LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
🎯 Nokia चा नवा फीचर लाँच!
LetsUp I Tech
📱 HMD Global कंपनीने भारतात आपला नवीन फीचर फोन Nokia 110 केला लाँच
💁♂ 1,599 रुपये इतकी किंमत असलेल्या या फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट, एफएम रेडिओसारखे बेसिक पण आवश्यक सर्व फीचर्स
✔ आजपासून (दि. 18) या फोनची विक्री सुरू, नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळासह ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधूनही फोन खरेदी करता येणार
🤔 फीचर्स काय-काय? :
● 1.77 इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले
● 4MB रॅम आणि 4MB इंटरनल स्टोरेजसह
● मायक्रो एसडी कार्ड (32जीबी) स्लॉट
● फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी qVGA कॅमेरा
● नोकिया सीरिज 30+ ओएसवर कार्यरत
● एलईडी टॉर्चलाइट, माइक्रो युएसबी पोर्ट, 3.5 एमएम ऑडिओ जॅक
● 800mAh क्षमतेची दमदार बॅटरी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 पीएमसी खातेदारांना दिलासा नाहीच!
LetsUp I National
📍 कोट्यवधी रुपये अडकलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही
⚖ पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
👉 सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे
😱 या निर्णयामुळे पीएमसी खातेदारांना धक्का, चिंता व्यक्त करण्यात येत आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏫 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती
LetsUp | Job
👉 पदाचे नाव व पद संख्या
1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (‘ब’ वर्ग) - 243
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) (‘ब’ वर्ग) - 98
🎓 शैक्षणिक पात्रता : [खुला प्रवर्ग: 50% गुण, मागासवर्गीय: 45% गुण]
1⃣ पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य/ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2⃣ पद क्र.2 : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
💁♂ वयाची अट : 31 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
🌍 नोकरी ठिकाण : मुंबई
💰 फी : खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय: ₹400/-]
📆 परीक्षा दिनांक : 25 नोव्हेंबर 2019
🧐 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2019
🖥 जाहिरात पाहा : http://bit.ly/35Kn395
👨🏻💻 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/31rVePo
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💥 सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बोबडे?
LetsUp I Breaking
⚡ रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची केली शिफारस
👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार
✔ त्यामुळे गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती बोबडे यांच्या नावाची केली शिफारस
⚖ विशेष म्हणजे, न्यायमूर्ती बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🎯 सरकार स्टील स्क्रॅप पॉलिसी आणणार
LetsUp I National
🧐 या धोरणाचा मसुदा तयार झाला, त्याला अंतिम रुप देण्यात येत असल्याची माहिती समोर
✔ स्टील स्क्रॅप पॉलिसीमध्ये पहिल्यांदाच आता एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनचा समावेश करण्यात येणार
📝 पॉलिसी कशी असणार? :
● माहितीनुसार, याअंतर्गत अनेक ठिकाणी स्क्रॅप सेंटर सुरू करण्यात येणार
● या केंद्रात जाऊन लोकांना स्टील स्क्रॅप विकता येणार
● यामध्ये सर्वच प्रकारातील जुन्या स्टीलचा समावेश असणार
● विशेष म्हणजे, स्टील तुम्ही स्क्रॅप केंद्रात विकल्यास सरकार तुम्हाला इन्सेंटीव्ह देणार
● इन्सेंटिव्ह म्हणून किती रक्कम द्यायची यावर चर्चा सुरू आहे
💫 हि पॉलिसी लवकरच जाहीर करण्यात येणार, त्यानंतर लोकांचे, तज्ञांचे मत विचारात घेतल्यानंतर हे धोरण लागू करण्यात येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🍔 धक्कादायक! Dominos Pizza बंद होणार
LetsUp I National
📍 मंदीचा फटका बसल्यामुळे भारतातील Domino's Pizza चे आऊटलेट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
🗣 डॉमिनोजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइल्ड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
👍 ते म्हणाले, सध्या कंपनीला मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कदाचित भारतातील डॉमिनोजचे आऊटलेट्स बंद होण्याची शक्यता आहे.
👉 अगोदरच स्वीडन, स्वित्झर्लंड, आईसलँड, नॉर्वे या 4 देशांमध्ये डॉमिनोजचे आउटलेट्स बंद झाले आहेत.
😔 सर्वांचा आवडता डॉमिनोज पिझ्झा बंद होणार असल्याने पिझ्झा प्रेमींची निराशा झाली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Update
● दहा बँकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑक्टोबरपासून संपावर जाण्याची केली घोषणा
● बाबरी विध्वंसाचे फुटेज वाहिन्यांनी दाखवू नयेत, न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अॅथॉरिटीचा टीव्ही वृत्तवाहिन्यांना सल्ला
● बांगलादेशी सैनिकाने गोळीबार केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आणि आणखी एक जखमी
● बीएसएनएलचा सप्टेंबरचा महिन्याचा पगार पुन्हा थकला, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण
● ज्येष्ठ गांधीवादी आणि पर्यावरणतज्ञ चंडीप्रसाद भट्ट यांना यंदाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर
● काँगेस-राष्ट्रवादीने त्यांच्या 15 वर्षांचा हिशोब द्यावा, आम्ही आमच्या 5 वर्षांचा देतो : मुख्यमंत्री फडणवीस
● लक्झरी एसयूव्ही Mercedes-Benz G 350d भारतात लाँच, 1.5 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमत
● भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेशच्या 15 सदस्यीय खेळाडूंची निवड, अष्टपैलू शकिब अल हसनकडे नेतृत्व
● हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनचा इन्स्टाग्रामवर सर्वात वेगाने 5 तास 16 मिनिटांत 10 लाख फॉलोअर्सचा विक्रम
● बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 RBIने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली!
LetsUp I National
📍 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे
👉 चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, माहिती अधिकारात माहिती समोर
💁♂ वर्ष आणि नोटांची छपाई :
● 2016-17मध्ये : 354.29 कोटी
● 2017-18 मध्ये : 11.15 कोटी
● 2018-19मध्ये : 4.66 कोटी
💫 चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😇 आता इन्कम टॅक्स घटणार?
LetsUp I National
📍 प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्ससंदर्भात केंद्र सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
👉 प्राप्तिकरामध्ये सुट देण्याचा विचार सरकारकडून गांभीर्याने सुरू असल्याचे संकेत आहेत.
👍 पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देवरॉय यांनीही दुजोरा दिला.
🗣 विवेक देवरॉय म्हणाले :
● सरकार लवकरच किंवा काही काळाने प्राप्तिकराच्या दरामध्ये सुद्धा कपात करेल, हे निश्चित आहे.
● मात्र प्राप्तिकराचे दर कमी झाल्यानंतर प्राप्तिकराबाबत मिळणारी सवलत संपुष्टात येऊ शकते.
💫 टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारच्या तिजोरीवर 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचा ताण पडणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏦 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच
LetsUp | National
⚡ स्टेट बँक ऑफ इंडियाने 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा केली लाँच
📍 या माध्यमातून ग्राहकाला मोबाइल फोनद्वारे पॉइंट ऑफ सेल (Pos)वर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार
💸 'एसबीआई कार्ड पे' अॅपमधून पॉईंट ऑफ सेल (Pos) वर टॅप केल्यानंतर पेमेंट होणार
🧐 यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड जवळ बाळगणं आणि पिन टाकण्याची गरज लागणार नाही
💁♂ SBIच्या कार्ड पेचा वापर करण्यासाठी :
● कार्डधारकाला एसबीआय कार्ड पे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागणार
● एकदा कार्डचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ग्राहकांना या अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणं सहजशक्य होणार
● फोन अनलॉक केल्यानंतर पॉइंट ऑफ सेल टर्मिनलच्या जवळ आणल्यास पेमेंट होणार
● ही सुविधा व्हिसा प्लॅटफॉर्मवर लाँच, किटकॅट व्हर्जन 4.4 अँड्रॉइट स्मार्टफोनवर वापरता येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 *LetsUp News Update*
● 2018-19 मध्ये डिजिटल व्यवहारात 383% वाढ, पेमेंटसाटी कार्डचा वापर यंदा 9% घटला
● काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पंजाबमधील सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; एकाच मृत्यू तर एक गंभीर
● रेल्वेची 'प्रमोशन ऑन व्हील्स' नावाची योजना, त्याअंतर्गत चित्रपट प्रमोशनसाठीही रेल्वेचे बुकिंग शक्य
● PMC बॅंक घोटाळा : बॅंकेचे संचालक सुरजित सिंग अरोरा यांना अटक; 11 संचालक रडारवर
● राज्यात 18 ते 20 ऑक्टोबरदम्यान पुन्हा वादळी पावसाचा इशारा, पीक सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
● आचारसंहिते दरम्यान राज्यात आत्तापर्यंत 28 कोटी 83 लाखांची रोकड जप्तीची माहिती समोर
● नवीन लाँच झालेल्या KTM 790 DUKE च्या आयात 100 पैकी 41 गाड्यांची 10 दिवसांतच विक्री
● प्रो कबड्डी : फायनलमध्ये दबंग दिल्ली Vs बंगाल वॉरीयर महामुकाबला, 19 ऑक्टोबरला लढत
● लिओनील मेस्सीने सहाव्यांदा जिंकला गोल्डन शु अॅवॉर्ड, सर्वाधिक 36 गोल करून मारली बाजी
● संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाड़ी' मध्ये आलिया भट दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी
● अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला, येत्या 17 नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला
● जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
● या वर्षी 65 देशांनी त्यांच्या वाट्याचा निधीच दिला नसल्यामुळे संयुक्त राष्ट्रांची तिजोरी झाली हलकी
● उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या 30 नोव्हेंबर पर्यंत रद्द
● पारले प्रोडक्ट्स समूहाच्या निव्वळ नफ्यात 15.2 टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर
● राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी पगाराचा मार्ग मोकळा, वित्त विभागाने काढले परिपत्रक
● महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : नरेंद्र मोदी
● प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा मुंबईचा यशस्वी जयस्वाल सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला
● बॅटरी उत्पादक कंपनी EXIDE ची इलेक्ट्रिक वाहन बाजारात एन्ट्री, EXIDE NEO ई-रिक्षा केली लाँच
● फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात, ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरु
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😇 जीएचआयमध्ये भारताची घसरण!
LetsUp | Update
📝 ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये (जीएचआय) भारताची घसरण झाल्याचे चित्र आहे.
👉 117 देशांच्या यादीत भारत 102व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
✔ दक्षिण आशियातील इतर देश हे 66 ते 94 व्या स्थानावर आहेत.
🇮🇳 भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे.
🧐 आकडेवारीचा आधार :
● हा ग्लोबल हंगर इंडेक्स 2014 ते 2018 या कालावधीत मिळवलेल्या आकडेवारीवर बनवण्यात आला आहे.
● विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे.
💁♂ गुणांचे प्रमाण असे :
● उपासमारीच्या आधारावरून देशांना 0 ते 100 गुण दिले गेलेत आणि जीएचआय तयार केला गेलाय.
● उपासमारी नाही : 0 हा अंक सर्वोत्तम
● उपासमारी फारच कमी : 10 पेक्षा कमी
● उपासमारीचे संकट गंभीर : 20 ते 34.9 गुण
● उपासमारी आव्हानात्मक : 35 ते 49.9 गुण
● उपासमारी अत्यंत भयावह : 50 गुण
💫 भारताला 30.3 गुण मिळाले असून याचा अर्थ भारतात उपासमारीचे संकट गंभीर असल्याचे दिसते आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी
LetsUp | National
⚡ भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
💁♂ 'एक्झिट पोल' वर बंदी : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माध्यमांवर 'मतदारांचा कौल'(एक्झिट पोल) सांगणाऱ्या कार्यक्रमांवर भारतीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
👉 निवडणुका : महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश या 17 राज्यांमधील 52 विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Update
● निवडणूक आयोगाकडून 21 ऑक्टोबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 दरम्यान एक्झिट पोल दाखवण्यास बंदी
● नद्यांमधील भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानत जाऊ दिले जाणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
● जम्मू-कश्मीरमध्ये पोस्ट पेड मोबाईल सुविधा सुरू झाल्यानंतर काही तासांतच एसएमएस सेवा बारगळली
● भारताचे अमेरिकेशी कोणतेही व्यापार वाद नाहीत वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी दिली माहिती
● जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याकडून नागरी वस्तीवर गोळीबार; गोळीबारात एका महिलेचा मृत्यू
● पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदारांच्या शिष्ट मंडळाने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची भेट घेतली
● महाराष्ट्राला सक्षम, खंबीर विरोधी पक्षाची गरज; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रतिपादन
● गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले फेसबुकचे आभासी चलन 'लिब्रा' झाले लाँच
● भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली
● बॅटमॅन सिरीजचा नवीन चित्रपट 'द कॅप्ड क्रुसेडर' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ काश्मीरमधील पोस्टपेड सेवा सुरु
LetsUp | National
⚡ 4 ऑगस्टपासून आत्तापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये बंद असलेली पोस्टपेड सेवा अखेर सुरू झाली आहे.
✔ यामुळे खोऱ्यातील सुमारे 40 लाख हून अधिक फोन सुरू झाले आहेत.
👉 मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता.
💫 मात्र काश्मीरमधील रहिवाशांना मोबाइल इंटरनेटसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती
LetsUp । Job
💁🏻♂ एकूण जागा : 540 जागा
👉 पदाचे नाव : मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)
🎓 शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार / वेहिकल / ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हर प्लांट & मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी क्लास 2 कोर्स उत्तीर्ण.
👨🏻💼 शारीरिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
📍 वयाची अट : 25 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
💰 फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
📆 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2019
🧐 अधिकृत वेबसाईट पाहा : http://bit.ly/2VFMmo5
🖥 फी भरण्याची लिंक : http://bit.ly/33ut6N0
👨🏻💻 जाहिरात पाहा : http://bit.ly/2MeN8FA
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏍 ‘करिझ्मा’ चा प्रवास थांबणार!
Letsup I Auto
🎯 Hero MotoCorp च्या ‘करिझ्मा’ या लोकप्रिय बाईकचा 16 वर्षांचा प्रवास आता थांबण्याची शक्यता आहे.
📝 सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीकडून एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान Karizma च्या एकाही युनिटची निर्मिती झालेली नाही.
😇 प्रोडक्शन बंद आणि चर्चा :
● भारत स्टेज 6 (BS-VI) मानकाच्या सक्तीमुळे कंपीनीने या बाईकचे प्रोडक्शन बंद आहे.
● Karizma चे इंजिन बीएस 6 मध्ये अपग्रेडही करता येणार नसल्यामुळे बाइकचे प्रोडक्शन बंद होत आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● चालू आर्थिक वर्षात भारताचा वृद्धी दर गतवर्षीच्या 6.9 टक्क्यांच्या तुलनेत 6% राहील : जागतिक बँक
● आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी क्षेपणास्त्रसज्ज विमाने, एअर इंडियाकडून वैमानिकांना प्रशिक्षण
● राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात अखेरची सुनावणी; 10 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कलम 144 लागू
● व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय नन मरियम थ्रेसिआ यांना संतपद जाहीर
● राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारसभा घेताहेत याचा अर्थ 100 टक्के भाजप विजयी होणार : योगी आदित्यनाथ
● इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोवर्स असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील पहिले नेते ठरले
● भारतीय मोबाईल काँग्रेस-2019 आजपासून (दि. 14) सुरु, यात कंपन्या उत्पादने प्रदर्शित व लाँच करणार
● वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत मंजू राणीने रौप्यपदक पटकावले, असे करणारी ती दुसरी भारतीय ठरली
● भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित
● फराह खानच्या आगामी चित्रपटामध्ये हृतिक आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💡 वीजेच्या मोटरचीही होणार पोर्टिबिलिटी
LetsUp । Update
⚡ लवकरच सरकार वीज ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
🎯 केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील 4 ते 5 कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्याची योजना बनवत आहे.
👍 याचबरोबर ग्राहकांना कोणत्या कंपनीकडून वीज घ्यायची याची देखील मुभा असणार आहे.
👉 तसेच ग्राहक कधीही वीज वितरण कंपनीमध्ये बदल करू शकणार आहेत.
🗣 केंद्रीय वीजमंत्री आरके सिंह म्हणाले :
● सर्व राज्यांमध्ये केंद्र सरकार 3 ते 4 कंपन्या निश्चित करेल व त्या कंपन्या वीज पुरवठा करतील.
● या निर्णयामुळे ग्राहकांना वीज कंपनी बदलण्याचा पर्याय देखील असेल.
● काही राज्यांमध्ये वीजचे दर हे 8 रूपये प्रती युनिट असून मात्र वीज वितरण कंपन्या या पेक्षा स्वस्त दरात ग्राहकांना वीज पुरवतील.
● याशिवाय संपूर्ण देशीतील प्रती युनिट दर हा एक समान करण्याविषयी देखील विचार सुरू आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
