cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरतीबाबत सर्व माहिती ✍✍ Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1

Більше
Рекламні дописи
6 888
Підписники
+2124 години
+1417 днів
+53430 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त फ्रॉड होतात ते फिजिकली हॅंडीकॅप कॅटेगरीमध्ये आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा घेतात ती अधिकाऱ्यांची गोरगरीब लेकरं. गरिब ह्याच्यासाठी की पूजा खेडकरने यूपीएससीच्या डिटेल एप्लीकेशन फॉर्ममध्ये (DAF) तिच्या पॅरेंट्सचं उत्पन्न शून्य टाकलं होतं. तिचे महाआदरणीय वडील वंचितकडून लोकसभा लढले तेव्हा त्यांनी आपली संपत्ती फक्त 40 कोटी दाखवली होती. आजच्या महागाईच्या काळात 40 कोटींमध्ये काय येतं? बिचार्‍या पुजाच्या नावावर सुद्धा फक्त 17 कोटींची संपत्ती आहे. आई वडील वेगळं राहतात असं तिने एका मॉक इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं. परवा तिची बिचारी आई मुळशीतील काही शेतकऱ्यांना बंदूक दाखवत होती. मुळशी पॅटर्न चित्रपटाचा दुसरा भाग तिच्यावर चित्रीत केला पाहीजे. या गोष्टींवरून आपल्याला ह्या मायलेकींच्या संघर्षाची जाणीव होते. पूजा खेडकरने दोन प्रकारच्या आरक्षणात फ्रॉड करून IAS चं पद मिळवलं आहे. पहिलं म्हणजे ओबीसी आरक्षण. ओबीसीसाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटचा क्रायटेरिया असतो त्यामध्ये परीक्षा देणाऱ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे. तरच तुम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवता येतो. जर ते उत्पन्न आठ लाखांच्यावर गेलं तर त्या व्यक्तीला ओबीसी रिझर्वेशनचा लाभ घेता येत नाही व त्याला ओपनमधून पद मिळवावं लागतं. पूजाच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी व तिची 17 कोटी व तिच्या बंदूकधारी आईची अशीच काहीतरी कोटींमध्ये असेल. तरी तिने ओबीसीमधून पद मिळवलं. माझ्या ओळखीतला सांगलीचा एक मुलगा यूपीएससीमधून IRS पदी सिलेक्ट झाला होता, त्याचे वडील माध्यमिक शाळेत शिक्षक होते म्हणून त्यांचा वार्षिक पगार आठ लाखांच्या जरा वर भरत होता त्यामुळे त्याचं पद गेलं. अजून एक मित्र आहे ज्याचं पण IRS म्हणून सिलेक्शन झालं आहे त्याच्या वडिलांचं उत्पन्नही आठ लाखांच्यावर भरल्याने त्याला सुद्धा जॉइनिंग मिळाली नाही आणि इथे वडील व स्वतः मिळून 50 कोटींच्यावर संपत्ती असूनही बिचाऱ्या गरिबीत वाढलेल्या पूजाला IAS पदी नियुक्ती मिळाली, How cute is this! यावरून आपली व्यवस्था गोरगरिबांची किती काळजी घेते हे लक्षात येतं. पूजा खेडकरने दुसरा फ्रॉड केलाय तो फिजिकली हॅंडीकॅप्ड कॅटेगरीमध्ये. PH मध्ये पाच कॅटेगरी असतात. दृष्टीदोष, श्रवणदोष, लोकोमोटरी डिसॉर्डर वगैरे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना आरक्षण आहे. या खेडकर नावाच्या कार्यकर्तीने PwBD-5 या कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट काढलंय. PH चं मेरीट आधीच खूप कमी लागतं आणि त्यात PwBD-5 सगळ्यात कमी लागतं कारण त्यात मल्टिपल डिसॅबिलिटीवाले कॅंडिडेट्स येतात. पूजा खेडकरने ब्लाइंडनेस आणि Mental Illness या दोन्हींचं खोटं सर्टिफिकेट काढलेलं आहे. IAS होण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो बघा. माझा एक आमच्याच विद्यापीठात शिकलेला मित्र आहे. त्याचं इंडियन फॉरेस्ट सर्विसमध्ये यूपीएससीतून सिलेक्शन झालं होतं. त्याचा एक डोळा पूर्णतः निकामी आहे. काहीच दृष्टी नाही त्यात. तरी DoPT ने (डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने) त्याची नियुक्ती रद्द ठरवली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एक डोळा चांगला असल्याने तो यूपीएससीच्या डिसॅबिलिटी क्राईटेरीयामध्ये बसत नाही पण कुठलाही दोष नसताना आपली लाडकी बहीण पूजा त्यामध्ये बसली व IAS झाली. वा DoPt वा! "लाडकी बहिण" योजनेची पहिली लाभार्थी ती ठरलेली आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की जर तुमच्याकडे पैसा, पद, लागेबांधे असतील तर नियमांना वाकवून नियमांची खोलून मारता येते. नियम फक्त सामान्य लोकांसाठीच आहे म्हणून सामान्य राहू नये हा संदेश आपल्याला यातून मिळतो. आता सगळी कथा सांगून झाली पण यातला मुख्य मुद्दा आहे तो फिजिकली हॅंडीकॅप्ड म्हणजेच दिव्यांग कॅटेगरीमध्ये होणार्‍या फ्रॉडचा. एखादा घोटाळा, गुन्हा सोशल मीडिया व बातम्यांमध्ये व्हायरल झाला की लोकं फक्त त्याच्या पुरतच बोलतात पण सिस्टमिक प्रॉब्लेमकडे कुणाचंच लक्ष नसतं. पत्रकार तर फक्त विषय गरम आहे तोवरच त्यावर लिहितात, बोलतात पण नवीन विषय मिळाला की तिकडे पळतात. पोर्शे एक्सीडेंट केसमध्ये सुद्धा झालं फक्त तेवढ्याच केसवर पत्रकाराकारांनी आभाळ वाकवलं पण मुख्य मुद्दा होता की 18 वर्षाखालील मुलांकडून होणारे भयानक गुन्हे आणि त्यातून त्यांची होणारी सहज सुटका. त्याबद्दल कुणीच बोललं नाही. पूजा खेडकरचा विषय फक्त तिच्यापुरताच मर्यादित नाही तर जवळपास प्रत्येक सरकारी नोकरीच्या परीक्षेत असे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून लोकं सिलेक्ट होतात आणि जे खरे दिव्यांग/PH वगैरे आहेत, ज्यांना त्या सवलतीची नितांत आवश्यकता आहे त्यांना ती मिळतच नाही.
Показати все...
जवळपास 50 ते 60% PH सर्टिफिकेट फ्रॉड असतात असं बोललं जातं. अर्थात त्याचा ऑफिशियल डाटा नाही पण माझ्या पाहण्यातल्या अशा कित्येक केसेस आहेत आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्यां प्रत्येकाला अशा कितीतरी केसेस माहीत असतात. महाराष्ट्रातील एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने Hearing Impairment चं सर्टिफिकेट काढून IAS पद मिळवलं होतं पण तिने पूजा खेडकर सारखा माज केला नाही म्हणून ती केस प्रकाशात आली नाही व सुमडीत सगळा कार्यक्रम पार पडला. माझ्या विद्यापीठातील दोन मुलांनी असंच डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून राज्यसेवेतून पदं मिळवली आहेत. मेडिकल टेस्ट मॅनेज क्लिअर झाली की संपला विषय आणि डॉक्टर लोकं पैसे घेऊन शेण खायला तयार असतातच. पोर्शे केसमध्येही डॉक्टरने ब्लड सॅम्पल बदलले होते. तुम्हाला खरोखर नाही तर फक्त कागदोपत्री दिव्यांग असण्याची गरज असते. स्पोर्ट कोट्यातही असेच डुप्लीकेट सर्टिफिकेट काढणारे शेकडो लोक्स आहेत. हे म्हणजे भाजपसारखं झालंय, दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना भाजप सरकारमध्ये मोठमोठी पद मिळतात आणि मूळ भाजपची लोकं फक्त हिंदुत्वावर आभाळ हाणण्यापुरतेच उरतात. कॉलेजला असताना माझे दोन बॅचमेट होते. त्यांनी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासात एक चतुर्थांश सवलत मिळावी यासाठी फिजिकली हॅंडीकॅपचे डुप्लिकेट आयडेंटिटी कार्ड काढलेले होते. त्याबद्दल त्यांना मी उठसूठ घोडे लावायचो. तिकडे धाराशिवमध्ये कुणीतरी महामंडळाचा अधिकारी होता, तो पैसे घेऊन असे सर्टिफिकेट सर्रास वाटायचा. या पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन ते आयडेंटिटी कार्ड काढून आणले होते. त्यातला एक जण तर दुसऱ्यांना नीतिमत्ता वगैरे शिकवायचा पण स्वतः मात्र तो पुरुषातील पूजा खेडकर होता. काही दिवसांनी जेव्हा मला ते त्यांचे आयडेंटिटी कार्ड सापडले तेव्हा मी ते फाडून फेकून दिले होते, तेव्हा त्यांची ती वन फोर्थची सवलत बंद झाली. जे खरेखुरे दिव्यांग आहेत त्यांना शिकण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. दृष्टिहीन व्यक्ती असेल असेल तर ब्रेल लिपीत अभ्यास करावा लागतो आणि त्या लिपीमध्ये बहुतेक पुस्तकं उपलब्ध नसतात आणि दृष्टी कमी असली तरी पुस्तके वाचनात कितीतरी कष्ट पडतात. Hearing Impairment असेल तर लेक्चर वगैरे ऐकणे अवघड होतं. कन्सेप्ट समजावून घेणं तर कितीतरी अवघड होऊन बसतं. लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असलेल्यांना तर कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं, त्यांना दूर राहून शिक्षण घेता येत नाही. पण हे खेडकरसारखे फ्रॉड कार्यकर्ते डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून ओपनच्या अर्ध्या मार्कात देशातील सर्वात मोठं प्रशासकीय पद मिळवतात. म्हणुन जे खरेखुरे PH आहे त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण या गोष्टींचा बाकीच्यांना काही फरक पडत नाही. सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे आहे, व्हाट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनेल वगैरेवर तुम्ही एकत्र येऊ शकता. एखाद्या परीक्षेत पास झालेल्यांमध्ये खरे PH किती आहे व फ्रॉड किती आहे त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. लोकशाहीत एकट्याचं कुणीच ऐकत नाही. ज्याची लॉबींग स्ट्रॉंग असते त्याचीच कामे होतात. आपल्या न्याय्य हक्काची कामे काढण्यासाठी सुद्धा लॉबिंग करावीच लागते व त्यासाठी प्रेशर ग्रुप तयार करावा लागतो. UPSC, DoPT, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना सुद्धा यातून अक्कल आली पाहिजे. जोपर्यंत खेडकरवर बसलेल्या कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सरकारने पूजा खेडकरला सस्पेंड करायला पाहिजे होतं पण त्यांनी फक्त तिची ट्रान्सफर केली आणि तेही प्रशासकीय कारणासाठी करतोय असं सांगितलं. अरे लाजा वाटू द्या! तुमचे असले अनेक फालतू निर्णय तुम्हाला राजकीयदृष्ट्या महागात पडले असूनही तुम्ही सुधरायला तयार नाही. सरकार काय झकमारी करेल ते करू द्या पण दिव्यांग व्यक्तीने एकत्र आलं पाहिजे. डिसॅबिलिटी असूनही कित्येक दिव्यांग व्यक्ती खूप टॅलेंटेड असतात. 2014 साली ईरा सिंगल नावाची दिव्यांग मुलगी युपीएससीमध्ये ऑल इंडिया टॉपर आली होती. असंही नाही की यूपीएससीने तिला इंटरव्यूमध्ये खूप मार्क दिले होते पण मेन्समध्ये आऊटस्टँडिंग मार्क्स पडून ती भारतात प्रथम आली होती. पाठीत कुबड असल्याने तिला नीट बसता येत नाही. विचार करा कीती कष्ट पडले असतील दिवसरात्र अभ्यास करायला. इरा सिंगलसारख्या व्यक्तींना दिव्यांग आरक्षणाची खरी गरज आहे. जे की आरक्षणाच्याही पलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करतील. 👉 Join :- @studentsintiative
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Marriage is not a National Exhibition 💯💯💯💯
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
पुन्हा कंत्राटी भरती 😐🤔
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता.. 👉 लिंक 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html 👉 परीक्षा दिनांक : 14,15,16 जुलै ➡️ परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐
Показати все...
अती महत्त्वाचे... सध्या WCD ची परीक्षा होत आहे, तरीही कृपया कुणीही प्रश्न कोणत्याही चॅनल किंवा ग्रुप वरती शेअर करू नका कारण ह्यात होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होते बाकी सर्व हुशार आहे सर्वांना विद्यार्थी हित समजत असेलच अशी अपेक्षा जर कोणताही चॅनल विद्यार्थी हितासाठी असेल तर तो एकही प्रश्न शेअर करणार नाही टीप : कृपया बाकी चॅनल वाल्यांनी पण मेसेज करून द्यावे चॅनल वरती...
Показати все...
मुंबई जाणाऱ्या प्रवाशांनी शक्यतो ट्रेन ने प्रवास करावा... कारण शहापूर ते पडघा कल्याण ठाणे पर्यंत सर्व जाम आहे कमीत कमी 9-10 तास लागत आहे किवा त्यापेक्षा जास्त... पुढील 8 दिवस ही परिस्थिती असणार आहे. त्यामुळे ट्रेन चा मार्ग वापरावा.
Показати все...
👉 उद्या होणाऱ्या WCD Exam साठी महत्त्वाचे Points. १) Negative Marking आहे, त्यामुळे काळजीपूर्वक Answer tick करा. विनाकारण तुक्के मारु नका. २) Accuracy खूप महत्त्वाची असेल, त्यामुळे प्रत्तेक Question हा काळजीपूर्वक Read करा. ३) जो Question येतच नाही त्याचा विचार जागेवर बंद करा. ४) जिथे ५०-५० चान्स वाटतोय तिथे थोडी Risk घेऊ शकता. ५) चांगली Accuracy असेल तर 80-85 Questions will be Best Attempt. काही गैरप्रकार दिसला तर बिनधास्त बोला..!! ▪️Confident रहा, दिवस तुमचाच असेल. ▪️All The Best..!! 👍
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.