Electrical Knowledge by Sachin Sir
Відкрити в Telegram
This channel is all about Educational and Advertisment review.
Показати більше4 824
Підписники
Немає даних24 години
-157 днів
-5730 днів
Архів дописів
#Mahadiscom_AE_JE_Vacancy
#Increase_Vacancy_2023
#No_GATE_For_MAHADISCOM
#Revise_Proper_CastWise_Distribution
#Maharashtra_Domecile_Compulsory
@CMOmaharashtra
@Dev_Fadanvis
@mieknathshinde
@MSEDCL
@AbhipawarBJP
@AjitPawarspeaks
@RRPSpeaks
@Dhananjay_AAP
@maha_governor
प्रति,
मा. प्रधान ऊर्जा सचिव मॅडम,
ऊर्जा विभाग,मंत्रालय,मुंबई दि:-१/१/२०२४
विषय :-१) महावितरण मधील जाहिरात क्र.७/२०२३(AE)आणि जाहिरात क्र.८/२०२३(JE) जागा वाढ करणे बाबत.
२)महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील AE संवर्गाची GATE सक्ती रद्द करून IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड करणे बाबत.
३) महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ मध्ये योग्य जातीनिहाय जागांचे वितरण करणे बाबत.
४) महाराष्ट्र शासन निर्णय अनुसार महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ साठी महाराष्ट्र अधिवास दाखला सक्तीचा करणे बाबत.
महोदय,
वरील विषयास अनुसरून महावितरण ने ३१/१२/२०२३ रोजी महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली परंतु सदर जाहिराती मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. जसे की Mahatransco, Mahagenco सहाय्यक अभियंता पदासाठी IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवते तसे Mahadiscom सहाय्यक अभियंता पदासाठी आधी कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक GATE exam चे मार्क्स वरून भरती करणार हा विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी वर खूप मोठा अन्याय आहे. तरी महावितरण ने सुद्धा IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवावी अशी नम्र विनंती.
महोदया महावितरण मध्ये AE ६००+ आणि JE ३००+ जागा रिक्त असताना फक्त AE २८१ आणि JE पदासाठी फक्त ५१ जागांसाठी महावितरण ने जाहिरात प्रसिद्ध करून ५ वर्षा पासून महावितरणच्या परीक्षेसाठी अभ्यास करत असलेल्या विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थी वर अन्याय केलेला आहे.
महोदया, महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मध्ये एकूण २८१ जागा पैकी OBC कॅटेगरी साठी १३७ जागा आणि ओपन कॅटेगरी साठी फक्त १९ जागा, ST कॅटेगरी साठी ०० जागा असा Uneven वितरण केलेले असल्यामुळे जाहिराती मध्ये योग्य तो बदल करावा अशी आपणास नम्र विनंती करतो.
महोदया, महाराष्ट्र शासन निर्णय अनुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र सक्तीचे असताना महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ जाहिराती मध्ये त्याचा अभाव दिसून आला. तरी महाराष्ट्र Domecile सर्टिफिकेट सक्तीचे करावे अशी नम्र विनंती.
तरी,महोदया वरील सर्व मागण्याचा सहानुभूतीपर्वक विचार करून योग्य ते बदल जाहिराती मध्ये करण्यात यावेत अशी मी आपणास नम्र विनंती करतो अन्यथा महाराष्ट्र विद्युत अभियंता त्यांच्या तर्फे मोठे आंदोलन ऊर्जा विभाग व महावितरण विरोधात केले जाईल.
आपले विश्वासू विद्युत अभियंते
प्रती,
महावितरण
ऊर्जा विभाग ,
महाराष्ट्र राज्य.
विषय - ऊर्जा विभागातील महापारेषण ( Mahavitran ) मधील सहाय्यक अभियंता ( AE ) हे पद दिलेल्या आश्वासन प्रमाणे सरळसेवाद्वारे IBPS कंपनी मार्फत भरण्यात यावेत व महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र सक्तीचे करून दहावीला मराठी विषय असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे याबाबद...
महोदय ,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की ,
महावितरण मधील सहाय्यक अभियंता GATE मार्फत घेण्याचे नियोजन केले आहे.( Mahadiscom advt NO.07/2023 Dated-29/12/2023).
तरी महावितरण मधील सहाय्यक अभियंता हे पद GATE मार्फत न घेता सरळसेवेद्वारे पूर्वीप्रमाणे ( IBPS ) मार्फत भरण्यात यावी व महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र सक्तीचे करून दहावीला मराठी विषय असण्याऱ्या उमेदवाराना प्राधान्य देण्यात यावी याची कारणे / सूचना खालील प्रमाणे-
1. GATE परीक्षेची जाहिरात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये निघून फेब्रुवारी - मार्च मध्ये परीक्षा होऊन निकाल लागले जातात परंतु ऊर्जा विभागातील ( mahatranco / mahagenco / mahadiscom जाहिरातिचे काही वेळापत्रक नसते. यामुळे ज्यांनी GATE 2021 2022 2023 दिली आहे असेच उमेदवार पात्र होतील.
2. आधीच 6 वर्षे झालीत ऊर्जा विभागात सहाय्यक अभियंता ( AE ) या पदांची जाहिरात आलेली नाही त्यामुळे खूप मोठा वर्ग Mahadiscom AE भरती पासून वंचित राहील.
3. तामिळनाडू,गुजरात,गोवा,पंजाब या राज्याच्या ऊर्जा विभागाने दहावीला तामिळ,गुजराती,कोकणी,पंजाबी विषय असणाऱ्या उमेदवाराना प्राधान्य दिलं आहे मग महाराष्ट्रमध्ये मराठी विषय असलेल्या उमेदवारांना प्राधान्य का दिले जात नाही ?
4.महापारेषण अणि Mahagenco ह्या पन महाराष्ट्र ऊर्जा विभागात येतात मग त्यांनी सहायक अभियंता पदासाठी IBPS मार्फत परीक्षा घेऊन पदे भरली आहेत. मग महावितरण साठीच वेगळा नियम का?.
4. In The Highcourt Judicature at Patna
CIVIL WRIT JURISDICTION
CASE NO - 8760 OF 2019
CASE NO - 9152 OF 2019
कलम 16 नुसार सर्वाना सरकारी नोकरीत समान संधी मिळाली पाहिजे, तसेच पटना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की GATE मार्फत परीक्षा घेणे हे भेदभाव ठरू शकते.
5. मूलतः GATE ही उच्च शिक्षण व शिष्यवृत्ती साठी असलेली चाचणी परीक्षा आहे.
तरी आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून बेरोजगार विद्यार्थाचे होणारे नुकसान टाळावे...
आपला विनम्र,
एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी
या नवीन वर्षांमध्ये तुमचे सिलेक्शन महावितरण किंवा महापारेषण मध्ये व्हावे अशी मनोकामना करतो . नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो.... अभ्यास करा आज पासून सेलेब्रेशन सिलेक्शन नंतर करूया.
Quiz will be start so join fast
https://t.me/Electricalknowledgewithsachinsir
