uk
Feedback
Essay (निबंध) Paper UPSC/MPSC Descriptive

Essay (निबंध) Paper UPSC/MPSC Descriptive

Відкрити в Telegram

Content, perspective and thoughts for Essay... निबंधासाठी माहिती दृष्टिकोन व विचार... Dr.Ashish Jaitpal (Founder and Director of Maitreya UPSC, 140+ marks in Essay paper of UPSC Mains) Main Telegram channel of Maitreya- https://t.me/maitreyaupscmpsc

Показати більше
1 374
Підписники
Немає даних24 години
+77 днів
+3730 днів

Триває завантаження даних...

Схожі канали
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
вересень '26
вересень '26
+23
в 1 каналах
серпень '26
+59
в 1 каналах
Get PRO
липень '26
+220
в 1 каналах
Get PRO
червень '26
+77
в 1 каналах
Get PRO
травень '26
+6
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+19
в 0 каналах
Get PRO
березень '26
+46
в 2 каналах
Get PRO
лютий '26
+11
в 0 каналах
Get PRO
січень '26
+21
в 1 каналах
Get PRO
грудень '25
+148
в 8 каналах
Get PRO
листопад '25
+87
в 1 каналах
Get PRO
жовтень '25
+9
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+14
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+14
в 0 каналах
Get PRO
липень '25
+55
в 1 каналах
Get PRO
червень '25
+89
в 2 каналах
Get PRO
травень '25
+78
в 1 каналах
Get PRO
квітень '25
+53
в 2 каналах
Get PRO
березень '25
+65
в 2 каналах
Get PRO
лютий '25
+84
в 2 каналах
Get PRO
січень '25
+49
в 1 каналах
Get PRO
грудень '24
+86
в 1 каналах
Get PRO
листопад '24
+318
в 1 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
13 вересня+2
12 вересня0
11 вересня+1
10 вересня0
09 вересня+1
08 вересня+3
07 вересня+1
06 вересня+2
05 вересня+1
04 вересня+2
03 вересня+8
02 вересня0
01 вересня+2
Дописи каналу
इसवी सन २०५५. हवामान बदलामुळे पृथ्वीवरील मानवी संस्कृती नष्ट झाली आहे. लंडन पाण्यात बुडालंय. ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलात आगीचे तांडव सुरू झालेय. लास वेगास वाळवंटाखाली गाडलं गेलंय. आल्प्स पर्वतावरून बर्फ पूर्णपणे गायब. वितळलेल्या ‘आ्क्टिटक’वरील ‘ग्लोबल आर्काइव्ह’ इमारतीमध्ये एक वृद्ध बसलाय. मानवजातीच्या उरलेल्या ज्ञानाचा तोच संग्राहक. जुन्या बातम्या आणि व्हिडीओ पाहताना तो स्वत:शीच पुटपुटतोय, ‘धोका दिसत असताना, वैज्ञानिक इशारे देत असताना आणि उपाय उपलब्ध असताना आम्ही कृती का केली नाही? आमच्याकडे वेळ होता तेव्हा आम्ही हवामान बदल का रोखला नाही? स्वत:चाच विनाश घडवणार्‍या ‘मूर्खांचा तो काळ’ होता?
फ्रॅनी आर्मस्ट्राँग यांच्या २००९ मध्ये आलेल्या या ‘द एज ऑफ स्टुपिड’मधील ही दृश्यं
सध्या आपण नेहमी विचारतो, ‘२०५० पर्यंत काय होईल?’ आर्मस्ट्राँग प्रश्न उलटा करतात, ‘२०५० मध्ये पृथ्वीच उद्ध्वस्त झाली तर… शिल्लक राहिलेला माणूस २००८ कडे पाहून आपल्याबद्दल काय विचार करेल? त्यांना ज्ञान होतं. निसर्गाकडून आणि शास्त्रज्ञांकडून इशारे मिळत होते. त्यांच्यासमोर पर्याय, त्यासाठीचं तंत्रज्ञान आणि निधी सर्व काही उपलब्ध होतं. पण तरीही त्यांनी कृती केली नाही. ते कोणत्या ‘विश्वात’ होते? त्यांच्यासाठी जीवनमरणाचे प्रश्न कोणते होते?’ #environment #climatechange #essay

2
धर्म कोणताही असो; त्याचे कट्टर, कडवे अनुयायी महिलांवर कसे अन्याय करतात याचा ताजा प्रत्यय केरळमसारख्या सुशिक्षित राज्यात दिसला. त्या राज्यातील इस्लामी पंडित, ज्येष्ठ धर्मगुरू कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार ऊर्फ ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांची ताजी मुक्ताफळे हे याचे उदाहरण. ‘‘स्त्रियांस सार्वजनिक मंचावर मज्जाव करायला हवा; त्यांचा सार्वजनिक वावर गोंधळ निर्माण करतो’’; हे या अबू बकर यांचे ताजे विधान. ते तेवढेच करून थांबत नाहीत. त्या राज्यातील महत्त्वाच्या शहरात भाषण करताना आपल्या या मुक्ताफळांच्या मांडणीत ते समोरच्या इडली पिठाचे दगडी वरवंटे-पाटे विकणार्‍या दुकानाकडे बोट दाखवून म्हणतात- ‘‘ ही दगडी यंत्रे अशी रस्त्यावर ठेवून गेल्याने काही फारसे बिघडत नाही. येणारे-जाणारे त्याकडे पाहणारही नाहीत. पण स्त्रियांचे असे नाही.स्त्रिरया म्हणजे गळ्यातील मोलाचे कंठभूषण. ते असे रस्त्यावर ठेवले तर येणारे-जाणारे त्यांस स्पर्श करतील आणि त्या दागिन्याचे सौंदर्य नष्ट होईल. म्हणून स्त्रियांस दागिन्यांच्या पेटीप्रमाणे सुरक्षित कुलूपबंद ठेवायला हवे.’’ म्हणजे स्त्रियांस घरात कोंडून ठेवायला हवे, असे त्यांचे म्हणणे. या आपल्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ ते इस्लामी धर्मग्रंथ कुराणाचा दाखला देतात. ‘‘कुराण म्हणूनच स्त्रियांस बुरख्यात ठेवण्यास सांगते. स्त्रिया सार्वजनिक मंचावर आल्या तर विध्वंस अटळ असतो’’, असे या धर्मगुरूंचे म्हणणे. वरवर पाहणारे स्त्रियांस त्यांनी किमती आभूषणांची उपमा दिली यात काही ‘सकारात्मकता’ पाहतीलही. पण तसे करून हे महाशय स्त्रियांच्या बंदिवासाचेच समर्थन करतात. हा धर्मसल्ला देताना अबूबक्र हे परंपरेचा आधार घेतात आणि त्यांचे अनुयायी (इस्लामी) धर्मोत्सव आता मशिदी आणि मदरसा यांचे कुंपण ओलांडून कसा ‘बाहेर’ गेला आहे याची आठवण करून देतात. धर्माने हे असे कुंपण ओलांडणे त्यांस मंजूर नाही. त्यामुळे धर्म भ्रष्ट होतो असे या अशा मागासांस वाटत असणार. हे असे वाटणे आणि तसे वाटणार्‍यांस समर्थन मिळणे हे कोणत्याही लोकशाही देशासाठी धोक्याचे आहे. कारण एकदा का हे ‘वाटणे’ स्वीकारार्ह होत गेले की त्यातून केवळ कट्टरपंथीयांचा उदय होतो; त्यांचे फावते आणि शेवटी त्यांच्या हाती धर्मसूत्रे जातात. आज अनेक देशांत हे कट्टरपंथीय इस्लामी स्वधर्मीयांचेच शिरकाण करताना आढळतात. ‘इस्लामला अशुद्ध केले’, ‘इस्लाम भ्रष्ट केला’ अशी कारणे पुढे करत हे विचारांध कट्टरपंथी बेलाशक स्वधर्मीयांची कत्तल करतात. विवेकास रजा देऊन एकदा का कट्टरता अंगी बाणण्यास सुरुवात झाली की अशांस सर्व काही खुपू लागते. युरोपातील बोस्निया- हर्झगोव्हिना या देशात या कट्टरपंथीयांनी मशिदी पाडल्या कारण त्यावरील घुमट बिगर-इस्लामी आहेत, असे त्यांचे म्हणणे. ते एक वेळ ठीक. पण आपल्याच धर्मबांधवांस कंठस्नान घालण्यासही या कट्टरपंथीयांनी कमी केले नाही. मल्याळींचा ओणम नुकताच साजरा झाला. त्यात हिंदू तरुणींच्या जोडीने ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मीयही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि यंदाही ते तसे झाले. या भिन्नधर्मीय तरुण-तरुणींच्या उत्सवी उत्फुल्लतेचा धर्मनिरपेक्ष आविष्कार देशाने नुकताच पाहिला. त्याच राज्यात इस्लामी धर्मगुरू महिलांच्या कुलूपबंदतेचे, बुरख्याचे समर्थन आणि आवाहन करत असेल तर त्यामागील धोका दुर्लक्ष करण्यासारखा नाही. हा कोणता धर्म? तरीही त्याचे ज्यांस पालन करावयाचे आहे त्यांनी ते खुशाल करावे. पण आपापल्या मठीच्या चार भिंतींच्या आत. या मठीचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात आले की एकाच धर्माचा अंमल हवा. हा धर्म म्हणजे देशाचे संविधान. हे संविधान स्त्री-पुरुष असा भेद करत नाही. पुरुषांस जे स्वातंत्र्य देते ते आणि तितकेच स्वातंत्र्य महिलांसही देते. तेव्हा या संविधानाचा अनादर करत महिलांस घराबाहेर पडू देऊ नका असे सांगण्याचा अधिकार या धर्मगुरूंस दिला कोणी? ते भले असतील ‘ग्रँड मुफ्ती’ किंवा अन्य काही. पण ते स्वधर्मवास्तूच्या आत. बाहेर महिलांनी कसे वागावे वगैरे प्रवचनांचा, मर्यादा निश्चितीचा अधिकार त्यांस नाही. ‘धार्मिकता’ या संकल्पनेप्रमाणे ‘मर्यादा’ ही संकल्पनाही बिचारी स्त्री-लिंगी. तिचे नियंत्रण करू पाहणारा ‘धर्म’ मात्र पुरुषी. अन्य अनेक मुद्द्यांप्रमाणे याबाबतची घृणास्पद पुरुषसत्ताकताही मोडून काढणे गरजेचे आहे. कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार यांचे ताजे वक्तव्य ती गरज अधोरेखित करते. (आजच्या लोकसत्ता संपादकीय मधील काही भाग. Utility- GS1 - भारतीय समाज; Ethics GS4; Essay) #gs1 #gs2 #gs4 #essay
488
3
मुलीच्या शिक्षणासाठी 'अमृत दौड' दोन मुलींच्या भविष्यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित अमृत दौडमध्ये स्वयंपाकाचे काम करणाऱ्या ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी चक्क साडी नेसून सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर विजयही मिळवला. ना महागडे स्पोर्ट्स शूज, ना ट्रॅकसूट, ना कसले प्रशिक्षण अशा स्थितीत स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांकाचे तीन हजारांचे बक्षीस पटकावले. व्यावसायिक तयारी करणाऱ्यांना मागे टाकत त्यांनी हा विजय मिळवला. या खुल्या धावण्याच्या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी होऊन धावत होते. याच गर्दीत सर्वांत मागच्या रांगेत रमाबाई रणवीर सहभागी झाल्या. घरकाम करणाऱ्या रमाबाई रणवीर रोजच्या साडीत स्पर्धेत सहभागी झाल्या. स्पर्धा सुरू झाल्यावर तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले. मात्र काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली. पावसाने ओला झालेला रस्ता आणि पायाला टोचणारे खडे अशा प्रतिकूल परिस्थितीत साडीचा पदर सांभाळत त्या धावत होत्या. मुलीच्या शिकवण्याची जिद्द मनात धरून त्यांनी धावण्याचा वेग वाढवला आणि एक एक स्पर्धकाला मागे टाकून फिनिशिंग लाइन गाठली. 'संसारासाठी रोज धावपळ करते. आज स्वतःसाठी धावले,' अशी प्रतिक्रिया रमाबाईनी व्यक्त केली. पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी रमाबाईंवर आली आहे. मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न समोर असल्याने त्या त्यांचे मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास आल्या आहेत. लोकांकडे स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. त्यांची एक मुलगी 'बीएससी'चे शिक्षण घेत आहे, तर दुसरी मुलगी पोलिस भरतीची तयारी करत आहे. तिची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने रमाबाईंनी बक्षीस जिंकायचे ठरवले. जिंकलेले बक्षीस त्यांच्या मुलींच्या फीसाठी उपयोगी येणार आहे.
2 491
4
किताबें करती हैं बातें बीते ज़मानों की दुनिया की, इंसानों की आज की, कल की एक-एक पल की ख़ुशियों की, ग़मों की फूलों की, बमों की जीत की, हार की प्यार की, मार की क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें? किताबें कुछ कहना चाहती हैं। तुम्हारे पास रहना चाहती हैं॥ किताबों में चिड़िया चहचहाती हैं किताबों में खेतियां लहलहाती हैं किताबों में झरने गुनगुनाते हैं परियों के किस्से सुनाते हैं किताबों में राकेट का राज़ है किताबों में साइंस की आवाज़ है किताबों में कितना बड़ा संसार है किताबों में ज्ञान की भरमार है क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे? किताबें कुछ कहना चाहती हैं। तुम्हारे पास रहना चाहती हैं॥ - सफ़दर हाश्मी
1 336
5
वेटरने आणलेल्या बिलाच्या मागे मजकूर लिहून पार्टनरने माझ्या हातात ठेवला. माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबरं टांगलं, माझं दुःख, माझं दुःख, तळघरात डांबलं. 'बहिणाबाई ना ?' 'Yes.' 'इतका चांगला संदेश बिलाच्या कागदावर उगीच लिहिलास. थांब, मी दुसरा कागद आणतो. हाच मजकूर पुन्हा लिही.' पार्टनर म्हणाला, 'अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही.' 'असं कसं ?' 'माणूस नुसत्या काव्यावर जगत नाही. मागची बाजू व्यवहाराचीच.' 'आणि एखाद्या अरसिक अकाऊंटस्‌मधल्या माणसानं बिलाची बाजू अगोदर पाहिली तर.....' 'तर कागद फिरवून सांगायचं, व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहेत. नया पैशांत मांडता न येणारे!' ~ पार्टनर (वपु काळे )
1 421
6
https://www.youtube.com/live/tgqsfKYFVmw?si=6HlQlTrmRdRjeTUW
1 036
7
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेत आदिवासी दिनाचा उत्सव साजरा करून आलेल्या मुली एका मोठ्या खोलीत, जमिनीवर झोपल्या होत्या. रात्री अडीचच्या दरम्यान एका मुलीला काही तरी चावल्याचं जाणवलं. तिचा आरडाओरडा सुरू झाला तोच दुसऱ्याही मुलीला सापाने दंश केला. तालुक्याचं ठिकाण धानोरा अवघ्या दहा किलोमीटरवर. रस्ता खराब असल्याने त्यांना २५ किलोमीटरचा वळसा घेऊन दवाखान्यात जावं लागलं. त्या तिथे पोहोचतात तोच, आश्रमशाळेत आणखी चार मुलींना सर्पदंश झाल्याचं निदर्शनास आलं. या सगळ्यात तिघींचे प्राण गेले. व्यवस्थेला असुविधेचा सर्प कसा विळखा घालतो बघा, सगळ्या मुली एकाच खोलीत झोपत, त्यांना खाटा नव्हत्या. लागूनच दगड विटांचे ढीग नि सरपणाचा ढिगारा. तिथे तीन महिने आधी एक साप निघाला होता. आता दीडशेहून अधिक मुली शाळा सोडून निघाल्या. शिक्षणात रस निर्माण व्हावा म्हणून केलेली व्यवस्था जिवावर उठत असेल तर काय म्हणावे? सर्पदंशापूर्वी मेळघाटातील विषबाधेचा प्रकार खूप गाजला. धारणीतील टिटंबा आश्रमशाळेतील मुलांनी जेवण केलं आणि कुणी गरगरलं, कुणाला चक्कर आली. जुलाब, उलट्या होऊ लागल्या. मुले घाबरून गेली. त्यांना तातडीने धारणीच्या रुग्णालयात दाखल केलं. यातून मुलं सावरत नाही तोच, बिजुधावडी, सावलीखेडा, सुसर्दा आश्रमशाळेतील मुलांनाही तसंच होऊ लागलं. जवळपास १७० विद्यार्थी या अवस्थेतून गेले. विद्यार्थ्यांना सकस, गुणवत्तापूर्ण अन्न मिळावं म्हणून काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील स्वयंपाक बंद करून 'सेंट्रल किचन' मधून अन्नपुरवठा सुरू केला. त्याच सेंट्रल किचनमधून विषाक्त अन्न बाहेर आलं. आजारापेक्षा उपचार भयंकर म्हणण्याची वेळ आली. चिखलदरा तालुक्यातील डोमा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अचानक भीतीदायक लक्षणं दिसू लागली. कारण नसताना मोठ्याने रडणं, जोरजोरात हसणं, अचानक ओरडणं, शांत बसून राहणं, कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणं आदी. मुले अचानक अशी वागू लागल्याने भुताटकीच्या अफवा पिकल्या. भूमकाला (मांत्रिक) पाचारण झालं. घाबरलेल्या पालकांनी मुलांना घरी परत नेले. डॉक्टरांच्या मते, 'हा 'मास हिस्टेरीया'चा प्रकार आहे. तीव्र मानसिक तणावातून तो होतो'. शाळेतल्या निरागस मुलांना असा कोणता तीव्र तणाव आहे. तो कोण देत आहे ?
4 248
8
आलिसिया स्पॅनिश, युरिना आणि फेइट अमेरिकी, आलिसिया कलाकार, तर युरिना कॉल सेंटरमधील ऑपरेटर. या तिघींचे देश वेगळे अन् संस्कृतीही वेगळी; परंतु त्यांच्यात समान धागा आहे, तो त्यांनी निवडलेल्या जोडीदारांचा. हा जोडीदार मानव नाही; तो आहे एक यंत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार असलेले संवादयंत्र (एआय चॅटबॉट)! कोणत्याही देशात अशा विवाहाला कायदेशीर मान्यता नाही; तरीही त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आलिसियाचा जोडीदार आहे, 'आयलेक्स', युरिनाचा 'क्लाउस'; अन् फेइटचा 'ग्रिफ'. आयलेक्स, क्लाउस, ग्रिफ ही या तिघींनी आपल्या सहचऱ्यांना दिलेली नावं. प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको यांच्यात जसा संवाद होतो, तसाच त्यांच्यातही होतो. रुसवे-फुगवेही होतात; परंतु ते कडेलोटाच्या टोकावर जात नाहीत. कारण, हे यंत्ररूपी सहचर आपापल्या पत्नींशी प्रेमानं बोलतात, त्यांच्या सुख-दुःखात समरस होतात, त्यांना हवा तसा सल्ला देतात अन् मुख्य म्हणजे त्यांची स्तुती करतात ! 'एआय' अशा प्रकारे काही लोकांसाठी सर्वांत जवळचा मित्र, सखा/सखी, गुरू, तत्त्वज्ञ, वाटाड्या बनलेय, जीवनसाथी बनलेय. ते 'एआय'शी मनमोकळेपणानं गप्पा मारतात, दररोजच्या जगण्यातील अडचणी सांगतात, निराशां व्यक्त करतात, नातेसंबंधांतील तणावापासून ऑफिसमधील राजकारणापर्यंत सारं काही नमूद करून सल्ला विचारतात. 'एआय' केवळ श्रवणभक्ती होत नाही, तर सहानुभूती व्यक्त करते, 'मूड' चांगला करते. आलिसिया, युरिना यांच्यासारख्यांनी त्याच्यात आपला जीवनसाथी शोधलाय. अशांची संख्या बोटांवर मोजता येण्यासारखी असली आणि बहुतेक जण 'एआय' कडे सखा/सखी म्हणून पाहत नसले, तरी त्याला आपला सोबती मानणारे अनेक आहेत. 'बॉट माझा सोबती' म्हणणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्याची मोठी बाजारपेठ वेगानं विकसित होतेय. मानवाशी आभासी; परंतु भावनात्मक परिक्ष्य पातळीवर मैत्री करणारे चंटबॉट्स एआय कम्पॅनियन' किंवा कृत्रिम सोबती म्हणून ओळखले जातात. २०२२ मध्ये अशा 'एआय कम्पॅनियन अॅप'ची संख्या सोळा होती; ती आता तीनशेच्या वर गेलीय. रिप्लिका, चार्टर एआय, पॉलीबझ, चाय हे त्यांपैकी काही. त्यांचा वापर करणारे वाढत असून, 'टेकक्रंच'च्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या जुलैपर्यंत असे अॅप आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाइल फोनवर डाउनलोड करणाऱ्यांची संख्या २२ कोटी होती; त्यांपैकी ८८ टक्के डाउनलोड तर २०२५च्या पहिल्या सहामाहीतील होते. वर्षभरात ही संख्या साठ कोटींवर जाईल, असा अंदाज त्या वेळी वर्तविण्यात आला होता. 'एआय कम्पॅनियन' च्या बाजारपेठेचे सध्याचे मूल्य पाचशे डॉलरवर गेले असून, ती दर वर्षी ३६ टक्के दरानं वाढून २०३६पर्यंत ९७२ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. या कृत्रिम सोबतीशी लिखित स्वरूपात संवाद साधता येतो; किंवा थेट बोलताही येते. तो सर्व गोष्टी, म्हणजे आप्तेष्टांच्या वाढदिवसापासून ऑफिसमधील कामापर्यंतच्या अनेक बाबी लक्षात ठेवतो; त्यांची आठवण करून देतो. दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो साथ करतो. त्यामुळे त्याचा वापर करणारे वाढताहेत. त्यांपैकी सर्वच जण त्यात आपला जीवनसाथी पाहत नाहीत. मात्र, निराशेनं ग्रस्त असलेले किंवा मानवी नातेसंबंधांपेक्षा तंत्रज्ञानाशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणं इष्ट मानणारे त्याच्यात आयुष्याचा साथीदार पाहतात. आलिसिया, युरिना, फेइट त्यांपैकीच. आलिसियानं आपल्या साथीदाराला 'होलोग्राम'च्या रूपात म्हणजे प्रकाशकिरणांद्वारे मानवी आकार प्राप्त करून साकारलंय. युरिनानं त्याचं चित्र साकारलंय. यंत्राला नवरा मानण्याची त्यांची कृती अनैसर्गिक खरी; माणसं माणसांपासून दुरावल्यामुळे, संवाद खुंटल्यामुळे, स्नेहात कृत्रिमपणा आल्यानं आणि यंत्रांवरील अवलंबित्व वाढल्यामुळं निर्माण होत असलेली पोकळी कृत्रिम बुद्धिमत्ता भरून काढत आहे; पण अशा वेळी दोष कोणाला द्यायचा ? - श्रीधर लोणी (महाराष्ट्र टाइम्स)
1 754
9
“The right question is usually more important than the right answer.” - Plato
1 637
10
आयुष्याची वारी…
आयुष्याची वारी…
4 166
11
ज्यांची दृष्टी धुसर झाली त्यांच्यासाठी चष्मा आहे स्वतःहून गांधारी झाले त्यांना काही उपाय नाही - विशाल मोहिते Join - https://t.me/essayUPSCMPSC
3 970
12
स्वार्थ जणु भिंतीवरचा, आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी... या गीताच्या ओळी समकाळात वारंवार आठवतात. 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही' ही एकच ओळ पूर्वी जीवनाच्या संचिताला शब्दप्रामाण्य देणारी होती. परंतु अशा 'लक्ष्मणरेषा' आता बिनदिक्कत पुसून त्यावर काळेकुट्ट ठिपके देणारी माणसं अवतीभोवती वाढली. काल-परवापर्यंत कणव, निष्ठा, सत्य, मूल्ये वगैरे अशा लंब्याचौड्या बाता झोडणारे लालसेपोटी स्वप्रतिमा नेस्तनाबूत करून या वाहटूळीत उडून उतली मातली. असो, विवेकी माणसांनो, तुम्ही फारच कष्टी होत असाल. पण कालाय तस्मै नमः. अगदी कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळून घेतलं गेलं तर त्याकडे पाहणाऱ्यांना डोळे वटारून म्हटलं पाहिजे, तुझे डोळे तू घरी का ठेवत नाहीस, अशा काळाच्या गर्तेत आहोत आपण. या कोलाहलात स्वतःच्या प्रतिमांशी वैर घेणाऱ्या माणसांच्या सावल्या मोठ्या होत चालल्यात, तसतसा सत्याचा प्रकाश लुप्त होत चालला. याच सावल्या दिवसागणिक गिळत चालल्यात प्रकाश देणाऱ्या ठिपक्यांना अन् प्रकाशाकडे पाहणाऱ्या किलकिल्या नजरांना. तरी एक बरं ही स्वार्थांध माणसं अलीकडे तंत्रज्ञान युगात कॅमेऱ्यात कैद असतात. यांची भूमिका बदलली की यांच्या जुन्या प्रतिमा या माणसांन्वा पिच्छा करतात. काय होतास तू काय झालास तू... किंवा काय वागलास तू... हे दाखवून कालचा आणि आजचा तू.... पाहत चल आरशात, असं सुचवीत असतील. या प्रतिमा यांना एकांतात सांगत असतीलही या फायद्या तोट्याच्या गोष्टी. पण तो मी नव्हेच, हे किमान म्हणण्याची सोय उरली नाही डिजिटल युगात हे बरंच झालं. म्हणून वाटतही असेल यांना यत्किंचित वाईट, परंतु जब लोगों को उजाला नजर आने लगता हैं, तब वो भूल जाते हैं की अंधेरे में साथ कौन था... असा हा काळ. इतक्या या बेईमान दुनियेत भट्टीत पोलाद शेकावं तशी माणसं शेकली जावीत न्याय, तत्त्व, विचार, मूल्यं यांच्या प्रति. त्यांना बोलता यावं तुकोबांच्या शब्दात... 'बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी। कोण कैसी कैसी भावनेच्या ॥' प्रसंगी एकटं उभं राहावं, परंतु भावनेच्या, स्वार्थाच्या आड जावून करू नये तडजोड़ निष्ठेशी हे सांगणं आज पचेल काय !! - डॉ. गणेश मोहिते- आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील सगुण निर्गुण सदरातून
3 694
13
स्वामी विवेकानंद एकदा नदीकिनारी उभे होते. त्यांना एकाने विचारलं, 'स्वामीजी, जीवनात गुरूचं स्थान काय?' स्वामीजी म्हणाले, 'समोरची होडी पाहा, नदीपार व्हायला तिला किती वेळ लागेल?' तो म्हणाला, 'एक तास.' स्वामीजी म्हणाले, 'हीच होडी दुसऱ्या मोठ्या बोटीला जोडली तर?' तो म्हणाला, 'पंधरा मिनिटांत ती नदीपलीकडे जाईल.' विवेकानंद म्हणाले, 'गुरू हा त्या मोठ्या बोटीसारखा असतो. क्षणात तो तुमची नौका पार करतो.'
2 017
14
Essay Test 4.pdf
1 996
15
https://www.loksatta.com/chaturang/mangala-samant-passes-away-social-activist-feminist-writer-maharashtra-literary-work-analysis-amy-95-5997887/
2 236
16
पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी, प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. ~ वपु काळे | फॅण्टसी एक प्रेयसी
1 818
17
संगीत देवबाभळी नाटकातील तुकारामांच्या पत्नीच हे वाक्य❤️
संगीत देवबाभळी नाटकातील तुकारामांच्या पत्नीच हे वाक्य❤️
2 120
18
निबंधात अशा real आणि grassroot story वापरा.
निबंधात अशा real आणि grassroot story वापरा.
1 558
19
Essay and Ethics Batch - Lecture 2 (MPSC Mains 2026/ UPSC Mains 2026) निबंध कसा लिहावा? आज दुपारी २ वाजता. मार्गदर्शक: डॉ. आश
Essay and Ethics Batch - Lecture 2 (MPSC Mains 2026/ UPSC Mains 2026) निबंध कसा लिहावा? आज दुपारी २ वाजता. मार्गदर्शक: डॉ. आशिष जैतपाळ • UPSC Essay मध्ये 140+ गुण • लेखक – 'निबंधकोश : विचारविमर्श' • लेखक – 'समग्र नीतिशास्त्र' • Author – 'Comprehensive Ethics' • Author – एथिक्स, इंटरग्रिटी अँड एप्टीट्यूड Offline - https://maps.app.goo.gl/R1oEYDRTq2x65kMb8 online- https://www.youtube.com/live/B0PqCxwLJyg?si=2ClRiW7yqX7QPVtd
1 260
20
कोण सुंदर दिसत? 😊 तुमच्या निबंधाच्या पेपर मधे तुम्ही तुमच्या सभोवतालचे निरीक्षण कसे करता, reflect कसे करता हे दिसले तर मार्क
कोण सुंदर दिसत? 😊 तुमच्या निबंधाच्या पेपर मधे तुम्ही तुमच्या सभोवतालचे निरीक्षण कसे करता, reflect कसे करता हे दिसले तर मार्क्स चांगले मिळू शकतात. आजूबाजूला बघण्याची दृष्टी मात्र विकसित व्हायला हवी. भेटूया ८ जूनला- निबंध कसा लिहावा या basic चर्चेपासून सुरुवात करूया…
2 536