mpscCurrentinfo🔥
Відкрити в Telegram
428
Підписники
Немає даних24 години
+77 днів
+630 днів
Архів дописів
निर्मला सीताराम करणार नवा विक्रम
निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आहेत.
महत्त्वाचे :
1] भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण 10 वेळा) अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
2] भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
3] पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे 9 आणि 8 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
#Updated Current Eco
अर्थसंकल्प तयार करणारी पडद्यामागची अर्थसंकल्पीय टीम...
घटनेत अर्थसंकल्प असा उल्लेख नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक आहे.
अनुच्छेद 112 नुसार केंद्रीय वार्षिक वित्तीय विवरणपत्रक याबाबत तरतूद आहे...तर 202 नुसार राज्याबाबत तरतूद आहे.
'चंद्रपूर'चा विक्रम; 2,739 मेगावॅट वीजनिर्मिती
चंद्रपूर येथील 2920 मेगावॅट उत्पादन क्षमतेच्या औष्णिक वीज केंद्रातून 19 जानेवारी 2026 रोजी 2739 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. [एकूण क्षमतेच्या 93.80 टक्के उत्पादन साध्य करण्यात आले आहे.] वीज केंद्राच्या 42 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी आहे.
आगामी वित्त वर्षात वृद्धी दर 7.2 टक्क्यांपर्यंत
वित्त वर्ष 2026-27 मध्ये भारताचा वृद्धी दर 6.8 ते 7.2 टक्के यादरम्यान राहील.
◆ दुबई येथे आयोजित होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या वार्षिक अन्न आणि पेय प्रदर्शन ‘गल्फूड 2026’ मध्ये भारताला अधिकृत ‘भागीदार देश’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
◆ भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विजय नोंदवणारी पहिली भारतीय महिला एकेरी बॅडमिंटनपटू बनली आहे.
◆ मध्य प्रदेश राज्याच्या राज्यपालांनी 2026 हे 'कृषी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. [राज्यपाल : मंगूभाई पटेल]
◆ महाराष्ट्र राज्याने भारतातील पहिले रजोनिवृत्ती (Menopause) कार्यक्रम सुरू केला आहे.
◆ केरळ राज्याने "बॅसिलस सबटिलिसला" राज्य सूक्ष्मजंतू म्हणून घोषित केले. [राज्य सूक्ष्मजंतू घोषित करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे.]
#Updated Current
प्रजासत्ताक दिन संचालनात चित्ररथांमध्ये 2026 महाराष्ट्राचा चित्ररथ ((गणेशोत्सव या चित्ररथाने प्रथम क्रमांक)) मिळविला आहे आत्मनिर्भरतेचे प्रतीक या आधारावर हे तयार केले होते.👆👆💐💐
◆ भारतीय रेल्वेने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर “ASC ARJUN” नावाचा मानवीय रोबोट तैनात केला आहे.
फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापराची बंदी
15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक फ्रेंच खासदारांनी मंजूर केले आहे. [हे विधेयक 130 विरुद्ध 21 मतांनी मंजूर झाले.]
आयुष्मान खुराना रेड चीफचा ब्रँड ॲम्बेसेडर
भारतातील अग्रगण्य फुटवेअर ब्रेड 'रेड चीफ'ने बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे.
◆ जागतिक आर्थिक मंचाने (WEF) आंध्र प्रदेश सरकारच्या भागीदारीत, ऊर्जा संक्रमण आणि सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारे 'सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन' (C4IR) स्थापित करण्याची घोषणा केली आहे.
◆ आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम, विंग्स इंडिया 2026 तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित केला जाईल
