mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
428
Підписники
+124 години
+47 днів
+430 днів
Архів дописів
महाराष्ट्राच्या शिलेदारांची राज्यसभेत एन्ट्री
6 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 7 राज्यसभा सदस्यांनी नवी दिल्लीतील संसद भवनात शपथ घेतली.
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहात महाराष्ट्रातील पाच सदस्यांसह एकूण 19 नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ दिली.
महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक झाली होती. या सातही जागांवरील सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीचे 06 आणि विरोधी महाविकास आघाडीच्या 01 उमेदवाराचा समावेश होता.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) अध्यक्ष रामदास आठवले हे सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर नियुक्त झाले आहेत.
💐 मेनका गुरुस्वामी यांनी आज खासदार म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला.
त्या भारतातील पहिल्या जाहीरपणे क्विअर (समलैंगिक) खासदार आहेत.
गुरुस्वामी या एक सुप्रसिद्ध घटनात्मक कायदा तज्ज्ञ आहेत.
समलैंगिकता गुन्हा नसल्याचे ठरवणाऱ्या २०१८ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
[तृणमूल काँग्रेस (TMC) कडून राज्यसभेवर त्यांची निवड झाली आहे.]
त्यांचा संसदेतील प्रवेश हा भारतीय राजकारणातील LGBTQ+ प्रतिनिधित्वासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.💐💐💐💐💐
7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन..
⭕️ 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रमुख प्राधान्याकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी साजरा करण्यात आला.
◾️ 2026 थीम : WHO ने “Together for health. Stand with Science” ही थीम जाहीर केली आहे .
▶️ लोकसभेच्या राज्यातील 48 जागा वरून 72 पर्यंत वाढ होणार.
↪️ लोकसभेचे एकूण संख्याबळ 816 पर्यंत वाढणार
➡️ 33 टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर एकूण 273 महिलांसाठी राखीव जागा
▶️ सुनेत्रा पवार खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी
➡️ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
↪️ राज्याच्या खो-खो इतिहासात या असोसिएशनच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
👉 एकल पदांवर आरक्षण लागू नाही
👉 भरती व पदोन्नती दोन्हीमध्ये नियम लागू
👉 सर्व विभागांसाठी एकच नवीन शासन निर्णय
👉 पूर्वीचे सर्व आदेश रद्द
👉 एकल पद = एका कार्यालयात एकच जागा
👉 आरक्षण दिल्यास 100% आरक्षण ठरते
👉 50% मर्यादेचे उल्लंघन होते
👉 नियुक्ती गुणवत्ता व पात्रतेवर आधारित
👉 लागू क्षेत्र: शासकीय, सहकारी, स्थानिक संस्था, विद्यापीठे
👉 अनुशेष (backlog) निर्माण होत नाही.
२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी...
👉 Reserve Bank of India (RBI) ने 17 ऑगस्ट 2023 रोजी UDGAM पोर्टल सुरू केले.
👉 UDGAM = Unclaimed Deposits - Gateway to Access inforMation.
👉 उद्देश: विविध बँकांमधील अनक्लेम्ड (न मिळालेल्या) ठेवी शोधणे.
👉 एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व बँकांची माहिती उपलब्ध.
👉 RBI गव्हर्नर Shaktikanta Das यांनी लाँच केले.
👉 ग्राहकांना ठेवी शोधणे व क्लेम करणे सोपे झाले.
+1
पायल नाग.
ओडिशातील एक रोजंदारी काम करणाऱ्या मिस्त्रीची मुलगी.
आठव्या वर्षी इलेक्ट्रिक शॉक लागला. सर्व चार अंग गमावले.
आणि मग, तिने एक धनुष्य सापडले.
कोच कुलदीप वेदवाण यांनी तिच्या चित्रकलेद्वारे तिला ओळखले, तेच व्यक्ती जेने जगज्जेता शीतल देवीला आकार दिला.
एप्रिल 2026 मध्ये बँगकॉकमधील वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरिज फायनलमध्ये तिच्या आदर्श शीतल देवीला हरवले.
Join https://t.me/mpscCurrentinfo
सुप्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि राज्यसभा सदस्य सौ. सुधा मूर्ती जी यांचे “Tides of Time: Bharat’s History Through Murals in Parliament” हे नवे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा..!
भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकशाही प्रवासाचे प्रभावी चित्रण या पुस्तकातून उलगडते. संसद भवनातील भित्तीचित्रांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध वारशाची मांडणी करणारे हे पुस्तक निश्चितच वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या लेखनातून जीवनमूल्ये, अनुभव आणि संस्कारांची समृद्ध परंपरा सातत्याने पुढे येत राहते, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.
या निमित्ताने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याचा आनंद लाभला.
🔹 NCERT म्हणजे काय?
National Council of Educational Research and Training
➡️ NCERT (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) ही भारत सरकारची एक शैक्षणिक संस्था आहे.
➡️ देशभरातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करते.
🔹 स्थापना
📅 स्थापना: 1961
➡️ शिक्षण क्षेत्रात संशोधन, धोरणे आणि पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी स्थापना झाली.
🔹 मुख्यालय
📍 नवी दिल्ली (New Delhi)
🔹 मुख्य उद्दिष्टे
✔️ शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे
✔️ विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करणे
✔️ शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे
✔️ नवीन शैक्षणिक धोरणे विकसित करणे
🔹 NCERT चे मुख्य कार्य
📚 पाठ्यपुस्तक निर्मिती
→ 1ली ते 12वी पर्यंतची पुस्तके तयार करणे
🧑🏫 शिक्षक प्रशिक्षण
→ शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणे
🔬 संशोधन (Research)
→ शिक्षण क्षेत्रातील नवीन पद्धती शोधणे
📝 अभ्यासक्रम तयार करणे (Curriculum)
→ CBSE व इतर बोर्डांसाठी अभ्यासक्रम तयार करणे
👍👍👍मूलभूत कर्तव्यांची 50 वर्ष
ही आहेत आपल्या भारतीय संविधानात निश्चित केलेली दायित्वे 👆👆
1976 मध्ये संविधानात 11 मूलभूत कर्तव्य जोडले गेली. ही राष्ट्राची एकता, अखंडता व जबाबदाऱ्यांची मार्गदर्शक तत्वे आहेत 👍👍👍👍
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यावर्षी
3 प्रमुख कर्तव्य यावर भर दिला होता ते वरील प्रमाणे आहे परीक्षेच्या दृष्टीने ती व्यवस्थित करून ठेवा..
केंद्र सरकारने 'नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग'ला (NCERT) अधिकृतपणे 'अभिमत विद्यापीठाचा' दर्जा प्रदान केला आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या (PMFME) अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे.
2] पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून 29 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली. [ही केंद्र पुरस्कृत योजना आहे.]
3] भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन (6 एप्रिल) निमित्त 6 ते 12 एप्रिल दरम्यान 'जनसंवाद सप्ताह' साजरा केला जाणार आहे.
4] अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) ने ब्लिंकिट (Blinkit) सोबत भागीदारी करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) भारतातील पहिली इन-टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा (एप्रिल 2026) सुरू केली आहे.
