Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 143
Obunachilar
-324 soatlar
-117 kunlar
-4130 kunlar
Postlar arxiv
4 143
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय व मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल, येथे भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालयांसाठी 12 मजली सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येत असून, या इमारतीच्या बांधकामात पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व ग्रीन बिल्डिंग संकल्पनेला प्राधान्य देत उच्च दर्जाचे काम करावे तसेच प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार प्रवीण दटके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 143
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देत विविध प्रकल्प व सुविधांची पाहणी केली.
यावेळी ‘सुश्रुत स्किल लॅब – 2’ चे उद्घाटन करून मुख्यमंत्री यांनी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा आढावा घेतला. ट्रान्सप्लांट ओटी, डायलिसिस सेंटर, कार्डियाक आयसीयू, ओपीडी, वॉर्ड क्र. 36, प्रतीक्षालय, क्रीडा संकुल आणि जलतरण तलाव अशा विविध सुविधांची त्यांनी पाहणी केली.
रुग्णांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
या प्रसंगी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 143
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो रुग्णालय) येथे भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.
विविध विभागांची व सुविधांची पाहणी:-
✅ शल्यचिकित्सा विभाग
✅ नेत्र विभागाचा मॉड्युलर ओ.टी. विभाग
✅ सिकल सेल व थॅलेसेमिया विभाग
✅ निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी उभारण्यात येणारी वसतिगृहाची इमारत
✅ प्रशासकीय इमारत येथील ॲडव्हान्स स्कील लॅब
✅ रुग्ण नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेला निवारा
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, रुग्णांना दर्जेदार सेवा व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असा दृढ विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. विशेषतः मेयो रुग्णालयातील वसतीगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
From Nari Shakti to Economic Strength! Empowering Women and building a Viksit Maharashtra
Inaugurated ‘Mahalaxmi Saras 2026’ exhibition in Mumbai today. Over the years, this exhibition has grown into a truly world-class platform, showcasing the strength and talent of women entrepreneurs.
Hon PM Narendra Modi Ji’s vision of 'Nari Shakti' is powering the journey towards a ‘Viksit Bharat’ by empowering women and bringing their potential into the mainstream economy. Over the past decade, initiatives like ‘Umed’ and ‘MAVIM’ have built a strong self-help group movement across Maharashtra, connecting millions of women, supporting families, and enabling women to create, brand, and market their own products.
Maharashtra has already created around 50 lakh ‘Lakhpati Didis’ and is now moving in mission mode towards 1 crore, transforming women into strong economic leaders. Women-led Self-Help Groups are a true powerhouse.
Along with the Saras exhibition, the ‘Umed’ platform has created a permanent digital marketplace with thousands of products, ensuring sustained opportunities. The expansion of ‘Umed Malls’ across districts, with a long-term vision down to the taluka level, is building a strong and accessible market network for women entrepreneurs.
Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Jaykumar Gore, MoS Yogesh Kadam, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #MahalaxmiSaras2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2050558781130723803?s=20
4 143
CMO Maharashtra Tweets:
सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- 'महालक्ष्मी सरस' द्वारे 'उमेद'ची गरुड भरारी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे 'महालक्ष्मी सरस 2026' चे उदघाटन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
देशात नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. महिला अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे. 'महालक्ष्मी सरस'मुळे बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ व ग्राहक मिळून महिलांना अपेक्षित लाभ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बचत गटांच्या उत्पादनांमध्ये आता केवळ गुणवत्ता नव्हे, तर आकर्षक पॅकेजिंग, उत्पादनाची माहिती, पोषणमूल्ये आणि वापर याबाबतची सविस्तर माहिती दिली जात असून त्यामुळे बचत गटांची स्पर्धात्मकता वाढली आहे. बचत गट आता मोठ्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम झाले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
याशिवाय, 'उमेद' अंतर्गत उभारण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म हा एक व्हर्च्युअल मार्केटप्लेस म्हणून विकसित होत असून, ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रवाहात महिलांना स्थान मिळवून देण्यासाठी तो महत्त्वाचा ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर आज 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी योजना तयार करण्यात येईल. त्यामार्फत महिला बचत गटांना नर्सरी उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, याद्वारे महाराष्ट्राच्या 300 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि पर्यावरण संवर्धनात हातभार लावतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahalaxmiSaras2026
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
