MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 896
Obunachilar
-624 soatlar
-277 kunlar
-8330 kunlar
Postlar arxiv
8 896
राज्यसेवा Prediction Batch मधुन upsc prelims मधील खालील प्रश्न Solve करता येत होते 👇👇
8 896
असतील प्रशासनाचे पण काही वाईट points, नसेल सगळंच ideal जस आपल्याला हवं असत तस..पण ते तस कोणत्याच क्षेत्रात नाहीये...शिक्षण, मेडिकल, क्रीडा, बॉलिवूड,बिजनेस का अजून काही.
नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. Ideology is always guided by one's own capacity. ज्यांना हा struggle फार महत्वाचा वाटत नाही,यात सगळा फार भपका वैगरे वाटतो त्यांच्या बद्दल "द्राक्ष आंबट असतात" हि एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमचे Struggle Truce Struggle सुरु ठेवा.
स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना असामान्य powers देऊन शोषणकारी व्यवस्थेत स्वतःचे स्थान निर्माण करून देण्याची (Position) प्रचंड ताकद आहे. (Super ३० मधला हृतिक आठवा "अब सिर्फ राजा का बेटा राजा नाही बनेगा")
So the show must go on...!!! कारण प्रश्न फक्त survival चा नाही तर आपण जे deserve करतो ते हक्काने merit वर मिळवण्याचा आहे. काही जणांनी आज मार्क्सला सत्यात उतरवू पाहणाऱ्या ग्रामशीला सत्यात उतरवले आहे. आपली पण वेळ येईलच...!!!
8 896
War of Position 😎 स्थानासाठीची लढाई 😍 आणि स्पर्धा परीक्षा
आंतानिओ ग्रामशी नावाचा राज्यशास्त्रात एक लै भारी 😎 विचारवंत इटलीत २० व्या शतकात होऊन गेला. हिटलरचा वैचारिक मोठा भाऊ समजल्या जाणाऱ्या मुसोलिनीचा ग्रामशी म्हणजे समकालीन. या भावड्याने कार्ल मार्क्सच्या मार्क्सवादाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यात भरपूर नवकल्पना सुचवल्या. त्यातल्या काही निवडक आणि interesting म्हणजे Hegemony / धुरिणीत्व आणि War of positions स्थानासाठीचे युद्ध.
MPSC निकालाच्या निमित्ताने ग्रामशीच्या या संकल्पनांची आज आठवण झाली. मार्क्सची क्रांती सत्यात उतरवायची असेल, अंतिम निर्णायक युद्ध War of Position जिंकायचे असेल तर भांडवलदार वर्गाशी/ शोषणकारी वर्गाशी स्थानांसाठीच्या छोट्या छोट्या लढाई Battles आधी आपल्याला नागरी समाज म्हणून जिंकाव्या लागतील असे त्याचे मत होत. असे म्हणतात कि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गांधीवादाचा कालखंड आणि एकूणच सामान्य जनतेने ब्रिटिशांशी दिलेला दिलेला लढा एक प्रकारचे War of position होता. आणि म्हणूनच Struggle Truce Struggle (संघर्ष तह संघर्ष) या पद्धतीने भारतीय जनतेने कधी लढा देत कधी तह करत असहकार, सविनय कायदेभंग आणि नंतर चले जाव या चळवळींच्या माध्यमातून छोट्या छोट्या लढाया जिंकत १९४७ ला स्वातंत्र्य मिळवून अंतिम युद्ध जिंकले.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला रोजच अशा battles ना सामोरे जावे लागते. अभ्यास हि तर यातली एक केवळ एकच battle आहे. अभ्यासासाठी चांगली library,class,पुस्तकांचा ढीग,रात्रीचे जागरण हे तर झालेच पण बाकी अनेक पातळ्यांवर या विद्यार्थ्यांना लढावे लागते. परीक्षांची अनिश्चितता, system चा मार , आर्थिक अडचणी, घरातले मेडिकल issue, गावाकडचे बांधाचे भाऊबंदकीचे वाद आणि त्यातून केसेस पडण्याची आणि सरकारी नौकरीचे स्वप्नच अडचणीत येण्याची. पुण्यात राहण्याचा खर्च, रूमच्या अडचणी,रूम पार्टनर सोबतचे वाद विवाद,जेवण्याचे वांदे, कधी एका बाजूला relationships आणि break up चा लोड तर कधी एकटेपणाचा लोड. गावाकडे गेले कि प्रश्नांची सरबत्ती ठरलेली असते. अजून किती वर्ष? अभ्यासच चालू आहे का अजून काही? पोरग पार वाया गेलंय वाटत? आई वडिलांचा ताण कमी करा जरा, बस करा आता.मुलींसमोर लग्नाचे प्रश्न,छोट्या भावाचं झालं तुझं कधी?तुझ्यामुळे बाकीचे अडकून पडलेत,वयाचे प्रश्न, पुढं मूळ बाळ कस होईल हे प्रश्न? तुमच्या वयात आमचं हे हे झालं होत...फॉर्म कोणते भरलेत? हा नाही का भरला? त्या मागच्या निकालाच काय झालं? मध्ये आमच्या मामाच्या पोराच्या मित्राची बहीण select झाली..तू नव्हती का दिली ती परीक्षा? होत नसेल तर हे सोडून दे..हे कर...ते कर..हे करू नकोस...प्लॅन बी नाही का? डोक्याचा भुगा आणि मनाचा कचरा करणारे हे प्रश्न झेलतच पोरं पोरींना तयारी सुरु ठेवावी लागते.
जे लोक या छोट्या daily battles जिंकतात,धडपडतात किंवा हरले तरी पुन्हा सकाळी उठून library गाठतात त्यांना एक दिवस ग्रामशी म्हणतो तसे final War जिंकता येते. काही जण अजून अंतिम युद्ध जिंकले नसतील.कदाचित अजून काही battles जिंकायच्या बाकी असतील, आणि त्या जिंकल्या मिळेल अपेक्षित यश देखील. थांबून तर चालणार नाही.
माणसाच्या आयुष्यात almost सगळीच क्षेत्र अशी आहेत कि जिथे अंतिम ध्येय गाठणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या १ % - २ % किंवा त्या पेक्षा पण कमीच असते. भारताच्या क्रिकेट टीम मध्ये एका वेळी ११ च खेळाडू आहेत. बाकी कुठल्या ना कुठल्या लीग मध्ये किंवा इतर टप्प्यावर आपलं आयुष्य आजमावत आहेत. ४ वर्षाने होणारे ऑलम्पिक मध्ये पदक आणि त्यातही सुवर्ण पदक जिंकणारे कमीच आहेत. बॉलिवूड मध्ये रोज दाखल होणारे अनेक आहेत पण स्टार पद मिळवणारे कमीच आहेत. राजकारणी भरपूर आहेत पण चाणक्यनीती चे बिरुद लागलेले कमीच आहेत. सरकारी मेडिकल कॉलेजेस साठी च्या entrance चे निकाल काय किंवा IIT चे निकाल कमीच लागतात. तसेच आपल्या MPSC UPSC करणाऱ्या मुलांची संख्या जास्त असली तरी यश मिळवू शकणाऱ्यांची संख्या कमीच असेल आणि राहील. त्यातही IAS IPS Group A मिळवू शकणाऱ्यांची संख्या कमीच राहील. म्हणून काय स्वप्न पाहणं सोडून देणार ? का प्रयत्न करणं सोडून देणार? आपल्या सद्सद्विवेकाने आणि आपल्या घरच्यांना विश्वासात घेत हा प्रयत्न करण्यात वावगे काहीच नाही. अगदी कुणाची साथ नाही मिळाली नाही तरी लढणे worth नक्कीच आहे. आणि हे निकाल लागलेल्या दिवशी select झाल्यावर रात्रभर न झोपू शकणाऱ्या मुलाला मुलीला विचारा,पेढ्यांच्या पाकिटाचे आणि फुलांच्या हारांचे, फेट्यांचे लागलेले ढीग आवरून आणि नातेवाईकांच्या शुभेच्छाचे कॉल घेऊन सुद्धा दमून न गेलेल्या आई वडिलांना विचारा. आणि प्रशासनात जाऊन समाधानकारक काम करू शकलेल्या अधिकाऱ्यांना विचारा.
8 896
Repost from MPSC
जा.क्र.99/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7173 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7174 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7175 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7176 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7177
8 896
👆👆👆👆
नगरपरिषद कर्मचारी पदांची कामे -
१) महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा अ) स्थापत्य, ब) विद्युत, क) संगणक
२) महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा
३) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरिक्षक व लेखापाल सेवा
४) महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारक व प्रशासकिय सेवा
५) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा
६) महाराष्ट्र नगरपरिषद नगररचनाकार आणि विकास सेवा
8 896
नगरपरिषद कर्मचारी पदांची कामे -
१) महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा अ) स्थापत्य, ब) विद्युत, क) संगणक
२) महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा
३) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरिक्षक व लेखापाल सेवा
४) महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारक व प्रशासकिय सेवा
५) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा
६) महाराष्ट्र नगरपरिषद नगररचनाकार आणि विकास सेवा
8 896
नगरपरिषद कर्मचारी पदांची कामे -
१) महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा अ) स्थापत्य, ब) विद्युत, क) संगणक
२) महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय, मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा
३) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरिक्षक व लेखापाल सेवा
४) महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारक व प्रशासकिय सेवा
५) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा
६) महाराष्ट्र नगरपरिषद नगररचनाकार आणि विकास सेवा
8 896
🙏 विनम्र आवाहन......!
मागील काही दिवसात वनसेवा मुख्य परीक्षा 2021 , राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 तसेच अभियांत्रिका सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या विविध प्रवर्गांचा निकाल जाहीर झालेला आहे . सोबतच कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल सुद्धा लवकरच जाहीर होईल.
त्या सर्व निकालांमध्ये बरेच विद्यार्थी कॉमन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच यातीलच काही विद्यार्थ्यांना STI, ASO किंवा इतर गट ब अथवा गट क ची पदे मिळालेली असू शकतात .
मा.आयोगाने निकालाचा क्रम चुकीचा लावल्यामुळे काही विद्यार्थ्यांना इच्छा असूनही यातील इतर पदामधून Opt out करता येत नाही किंवा आलेले नाही.
तर काही विद्यार्थी संधी असून सुद्धा एका पेक्षा अधिक post मधून opt out करत नाहीत .
त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना व सिलेक्टेड उमेदवारांना नम्रतेची विनंती व आवाहन आहे की,
जर आपल्याला एकापेक्षा अधिक पदे मिळालेले असेल व पुढे याहून अधिक चांगले पद मिळण्याची शक्यता असेल तर नक्कीच त्याखालील पदक्रमाने दुय्यम पोस्ट मधून आपण आवर्जून Opt out करावे व इतर विद्यार्थ्यांना पद मिळण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
आपल्या एका निर्णयाने पदापासून वंचित असणारे उमेदवाराचे post मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते .
यामध्ये कोणी कोणाला फोर्स तर नक्कीच करू शकत नाही किंवा करू ही नये ; पण नैतिकतेच्या आणि माणुसकीच्या नात्याने आपण हा स्तुत्य निर्णय घेऊ शकतो .
आपल्या सदसदविवेकास जागून सर्वांनी Opt out करण्याचा योग्य निर्णय घ्यावा एवढीच विनंती...!
मा. आयोगाचे सुद्धा २०२१ चे सर्व अंतिम निकाल जाहीर झाल्यावर सर्व पदांसाठी पुन्हा एकदा उमेदवारांना ऑप्टिंग आऊटची संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आयोगाने जाहिरात काढलेल्या जागा शिल्लक राहणार नाहीत व शंभर टक्के पद भरती होऊ शकेल..ही विनंती..!
(कारण राज्यसेवा, वनसेवा व कृषी सेवेसारख्या जाहिरातींसाठी प्रतीक्षा यादी लागत नाही)
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना...!
आपलाच,
प्रेमराज चव्हाण
@Premrajchavan
(इतर चॅनल ऍडमिन्सला सुद्धा विनंती की आपण हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा)
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
All About #Prediction Batch
Last Day For Admission as well as Offer
Fees 450 = 300 रुपये
@Mrahulkumar
8 896
फक्त आजच्या दिवस Prediction Batch साठी Admission परत सुरु करत आहोत.....fees आता 450 नसुन 300 असेल.
जे Batch साठी msg करत होते ते Join करु शकता.
@Mrahulkumar
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
