LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारताच्या छेदक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, शत्रूच्या माऱ्याला हे क्षेपणास्त्र निष्प्रभ करते, मोदींनी केले वैज्ञानिकांचे अभिनंदन
👉 नवी दिल्ली - देव आणि भक्तांच्या संवादात पुजारी अडथळा आणू शकत नाहीत : दिल्ली उच्च न्यायालय
👉 नवी दिल्ली - वरिष्ठ सनदी अधिकारी अजय त्यागी यांची सेबीच्या अर्थात सुरक्षा आणि विनिमय बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड
👉 नवी दिल्ली - 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर भारतात राहिलेले वांग की हे चीनच्या सैन्यातील जवान तब्बल 5 दशकांनंतर मायदेशी परतले
👉 चंदीगढ - हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नीच्या भाच्याची एका हायप्रोफाईल प्रकरणात बीएमडब्ल्यू कारने चिरडून हत्या, आरोपींना पकडण्यात अद्याप पोलिसांना अपयश
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - गुरूचा चंद्र असलेल्या युरोपावर रोबोटिक लॅंडर पाठविण्याची नासाची योजना, येथे जीवन शोधण्याचा नासाचा प्रयत्न असणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 लखनऊ - पंतप्रधानांना केवळ जन्मकुंडल्या वाचणं, गुगलवर सर्च करणं आणि लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणं, याचीच आवड आहे : राहुल गांधी
👉 बीड - मुंडे साहेब तारीख बदलणारे नव्हते, ते इतिहास बदलणारे होते. शिवाय, उभ्या महाराष्ट्रात मुंडे साहेबांचा अपमान कदापि सहन करणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - दोन वर्ष आणि सात महिन्याच्या कालावधीत मुंबई मेट्रोमध्ये 25 कोटी प्रवाशांनी केला प्रवास, त्यामुळे मुंबई मेट्रो कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना सेवा देणारी मेट्रो ठरली
👉 मुंबई - मुंबई विमानतळावर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी उघड, कारवाईत एकूण सुमारे 65 लाख किमतीचं सोनं जप्त
👉 नाशिक - नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर 5 फूट उंच दगड आढळला, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे दोन एक्स्प्रेस ट्रेनचे अपघात टळले
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारतातील प्रसिद्ध बिर्ला ग्रुपच्या मालकीच्या हिंदुस्तान मोटर्सची शानदार कार 'अॅम्बेसेडर' 80 करोड रुपयांना विकली गेली, फ्रेंच कार कंपनी पूजो (pegeot)ने 'अॅम्बेसेडर'चे हक्क केले खरेदी
👉 मुंबई - अँड्रॉईडनंतर 'भीम अॅप' आता आयफोनधारकांसाठीही उपलब्ध, आतापर्यंत 1.4 कोटींपेक्षा जास्त यूझर्सनही भीम अॅप केलं डाऊनलोड
🎯 खेळ घडामोडी :
👉 भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना, तिस-या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशने 6 विकेट्स गमावत केल्या 322 धावा, बांगलादेश अजूनही 365 धावांनी पिछाडीवर
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपला आगामी चित्रपट ’नाम शबाना’ मध्ये ऍक्शन अवतार दिसणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
ATM वापरताना काय काळजी घ्यावी?
Let’s Up Tips & Tricks
जनधन योजनेमुळे व डिजिटल व्यवहारामुळे बँकेच्या प्रत्येक खातेदारांकडे ATM आले आहेत तसेच खाजगी बँकांनीसुद्धा प्रत्येक ग्राहकाला ATM दिले आहेत. ATM वापरण्याबाबत जागरूकता नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ATM वापराबाबत या खास टिप्स...
👉 ATM कार्डाचा पिन अथवा पासवर्ड स्वत:च्या अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावांचा ठेवू नका तसेच तुमची जन्मतारीखही पिन म्हणून नोंदवू नका.
👉 फसव्या कॉलपासून सावध रहा. कोणतीही माहिती देऊ नका.
👉 तुमचा पिन नियमित बदला.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 तुमचा पिन लक्षात ठेवा. तो कार्डासोबत ठेवू नका किंवा इतर कुठेही लिहू नका.
👉 दुकानात कार्ड स्वाइप करताना आपल्या कार्डाचा पिन स्वत: च मशीनवर टाका.
👉 तुमचे एटीएम कार्ड, पिन आणि इंटरनेट बँकिंगसंबंधीत तपशिल इतर कोणालाही देऊ नका.
👉 एटीएम व्यवहारासाठी कोणाचीही मदत घेऊ नका तसेच एटीएममध्ये इतर कोणालाही आपल्याजवळ येऊ देऊ नका.
👉 एटीएम मशिनला कोणतेही अज्ञात उपकरण किंवा संशयास्पद मशिन लावले असल्यास तुमचे कार्ड स्वाइप करू नका.
👉 तुमच्या आर्थिक व्यवहारासंबंधी एसएमएस अॅलर्टस चालू करा.
👉 कार्ड हरवल्यास ते ताबडतोब ब्लॉक करा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 व्हॉट्सअॅप ; टू-स्टेप व्हेरिफिकेशन लाँन्च
Let's Up Techno Katta
सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपने आपलं नवं टू-स्टेप व्हेरिफिकेशन फिचर लाँन्च केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्हॉटसअॅप टू-स्टेप व्हेरिफिकेशन या फीचरचं टेस्टिंग करत होते. या टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजच्या सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित होते. या फीचरमुळे 6 अंकाचा पासवर्ड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.
पाहूयात कशाप्रकारे करता येईल हे फीचर सुरु : व्हॉटसअॅपवरील सेटींगमध्ये जात अकाऊंटवर क्लिक करावे लागेल. या विभागात आपल्याला 'टू-स्टेप-व्हेरिफिकेशन' हा पर्याय दिसेल. याच्या खाली असलेल्या ‘इनेबल’वर क्लिक करून आपण या सुरक्षा फीचरचा वापर करू शकता. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा 6 आकडी पासवर्ड तयार करावा लागेल. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागेल. पासवर्ड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येईल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
जर तुम्ही या टू-स्टेप-व्हेरिफिकेशन फीचरचा पासवर्ड विसरलात आणि तो पासवर्ड ई-मेलच्या माध्यमातून रिकव्हर करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तर आपण 7 दिवसांपर्यंत आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपला ‘रिव्हेरिफाय’ करून वापरू शकणार नाहीत.
👉 हॉनरचा V9 लवकरच येतोय
हॉनर कंपनीने आपल्या V9 स्मार्टफोनचा टीझर लॉन्च केला आहे. 21 फेब्रुवारीला हा स्मार्टफोन लॉन्च होईल. हा स्मार्टफोन वॉटर रेसिस्टंट असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
हॉनर V9 चे फीचर्स :
* ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नोगट 7.0
* रॅम : 4जीबी/6जीबी
* प्रोसेसर : 2.4GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
* डिस्प्ले : 5.7 इंचाचा क्वार्ड एचडी डिस्प्ले
* मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी
* कॅमेरा : 12 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल ड्यूअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
* बॅटरी : 3900mAh
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंजिनीअरिंगसाठी देशपातळीवर एकच समान प्रवेश परीक्षा होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय
👉 चेन्नई - तामिळनाडूतील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केंद्र सरकारला अद्याप कुठलाही अहवाल पाठवलेला नाही, राजभवनातील जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली माहिती
👉 बंगळूर - सध्या इन्फोसिसमध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे मी दु:खी झालो, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सह संस्थापक आणि पहिले चेअरमन एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 नायजेरिया - बोको हराम या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 8 जवान ठार झाल्याचे वृत्त
👉 कराची - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना निलंबित करण्यात आले
🎯 राजकीय घडामोडी :
👉 उत्तर प्रदेश - यूपीत आज विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान, 15 जिल्ह्यातील 73 मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
👉 मुंबई - शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार असून, 43 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे एकदा आरशासमोर उभे राहा, गिरेबान में झाक के देखो - मुख्यमंत्री
👉 मुंबई - प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरल्यामुळे भाजपविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली
👉 पुणे - उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या विरोधात तोंडाने मर्डर करतात बाकी काही करू शकत नाहीत - नारायण राणे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांना गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचा किताब, सुदर्शन यांनी साकारला वाळूचा सर्वात मोठा किल्ला
👉 कल्याण - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार भिवंडीतील एसटी डेपोबाहेर उभ्या असलेल्या 50 रिक्षा आरटीओने जप्त केल्या, डेपोच्या आवारातील अवैध दुकाने हि पाडली
🎯 खेळ घडामोडी :
👉 पाचव्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिका आयसीसी क्रमवारीत अग्रस्थानी, भारताची चौथ्या तर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 सोनू सूद करणार बायोपिक, अभिनेता, पैलवान व हिंद केसरी दारासिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारतीय बँकाचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारने युनायडेट किंग्डमला केली अधिकृत विनंती
👉 नवी दिल्ली - 2 जी स्पेक्ट्रम, सुब्रमण्यम स्वामींना रतन टाटांविरोधात पुरावे सादर करण्याची कोर्टाची सूचना, पुरावे सादर करण्यासाठी स्वामींना 1 मार्चपर्यंत मुदतवाढ
👉 नवी दिल्ली - राष्ट्रगीताचा प्रसार करण्यासंदर्भात तातडीने धोरण निश्चित करण्याचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 भारत आणि रशियाला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचा अर्धा मार्ग पूर्ण, येत्या मार्चपर्यंत तो पूर्ण होईल, इराणच्या मंत्र्यांनी दिले आश्वासन
👉 मियामी - अमेरिकेवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सांगणारा दहशतवादी खालिद शेख मुहम्मद यांनी बराक ओबामा यांच्या नावाने पाठविले पत्र
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - सपा-काँग्रेसची आघाडी ही दोन कुटुंबांची आघाडी, एकानं देशाला लुटलं तर दुसऱ्यानं यूपीला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 चेन्नई - तमिळनाडुच्या राज्यपालांनी केंद्राला पाठवला अहवाल, व्हीके शशिकला यांचा सत्ता स्थापनेचा दावा
👉 तामिळनाडू - ओ. पन्नीरसेल्वम यांना समर्थन देणाऱ्या इ.मधुसूदन यांची अण्णा द्रमुकने पक्षातून केली हकालपट्टी
👉 मुंबई - हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी रेश्मा भोसले यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार
👉 उदगीर - भावाच्या खोटं बोलण्यामुळे मी फार वैतागून गेली आहे. आमचे बंधू इतके खोटे बोलतात की, त्यांना खोटं बोलण्याचं नोबेल मिळेल : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - मुंबईतील शिक्षकांसाठी शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन उद्यापासून, शैक्षणिक विषयावरील अनेक ठराव मंजूर होणार असल्याची अनिल बोरनारे यांची माहिती
👉 नाशिक - पेठ रोडवर ट्रकला अपघात, रस्त्यावरील झाडावर ट्रक घुसला, ट्रकच्या आत अडकलेल्या चालकाला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
👉 औरंगाबाद - डॉक्टर टाकळकर खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू सानप याला लोणार येथून अटक
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28334.25, निफ्टी : 8793.55, सोने भाव : 28,999 (प्रतितोळा), चांदी : 41,905 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 मुंबई - व्हॉट्सअॅपचं नवं फिचर टू-स्टेप व्हेरिफिकेशन, यामुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित होते, आयओएस, अँड्रॉईड आणि विंडोज स्मार्टफोनसाठी याचे अपडेट देणे सुरु
🎯 खेळ घडामोडी :
👉 हैदराबाद - भारतीय कर्णधार विराट कोहलीचे विक्रमी द्विशतक आणि वृद्धिमान साहाच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने आपला डाव 6 बाद 687 धावांवर केला घोषित, बांगलादेशने 1 विकेट गमावत केल्या 41 धावा
👉 विराट कोहलीनं मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम, सलग 4 मालिकांमध्ये द्विशतक करणारा विराट पहिलाच क्रिकेटपटू
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर बाळकूम ठाणे येथे 19 मार्चला होणाऱ्या पिंकथॉनचा हिस्सा असणार
👉 मुंबई - 'दंगल'च्या यशानंतर अभिनेत्री साक्षी तन्वरने 'व्होल्वो एस-90' ही लक्झरी कार खरेदी केलीय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
आंब्याचा 'बहर' : घ्यावयाची काळजी
Let's Up Agri Katta
उन्हाळा म्हटलं की, सर्वांना आंब्याच्या रसाची आठवण येते. चांगला आंबा येण्यासाठी त्याच व्यवस्थापनही गरजेचं असतं. या दिवसात आंब्यावर तुडतुडे तसंच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे आंब्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास बहर टिकण्यासह फळधारणा होण्यासही मदत होते...
👉 बहरावरील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 10 एमएल मोनोक्रोटोफॉस किंवा 10 एमएल डायमिथोएट 10 लिटर पाण्यात किंवा कार्बाईल पावडर 50 टक्के दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं.
👉 दमट वातावरणात भुरी रोगाचा प्रादुर्भाव हेण्याची शक्यता असते. भुरी रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी 30 ग्रॅम सल्फर 10 लिटर पाण्यात फवारावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 संपूर्णपणे मोहर बाहेर पडलेला आंबा झाडांच्या फांद्या हळुवारपणे हलविल्यास परपरागीकरणाची क्रिया वाढीस लागून, आंबा फळधारणा वाढण्यात निश्चितपणे मदत मिळू शकते.
👉 मोहरावर तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रभावी नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझोल 10 मिली अथवा पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
👉 फळांची गळ टाळण्यासाठी युरिया 20 ग्रॅम अधिक एन.ए.ए. 20 पीपीएम (20 मि.ग्रॅ.) अधिक पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
👉 फळधारणा झालेल्या ठिकाणी मोहराचे वाळलेले वा सुकलेले टोक वाऱ्यामुळे फळांस घासून फळे खराब होण्याची शक्यता असते म्हणून या मोहराचे टोक शक्य झाल्यास कापून टाकावे.
👉 एकाच ठिकाणी 5-6 फळे असल्यास फळाची विरळणी करावी. जेणेकरून इतर फळाची वाढ चांगली होऊन निर्यातक्षम दर्जाची फळे मिळतील.
👉 दोन फळांमध्ये शक्य झाल्यास वाळलेले पान ठेवावे, त्यामुळे फळे एकमेकांस घासून खराब होणार नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 चष्म्याचा नंबर कमी करण्याचे उपाय...
Let's Up Faide Ki Baat
आजकाल टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवत असल्याने कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढलंय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. अशाच काही उपयांवर नजर टाकूयात...
👉 जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
👉 दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.
👉 रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.
👉 रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा.
👉 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशोपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
👉 गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
👉 एक चमचा बडिशोप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.
👉 रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.
👉 डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोडच्या तेलाने मसाज करा. यामुळे फायदा होईल.
वरील उपयांद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर नक्कीच कमी होऊ शकतो. शिवाय या उपायातून तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. कारण हे आयुर्वेदिक उपाय आहेत...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 रहस्यपट ; ध्यानीमनी
Let's Up Movie Review
प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'ध्यानीमनी' याच नाटकावर आधारित 'ध्यानीमनी' सिनेमा आज रिलीज झालाय. ध्यानीमनी या नाटकाची निर्मितीही महेश मांजरेकर यांनी केली होती आणि आता या सिनेमाचीही निर्मिती महेश मांजरेकर यांनीच केली आहे.
कथा : ही गोष्ट आहे सदानंद आणि शालिनी पाठक या दोघांची. या दोघांच्या लग्नाला अनेक वर्षी झालीत, तरी मूल होत नसल्याच्या धक्क्याने शालिनीचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे आपल्याला मूल आहे, त्याचं नाव मोहित आहे, या अशा खोट्या दुनियेत ती रमू लागते. दुसरीकडे बायको शिवाय आपलं जगात कुणीच नाही या विचारानं सदानंदही तिच्या या खोट्या जगात सामील होतो. शालिनीचा हा आजार वाढत जातो, या काल्पनिक जगातून आता बाहेर पडणं तिला शक्य नाही. याच दरम्यान सिनेमात समीर आणि अपर्णाची एन्ट्री होते, जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि मृण्मई देशपांडेनं. समीरनं सायकॉलॉजीचा अभ्यास केलाय. शालिनीला मूल नसल्यानं, झालेला मानसिक आजार पाहता, समीर तिला या आजारातून बाहेर काढण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'ध्यानीमनी' हा सिनेमा पहावा लागेल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
कलाकारांचा अभिनय : महेश मांजरेकर यांनी सदाभाऊची भूमिका कमाल साकारली आहे. अनेक वर्षांनी सिनेमात पदार्पण करणाऱ्या अश्विनी भावेंनाही त्यांची भूमिका छान जमलीय. तसेच मृण्मयी देशपांडे आणि अभिजीत खांडकेकर यांच्याही भूमिका ठिक-ठाक आहेत.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी या अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत दळवी यांची कथा पटकथा मस्त आहे. रहस्यपट आणि मजबूत पटकथा असल्यामुळे हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो एवढं नक्की. त्यामुळे हा सिनेमा एकदातरी पहायला हरकत नाही...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 पंतप्रधान आवास योजना ; सबसिडीचे तपशील जाहीर
Let's Up Current Affair
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरखरेदी सबसिडी योजनेचे तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिलं घर घेणाऱ्यांसाठी भरघोस सूट देण्यात आली आहे. त्यांना 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे.
या योजनेनुसार आधी फक्त 15 वर्षे मुदतीची गृहकर्जे ही अट रद्द करून ती 20 वर्षे करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना ही 3 वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि फक्त पहिलं घर खरेदी करणारांसाठी आहे. त्यानुसार सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
👉 तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असेल तर तुम्ही पहिल्या घरखरेदीसाठी घेणार असलेल्या गृहकर्जातील 6 लाख रूपयांसाठी तुम्हाला 6.5 टक्क्यांची सबसिडी मिळेल. तुमच्या होमलोनमधील पहिल्या 6 लाखांवर 6.5 टक्क्यांची सवलत मिळेल. म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर तुम्हाला पहिल्या 6 लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज व्याज भरावं लागेल. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्क्यांप्रमाणे व्याज देय असेल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 2 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 9 लाखांपर्यंत 4 टक्के सूट
👉 18 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पहिल्या 12 लाखांपर्यंत 3 टक्के सूट
👉 तिसरी भारतीय महिला अंतराळवीर...
डॉ. शवना पंड्या या कॅनडामध्ये जन्मलेल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर आता अंतराळात जाणा-या तिस-या भारतीय महिला ठरणार आहेत. शवना पंड्या या अंतराळ मोहिमेवर जाणार असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावला आपणा सर्वांना माहिती आहे. त्यानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला अंतराळवीर ही सुनिता विल्यम्स ठरली.
कॅनडामध्ये जन्मलेल्या डॉ. शवना पंड्या या सध्या कॅनडाच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच त्या दोन स्पेस मिशनवर जाण्याची तयारीही करीत आहेत. 32 वर्षीय शवना पंड्या या सिटीझन सायन्स अॅस्ट्रोनॉट मोहिमेसाठी 3 हजार 200 लोकांमधून निवडलेल्या दोघांमध्ये होत्या. त्यात त्यांची निवड झाली. या मोहिमेवर त्या त्यांच्या आणखी 8 अंतराळवीरांसोबत जाणार असून ही मोहिम 2018 मध्ये होणार आहे.
शवना पंड्या या सध्या कुटूंबियांना भेटण्यासाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेच्या आवडीबद्दल एका वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सांगितले की, मला बालपणापासूनच अॅस्ट्रोनॉट होण्याची इच्छा होती. पण मल मेडिसीनही आवडायचं’. पंड्या या केवळ डॉक्टरच आहेत असं नाही तर त्या ऑपेरा सिंगर, लेखिकाही आहेत. त्या सांगतात की, तुमच्यात प्रॉयोरिटी ठरवण्याची ताकद आणि पॅशन असेल तर तुम्ही खूप काही मिळवू शकता’.
या मोहिमेवर त्या काय करणार आहेत याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ‘मी बायो मेडिसीन आणि मेडिकल सायन्सवर प्रयोग करणार आहेत. यासोबतच त्या वातावरणातील बदल याचाही अभ्यास करणार आहेत. सध्या त्या मुंबईत आल्या असून स्थानिक डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधत आहेत. त्यांच्या या संवादाचा भारतीय विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती
Let's Up Job Updates
भारतीय सांख्यिकी & आर्थिक सेवा परीक्षा
पोस्ट : इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस - जागा : 15 - पात्रता : पदव्युत्तर पदवी (Economics/Applied Economics/Business Economics/Economtrics)
पोस्ट : इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस - जागा : 29 - पात्रता : Statistics/Mathematical Statistics/Applied Statistics विषयासह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/Mathematical Statistics/Applied Statistics)
संयुक्त भूवैज्ञानिक & भूविज्ञानी परीक्षा
पोस्ट : जिओलॉजिस्ट, ग्रुप A - जागा : 40 - पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
पोस्ट : जिओलॉजिस्ट, ग्रुप A - जागा : 40 - पात्रता : M.Sc. (Physics/Applied Physics/Geophysics/Exploration Geophysics/Applied Geophysics/Marine Geophysics/Tech.)
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
पोस्ट : केमिस्ट, ग्रुप A - जागा : 25 - पात्रता : M. Sc. (Chemistry / Applied Chemistry / Analytical Chemistry)
पोस्ट : ज्युनिअर हैड्रोजिओलॉजिस्ट (सायंटिस्ट B), ग्रुप A - जागा : 33 - पात्रता : पदव्युत्तर पदवी (Geology or Applied Geology or Marine Geology)
वय : पदानुसार 21 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फी : 200 रुपये (SC/ST फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : दि. 03 मार्च 2017
अधिक माहितीसाठी :
भारतीय सांख्यिकी & आर्थिक सेवा परीक्षा : https://goo.gl/0s5rfT
संयुक्त भूवैज्ञानिक & भूविज्ञानी परीक्षा : https://goo.gl/bMQzkt
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/zFWuFg
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉनने जीएसटी कायद्याला केला विरोध
👉 नवी दिल्ली - मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव फक्त भारताने नव्हे, तर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही दिला होता - विकास स्वरूप
👉 नवी दिल्ली - विमानतळांची नावे बदलण्याचा विचार कॅबिनेट मंत्रीमंडळ करत असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली
👉 नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र 9 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत होईल - एएनआय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लॉस एंजिलिस - हिजाब घालून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम खेळाडूला लॉस एंजिलिस विमानतळावर अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मोदींना चर्चेत राहायला आवडते, ज्या दिवशी ते बातम्यांमध्ये नसतात, त्या दिवशी त्यांना झोप लागत नाही, राहुल गांधीची टीका
👉 मुंबई - मराठी माणूस आणि मराठी मतांचे राजकारण करणाऱ्या मनसेने महापालिका निवडणुकीत 7 उत्तर भारतीय चेहऱ्यांना उमेदवारी दिली
👉 मुंबई - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली - उद्धव ठाकरे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - जेट एअरवेजच्या कुवेतहून आलेल्या विमानातून स्पीकरच्या रॉडमध्ये दडवून आणलेले 26 लाख 40 हजारांचे सोने जप्त
👉 नवी मुंबई - तळोजा-नावडा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सापडल्या चार जिलेटीन कांड्या, तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
👉 मुंबई - मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास हायकोर्टाचा मज्जाव, मेट्रोसाठी वृक्षतोड कराल तर खबरदार अशा शब्दात हायकोर्टाने दिला इशारा
👉 जळगाव - भुसावळ येथे लग्नाहून परतलेल्या व-हाडाची गाडी चालकाचा ताबा सुटल्याने 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली, अपघातात एकाचा जागीच मृत्यू
🎯 खेळ घडामोडी :
👉 पुजाराने चंदू बोर्डे यांचा एका मोसमात सर्वाधिक धावा ठोकण्याचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला, बोर्डे यांनी 1964-65 मध्ये 1604 धावा केल्या होत्या तर पुजाऱ्याने या मोसमात आतापर्यंत 1605 धावा केल्या आहेत
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 प्रसिद्ध गायक शान व सुखविंदर सिंग ‘राजा’ या आगामी मराठी चित्रपटातील काही गाणी गाणार असून त्यातील काही गाणी नुकतीच रेकॉर्ड झाली आहेत
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - आता सरकार बेनामी संपत्ती बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या तयारीत, त्यामुळे सगळ्या राज्यांचे आधार क्रमांक राजस्व रेकॉर्डशी जोडण्याची प्रकिया सुरु
👉 नवी दिल्ली - कॅशलेस व्यवहार, लकी ड्रॉ आणि डिजिधन व्यापार योजनेंतर्गत 7 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 7 लाख 60 हजार उपभोक्ता आणि दुकानदारांना 117 कोटी 40 लाख रुपयांचे बक्षिस वितरण : नीति आयोग
👉 नवी दिल्ली - 'बॉर्डर'सिनेमादरम्यान जळीतकांड, सर्वोच्च न्यायालयाने बिल्डर-डेवलपर गोपाळ बंसल यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली
👉 नवी दिल्ली - रिलायन्स जिओच्या फ्री ऑफरला आव्हान देणाऱ्या वोडाफोनच्या ट्रायविरोधातल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाची सुनावणी 14 फेब्रुवारीला
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
लंडन - सन 2025 सालापर्यंत पाकिस्तानात पाणी उरणार नाही आणि त्या देशाचे रखरखीत वाळवंटात रूपांतर होईल, राष्ट्रसंघाच्या संस्थेने दिला गंभीर इशारा
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - मुंबईसह राज्यातील दहाही महापालिकांसाठी मंगळवार दि. 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून यादिवशी महापालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी : निवडणूक आयोग
👉 मुंबई - 7 शिवसैनिकांचा रत्नागिरीजवळ अपघाती मृत्यू झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील विलेपार्लेमध्ये नियोजित प्रचारसभा रद्द
👉 मुंबई - शिवसेना आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये साटंलोटं आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा
👉 मुंबई - महिलेच्या विनयभंगाप्रकरणी मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेवक सुधीर जाधव अटकेत
👉 पुणे - महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला, तर विरोधी आमदारांची संख्या 150 होईल, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांचा दावा
👉 नागपूर - भाजपाच्या सुमारे 30 बंडखोरांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करणार, भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार सुधाकर कोहळे यांची माहिती
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्यामृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
👉 नागपूर - गडचिरोलीत निवडणूक बंदोबस्तासाठी ड्युटीला नकार देणाऱ्या राज्य राखीव दलाच्या दोन सहाय्यक फौजदारांना अटक, मोहनचंद पांडे आणि ओमप्रकाश लांजेवर अशी अटक झालेल्याची नावे
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28329.70, निफ्टी : 8778.40, सोने भाव : 29,290 (प्रतितोळा), चांदी : 42,226 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 व्हेलेंटाईन डे ला शाओमीचा फोर एक्स होणार लाँच, या फोनला 5.5 इंची फुल एचडी डिस्प्ले, 2,3 व 4 जीबी रॅम व 16, 32 व 64 जीबी इंटरनल मेमरी अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार, अँड्राईड मार्शमेलो 6.0 ओएस, 13 एमपीचा रियर तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा तर गोल्ड, सिल्व्हर व ग्रे रंगात हा फोन येईल, हा फोन साधारण 10 हजार रूपयांतच ग्राहकांना मिळू शकणार
🎯 खेळ घडामोडी :
👉 हैदराबाद - बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 356, सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही झळकावले शतक
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - गळ्यात कोब्रा घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतची 5 हजार रूपयांच्या जामीनावर सुटका
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
लिव्हिंग रूम कशी असावी?
Let's Up Tip & Tricks
'घराची कळा अंगणावरून कळते' या म्हणीप्रमाणे घराची कळा हि लिव्हिंग रूम वरून कळून येते. कारण घरात प्रवेश केल्या-केल्या समोर चित्र उभे राहते ते लिव्हिंग रूमचे. यावरून एकंदरीत घराचा अंदाज कोणीही बांधू शकतो म्हणून सध्याला ‘लिव्हिंग रूम’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच लिव्हिंग रूम कशी असावी या बद्दल काही टिप्स...
👉 आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक हि लिव्हिंग रूम असते म्हणून तुम्ही कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न लिव्हिंग रूममधून करा. तुमच्या व्यक्तिमत्वाची झलक लिव्हिंग रूममध्ये येउ द्या.
👉 हॉलच्या एखाद्या कोपर्यात चौरंगावरील हिरव्यागार रोपट्याची कुंडी, त्यावर सोडलेला प्रकाशझोत वातावरणात जिवंतपणा आणतो तसेच थकवाही घालवतो. यामुळे सावलीत वाढणारी झाडे किंवा कृत्रिम झाडे लिव्हिंग रूममध्ये अवश्य ठेवा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 लिव्हिंग रूम हि आवडीनुसार बदलत असते त्यामुळे हॉलमधील एखादी भिंत टेक्श्चर पेंट अथवा वॉलपेपरसारख्या स्पेशल इफेक्टसाठी अवश्य राखून ठेवा.
👉 लिव्हिंग रूममध्ये ड्रॉवरची सोय असावी कारण दररोज येता-जाता लागणार्या वस्तू घेणे व ठेवणे सोप्पे होईल. तसेच या ड्रॉवरमध्ये काचेचे स्वतंत्र कप्पे करून घेतल्यास वस्तू वेगळ्या ठेवता येतात व पटकन सापडतात.
👉 लिव्हिंग रूममध्ये भारतीय बैठक असू द्यावी कारण मुक्कामी राहणार्या एखाद्या पाहुण्याची झोपायची सोय होते किंवा वर्दळीच्या वेळी त्रासही होणार नाही.
👉 मोज्यांसाठी स्वतंत्र ड्रॉवर ठेवा. किंवा शू-रॅकच्या दारावर आतील बाजूस छोटे स्टेनलेस स्टीलचे रॉड लावून त्यावरही मोजे लटकवता येऊ शकतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 10 महानगरपालिकांचे चित्र स्पष्ट
Let's Up Political Update
मुंबईसह 10 महापालिकेतील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...
मुंबई महापालिका - 227 जागांसाठी एकूण 2 हजार 267 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 367 जणांनी घेतले अर्ज मागे
ठाणे महापालिका - 131 जागांसाठी (33 प्रभाग) 805 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 228 जणांनी घेतले अर्ज मागे
उल्हासनगर महापालिका - 78 जागेसाठी 479 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 79 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
पुणे महापालिका - 162 जागांसाठी 1076 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 751 जणांनी घेतले अर्ज मागे, तर 418 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद
पिंपरी-चिंचवड महापालिका - 128 जागांसाठी 758 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 480 जणांनी घेतले अर्ज मागे
सोलापूर महापालिका - 102 जागांसाठी 743 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 259 जणांनी घेतले अर्ज मागे
नाशिक महापालिका - 122 जागांसाठी 821 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 461 जणांनी घेतले अर्ज मागे
नागपूर महापालिका - 151 जागांसाठी 1141 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 433 जणांनी घेतले अर्ज मागे
अकोला महापालिका - 80 जागांसाठी 579 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 157 जणांनी घेतले अर्ज मागे - 145 अर्ज छाननीत बाद
अमरावती महानगरपालिका - 87 जागांसाठी 648 उमेदवार रिंगणात - शेवटच्या दिवशी 80 जणांनी घेतले अर्ज मागे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 मोफत इंटरनेटसाठी 'अलीबाबा'चे पाऊल
Let's Up Techno Katta
आधी फेसबुकने ‘फ्री बेसिक्स’च्या माध्यमातून तर गुगलने ‘रेलटेल’ या कंपनीच्या मदतीने आणि आता अलीबाबा या विख्यात चिनी कंपनीनेही भारतात मोफत इंटरनेट सेवा पुरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी मोबाईल कंपन्या आणि वाय-फाय सेवा पुरवठादारांशी बोलणे सुरू असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. अलीबाबाने भारतात थेट गुंतवणूक केली नसली तरी अनेक ई-पोर्टल्समध्ये त्यांची भागिदारी आहे. यासोबत ‘युसीवेब’ हे ब्राऊजरही भारतात लोकप्रिय आहे. हा समूह लवकरच भारतात जोरदार एंट्री करण्याची शक्यता आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 युट्युब अॅप ; लाईव्ह स्ट्रीमिंग
अलीकडच्या काळात जगभरात लाईव्ह स्ट्रीमिंगची क्रेझ वाढलीय. सध्या युट्युबने संगणकावरून ही सुविधा दिलेली आहे. आता याचप्रकारे कुणीही स्मार्टफोनवरून याचा लाभ घेऊ शकणार आहे. सुरवातीला 20 देशांमधील युजर्सला हे फिचर देण्यात आले आहे. त्यातही 10 हजारांवर सबस्क्रायबर असणार्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. मात्र लवकरच अन्य देशांमध्ये आणि कमी सबस्क्रायबर असणार्यांनाही लाईव्ह स्ट्रीमिंग करता येईल असे युट्युबतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याच्या जोडीला युट्युबने डायनॅमिक चॅटींगही व्यवस्थादेखील केली आहे. अर्थात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतांना यावरील कॉमेंटही अन्य युजर्सला ‘रियल टाईम’ दिसतील.
👉 ट्विटरवर सुरक्षाविषयक नवीन फिचर्स
ट्विटरवर अनेक युजर्स हे राजकीय, धार्मिक, जातीय, प्रांतीय, भाषिक, वांशिक वा अन्य विषयांवरून द्वेष पसरवण्याचे काम करत असतात. याला आळा घालण्यासाठी ट्विटरने आता काही सुरक्षाविषयक फिचर्स अंगिकारले आहेत. ट्विटरवर द्वेष पसरवणार्या युजर्सला ब्लॉक करण्यात येते. मात्र ते दुसर्या नावाने अकाऊंट उघडून पुन्हा घृणा पसरवण्याचे काम करतात. आता मात्र हे युजर्स नव्याने अकाऊंट सुरू करू शकणार नसल्याची काळजी ट्विटर घेणार आहे. याशिवाय ट्विटरवर लवकरच ‘सेफ सर्च’ हे फिचर येणार असून यामुळे द्वेषभावनायुक्त ट्विट ‘फिल्टर’ होणार आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 कुशलने वाचवले जेनिफरचे प्राण
Let's Up Entertainment Katta
सोनी टीव्हीवरील ‘बेहद’ मालिकेत लग्नाचा सीक्वेन्सचं शूटिंग सुरु होतं. कथेनुसार लग्नाच्या या सीनमध्ये आग लागणार होती. त्याप्रमाणे आग लागली. पण अचानकच आग पसरत गेली आणि तिथे एकच गोंधळ उडाला. आग पसरल्याचं लक्षात येताच पहिल्यांदा कुशल टंडन पळून गेला. पण जेनिफर विंगेट तिथेच असल्याचं दिसल्यावर तो पुन्हा तिथे गेला आणि जेनिफरला वाचवलं. यात कुशल टंडन जखमी झाला खरा पण त्याने एखाद्या हिरोप्रमाणेच अभिनेत्री जेनिफर विंगेटला आगीतून वाचवलं. कुशलने ट्वीट करुन शुभचिंतक आणि चाहत्यांचे प्रार्थनांसाठी आभार मानले.
👉 संजयची आई होणार मनीषा कोईराला…
सध्या अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकमधील स्टार कास्टची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर संजय दत्त साकारणार असून मान्यता दत्तच्या भमिकेत दिया मिर्झा असेल. या चित्रपटातील सर्वात महत्त्वाची म्हणजे संजयची आई व अभिनेत्री नर्गिसची भूमिका मनीषा कोईरालाकडे आली आहे. राजकुमार हिरानीने या भूमिकेसाठी मनीषाची निवड नक्की केली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
नर्गिसचा 1981 साली कॅन्सरने मृत्यू झाला. मनीषाही कॅन्सरमधून बरी झाली आहे. मनीषाची निवड या भूमिकेसाठी करण्यामागे ती सुंदर आहे हे एक कारण असले तरी ती कॅन्सरग्रस्त होती हेही एक कारण असल्याचे समजते. हिरानीच्या मते मनीषाने कॅन्सरच्या वेदना भोगल्या असल्याने नर्गिसने कॅन्सरशी केलेला संघर्ष ती चांगला दाखवू शकते. सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल करणार आहेत. मनीषाने यापूर्वी संजय दत्त सोबत खौफ, कारतूस, यल्गार, सनम, महबूबा या चित्रपटांत त्याची नायिका म्हणून काम केले आहे.
👉 अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला?
बॉलीवूडमध्ये ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनचीही लव्हस्टोरी पूर्ण होता-होता राहिली. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल असले तरी ऐश्वर्या हे अभिषेकचे पहिले प्रेम नव्हते. अभिषेक आणि करिश्मा यांची लव्हस्टोरी सर्वच जाणतात. असंही म्हटलं जात की, या दोघांचा साखरपुडाही झाला होता. करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. अभिषेकची बहिण श्वेताच्या लग्नात हे दोघं एकमेकांच्या जवळ आले.
इतकंच नव्हे तर अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची जाहीर घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यावेळी असे काही घडले की, अभिषेक-करिश्मा कायमचे दुरावले. करिश्माची आई बबिता यांना अभिषेक फारसा आवडत नव्हता. यादरम्यान अभिषेकचे अनेक चित्रपट फ्लॉप होत होते तर करिश्मा त्यावेळी सुपरहिट हिरोईन होती. बबिता यांना ही भीती होती की, अभिषेक यशस्वी नाही झाला तर काय होणार. अखेर आईच्या दबावापुढे करिश्माला झुकावे लागले आणि त्यांनी साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 नागपूर पोलीस विभागात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : विधी अधिकारी (वर्ग ब) - जागा : 04 - पात्रता : कायदा पदवी व सनदधारक, 05 वर्षे अनुभव
पोस्ट : विधी अधिकारी - जागा : 19 - पात्रता : कायदा पदवी व सनदधारक, 05 वर्षे अनुभव
वय : 60 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवायचा पत्ता : विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र ,सिव्हील लाईन, नागपूर
अर्ज पोहोचण्याची मुदत : 15 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/dRe4qc
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 शामराव विठ्ठल बँकेत ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ पदांची भरती
पोस्ट : ग्राहक सेवा प्रतिनिधी (Customer Service Representative) - जागा :40 - पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 45% गुणांसह पदवीधर, संगणक ज्ञान
वय : दि. 31 मार्च 2017 रोजी 30 वर्षे
फी : 600 रुपये
परीक्षा : दि. 09 एप्रिल 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 07 मार्च 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/NDc1TZ
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/yDoj9R (दि.16 फेब्रुवारी 2017 पासून सुरु)
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत एकाच महिन्यात 140 बलात्कार आणि 238 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे उघड
👉 चेन्नई - व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात उभे ठाकणारे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गरज भासल्यास मी राजीनामा परत घेईन असे जाहीर केले
👉 मंगळुरु - येथील विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिका-यांनी सोने जप्त केले असून याप्रकरणी दोघांना अटक केली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 रशियाचे मुख्य विरोधी पक्ष नेता आलेक्सई नॅव्हलिन हे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात आढळले दोषी, पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मोदी जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत बहिष्कार कायम राहिल, अकाँग्रेस खासदारांचा पावित्रा
👉 मुंबई - मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना - रामदास आठवले
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 पुणे - शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हानिहाय पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय - राज्य सरकार
👉 औरंगाबाद - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा शहरातील गुलमंडी भागात पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला
👉 पुणे - साहित्य अकादमीतर्फे ज्येष्ठ समीक्षक आनंद प्रकाश दीक्षित आणि श्रीकांत बहुलकर यांना भाषा सन्मान पुरस्कार डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या हस्ते प्रदान
👉 मुंबई - पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या एका अमेरिकन उद्योगपतीला पोलिसांनी केली अटक
🎯 खेळ घडामोडी :
👉 भारत-इंग्लंड U19 संघांमधला अखेरचा वन डे सामना टाय, अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना भारताचा ईशान पोरेल धावचीत
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - सोनी टीव्हीवर दाखविल्या जाणा-या ‘बेहद’ मालिकेच्या सेटला शूटिंगदरम्यान आग, सेटवर अडकलेल्या अभिनेत्री जेनिफर विंगेटलाअभिनेता कुशल टंडनने वाचवले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, रेपो रेट 6.25 टक्के कायम आणि रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम
👉 नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींनाच कोर्टाची अवमानना केल्याबद्धल सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने केली नोटीस जारी
👉 नवी दिल्ली - जेवढ्या परिपक्वपणे यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, ते पाहता पुढच्या वर्षी देशाचा विकास दर 7 टक्क्यांच्या वर जाईल : शक्तिकांता दास
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
रियाध - सौदी अरबिया या मुस्लिम बहुल देशाने गेल्या 4 महिन्यात तब्बल 39 हजार पाकिस्तानी नागरिकांना पाठवले परत
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका हेमांगी चेंबुरकर आणि त्यांच्या सचिवाला सत्र न्यायालयाने सुनावली एसीबी कोठडी
👉 उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका निवडणूक, 78 जागांसाठी 482 उमेदवार रिंगणात, शेवटच्या दिवशी 79 जणांची माघार
👉 ठाणे - ठाणे महानगरापालिका निवडणूक, 131 जागांसाठी 805 उमेदवार रिंगणात, शेवटच्या दिवशी तब्बल 228 जणांनी माघार
👉 अकोला - महानगरपालिका निवडणुक, 579 उमेदवार रिंगणात, 157 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
👉 पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक, 128 जागांसाठी 758 उमेदवार रिंगणात, शेवटच्या दिवशी 480 जणांची माघार
👉 पुणे - शिवसेनेचा वचननामा जाहीर, पुण्यात मोफत आरोग्यसेवा देणार, शहरात वायफाय यंत्रणेसाठी प्रयत्न करणार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील खानू गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, सर्व प्रवासी मुंबईचे
👉 सांगली - मिरजेत भरदिवसा मुख्य बाजारपेठेतून 30 लाख रुपयांची चोरी, एटीएममध्ये पैसे भरायला आलेल्या बँकेच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी केली चोरी
👉 भंडारा - पोलीस कोठडीत आरोपींनी जन्मदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलीस उपयुक्तांनी ठाणेदार शेट्टे यांच्यासह 10 जणांना निलंबित केले
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28289.92, निफ्टी : 8769.05, सोने भाव : 29,345 (प्रतितोळा), चांदी : 42,409 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 कूलपॅडचा 3 सिमवाला नोट थ्री एस सादर, या फोनची किंमत आहे 9999 रूपये, या फोनसाठी 5.5 इंची आयपीएस एचडी 2.5 डी कर्व्ह डिस्प्ले, अँड्राईड 6.0 मार्शमेलो, 3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी, 13 एमपीचा रियर, 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा व मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे
🎯 खेळ घडामोडी :
👉 हैदराबाद - बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी करुण नायरच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी
👉 हैदराबाद - हार्दिक पांड्याला आम्ही संघात ठेऊ इच्छितो कारण की, कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करण्याची त्याची क्षमता आहे : अनिल कुंबळे
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश विवाहबंधनात अडकणार, रुक्मिणी सहाय आणि नीलचं अरेंज मॅरेज असून 3 दिवस हा विवाहसोहळा चालणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
ब्रेकिंग न्यूज By Lets Up
पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चपासून संपणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील जनतेला खुशखबर दिली आहे. येत्या 13 मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. 20 फेब्रुवारीपासून तुम्हाला दोन टप्प्यात मोठी रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवड्याला बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असून, 50 हजार रुपये तुम्हाला काढता येणार आहेत. मात्र 13 मार्चनंतर बचत खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
