uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 866 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 282-o'rinni va Hindiston mintaqasida 2 493-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 866 obunachiga ega bo‘ldi.

03 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 730 ga, so‘nggi 24 soatda esa 70 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 32.41% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.47% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 34 315 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 613 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 64 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 04 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 866
Obunachilar
+7024 soatlar
+3437 kunlar
+1 73030 kunlar
Postlar arxiv
🎯जेम्स पीबल्स, मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान विश्वाची उत्क्रांती व बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी नोबेल स्टॉकहोम : महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे. विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी १९९५ मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ  लाख १८ हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे. जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले. महाविस्फोटानंतरच्या वैश्विक सूक्ष्म लहरी म्हणजे सीएमबीआरचे अस्तित्व त्यांनी पहिल्यांदा वर्तवले होते. तुमची सर्वात मोठी कामगिरी कुठली असे विचारले असता ते म्हणाले की, असे काही सांगणे अवघड आहे. संपूर्ण आयुष्यभर केलेल्या कामाची ही पावती आहे. विश्वरचनाशास्त्रातील अनेक कोडय़ांचा उलगडा करण्यासाठी आपण यापुढेही सैद्धांतिक पातळीवर काम करीत राहू. विज्ञानाच्या प्रेमातून, कुतूहलातून तरुणांनी त्याकडे वळावे, पुरस्कार व मानसन्मान हा यातील एक भाग असला तरी तो तुमचा उद्देश असता कामा नये. विश्वाच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत बरीच माहिती मिळाली असली तरी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मिशेल मेयर व दिदियर क्वेलोझ यांना पृथ्वीपासून पन्नास प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ५१ पेगासी बी या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल नोबेल जाहीर करण्यात आले. या दोघांनी पहिल्या बाह्य़ग्रहाचा शोध लावला. हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे तो तारा वेगळ्या स्वरूपाचा असून तसे फार थोडे तारे आहेत, कारण त्यात हायड्रोजन अणूंचे संमीलन होऊन हेलियमचे अणू गाभ्याच्या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारच्या दुर्मीळ ताऱ्यात सूर्याचाही समावेश आहे. अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मोलोनी यांनी म्हटले आहे की, विश्वाच्या मूलभूत स्वरूपाबाबतचे हे संशोधन क्रांतिकारी असून दूरस्थ बाग्रह शोधण्यातून विश्वरचनाशास्त्रात बाह्य़ग्रह विज्ञान ही नवीन शाखाच निर्माण झाली आहे. १९९५ मध्ये पहिला बाह्य़ग्रह शोधला गेला तेव्हा पृथ्वीचे विश्वातील स्थान काय आहे याबाबतचे आकलन बदलले आहे.

युद्धसराव:- हिम विजय:- •••••••••••••••••••••••••••••••••• ● चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशाच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतीय लष्कर पहिल्यांदाच ‘हिम विजय’ या नावाने आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्वतीय युद्ध सराव आयोजित केला आहे. सरावाची सांगता 25 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे ● नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतीय क्षेत्रात 14 हजार फूट उंचीवर नव्या प्रकाराचे युद्ध धोरण तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.सरावामध्ये प्रत्येकी 4 हजार सैनिक असलेले तीन गट तयार करण्यात आले आहेत.या अभ्यासामध्ये नव्याने संकलित केलेल्या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ (IBG) या तुकडीची क्षमता तपासली जात आहे.

रयत प्रबोधिनी व साई अकॅडमीची राज्यसेवा २०२० टेस्ट सिरीज • एकूण 27 टेस्ट ( 5 विषयनिहाय + 11 CSAT+ 11 Full Length). • आयोगाप्रमाणे CSAT पेपरमध्ये उतारे व प्रश्न असतील. • विषयनिहाय टेस्टमध्ये आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण सिलॅबस कवर करून प्रश्न कव्हर केले जातात. • आयोगाच्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण करून, स्पर्धा परीक्षेमध्ये विविध पातळीवर यशस्वी झालेल्यांकडून प्रश्न काढले जातात. • आयोगाच्या बदलत जाणार्या् प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या स्वरूपाचे प्रश्न. • मूलभूत संकल्पना व factual data या दोन्ही गोष्टींचा आयोगानुसार योग्य सम्यक. • त्यानंतरच्या 20 टेस्ट आयोगाची वेळ, पद्धत व काठिण्य पातळी यानुसार 10 GS + 10 CSAT असतील. • विषयनिहाय टेस्ट नंतर तात्काळ स्पष्टीकरण

' जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी यांचा तुलनात्मक अभ्यास ' ( वाचण्यासाठी लागणारा कालावधी - ३ मिनिटे ) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्य संख्येवर होणार परिणाम:- लोकसभा :- जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश स्थापनेपूर्वी लोकसभेत राज्यांच्या एकूण निवडून आलेल्या सभासदांची संख्या 530 होती पण आता ही संख्या 524 होईल, तर केंद्रशासित प्रदेशात ही पूर्वी 13 होती पण आता ती 19 पर्यंत वाढेल. तथापि, लोकसभेत एकूण सदस्यांच्या संख्येमध्ये कोणताही बदल होणार नाही कारण जम्मू-काश्मीर राज्यातून आलेल्या सदस्यांना आता केंद्रशासित प्रदेश मानले जाईल, त्यातील सदस्य जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश आणि १ केंद्रशासित प्रदेश लडाखचे असतील. राज्यसभा :- यापूर्वी राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची एकूण संख्या २२९ होती, तर आता ती घटून २२४ करण्यात येईल. केंद्र शासित प्रदेशांमधून म्हणजेच दिल्ली आणि पुडुचेरीचे राज्यसभेचे ४ सदस्य असत, आता त्यांची संख्या ८ वर जाईल कारण जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशातील हे चार सदस्य जोडले जातील. लडाखमध्ये विधानसभा नसल्यामुळे राज्यसभेत कोणताही प्रतिनिधी असणार नाही. जम्मू आणि काश्मीर :घटनादुरुस्ती :- जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशास कलम 356 लागू होणार नाही. जोपर्यंत जम्मू-काश्मीर एक राज्य आहे तोपर्यंत कलम 356 जम्मू-काश्मीरला लागू आहे, परंतु ,१ ऑक्टोबर, २०१९ नंतर म्हणजेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या स्थापनेनंतर कलम 356 लागू होणार नाही . जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशासाठी ही प्रक्रिया लागू होणार नाही कारण कलम 356 फक्त राज्यांना लागू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास दिल्ली आणि पुडुचेरीप्रमाणेच, त्याच प्रकारची तरतूद दिल्ली व पुडुचेरीशी संबंधित आहे. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा घटनादुरुस्ती प्रक्रियेत कोणतीही भूमिका निभावणार नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 (२) नुसार काही घटनात्मक दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांची मंजुरी आवश्यक आहे अशी तरतूद आहे. या मतानुसार, जम्मू-काश्मीरचा केंद्र शासित प्रदेश बनल्यानंतर हे राज्य यापुढे वर्गात येणार नाही आणि आता निम्म्या राज्यांचा अर्थ आधीच्या 15 राज्यांच्या तुलनेत राज्यांची संख्या १४ होईल. कारण आता 29 राज्यांऐवजी 28 राज्ये शिल्लक आहेत. - विशाल लोंढे रयत प्रबोधिनी , पुणे धन्यवाद

photo content

photo content

🌸🌸‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात🌸🌸 ✍ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे. ✍अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत. ✍२८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

photo content

photo content

​​⁠💢 तेजस लढाऊ विमानात उड्डाण करणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षणमंत्री ठरले आहे 💢 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎆 केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह बंगळुरुच्या एचएएल विमानतळावरून स्वदेशी निर्मित लढाऊ विमान तेजसमध्ये उड्डाण करणारे पहिले संरक्षणमंत्री झाले. 🎆 त्यांच्यासमवेत एअर व्हाईस मार्शल एन तिवारी हेदेखील होते, जे प्रकल्प संचालक, नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटर, एडीए (एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी) देखील आहेत. 🎆 आयएएफने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडे 40 तेजस विमानांसाठी ऑर्डर दिले. 🎆 आयएएफने 50,000 कोटी रुपये खर्चून 83 तेजसच्या आणखी एका तुकडीच्या खरेदीसाठी एचएएलला प्रस्ताव (आरएफपी) देण्याची विनंती केली. 🎆 हिन्दुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली. 🎆 तेजस हे लढाऊ विमान असून, तीन वर्षापूर्वीच ते हवाई दलात दाखल झाले. ◾️ तेजसची वैशिष्ट्ये ◾️ 🚁 तेजस हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करू शकते. 🚁 यामध्ये बॉम्ब आणि रॉकेटही वापण्याची सुविधा आहे. 🚁 ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के अॅल्युमिनिअम आणि टायटेनियम या धातूपासून तेजची बांधणी 🚁 तेजसमध्ये केवळ एकच पायलट बसू शकतो. तर प्रशिक्षणासाठी असलेल्या तेजसमध्ये दोन सीटची सुविधा आहे. 🚁 विशेष म्हणजे जमिनीपासून ५४ हजार उंचीपर्यंत तेजस उड्डाण करू शकते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आयफा पुरस्कार 2019:- •••••••••••••••••••••••••••••••••••••••• ● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी ● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी) ● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत) ● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन) ● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत) ● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू) ● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर ● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ) ● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण ● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर ● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम ● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू) ● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’ ● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’ ● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी ● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक) ● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी) ● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)

photo content
+1

The Best Universities in the World: 1.🇬🇧 Oxford 2.🇺🇸 California Institute of Technology 3.🇬🇧 Cambridge 4.🇺🇸 Stanford 5.🇺🇸 MIT 6.🇺🇸 Princeton 7.🇺🇸 Harvard 8.🇺🇸 Yale 9.🇺🇸 University of Chicago 10.🇬🇧 Imperial College London (Times Higher Education, 2019)

photo content

"Mission 2020- Prediction - 1" राष्ट्रीय कॉग्रेस च्या अध्यक्ष निवडीचा मुद्दा चर्चेत आहे .. मग INC चा अध्यक्ष असलेली शेवटची महाराष्ट्रातील व्यक्ती कोण असावी ?? बंकीपुर ,बिहार मधे १९१२ नंतर राष्ट्रीय कॉग्रेस ला मागील १०७ वर्षात एकही मराठी ,महाराष्ट्रीयन अध्यक्ष मिळाला नाही. हि व्यक्ती होती "रंगनाथ मुधोळकर"(R.N.mudholkar)

photo content

पंकज अडवानी बनला २२ व्यांदा जगज्जेता 👑 आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या १५०-अप प्रकारात पंकजने अंतिम लढतीत म
पंकज अडवानी बनला २२ व्यांदा जगज्जेता 👑 आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या १५०-अप प्रकारात पंकजने अंतिम लढतीत म्यानमारच्या नाय थ्वाय ओ चा पराभव करत जगज्जेतेपद पटकावले. 🇮🇳 🥇🎱