uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - हाजीन चकमकीत शहीद झालेले रायफल मॅन रवी कुमार यांच्या पार्थिवावर सांबा येथे अंत्यसंस्कार 👉 नवी दिल्ली - बांदीपुरा चकमकीत झालेले सीआरपीएफ अधिकारी चेतन कुमार चीता यांच्यावर एम्स रुग्णालयात शस्त्रक्रिया, प्रकृती चिंताजनक 👉 नवी दिल्ली - प्राप्तिकर भरण्यासाठी विशेष अॅप विकसित करण्याचा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा प्रयत्न सुरू, अॅपचा वापर करून मोबाइलद्वारे प्राप्तिकर भरता येणार 👉 नवी दिल्ली - बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन याची रवानगी तिहार कारागृहात करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश 👉 तामिळनाडू - शशिकला आणि पळनीसामी यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल, अण्णा द्रमुकचे आमदार एस. सर्वनन यांच्या तक्रारीनंतर कुवाथूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ----------------------------------------------------------- तुमच्या फोनचा स्पीड 50 पेक्षा अधिक टक्क्यांनी व बॅटरी पॉवर 20 टक्क्यांनी वाढवणारे फास्ट क्लिनर-स्पीड बुस्टर अ‍ॅप लगेच डाऊनलोड करा http://tracking.performancerevenues.com/SH2Br ----------------------------------------------------------- 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - जगातील महत्त्वाच्या स्थळांवर ड्रोनहल्ला होण्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त करत सावधगिरीचा दिला इशारा 👉 मलेशिया - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाची हत्या करणाऱ्या संशयित महिलेला अटक केल्याचा मलेशियन पोलिसांचा दावा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी मुंबई - निवडणुकीनंतरही राज्य सरकारला कोणताही धोका नाही, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा 👉 नाशिक - नाशिक महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीसाठी 2 लाख रुपयांची मागणी प्रकरण, निवडणूक आयोगाकडून नाशिक भाजप शहराध्यक्षांना नोटीस 👉 नाशिक - जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा केला जाहीर 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल 👉 मुंबई - आदेश पालनाबाबत गेल्या दोन वर्षांत काय केले, याबाबत दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर मांडण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28155.56, निफ्टी : 8724.70, सोने भाव : 29,025 (प्रतितोळा), चांदी : 42,463 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 ऑडी कंपनीने भारतात आपल्या ए4 या लक्झरी सेदान मालिकेतील ए4 35टीडीआय हे नवीन मॉडेल सादर करण्याची केली घोषणा, दिल्लीतील एक्स-शोरूम या मॉडेलची किंमत 40.2 लाख रूपये 🎯 खेळ घडामोडी : 👉 लाहोर - पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी क्रिकेटर नासिर जमशेदचे केले निलंबन 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 बॉलिवूड रॅपर हनी सिंहचे सुपरहिट गाणे ‘धीरे धीरे’चा यू ट्यूबवर धुमाकळ सुरूच, या गाण्याचा व्हिडीओ 20 कोटींहून अधिक जणांनी पाहिला, भारतीय संगीत क्षेत्रात एक विक्रम मानला जातो आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी 'बाजरी' Let's Up Agri Katta उन्हाळा म्हटलं कि, सगळीकडे भकास व सुकलेलं दृश्य पाहायला मिळतं. हिरवं पाहणं तर लांबच त्यात महाराष्ट्रातील काही भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांचा हा मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अशा परिस्थितीत बाजरी हे कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. बाजरी हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. बायफ या संस्थेने उन्हाळी हंगामातील हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी बाजरीची ‘बायफ बाजरी-1’ ही जात विकसित केली आहे. ‘बायफ बाजरी-1’ जातीचे वैशिष्ट्ये : 👉 ही जात जोमाने वाढणारी असून, तिच्या 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत तीन कापण्या मिळतात. 👉 या जातीला भरपूर फुटवे येत असल्याने चाऱ्याचे अधिक उत्पादन मिळते. 👉 बाजरीची ही जात पालेदार, रसाळ, गोड, लव विरहीत, मऊ असून, उंच वाढते. 👉 फेब्रुवारीमध्ये पेरणी केल्यानंतर ही बाजरी जात ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाण्यावर येते. अधिक उत्पादन मिळते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 या बाजरीचा हिरवा चारा तसेच वाळलेला चाराही पौष्टीक असतो. मुरघासही (सायलेज) चांगला तयार होतो. 👉 दोन कापण्यांपासून हिरवा चारा आणि तिसऱ्या कापणीपासून धान्य आणि वाळलेला चाराही मिळतो. धान्य देखील खाण्यास उत्तम आहे. जमीन व पूर्वमशागत : बायफ बाजरी -1 या जातीसाठी मध्यम ते भारी, निचरा होणारी जमीन योग्य आहे. कारण या जमिनीत तिची वाढ वेगाने होते. पेरणीपूर्वी एक नांगरट करून गरज वाटल्यास कुळवाच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन तयार करावी. पाणी व्यवस्थापन : बाजरीची पेरणी केल्यानंतर व बाजरी उगवून आल्यानंतर दोन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यापुढील पाण्याच्या पाळ्या उन्हाळी हंगामामध्ये भारी जमिनीत बारा ते पंधरा दिवसांनी आणि मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी द्याव्यात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 चष्म्याच्या खुणा घालवण्याचे घरगुती उपाय... Let's Up Health Katta हल्ली चष्मा वापरणार्‍यांचे प्रमाण वाढलेय. त्यातच सतत डोळ्यांवर चष्मा असल्यामुळे डोळ्यांच्या बाजूला काही खुणा, व्रण दिसू लागतात. पण काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांनी तुम्ही या खुणा दूर करू शकता. ते कसे त्याबद्दल जाणून घेऊयात... 👉 काकाडीच्या रसामुळे चष्म्याच्या खुणा दूर होतात. 👉 लिंबामुळे ब्लिचिंग होतं. त्यामुळेच अर्ध लिंबू चष्म्याच्या खुणांवर दहा मिनिटे चोळा. दोन मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 कोरफडीचा रस किंवा जेल हा चष्म्याच्या खुणा घालवण्याचा रामबाण उपाय आहे. रात्री झोपताना कोरफडीचा ताजा रस खुणांवर लावावा. रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा. हा उपाय नियमितपणे केल्यास महिनाभरातच तुम्हाला फरक जाणवेल. 👉 सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पूड दुधात मिसळा. जाडसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण खुणांवर लावा. अर्ध्या तासांनी धुवून टाका. 👉 बराच काळ चष्मा वापरल्याने नाकाजवळची त्वचा कोरडी पडते. हा कोरडेपणा मधामुळे दूर होऊ शकतो. एक चमचा मधात गुलाबपाण्याचे काही थेंब घालून हे मिश्रण खुणांवर लावून ठेवा. काही दिवसातच त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. गुलाबपाण्यामुळे वर्ण उजळेल. 👉 म्हणून सालांसह खा फळे... फळं आणि भाज्या खाताना साली काढल्या जातात. पण साली काढल्याने बरीचशी आरोग्यकारक सत्वं नष्ट होतात. फळांच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंटस् आणि जीवनसत्वं असतात. संत्र, मोसंबी यांसारख्या आंबट फळांच्या सालींमध्ये फायबर आणि अन्य आरोग्यदायी घटक असतात. म्हणूनच अशा फळांच्या सालींचा इतर मार्गांनी आहारात समावेश करायला हवा. 👉 जांभळ्या, निळसर किंवा पिवळ्या रंगाची सालं असलेल्या ब्लूबेरी, द्राक्षं, गाजर, किवी यांसारख्या फळांच्या सालींमध्ये ’अँथोसिएनिदिन ग्लायकोसाईडस्’, ’केरोटीन’, ’ल्यूटीन’ अशी रंगद्रव्यं असतात. या रंगद्रव्यांमध्ये शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंटस् असतात. 👉 काही फळांच्या सालीत न विरघळणारं फायबर असतं. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. सफरचंद तसेच इतर काही फळांच्या सालींमध्ये ’पेक्टीन’ नामक फायबर असतं. या फायबरमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. ’हेमो-सेल्यूलोज’सारख्या फायबरमुळे कलोन कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होतो. 👉 फळांच्या सालीमध्ये उष्मांक, साखर आणि चरबी अजिबात नसते. म्हणूनच वजन कमी होतं. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 इस्रोचा जागतिक विक्रम... Let's Up Current Affair पीएसएलव्ही-सी 37' सोबत 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून PSLV- C37 सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण झाले. एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा पहिलाच देश आहे. या उपक्रमात 101 छोटे उपग्रह होते. ज्यांचे वजन 664 किलोग्रॅम इतके आहे. यापूर्वी 2014 मध्ये एकाच वेळी 37 उपग्रह अवकाशात सोडून रशियाने विश्वविक्रम केला होता. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) हे उपग्रह प्रति तास 27 हजार किमी वेगाने अंतराळात सोडण्यात आले. या वेगाने सुमारे 600 सेंकंदात 101 उपग्रह उवकाशात सोडण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता. भारतात यापूर्वी जून 2015मध्ये एकाच वेळी 23 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्य़ा प्रयोगात तब्बल 101 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. पीएसएलव्हीने 214 किलो वजनाच्या कार्टोसॅट-2 साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर 103 सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून 520 कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल. त्यांचे एकूण वजन 664 आहे. यातील 96 उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर 5 उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत. 👉 स्मार्टफोन विक्री ; चिनी कंपन्यांचा बोलबाला इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये भारतीय बाजारात तब्बल 10 कोटी 91 लाख स्मार्टफोन विकले गेले. गतवर्षीच्या तुलनेत 5.2 टक्के अधिक फोन विकले गेले आहेत. त्यात चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन सर्वाधिक संख्येने विकले गेल्याचे नमूद केले गेले आहे. गतवर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात 2.58 कोटी स्मार्टफोन विकले गेले. हा आकडा 2015 इतकाच आहे आणि जुलै ते सप्टेबर या तिमाहीपेक्षा हा आकडा 20.3 टक्क्यांनी कमी आहे. फेस्टीव्ह सीझनमध्ये झालेली जोरदार विक्री पण नोव्हेंबर मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे हा फरक पडला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. चिनी स्मार्टफोन विक्री चौथ्या तिमाहीत एकूण विक्रीच्या 46 टक्के होती. स्थानिक उत्पादकांचा स्मार्टफोन विक्रीत 19.4, सॅमसंगचा 25 तर शाओमीचा वाटा 10.7 टक्के असल्याचेही या आकडेवारीत नमूद केले गेले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 जिओ ; लवकरच '6' सीरिजचा नंबर मिळणार Let's Up Techno Katta रिलायन्स जिओला 6 सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचे बोलले जात आहे. टेलेकॉमटॉक (telecomtalk) च्या रिपोर्टनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच 6 सीरिजचे नंबर वितरीत केले जातील. सध्या मिळालेल्या परवानगीनुसार जिओ एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये 60010-60019, आसाममध्ये 60030-60039 असा MSC कोड असेल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जिओने या सीरिजचे नंबर दिले तर 6 सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत 9,8 आणि 7 या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 गुगल टोरंट साईटस् वगळणार! अवैध डाऊनलोडींग रोखण्यासाठी गुगल लवकरच आपल्या सर्च रिझल्टमधून टोरंट साईटस् वगळणार असून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. टोरंट साईटस् वरून सॉफ्टवेअर, ई-बुक्ससह विविध बाबी सुलभपणे डाऊनलोड करता येतात. तथापि याचा सर्वात मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसत असतो. अगदी चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो टोरंटवर दाखल होत असतो. अर्थात जगभरात तो डाऊनलोडसाठी सहजपणे उपलब्ध होत असल्याने त्या चित्रपटाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असतो. याचप्रमाणे डॉक्युमेंटरीज, दूरचित्रवाणी मालिका, म्युझिक व्हिडीओज आदींसाठीही ही डोकेदुखी ठरत आहे. गेल्या वर्षी भारत सरकारने काही टोरंट साईट बंद केल्या होत्या. मात्र काही महिन्यातच त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. साधारणपणे एखाद्या साईटवर बंदी आल्यास काही दिवसातच ती दुसर्‍या ‘डोमेन नेम’ने सुरू होत असते. आणि ‘गुगल सर्च’च्या मदतीने ती कुणालाही सहजपणे सर्च करता येते. नेमकी हीच बाब लक्षात घेत मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांनी गुगलने टोरंट साईटला आपल्या सर्चमध्ये स्थान देऊ नये अशी मागणी कधीपासूनच केली आहे. गुगलने आता यावर गांभिर्याने विचार करून ही बाब मान्य करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्येच गुगलवर कुणीही टोरंटशी संबंधीत सर्च केल्यानंतर त्याला या साईट दिसणार नाहीत. अर्थात यातून मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, 3 सैनिक शहीद तर 6 जवान आणि एक नागरिक असे 7 जण जखमी 👉 नवी दिल्ली - मुस्लिमांमधील तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेच्या केवळ कायदेशीर बाजूंशीच संबंधित प्रश्नावर आम्ही निर्णय घेऊ - सर्वोच्च न्यायालय 👉 नवी दिल्‍ली - भारतीय अंतराळ संशोधक संस्था अर्थात इस्रो आज इतिहास रचणार, एकाचवेळी 104 उपग्रहांचे प्रक्षेपण इस्रोकडून करण्यात येणार 👉 उत्तरप्रदेश - येथे आज दुस-या टप्प्यातील 11 जिल्ह्यातील 67 विधानसभा जागांसाठी मतदानास शांततेत सुरुवात (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 तैवानमध्‍ये वृध्‍द पर्यटकांना घेऊन जाणारी एक बस राजमार्गावर पलटी झाली, 32 जणांचा मृत्‍यू तर 12 जण गंभीर जखमी 🎯 राजकीय घडामोडी : 👉 चेन्नई - अडचणीत असतानाही आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी समाधानी, आम्हाला सरकार स्थापनेसाठी लवकरच निमंत्रण मिळेल - शशिकला 👉 मुंबई - दोन कोंबडी झुंजत आहेत, निवडणुकीनंतर पुन्हा सोबत येतात, राज ठकरेंची सेना-भाजपावर अप्रत्यक्ष टीका 👉 मुंबई - मुंबईत गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे त्यामुळे काहीही झाले तरी भाजपा शिवसेनेचा नंबर घेऊ शकत नाही - शरद पवार 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - मुंबईत सहा मार्चला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीच बारावीचा पेपर असल्याने बारावीचा पेपर पुढे ढकलावा - आयोजक, मराठा क्रांती मूक मोर्चा 👉 भिवंडी - भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या केली 👉 मुंबई - मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल ते जून या महिन्यात उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला, मध्य रेल्वेकडून 52 सुपरफास्ट ट्रेन सोडल्या जातील 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैदराबाद - बांगलादेशविरुद्ध सगळ्यांनीच चांगली कामगिरी केली असली तरी आमचे लक्ष ऑस्ट्रेलिया विरुद्ध होत असलेल्या चार लढतींच्या कसोटी मालिकेकडेच - विराट कोहली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 पुणे - प्रसिद्ध बॉलीवूड संगीत संयोजक, वादक केरसी लॉर्ड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार प्रसिद्ध अकॉर्डिंन आणि पियानो वादक एनोक डॅनिअल्स यांना संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांचा हस्ते प्रदान 👉 कोटा - शाहरुख खान विरोधात गुन्हा दाखल, रईस सिनेमाच्या प्रमोशनवेळी कोटा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा दाखल (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात गोळीबार, 3 जवान शहीद, एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश 👉 नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधीची शेअर मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा विचार, आता हे प्रमाण सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याचा विचार 👉 नवी दिल्ली - सिनेमा किंवा डॉक्युमेंट्रीमध्ये जर राष्ट्रगीत सुरु झालं, तर उभं राहण्याची गरज नाही. मात्र थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं लागेल : सुप्रीम कोर्ट 👉 नवी दिल्ली - एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने दिला मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरल्याने शशिकला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॊशिंग्टन - सन 2015 मध्ये जगभरात प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक भारत आणि चीन या देशांमधे झाले, हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटच्या अहवालातील माहिती (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी, शशिकला यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, ई पलनीसामी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती 👉 नवी दिल्ली - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 👉 मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेसचे व्हॅलेंटाइन फिक्स, काँग्रेसने शिवसेनेला दिले 10 जागांचे गिफ्ट : विनोद तावडे 👉 सांगली - मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. मात्र, जर चळवळीची मशागत चांगली झाली असेल, तर नवी पेरणी करू नको, असं मुलांना का सांगू?”, ‘स्वाभिमानी’चे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्पष्टीकरण 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा मृत्यू, महिन्याभरात दुस-या वाघाचा मृत्यू, वन कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना वाघाचा मृतदेह आढळला 👉 यवतमाळ - पारवा येथे इलेक्ट्रिक पोल वाहून नेणारा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार, 1 जण गंभीर जखमी, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश 👉 कोल्हापूर - जेष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा चोरीस, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28339.31, निफ्टी : 8792.30, सोने भाव : 29,118 (प्रतितोळा), चांदी : 42,576 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मुंबई - पायरसीविरोधात एक पाऊल पुढे टाकत गूगलने टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा घेतला निर्णय, गूगलसोबतच बिंग, याहू, यांसारखे सर्च इंजिननही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालणार 🎯 खेळ घडामोडी : 👉 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, अजिंक्य रहाणे, रिद्धीमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकूंद आणि हार्दिक पंड्या 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी 2' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड जारी, पहिल्या 3 दिवसातच जॉली एलएलबीची कमाई 50 कोटी 46 लाख रुपये (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 ब्रेकिंग न्यूज अँजिओप्लास्टी स्वस्त; स्टेंटच्या किंमतीत 85 टक्क्यांपर्यंत घट अँजिओप्लास्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत चक्क 85 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. हे नवे दर आज 14 फेब्रुवारीपासून लागू होणार असून, या नव्या दरप्रणालीमुळे लाखो सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय फार्मास्युटिकल दर प्राधिकरणाने या स्टेंटच्या किंमती ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार बायोरिसॉर्बेबल स्टेंटची किंमत 30 हजार रूपये, तर, बेअर मेटल स्टेंटची किंमत 7 हजार 500 रूपये इतकीच आकारण्याबाबत ठरवून दिले आहे. आतापर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या ड्रग एल्युटिंग स्टेंटची किंमत सध्यास्थितीत 24 हजार ते दीड लाख रूपये तर, बायोरिसॉर्बेबल स्टेंटची किंमत सादारन 1.7 ते 2 लाख रूपयांच्या घरात आकारण्यात येत होती. भारतामध्ये वापरल्या जात असलेल्या 95 टक्के स्टेंट या ड्रग एल्युटिंग प्रकारात मोडणाऱ्या असतात. ज्या स्थानिक कंपन्या असे स्टेंट बनवतात त्यासाठी साधारण 8 हजार रूपये खर्च येतो. हे स्टेंट बनविणाऱ्या कंपन्यांपेक्षा वितरकांना यात प्रचंड नफा होतो. वितरकांना होत असलेला नफा हा 13 टक्क्यांपासून ते 200 टक्क्यांपर्यंत होतो. त्यात परत या किंमतीमध्ये हॉस्पिटलही वाढ करतात. ही वाढ 11 ते 654 टक्क्यांपर्यंत केली जाते. त्यामुळे मुळ उत्पादकापासून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचलेल्या स्टेंटच्या किंमतीत तब्बल 10 पटींनी वाढ होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

दत्तक मुलाला वाढवताना... Let's Up Parenting Katta हल्ली दत्तक मुलं घेण्याचं प्रमाण वाढलंय. दत्तक मुलं घेताना सोबत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे मूलाचा स्वभाव कसा आहे? हे आपल्याला माहिती नसते. अशा वेळी त्याला समजून घेणं, त्याला भरपूर प्रेम देणं. या गोष्टी अगदी मनापासून कराव्या लागतात. हे सगळं करणं म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच. म्हणूनच पुढील काही उपायांचा अवलंब करुन तुम्हाला मुलाच्या वागणुकीत सकारात्मक बदल करता येतील... मुलाचे मन वळवा : मुलाला घरी आणल्यानंतर तो अनावश्यक गोष्टीत त्याचा वेळ वाया घालवत असतो. कदाचित तो त्या गोष्टीत गुंतलेला असतो. अशावेळी न चिडता त्याचे त्या गोष्टीतून मन वळवा. उदाहरणार्थ तुम्ही एखादे काम करत असल्यास त्याला सोबत घ्या. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) काही वेळा दुर्लक्ष करा : मुलांकडे दुर्लक्ष केले तर ते बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात पण काही वेळा दुर्लक्ष करणं मुलांच्या व पालकांच्या दृष्टीने फायदेशीर असतं. उदाहरणार्थ मूल अंगठा चोखत असेल किंवा त्याने बेडवर कपडे अस्ताव्यस्त टाकले असतील, तर काही वेळा दुर्लक्ष करा. टाईम आउट टेक्निक : मुलाला दूर ठेऊन शिस्त लावण्याचे तंत्र म्हणजे 'टाईम आउट टेक्निक'. दत्तक घेतलेले मूल जर वाईट वागत असेल, तर काही तास त्याला एखाद्या कोपऱ्यात किंवा खोलीत बसवा. मात्र या उपायांविषयी तज्ज्ञांशी बोलून घ्या. टाईम इन टेक्निक : टाईम इन टेक्निक हि पद्धत 'टाईम आउट टेक्निक'च्या अगदी उलट आहे. या पद्धतीत मुलाला तुमच्या जवळ प्रेमाने घ्या किंवा त्याला तुमच्या जवळ घ्या. उदाहरणार्थ तुम्ही स्वयंपाक करताना मुलाला सरळ तुमच्यासमोर उभे करा. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 ‘बाहुबली 2’ शाहरुख आणि चर्चा! Let's Up Entertainment Katta अभिनेता शाहरुख खान बाहुबलीच्या सिक्वलमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुखने काम करावे म्हणून सध्या जोरदार प्रयत्न सुरु असून ‘बाहुबली’ चित्रपटाची टीम किंवा शाहरुख खानने या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, या चित्रपटात शाहरुख कोणत्या भूमिकेत दिसेल याची चर्चा रंगताना दिसत आहे. एवढेच नाही तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तो चित्रपटात किती वेळ प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, याचे अंदाज बांधण्यात शाहरुखच्या चाहत्यांसह बॉलिवूड दंग झाले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 प्रभासचा नवा चित्रपट 150 कोटींचा... दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या नव्या चित्रपटाच्या कामात गुंतला आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी प्रभास 19 या नावाने प्रोजेक्टचे काम सुरू आहे. हा चित्रपट 3 भाषेत बनणार असून याचे बजेट 150 कोटी रुपयांचे आहे. चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. प्रभासचा हा नवा चित्रपट तेलुगु, तामिळ आणि हिंदी भाषेत बनणार असल्याचे निर्मात्याने जाहिर केले आहे. शूजीत यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात प्रभास पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. पुढील महिन्यात चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होईल. शंकर - एहसान - लॉय या चित्रपटासाठी संगीत देणार आहेत. 👉 ‘हाफ गर्लफ्रेंड’चे पहिले पोस्टर रिलीज अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा पोस्टर #halfgirlfriend #filmfact1 अशा हॅशटॅग अंतर्गत प्रदर्शित करण्यात आला आहे. बास्केट बॉल कोर्ट अतिशय लक्षवेधी अशा या पोस्टरमध्ये दिसत असून एनबीए या विश्वविख्यात बास्केटबॉल लीगविषयीची माहिती या पोस्टरवर देण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 19 मे ला प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा, अर्जुनच्या या आगामी चित्रपटाचे कथानक प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकावर आधारलेले असून या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर एका सर्वसामान्य बिहारी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो दिल्लीच्या एका श्रीमंत तरुणीच्या (आलियाच्या) प्रेमात पडतो. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाचा बॉल बास्केटमध्ये जाण्यात यश मिळवणार का हे येत्या काळात कळेलच. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 Let's Up Status Katta 👉 हर गम की दवा नहीं होती, क्या होता जो दुआ नहीं होती, बे-खौफ लोग तोड़ देते हैं दिल, ये सोच कर, की इस जुर्म की कोई सजा नहीं होती...! 👉 ज़िन्दगी को खुशनुमा बनाने में रह गए, हर किसी के गम को मिटाने में रह गए, समझा ना किसी ने हमें अपना और, हम सबको अपना बनाने में रह गए... 👉 हर उदासी दिल पर छाई हुई, हर खुशी है मुझसे घबराई हुई, और क्या रखा है ज़िन्दगी के दामन में, चंद कलियाँ हैं वो भी मुरझाई हुई... 👉 अभी सूरज नहीं डूबा जरा सी शाम होने दो, मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम होने दो, मुझे बदनाम करने का बहाना ढूंढते हो क्यों, मैं खुद हो जाऊंगा बदनाम पहले नाम होने दो... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 ये दुनिया वाले भी बड़े अजीब होते हैं, कभी हमसे दूर तो कभी करीब होते हैं, दर्द ना बताएं तो हमें कायर कहते हैं, और दर्द बता दें तो शायर कहते हैं...! 👉 ना संघर्ष न तकलीफ, तो क्या मज़ा है जीने में, बड़े-बड़े तूफ़ान थम जाते हैं, जब आग लगी हो सीने में...! 👉 हम चाहे तो भी भुला नहीं सकते, तेरी यादों से दामन छुड़ा नहीं सकते, तेरे बिना जीना एक पल भी नामुमकिन है, तुम्हें चाहते हैं इतना बता नहीं सकते...! 👉 दिल की आवाज़ को इज़हार कहते हैं, झुकी निगाह को इकरार कहते हैं, सिर्फ पाने का नाम इश्क नहीं होता, कुछ खोने को भी प्यार कहते हैं... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 पीएफमधील पैसे काढा ऑनलाईन Let's Up Current Affair कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल 2017पासून ऑनलाईन पीएफचे पैसे काढू शकतात. यासाठी स्वतःच्या कंपनीत किंवा कार्यालयात पैसे काढण्याचा फॉर्म भरण्याची गरज नाही. याचा फायदा 17 कोटी सदस्यांना होणार आहे. ईपीएफओच्या कार्यालयांना सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन एप्रिलपासून ऑनलाईन पीएफ काढण्यास सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, ऑनलाईन सेवा सुरु झाली की, ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सध्या पीएफ काढण्यासाठी पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तो कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटकडे जमा करावा लागतो. नंतर तो फॉर्म ईपीएफओ कार्यालयात जातो, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे ऑनलाईन ऑप्शन चांगला आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 यंदा साखर टंचाई अन् दरवाढ! साखर हा देशाच्या राजकीय व आर्थिक दृष्टीने संवेदनशील मुद्दा मानला जातो. देशात दरवर्षी 2.45 कोटी टन साखरेची मागणी असते. मात्र यंदा देशात साखर उत्पादन घटले असून साधारण 2.25 कोटी टन उत्पादन येईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र साखर ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन 2 कोटी टनांपर्यंत असेल. मागील स्टॉक 77 लाख टनांचा आहे. तरीही 2017 मध्ये साखर आयात करावी लागेल व त्याचा निर्णय एप्रिलमध्येच सरकारला घ्यावा लागेल. साखर आयात करायची झाली तर दुबई व थायलंडला प्राधान्य दिले जाईल असेही समजते. साखर आयात करताना सरकार आयात शुल्क रद्द करण्याचीही शक्यता आहे. सध्या हे शुल्क 40 टक्के इतके आहे. देशातील साखरेची मागणी पुरी करण्यासाठी किमान 15 लाख टन साखर आयात करावी लागेल असे ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल विथलोनी यांनी सांगितले. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - कर्मचारी भविष्‍य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल महिन्यापासून ऑनलाईन पीएफ काढू शकतात, यामुळे ईपीएफओच्या 17 कोटी सदस्यांना होणार फायदा 👉 नवी दिल्ली - हिंदू लोक धर्म परिवर्तन घडवत नाहीत, तर इतर देशांच्या तुलनेत या देशातील अल्पसंख्याकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे - केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू 👉 नवी दिल्ली - एक्झिट पोल घेतल्यामुळे दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्रावर एफआयआर दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश 👉 चेन्नई - जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात सहआरोपी असलेल्या शशिकला नटराजन यांचा आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पाकिस्तानाच्या लाहोरमधील विधानसभेजवळ बाॅम्बस्फोट, यामध्ये उच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासह 13 जणांचा मृत्यू तर स्फोटात अनेकजण जखमी 👉 पॅरिस - दक्षिण फ्रान्सच्या साव्वा प्रांतातील स्काई र्झिाटमध्ये झालेल्या हिमस्खलनात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मध्यावधी निवडणुका झाल्यास राज्याचं फार नुकसान होणार नाही, मध्यावधी निवडणुकीचे शरद पवार यांच्याकडून संकेत 👉 पुणे - राष्ट्रवादी ही कनफ्युज पार्टी, येत्या काळात त्यांच्याकडे पुण्यासह पिंपरी चिंचवडही राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉 सांगली - ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल - खासदार राजू शेट्टी 👉 मुंबई - महापालिका निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत कदापि जाणार नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या 16 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे कंत्राट जीव्हीके कंपनीला, जीव्हीके कंपनी विमानतळही चालवणार 👉 सोलापूर - सोलापूर येथे रेल्वेतून 14 किलो सोने जप्त, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडे चार कोटी रुपये 👉 वाशिम - आसेगाव पेन येथील तलाठी दीपक लहाने 8 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडला, वाटणीच्या नोंदीसाठी केली होती पैशांची मागणी 🎯 खेळ घडामोडी : 👉 हो चीमिन्ह - येथे आजपासून सुरू होत असलेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतून आघाडीच्या खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारतीय संघातून माघार घेतली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिची बहीण इसाबेल ही बॉलीवूड पदार्पणाच्या तयारीत, कतरिनाच्याच होम प्रॉडक्शनमधून एंट्री करणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

प्रॉपर्टी गहाण ठेवणे म्हणजे काय? Let's Up Useful Info आपल्या गरजा, वाढती महागाई आणि जबाबदाऱ्या पाहता आपल्यापैकी कित्येकांना कर्ज घ्यावे लागते. पण कर्ज घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. तसेच बॅंकेलाही त्यांची रक्कम परत मिळेल याची हमी हवी असते, त्यासाठी रकमेच्या बदल्यात प्रॉपर्टी गहाण (मॉर्गेज) ठेवली जाते. ही सर्व प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याबद्दल जाणून घेऊयात… 👉 मॉर्गेज म्हणजे काय? मॉर्गेज म्हणजे एखादी वस्तू गहाण ठेवणे होय. जेव्हा आपल्याला कर्जाची गरज असते, अशा वेळी बॅंक कर्ज उपलब्ध करून देते. पण त्यासाठी तुम्हाला जमीन घर किंवा यासारखी एखादी प्रॉपर्टी(मालमत्ता) बँकेकडे मॉर्गेज(गहाण) म्हणजे फक्त तुमच्या कर्जाची परत फेड व्यवस्थित व्हावी, यासाठीची तरतूद असते. 👉 मॉर्गेज केव्हा घेऊ शकता ? मॉर्गेजसाठी तुमच्याकडे स्वतःच्या नावावर काही प्रॉपर्टी असणे आवश्यक असते, म्हणजे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे तरच बॅंक तुम्हाला मॉर्गेज द्यायला तयार होतात. 👉 प्रॉपर्टी गहाण कशी ठेवायची? एखादी प्रॉपर्टी गहाण ठेवायची म्हणजे बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेताना कर्जाची सुरक्षितता (लोन सिक्युरिटी) म्हणून ती प्रॉपर्टी बँकेकडे ठेवावी लागते. कर्जदात्याने निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड केली नाही तर गहाण ठेवलेली प्रॉपर्टी विकून कर्जाच्या रकमेची भरपाई करण्याचा अधिकार बँकेला असतो. त्यासंदर्भात कर्ज घेणारा आणि बँक यांच्यात एक कायदेशीर करार करण्यात येतो. कर्जाचे कागदपत्रं तयार करतानाच प्रॉपर्टी गहाण ठेवल्याची कागदपत्रंही तयार केली जातात. कर्ज देणाऱ्या बँका एकापेक्षा जास्त असतील तर कोणाकडे किती प्रॉपर्टी गहाण ठेवायची याचं प्रमाण ठरतं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्टच्या सेक्शन 58 नुसार एखादी प्रॉपर्टी गहाण ठेवणं म्हणजे सुरक्षेच्या उद्देशाने तिच्या मालकी हक्काचं हस्तांतरण करणं होय. प्रॉपर्टी गहाण ठेवण्याची परिस्थिती आणि करारातल्या तरतूदीही वेगवेगळ्या असतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 प्रॉपर्टी गहाण ठेवण्याचे 2 प्रकार रिपेमेंट मॉर्गेज : मॉर्गेजच्या दोन प्रकारांपैकी कुठल्याही एका प्रकारे तुम्ही मॉर्गेज रिपेमेंट मॉर्गेजपेमेंट बँकेला करावे लागते. त्यासाठी बॅंक तुम्हाला मासिक हफ्ते ठरवून देते, ती रक्कम दर महिन्याला भरावी लागते. मॉर्गेजवर व्याज आकारणी दर महिन्याला भरण्यात येणा-या रकमेतून बॅंक व्याज वजा करत राहते आणि जर तुम्हाला एकदम मुद्दल मधून रक्कम वजा करायची असेल, तर त्यासाठी वेगळी मोठी रक्कम भरणे गरजेचे आहे अशा प्रकारे या दोनही प्रकारात तुम्ही कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही बँकेला पैसे ठराविक मुदती मध्ये परत केले नाहीत किंवा ठरवून दिलेले हप्ते वेळेत भरले नाहीत, तर बॅंक तुम्हाला नोटीस देते आणि त्या नंतरही तुम्ही पैसे भरले नाहीत तर बॅंक तुम्ही मॉर्गेज (गहाण) ठेवलेली मालमत्ता जप्त करते. इंटरेस्ट ओन्ली मॉर्गेज : आपण ठराविक काळामध्ये मॉर्गेज घेऊ शकता त्यासाठी घेतलेल्या रकमेचे प्रॉपर्टी बॅंक स्वतः च्या ताब्यात घेते. शक्यतो मोर्गेज घेणे टाळावे पण जर आवश्यक असेल तर लवकरात लवकर त्याच्या कचाट्यातून सुटनेच योग्य कारण जरी ही गहाणवट सावकारी पद्धतीची नसली तरी व्याजाची रक्कम वाढतच जाते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकार तब्बल 2.83 लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणार, गृह मंत्रालयात 6,076, पोलिस विभागात 1.06 लाख, विदेश मंत्रालयात 2,109 जागा भरल्या जातील 👉 नवी दिल्ली - विविध समस्यांविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील खाजगी, विदेशी व राष्ट्रीयकृत बँकांतील 10 लाख बँक कर्मचारी व अधिकारी 28 फेब्रुवारीला एक दिवसीय संपावर जाणार 👉 नवी दिल्ली - पाकिस्तानात बनवलेल्या 2 हजार रूपयांच्या नव्या नोटा बांगलादेशमार्गे भारतात पाठवल्या जात असल्याचे उघड 👉 नवी दिल्ली - व्यापम प्रकरणी कोर्टाचा दणका, 2008 ते 2012 या कालावधीत प्रवेश घेतलेल्या MBBSच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेशच न्यायालयाने केले रद्दबादल 👉 नवी दिल्ली- पनामा पेपर लीकप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी 👉 नवी दिल्ली- विक्री आणि पुरवठ्यावर बंदी आणून तंबाखूवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करा, दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 लॉस अँजेलिस - भारतीय तबलावादक संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार, ‘सिंग मी होम’ या गाण्यासाठी जागतिक संगीत प्रकारात दास यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळाला (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 रायगड - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे विरोधातील 5 उमेदवारांनी निवडणुकीपूर्वीच घेतली माघार 👉 सांगली - राष्ट्रवादीचे नेते आणि वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील आणि काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केला भाजपमध्ये प्रवेश 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच रेल्वे गाड्यांच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार, हे दरवाजे फक्त रेल्वे स्थानकांमध्येच उघडले जातील 👉 नवी मुंबई - दिघा येथील पांडुरंग आणि मोरेश्वर इमारतींना सील करण्यास आलेल्या एमआयडीसीच्या प्रशासनाला इमारतीतील राहिवासियांनी सील करण्यापासून रोखले 👉 मुंबई - मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून 2 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त, सोन्याची किंमत जवळपास 63 लाख इतकी 👉 नाशिक - नाशिक-पुणे रस्तेप्रवास आता सुपरफास्ट होणार, वाहतुकीसाठी नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा 137 किलोमीटरचा मार्ग खुला 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28351.62, निफ्टी : 8805.05, सोने भाव : 29,147 (प्रतितोळा), चांदी : 42,680 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 आसुसचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन झेनफोन 3एस मॅक्स सादर, याची रॅम 3 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी, कॅमेरे 13 आणि 8 मेगापिक्सल्स, ओएस अँड्रॉईडच्या नोगट, या फोनची किंमत 14,999 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैदराबाद - विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताणे सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला, विशेष म्हणजे विराट हा सर्वाधिक 19 कसोटी सामने अपराजित राहणारा भारताचा कर्णधारही ठरला 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर बनलेला चित्रपट ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे 2017 रोजी प्रदर्शित होणार, सचिनने ट्विटरवर सिनेमाचे पोस्टर केले शेअर (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय Let's Up Sports Katta विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हैदराबादच्या एकमेव कसोटीत बांगलादेशला 208 धावांनी हरवून, सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने बांगलादेशला विजयासाठी 459 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशला पाचव्या दिवशी 250 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 4 तर ईशांत शर्माने 2 विकेट घेतल्या. तर या कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 मुरलीधरनची भीती वाटायची : सेहवाग माझ्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचीच भीती वाटायची, असे टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने कबूल केले आहे. मुरलीधरनचा अचूक टप्पा आणि गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणे अवघड होते, असे सेहवागने सांगितले. मुरलीधरनने तीनवेळा सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र सेहवागने 2008 च्या श्रीलंका दौऱ्यात मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार केला होता. गॅले कसोटीत सेहवागने नाबाद 201 धावा ठोकल्या होत्या. याशिवाय सेहवाग आणि मुरलीधरन यांच्यातील आणखी एक द्वंद्व 2009 मध्ये मुंबई कसोटीत पाहायला मिळाले होते. त्यावेळीही सेहवागने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत 293 धावा ठोकल्या होत्या. सेहवागने अनेक गोलंदाजांची धुलाई केली. त्यामध्ये मुरलीधरनचाही समावेश असला, तरी त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे सेहवाग काहीसा बिचकत होता. 👉 शिखर धवनचे लक्ष्य पुनरागमन! भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने राष्ट्रीय संघातल्या पुनरागमनासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यंदा 1 ते 18 जून या कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निवडीला अजूनही 3 महिन्यांचा अवधी आहे, याकडे लक्ष वेधून धवन म्हणाला की, त्या अवधीत मला 3-4 स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी बजावली, तर मला भारताच्या वन डे संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते, असा विश्वासही धवनने व्यक्त केला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत शिखर धवन अपयशी ठरला होता. तिसऱ्या सामन्यापासून त्याला भारताच्या वन डे संघातून वगळण्यात आले. तसेच 2016 सालच्या मार्च महिन्यानंतर शिखर धवनला भारताच्या टी-20 संघातूनही वगळण्यात आले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 घसेदुखीने हैराण? करा घरगुती उपचार! Let's Up Health Katta आपल्या अन्नमार्गातील तसेच श्‍वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे घसा. तसेच आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहिती खाली दिली आहे. 👉 घसा दुखणे - दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 घसा खवखवणे - बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो. 👉 खोकल्याची ढास येत असल्यास - आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो. 👉 तोंड येणे, तोंडात पुरळ - तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते. 👉 घशात जळजळ, घसा बसणे - वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 गुगलचे ‘युट्युब गो’ अ‍ॅप लाँच Let's Up Techno Katta भारतात इंटरनेटचा वेग म्हणावा तसा नाही. यामुळे युट्युबवरील व्हिडीओ पाहणे अथवा शेअर करण्याला खूप मर्यादा पडतात. त्यामुळे खास भारतीय युजर्ससाठी गुगलने युट्युब गो हे अ‍ॅप लाँच केले असून याच्या मदतीने अगदी ऑफलाईन असतांनाही युट्युबवरील व्हिडीओ शेअर करता येणार आहे. सध्या तरी हे अ‍ॅप प्रायोगिक पातळीवर आहे. अर्थात कुणालाही नोंदणी करूनच त्याची बीटा आवृत्ती डाऊनलोड करता येते. यातील काही फिचर्स हे अत्यंत अभिनव असेत आहेत. यात प्रत्येक व्हिडीओ डाऊनलोड वा स्ट्रीम करण्याआधी तो किती मेगाबाईटचा आहे? याची माहिती येते. तसेच तो युजर्सला हव्या तितक्या मेगाबाईटमध्ये पाहता येतो. अर्थात या माध्यमातून डाटा बचत करण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर हा व्हिडीओ सेव्ह करून तो कधीही पाहण्याची सुविधाही दिलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इंटरनेट नसतांनाच म्हणजेच ऑफलाईन असतांनाही हा व्हिडीओ ब्ल्यू-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधीत युजर आपल्या मित्रांना शेअर करू शकतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 फेसबुक मिळाले कमाईचे नवीन माध्यम सध्या आपल्याला आपल्या फेसबुक न्यूज फिडमध्ये अनेक जाहिराती दिसत असतात. याचप्रमाणे फेसबुक पेजवरही जाहिराती असतात. मात्र आजवर ग्रुप्समध्ये जाहिराती देण्यात आलेल्या नव्हत्या. आता मात्र या सोशल नेटवर्कींग साईटने ग्रुप्सलाही टार्गेट केले आहे. या अनुषंगाने लवकरच विविध फेसबुक ग्रुप्समध्ये जाहिराती दिसणार आहेत. अर्थात यातून या साईटला कमाईचे एक नवीन माध्यम मिळेल. विविध ग्रुप्समध्ये जाहिराती दाखविण्याची आता चाचणी सुरू झाली आहे. 👉 ऑफलाईन मोडमध्ये पहा सिनेमा आता जिओ सिनेमा अॅप द्वारे ऑफलाईन मोडमध्येही सिनेमा पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. अर्थात चित्रपट मोठा असेल तर 1 जीबी डेटा संपून जाण्याची शक्यता आहे. मात्र स्मार्ट डाऊनलोड फिचर नुसार रात्री 2 ते 5 या काळात डाऊनलोड शेड्युलमध्ये अनलिमिटेड डेटा डाऊनलोड करता येणार आहे. हा हॅपी अवर्समधला डाउनलोड 1 जीबीचा रेग्युलर डेटा व्यतिरिक्त आहे. शिवाय 1 जीबी डाऊनलोड मर्यादा संपली तरी फोर जी स्पीड इंटरनेट मिळणार आहे. अर्थात त्यासाठी बूस्टर पॅक घ्यावा लागेल. त्याचा रेट 1 जीबीसाठी 51 रूपये असून 6 जीबीसाठी 301 रूपये आहे. जिओ युजर्स त्यांचा आवडता चित्रपट इंटरनेट शिवाय डाउनलोड करू शकणार आहेत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भारत पुन्हा विश्वविजेता Let's Up Current Affair पाकचा 9 विकेटने धुव्वा उडवून भारताच्या दृष्टीहिन संघाने सलग दुसर्‍यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघाने 9 पैकी 8 लढती जिंकून फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे पाकला नमवण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. पाकने 9 बाद 197 अशी भक्कम मजल मारली होती. भारताने हे टार्गेट 1 विकेट गमावूनच पूर्ण केले. प्रकाश जयारामैशाने नाबाद 99 तर अजयकुमार रेड्डीने 43 धावा केल्या. पाकला या लढतीत एकही विकेट मिळाली नाही. कारण रेड्डी धावचित झाला. स्पर्धेत 570 धावा करणारा पाकचा बादर मुनीर ‘मॅन ऑफ दी सीरिज’ ठरला. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राचे यशस्‍वी परीक्षण भारताने ओडिशाच्‍या किनार्‍यावरुन बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राचे यशस्‍वी परीक्षण केले. अब्‍दुल कलाम द्वीप (आयटीआर) येथून काल सकाळी सात वाजून 45 मिनिटांवर प्रक्षेपण केले. भारत हा अशा प्रकारचे तंत्रज्ञान मिळवणारा जगातील पाचवा देश ठरला आहे. याआधी हे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया, चीन आणि इस्त्राइल या देशांकडेच होते. चाचणीदरम्यान पृथ्वी डिफेन्स व्हेइकल (PDV) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याला आकाशात 97 किमी उंचीवर नष्ट केले. या चाचणीसाठी बंगालच्या उपसागरातून एका कृत्रिम बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 👉 इस्त्रो करणार जागतिक विक्रम इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्त्रो) शुक्र ग्रहावर तसेच पुन्हा मंगळाच्या कक्षेत पोहचण्याची मोहीम आखली आहे. याशिवाय एकाचेवळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचे नियोजन ही केले आहे. एकाचवेळी 104 ग्रह अवकाशात सोडण्यात जर यश आले तर तो जागतिक विक्रम ठरणार आहे. यापूर्वी रशियाने एकावेळी 37 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. पीएसलव्हीच्या सहायाने 3 भारतीय आणि 101 परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचे नियोजन इस्त्रोने केले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मिर - कुलगाम येथील चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, एका नागरिकासह सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद तर तीन जवान जखमी 👉 नवी दिल्ली - सायबर हॅकर्सनी केंद्रीय गृहखात्याची वेबसाइट केली हॅक, वेबासाइट हॅक झाल्याचे समोर येताच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने ही वेबसाइट ब्लॉक केली 👉 नवी दिल्ली - नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरून चोरीस गेलेली नोबेल पुरस्काराची प्रतिकृती शोधून काढण्यात पोलिसांना यश, तीन चोरट्यांना केली अटक 👉 छत्तीसगड - नारायणपूरमध्ये कोडलियारच्या जंगलात पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशन मोहिमेत 4 नक्षलवाद्यांना केली अटक 👉 लखनऊ - समाजवादी पार्टीचे अलापूर मतदारसंघाचे उमेदवार चंद्रशेखर कन्नोजिया यांचं प्रचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 अमेरिकेचे जापानला शंभर टक्के समर्थन, उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर ट्रम्प यांनी जापानला दिलं आश्वासन 👉 वॉशिंग्टन - पनामा पेपर लिक प्रकरणी दोन जणांना अटक , रॅमन फॉसेका मोरा व जर्गेन मोसॅक यांना अटक 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - भाजपला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 50 जागा मिळतील - भाजप अध्यक्ष अमित शहा 👉 चेन्नई - यापुर्वीही पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला, काही लोक आहेत, जे आजही महिलांचं नेतृत्व स्विकारायला तयार नाहीत - शशिकला 👉 मुंबई - 14 फेब्रुवारीला फुटणार मनसेच्या प्रचाराचा नारळ, मुंबई, ठाणेसह नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या जाहिर सभा 👉 मुंबई - गुहेत बसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलतात, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत दाखवली त्यासाठी 56 इंचाची छाती असावी लागते - मुख्यमंत्री 👉 पुणे - महापालिका प्रचारासाठी एमआयएम खासदार ओवेसींच्या प्रचार सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली, 14 फेब्रुवारीला होतं सभेचं आयोजन 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 गडचिरोली - सिरोंचाजवळील गोदावरी नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या सुमारे 37 ट्रक व 3 जेसीबी वाहनांवर कारवाई 👉 सांगली - राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सूनच्या गाडीला प्रचारासाठी जात असताना झाला अपघात, आठ जण जंखमी 👉 सिंधुदुर्ग - दक्षिण कोकणातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात, महाशिवरात्रीनिमित्त 24 पासून यात्रोत्सव 👉 औरंगाबाद - प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे एक मार्च पासून काळ्या फिती लावून काम 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैद्राबाद - येथील भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेश दुसऱ्या डावात 3 बाद 103 धावा, अजूनही 356 धावांची आवश्यकता 👉 बंगळुरु - दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकावर भारताने सलग दुसऱ्यांदा कोरले नाव, पाकिस्तानचा 9 विकेट्सने उडवला धुव्वा 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 आमचा बाप अन् आम्ही या पुस्तकावर लवकरच चित्रपट, यात अभिनेते नाना पाटेकर हे माझ्या बापाची भूमिका साकारणार - डॉ. नरेंद्र जाधव 👉 मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्या दोन दिवसात 30.51 कोटी रुपयांचा जमवला गल्ला (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)