LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
📣 ई-सिगारेट कायद्याचा मसुदा जाहीर
LetsUp | National
📍 इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) प्रतिबंध कायद्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य विभागाने केला जाहीर
👍 यामध्ये ई-सिगारेट बाळगल्यास किंवा वापर केल्यास 6 महिन्यांपर्यंत कैद आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा प्रस्तावित
📝 मसुद्यात काय-काय? :
● या मसुद्यानुसार, ई-सिगारेटचे उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात यावर बंदी असणार
● उपलब्ध असलेली ई-सिगारेट वा त्याचा साठा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळेत जमा करावा.
● कायदा लागू झाल्याच्या दिवसापासून देशभरात यावर बंदी असेल.
● हा कायदा देशभरात एकाचवेळी लागू होणार आहे
✔ भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 47 चा आधार घेत ही बंदी घालणे फायदेशीर असल्याचे मसुद्यात आहे
🎯 दंड असा :
● ई-सिगारेटचे उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात केल्यास 1 वर्षांपर्यंतची कैद आणि 1 लाखांपर्यंत दंड
● कोणत्याही व्यक्तीने ई-सिगारेटचा वापर केल्यास किंवा जवळ बाळगल्यास 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा आणि 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ SBIकडून कर्जावरील शुल्कमाफी रद्द
LetsUp I Update
⚡ SBIच्या सर्व प्रकारच्या कर्जांवर पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क आकारणी सुरू होणार
👉 गृहकर्ज, वाढीव कर्ज, कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांना दिले जाणारे कर्ज आदींसाठी हा बदल लागू
💫 SBIने गेल्याच महिन्यात प्रक्रिया शुल्कमाफीची केली होती घोषणा, मात्र बँकेने हा निर्णय अचानक केला रद्द
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● SBIच्या जवळपास सर्व प्रकारच्या कर्जांवर पुन्हा एकदा प्रोसेसिंग फी आकारणी सुरू होणार
● उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू कॉमरोसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रेसेट'ने सन्मानित
● जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पोस्टपेड सेवा आज (दि.12) शनिवारपासून सुरू होणार
● प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर : स्मृती इराणी
● अमित शहा आज (दि. 12) केंद्रीय माहिती आयोगाच्या 14 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन करणार
● पाकिस्तानकडून या वर्षात 10ऑक्टोबरपर्यंत तब्बल 2 हजार 317 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन
● हरिद्वार येथून चारधाम छडी यात्रा 70 वर्षांनंतर पुन्हा सुरू, या दरम्यान मोफत यात्रा घडवली जाते
● एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनऐवजी 10 हजार रुपये उचल देण्याचा महामंडळाने घेतला निर्णय
● भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळेची IPL संघ किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी निवड
● ‘झी मराठी अवॉर्ड्स 2019’ : अवघ्या तीन महिन्यांत ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेने मारली बाजी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
⛽ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात
LetsUp I Update
⚡ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात
✔ मुंबई, दिल्लीत पेट्रोलच्या दरात 12, कोलकातामध्ये 11 तर चेन्नईमध्ये 13 पैशांनी स्वस्त
✔ मुंबई, चेन्नईत डिझेलच्या दरात 16 तर दिल्ली आणि कोलकातामध्ये 15 पैशांची स्वस्त
📍 पेट्रोल दर (प्रति लीटर) :
● मुंबई : 79.3 रुपये
● दिल्ली : 73.42 रुपये
● कोलकाता : 76.07 रुपये
● चेन्नई : 76.25 रुपये
📍 डिझेल दर (प्रति लीटर) :
● मुंबई : 69.81 रुपये
● दिल्ली : 66.60 रुपये
● कोलकाता : 68.96 रुपये
● चेन्नई : 70.35 रुपये
💫 आंतरराष्ट्रीय बाजारात, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरु
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🎬 'द स्काय इज पिंक' कसा आहे?
LetsUp I Movie Review
एका सत्य घटनेवर आधारित अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवा चित्रपट 'द स्काय इज पिंक...' अखेर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे प्रियांका- फरहान अख्तर ही नवी कोरी जोडी प्रथमच एकत्र दिसली.
● दिग्दर्शन : शोनाली बोस.
● कलाकार : प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम, रोहित सराफ.
● निर्मिती : प्रियांका चोप्रा, रोनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर.
● संगीत : प्रितम आणि मिकी मॅक्लरी.
🤔 कथा : ही कथा आहे अदिती (प्रियांका चोप्रा) आणि नीरेन (फरहान अख्तर) यांची. दोघांमध्ये शारीरिकदृष्ट्या असणाऱ्या काही बाबींमुळे त्यांच्या मुलांना जन्मत:च काही आजार उद्भवतात. त्यातच ते त्यांचे पहिले अपत्य देखील गमावतात.
अशात आएशा (झायरा) चा जन्म होतो. तिलाही जन्मत:च एक आजार असतो. याचदरम्यान त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच मुलगा इशान सर्वांचे लक्ष वेधतो. इशानची प्रकृती तुलनेने चांगली असते.
पण, आएशा मात्र वेळोवेळी जन्म-मृत्यूशी लढत असते. मुळात आपला अंत कसा आहे? हे आएशा जाणत असते. तरीही तिला वाचवण्यासाठी, काही आनंदाच्या क्षणांची उधळण करण्यासाठी ते दोघे फार धडपडत असतात. हे सविस्तर पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरला जावे लागेल.
प्रियांका चोप्रा, फरहान, झायरा वसिम आणि रोहित सराफ सर्वांनीच आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि गीतं ठीक-ठाक आहेत. एक वेगळी स्टोरी तसेच प्रियंकांचे चाहते असाल तर नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे.
⭐ रेटिंग : 3.5 / 5
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● केंद्र सरकारने जारी केलेल्या एका सर्व्हेनुसार भारतात 2007 नंतर दृष्टिहीन लोकांचे प्रमाण 47 टक्क्यांनी कमी झाले
● स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात (6.9) केली कपात
● हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू,अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार
● आता रेल्वेतून प्रवासादरम्यान आपले सामान चोरी झाल्यास तुम्हाला अॅपच्या माध्यमातून FIR दाखल करता येणार
● लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना 2018 चा तर लेखक पीटर हँडके यांना 2019 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर
● भाजपचे बंडखोर उमेदवार चरण वाघमारे, बाळासाहेब ओव्हाळ, दिलीप देशमुख, गीता जैन आदींची हकालपट्टी
● सध्याचा डेटा प्लॅन सुरू असणाऱ्या ग्राहकांना कॉलिंगसाठी तूर्तास कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, जिओने केले स्पष्ट
● Xiaomi कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Redmi 8 केला लाँच , किंमत 7,999 रुपयांपासून सुरू
● भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे लवकरच दक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी लग्न बंधनात अडकणार
● मिलाप झवेरी दिग्दर्शित 'मरजावां' चित्रपटातील अभिनेत्री नोरा फतेही 'प्यार दो प्यार लो' गाणं प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏏 दिवसअखेर भारत 3 बाद 273
LetsUp | Sports
👍 दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 273 अशी मजल मारली
🎯 खेळ थांबला तेव्हा विराट कोहली 63 आणि अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत होते
👉 या मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
💫 यावेळी रोहित शर्मा फक्त 14 धावाच करू शकला, तर मयंक अग्रवालने 108 धावांची खेळी साकारली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👍 रेल्वेत चोरी; FIR दाखल करा
LetsUp | National
📍 आता रेल्वेतून प्रवासादरम्यान आपले सामान चोरी झाल्यास तुम्हाला FIR दाखल करता येणार
👌 सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) प्रवासी आणि त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी घेतला निर्णय
🗓 आज दि. 10 ऑक्टोबरपासून प्रवाशांना या सुविधेचा फायदा उचलता येणार आहे
💁♂ या पार्श्वभूमीवर जीआरपीने यासाठी एक खास अॅप तयार केले आहे
✔ या अॅपच्या माध्यमातून धावत्या रेल्वेमध्ये एखादा चोरीचा प्रसंग घडल्यास ट्रेन न थांबवता मोबाइल अॅपच्या माध्यमातून एफआयआर दाखल करता येणार
👉 तसेच जीआरपीने केलेल्या सहकार्याचा अनुभवही प्रवासी या अॅपवर नोंदवू शकतात
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 10 अंकांनी घसरून 68 व्या क्रमांकावर फेकला गेला
● यूजीसी नेटसाठी अर्ज करणाऱ्यांना दिलासा, नोंदणीच्या अंतिम तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
● देशात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद, बुधवारपासून (दि.9) मान्सूनच्या परतीला सुरुवात
● स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट घटवून कर्ज दर स्वस्त (0.25) केला
● मॉब लिंचिंगविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या 50 सेलिब्रेटिंवरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द
● विधानसभेच्या घोषणेनंतर आचारसंहिता लागू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकरणात 477 गुन्हे दाखल
● राहुल गांधी यांनी सांगावं की, त्यांच्या पक्षाने जम्मू काश्मीरसाठी काय केले : केंद्रीयमंत्री अमित शहा
● Motorola चा नवा स्मार्टफोन Motorola one macro लाँच, किंमत फक्त 9 हजार 999 रुपये
● भारत-दक्षिण आफ्रिके दरम्यान दुसरा कसोटी सामना आजपासून, सामन्यावर पावसाचे सावट
● 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाची विक्रमी कमाई, चित्रपटाने 6 दिवसांत 100 कोटींचा गल्ला केला पार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😍 हो, SBIची सगळी कर्ज स्वस्त
LetsUp | National
भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना दिवाळीच्या आधीच मोठी भेट देत एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी घटविले आहे.
हे नवे दर उद्यापासून (दि. 10) लागू होणार आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षात ही सलग सहावी कपात आहे. एसबीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत. आता पुढील वर्षापर्यंत हे दर 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांवर आले आहेत.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🔎 आयकर विभाग करदात्यांच्या तक्रारींचा ऑनलाईन निपटारा करणार
LetsUp | Update
दसऱ्या मुहूर्तावर केंद्र सरकारने करदात्यांना 'फेसलेस असेसमेंट'ची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या सुविधेमुळे करदात्यांना आयकर कार्यालयाचे हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही. कारण आयकर विभागाचे अधिकारी ऑनलाईन राहून करदात्यांच्या तक्रारींचा निपटारा करणार आहेत. वेळप्रसंगी करदात्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही संपर्क साधला जाणार आहे.
● याअंतर्गत करदात्यांना रजिस्टर्ड ई-मेल आणि 'www.income taxindiaefiling.gov.in' वर लॉग इन केल्यानंतर आयकर विभागाच्या नोटीस तसेच अन्य सूचना मिळतील.
● त्याचबरोबर रजिस्टर्ड मोबाईलवर तत्काळ मेसेजही मिळेल.
● याआधारे करदात्यांच्या रिटर्न फाईल वा इतर तक्रारींची चौकशी केली जाणार आहे.
● करदात्यांना आपल्या कार्यालय वा घरातून आयकर विभागाच्या नोटिशीला उत्तर देता येणार आहे.
● ई-मेलच्या माध्यमातून नॅशनल ई-असेसमेंट सेंटरशी संपर्क साधता येणार आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे आणि बंगळुरू या 8 शहरांमध्ये हे रिजनल सेंटर कार्यरत राहणार आहेत. यामुळे कर निर्धारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सहजसुलभ होणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● प्लास्टिकमुक्त भारतासाठी जनआंदोलन उभे राहावे; पंतप्रधान मोदींचे रावण दहन कार्यक्रमात आवाहन
● फ्रान्सने भारताला पहिले राफेल विमान सोपवले; राजनाथ सिंह यांनी ॐ लिहून केले शस्त्रपूजन
● यंदा नवरात्रीला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी विक्रमी गर्दी, एकूण संख्या 62.71 लाखांच्या पुढे गेली
● या वर्षी भाविकांसाठी बद्रीनाथाचे कपाट 17 नोव्हेंबर रोजी बंद होणार : मुख्य पुजारी ईश्वरीप्रसाद नंबुद्री
● जयपूरसह देशातील प्रमुख शहरांत येत्या 1 एप्रिलपासून बीएस 6 इंधन मिळण्यास सुरुवात होणार
● शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासह 10 रुपयांत जेवणाची थाळी देणार : उद्धव ठाकरे
● नाराज शिवसेना उमेदवारांनी आर्ज मागे घ्यावे आणि भगव्या शिवशाहीचे साक्षीदार व्हावे : सुभाष देसाई
● काँग्रेस-राष्ट्रवादी विलिकरणाचा मुद्दा नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
● सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग 11 ऑक्टोबरला करता येणार
● 'मरजावां' सिनेमाच्या दुसऱ्या 'एक तो कम जिंदगानी' गाण्याचा टिझर रिलीज, यात नोरा फतेही झळकणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👩🚀 15 महिलांची टीम करणार स्पेसवॉक
LetsUp | International
'नासा' ने प्रथमच फक्त 15 महिलांची टीम अंतराळात स्पेसवॉक करायला पाठवण्याची योजना आखली आहे.
क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर या दोन महिला अंतराळवीर या टीमचे नेतृत्व करणार आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला या 15 महिला अंतराळात तीन-तीन अशा गटांनी स्पेसवॉक करणार आहेत.
यापूर्वीही 'नासा'ने मार्च महिन्यात महिलांसाठी स्पेसवॉक कार्यक्रम योजला होता. स्पेससूट उपलब्ध न झाल्याने ती योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र आता तीच योजना नव्याने बनवण्यात आली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस!
LetsUp | Politics
सर्वच पक्षांना बंडोबांना थंड करण्याची आज अखेरची संधी आहे. कारण आज (दि. 7) सोमवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे.
288 मतदारसंघात युती व आघाडीमध्ये जागावाटपामुळे धूस-फूस पहायला मिळाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यात कोणता पक्ष किती यशस्वी ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशा सर्व माघारी अर्जानंतरच 288 मतदार संघातील लढतींचें चित्र आजअखेर स्पष्ट होणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● राज्य सरकारकडून 21 ऑक्टोबर 2019 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांत सार्वजनिक सुट्टी जाहीर
● आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस, त्यामुळे शेवटच्या नाट्यमय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष
● 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
● आदिवासी आजीच्या (जोधईया बैगा) कलेची जागतिक स्तरावर दखल; इटलीतल्या प्रदर्शनात पेटिंग
● आरेमध्ये लागू करण्यात आली जमावबंदी अनिश्चित काळासाठी लागू राहणार, पर्यावरणप्रेमी संतप्त
● आरेतील वृक्षतोडीवर सुप्रीम कोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल, आज (दि.7) होणार सुनावणी
● विठुरायाच्या महापूजेसाठी 2020 पर्यंतचे बुकिंग फुल्ल, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती
● डीटेल कंपनीने किफायतशीर मूल्य असणारा 32 इंचचा स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत केला सादर
● जपान ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने एकेरीचे विजेतेपद पटकावले
● जॅकलीन फर्नांडिस-सुशांतसिंग राजपूत 'ड्राईव्ह'मध्ये एकत्र दिसणार, त्यांचं 'मखना' साँग रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ पावसाळ्यात वायपरची काळजी घ्या
LetsUp | Auto
पावसाळा सुरु असल्याने वाहनचालकांच्या मनात आपल्या गाडीचा वायपर, त्याची ब्लेड चांगली आहे का? गाडीचा वायपर बंद तर नाही ना पडणार? या ना अशा अनेक प्रश्नांची धांदल सुरु असते. यावर उपाय म्हणून काय काळजी घ्यावी? याबाबत जाणून घेऊयात...
1. सर्वप्रथम आपल्या गाडीचे वायपर नीट चालतात का? तपासून घ्या.
2. काच नीट स्वच्छ होत नसल्यास वायपरची ब्लेड्स बदला.
3. वायपरची ब्लेड्स स्वस्त असल्यामुळे दरवर्षी ती बदला. त्यामुळे काच चांगली स्वच्छ राहते, शिवाय त्यावर ओरखडेही पडत नाहीत.
4. वायपरबरोबर वायपरचे स्प्रेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यात नियमित पाणी भरणेही गरजेचे आहे, त्यात शॅम्पू टाकल्यास काच चांगली स्वच्छ होते.
😇 वायपर बंद पडल्यास : लांबच्या प्रवासाला जाताना गाडीचा वायपर बंद पडला तर अशावेळी कच्चा बटाटा, तंबाखू किंवा शेव्हिंग फोम लावून काच स्वच्छ करता येते. यामुळे काच थोडीफार स्वच्छ होण्यास नक्की मदत होईल. पावसाचे पाणी काचेवरून पटकन ओघळते व वायपर सुरू नसतानाही गाडी चालवता येते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ क्रांतिकारी अवलिया 'स्टीव्ह जॉब्स'
LetsUp I Special
स्टीव्ह जॉब्स यांनी अफाट कल्पना शक्ती व अपार कष्ट या जोरावर जगात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या मकॅन्टोस कॉम्प्युटर, आयफोन, आयपॉड, आयपॅड अशा उपकरणांनी तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवून आणली. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊ त्यांचे यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम...
1. तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. ("Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do")
2. वेगळे विचार करा. (Better Be a pirate than to join navy. Be different)
3. पहिले पाऊल टाका. (Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition)
4. सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा. (Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big)
5. नेहमी शिकत रहा. (Learn continually)
6. लोकांच्या भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका. (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice)
7. फक्त पैशांसाठी काम करू नका. (Don’t do it for money)
8) दुसऱ्याचे आयुष्य जगू नका. (Don’t live someone else’s life)
9. अनुकरण नका नेतृत्व करा. (innovation distinguishes between a leader and a follow)
10. कधीच संतुष्ट होऊ नका. (stay hungry, Stay foolish)
वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेणारे स्टीव्ह जॉब्स नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● यंदाचा माेसमी पाऊस, पूर आणि भूस्खलनात 1900 जणांचा बळी; 46 बेपत्ता असून 738 जण जखमी
● 'राफेल' येत्या 8 ऑक्टोबर रोजी भारताच्या ताब्यात मिळणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या जेटमधूनही उड्डाण करणार
● पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी; केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे सोपवला तपास
● दीर्घकालीन व्हिसावर वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या झुबेदा बेगम यांना लग्नानंतर 35 वर्षांनी भारताचे नागरिकत्व मिळाले
● विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल; बंडखोरांना माघार घ्यायला लावणार : मुख्यमंत्री फडणवीस
● महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश
● मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW) पीएमसी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना केली अटक
● मारुती कंपनीने 6 महिन्यांत बीएस-6 मानकाची दोन लाखांहून जास्त वाहने केली विक्री
● रवींद्र जडेजा सगळ्यात जलद 200 विकेटचा टप्पा गाठणारा डावखुरा बॉलर ठरला आहे
● बॉलिवूड इंडस्ट्रीसारखंच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही स्त्री पुरूष असा भेदभाव केला जातो : श्रुती हसन
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😇 पाकिस्तान कर्जबाजारी; संकटात वाढ
LetsUp | International
पाकिस्तान चीनच्याच कर्जात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आएएमएफने दिलेल्या कर्जापेक्षाही चीनकडून पाकिस्तानने दुप्पट कर्ज घेतले आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आयएमएफने 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रस्तावित बेलआऊट पॅकेजला मंजुरी दिली आहे. सध्या पाकिस्तावर असलेल्या इतर कर्जापोटी त्यांना 2.8 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.
पाकिस्तानने चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्यामुळे त्यांच्या संकटात वाढ झाली आहे. तर आयएमएफने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला 2022 पर्यंत चीनकडून घेतलेल्या 6.7 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची रक्कम फेडावी लागणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Update
● केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्सचे व्याजदर घटवून 7.9% केले
● गंगा आणि तिच्या उपनद्यांत मूर्ती विसर्जनावर बंदी घालावी असे केंद्राने 11 राज्यांना दिले निर्देश
● अॅट्रॉसिटी कायदा : केंद्र सरकारच्या दुरुस्त्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून
● एअर इंडिया प्रवाशांसाठी मागणीनुसार आता देणार मदतनीस, त्यांची 'नमस्कार सेवा' सुरू
● पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी केले जाहीर
● महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 77 स्टार प्रचारक; पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह खडसे, तावडे यांची वर्णी
● PMC बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक
● महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने फोर्ड इंडियामध्ये 51 टक्के समभाग खरेदी करण्याची केली घोषणा
● पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची दिवसअखेर 3 बाद 39 अशी अवस्था, अश्विनचे 2 बळी
● अभिनेता विकी कौशलने आपल्या आगामी 'उधम सिंग' या चित्रपटासाठी जवळपास 13 किलो वजन केले कमी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
