गुण → अंतिम एकूण गुण या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही मानवी किंवा तांत्रिक त्रुटी झालेली नाही याची तपासणी करावी. ५. पेपरनिहाय गुणांची माहिती उपलब्ध करून द्यावी उमेदवारांना त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. ६. नियमानुसार उत्तरपत्रिकांची प्रत उपलब्ध करून द्यावी लागू नियम व आयोगाच्या धोरणानुसार उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रत/स्कॅन प्रत किंवा उपलब्ध मूल्यमापनाशी संबंधित माहिती मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी. ७. स्वतंत्र पुनर्पडताळणी समिती स्थापन करावी मूल्यमापन प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर शंका असल्यास, आयोगाबाहेरील किंवा हितसंबंधांचा संघर्ष नसलेल्या तज्ज्ञांच्या सहभागाने स्वतंत्र पुनर्पडताळणी समिती स्थापन करण्यात यावी. ८. नमुना पद्धतीने स्वतंत्र ऑडिट करावे संपूर्ण परीक्षेतील उत्तरपत्रिकांमधून नियमानुसार योग्य नमुना निवडून मूल्यमापन, गुणांची नोंद आणि अंतिम गुणांची प्रक्रिया यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे. ९. आढळलेल्या त्रुटींचा परिणाम तपासावा पुनर्पडताळणीमध्ये एखादी त्रुटी आढळल्यास ती केवळ संबंधित उमेदवारापुरती मर्यादित आहे की इतर उमेदवारांवरही परिणाम झाला आहे, याची तपासणी करण्यात यावी. १०. त्रुटी आढळल्यास सुधारित गुण/निकाल द्यावा एखाद्या उमेदवाराच्या गुणांकनात त्रुटी आढळल्यास नियमानुसार आवश्यक ती दुरुस्ती करून सुधारित गुण व आवश्यक असल्यास सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा. ११. कट-ऑफ व पात्रतेवर झालेला परिणाम तपासावा गुणांकनातील कोणतीही त्रुटी आढळल्यास त्याचा संबंधित उमेदवारांच्या पात्रता, गुणमर्यादा, निवड व पुढील प्रक्रियेवर परिणाम झाला आहे का, याची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी. १२. संपूर्ण प्रक्रियेचा लेखी अहवाल द्यावा पुनर्पडताळणी/ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्या बाबी तपासण्यात आल्या, कोणत्या त्रुटी आढळल्या/आढळल्या नाहीत आणि त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत अधिकृत अहवाल/स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात यावे. १३. उमेदवारांसाठी तक्रार निवारणाची स्वतंत्र व्यवस्था करावी गुणांकनाबाबत शंका असलेल्या उमेदवारांना आपली तक्रार अधिकृतरीत्या नोंदविण्यासाठी निश्चित कालावधी व स्वतंत्र grievance mechanism उपलब्ध करून द्यावा. १४. भविष्यातील परीक्षांसाठी सुधारित सुरक्षा व मूल्यमापन व्यवस्था करावी या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी आढळल्यास भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उत्तरपत्रिका हाताळणी, डिजिटल डेटा, मूल्यमापन, गुणांचे संकलन व निकाल निर्मिती यासाठी अधिक सुरक्षित आणि audit-trail आधारित प्रणाली विकसित करण्यात यावी.🙏🏻🙏🏻

⭐️IMP: This chat section is open till 9:30am.

आदिवासी आंदोलनाला 'सीजेपी'चे बळ; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत तळ ठोकण्याची दीपके यांची घोषणा

Ha paper tr time vr ch honar ahe no doubt

Desriptive cancel karun objective offline exam ghya

मित्रांनो, सर्व लोक मागच्या परीक्षांबद्दल बोलत आहे.. जे की बरोबर आहे. हे लेंडवे वगैरे आल्यापासून झालेल्या सर्वच परीक्षांची तपासणी झाली पाहिजे. पण पुढच्या परीक्षांचे काय? गट क साठी १२ लाख मुलांनी फॉर्म भरले आहेत.. म्हणजे आता त्यांचे पेपर काढणे / प्रिंटिंग चालू झाले असेल.. तो पेपर मॅनेज झाला नसेल असे आपण कसकाय म्हणू शकतो? तलाठी ही आधी पासून लोकांना आवडणारी पोस्ट आहे..तिच्यात ऑफलाईन होत असताना आणि ऑनलाइन होत असताना दोन्ही वेळेस घोटाळे झाले आहेत. आणि जर मागच्या गट ब मुख्य बद्दल एवढे आरोप आहेत तर आता ५ डिसेंबर ला होणाऱ्या गट ब मुख्य साठी यांनी काही प्लान केला नसेल असे पण म्हणता येणार नाही. आणि गट क मुख्यला फक्त २ महिने? इथे ज्याने ३-४ मुख्य आधीच दिल्यात त्याला सुद्धा मुख्य परीक्षेच्या revision साठी ४ महिने लागतात. एवढा कमी वेळ यांच्या लोकांना फायदा पोहचवण्यासाठी तर नाही दिला ना? हे सर्व प्रश्न आहेत. मी स्वतः परत परत परीक्षा पुढे ढकलणे आणि रद्द करणे याच्या विरोधी मताचा आहे. कारण गरीब विद्यार्थ्यांचे वय वाढत असते आणि ३ महिने परीक्षा पुढे गेली तरी पुण्यासारख्या शहरात ३० ते ४० हजार रुपये पण जास्त लागतात. पण सध्याचा विचार करता: एवढी मोठी भरती आहे की हा once in lifetime चान्स आहे म्हणून पेपर विकल्या जाण्यापेक्षा २ महिने पेपर लेट होणे कधीही चांगले. त्यामुळे जो पर्यंत आयोगात हेच लोक आहेत (अध्यक्ष, सदस्य, सचिव तिथून ते खालच्या शिपाई पर्यंत) तो पर्यंत पुढची भरती पण घेऊ नये. यांना सर्वांना लवकरात लवकर बदलण्यात यावे. नंतर पुढची परीक्षा नवीन लोकांनी घ्यावी. आणि हे एक महिन्याचा आत करावे. म्हणजे परीक्षा पण जास्त लांबणार नाही.

तक्रार करून पण आयोग दखल घेत नाही माझ्याजवळ OC ahet

लेंडवेच्या sign असलेल्या सर्व exam cancel व्हायला पाहिजे... पेपर 💯 फुटले आहेत. आणि MPSC पूर्ण बॉडी बरखास्त करा. याच मुख्य मागण्या आहेत आमच्या बाकी कुणी मुद्दा भटकू नये.

1) अध्यक्ष आणि सचिव ह्याचे राजीनामे 2) लेंडवे chya सह्या असलेल्या सर्व परीक्षा ची चौकशी 3 ) जास्तीत जास्त जागा असलेल्या जाहिराती 4) परीक्षा वेळेवर आयोजित होणे