Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 078
Obunachilar
-224 soatlar
-247 kun
-3430 kun
Postlar arxiv
4 076
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 : जलसुरक्षित, समृद्ध गावांचा संकल्प!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 2026-27' योजनेचा शुभारंभ केला. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र गट, सुधारित पुरस्कार रचना आणि प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेवर आधारित मूल्यमापनातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0’ अधिक व्यापक व परिणामकारक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जलसंधारण, जलस्रोतांचे बळकटीकरण, स्वच्छता, हरित गाव आणि लोकसहभागावर विशेष भर देत दुष्काळावर मात करून शाश्वत ग्रामविकास साधण्याचा या अभियानाचा संकल्प आहे. या अभियानातील महत्त्वाचे बदल आणि जलसुरक्षित, समृद्ध गाव घडविण्याच्या उद्देशाची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhaPanchayatRajAbhiyan
11 Okt, 07:51
4 076
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान : लोकसहभागातून गावांचा सर्वांगीण विकास!
गावांच्या विकासाला लोकसहभागाची जोड देत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26’ला यशस्वी प्रतिसाद मिळाला. आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, घरकुल आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत या अभियानातून परिवर्तन घडून आले. पायाभूत सुविधांचा विकास, शेतकऱ्यांना बळ आणि ग्रामीण भागात स्वावलंबनाच्या नव्या संधी निर्माण करणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून समृद्ध गावांच्या दिशेने सुरू असलेल्या परिवर्तनाच्या प्रवासाची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhaPanchayatRajAbhiyan
11 Okt, 07:49
