无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
Umesh kudale:
परमहंस सभेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती शेअर करत आहे.
राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्यची तयारी करणाऱ्या मंडळींनी विशेष लक्ष द्या ..
खाली दिलेला चार्ट हा आधीचे परमहंसचे सदस्य (असण्याची शक्यता कारण वही चोरीला गेल्यामुळे निश्चित नावे जाहीर झाली नाहीत) नंतर कोण कोणत्या गोष्टीत सहभागी झाले याची माहिती देतो.यापैकी कासीमभाई ढालवाणींवर आयोगाने प्रश्न विचारला आहे..
(शेअर करणाऱ्या मंडळींनी इतिहासाची मोडतोड न करता शेअर करा..माझ्या नावासह शेअर नाही केला तरी हरकत नाही )
धन्यवाद ,
उमेश कुदळे..
उद्या सकाळी १०:३० वाजता
इतिहासाचे लेक्चर होईल ..
"आधुनिक महाराष्ट्रातील क्रांतीकारक चळवळ"
सत्र सर्वांसाठी खुले..काहीतरी नवीन ,परीक्षाभिमुख ,नवीन trend नुसार ऐकण्यासाठी नक्की या..
रयत प्रबोधिनी ,अप्पा बळवंत चौक ,पुणे
9762131361
“महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिन”
आपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो.
●जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे.
●दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.
●तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
◆कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१ पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली.
●१९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”
◆भारतातील पहिला कामगार दिन :-●भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला.
●लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता.
●याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला.
●कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.
●मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
"रयत अभ्यासिका"
अभ्यास करणाऱ्यांसाठी चांगली सेवा अल्प दरात..
नक्की भेट द्या ..(काहीच जागा शिल्लक)
