cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

सैर सह्याद्रीची....

महाराष्ट्रातील गडांची माहिती व्हावी या हेतूने ग्रुप'ची निर्मिती करण्यात आलेली आहे... #सह्याद्री #दुर्गप्रेमी #मी_प्रवासी भटकंती'ची आवड असणाऱ्या प्रत्येकाने जॉइन करावें असे चॅनेल... Join : @Sair_Sahyadrichi "गडांचे करू रक्षण, थांबवू वनराईचे भक्षण...!!"

Більше
Рекламні дописи
7 281
Підписники
+1424 години
+627 днів
+23130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🎯कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव रत्नागिरीतलं माचाळ गाव हे कोकणातलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. इथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.   May 11, 2024 by वनिता कांबळे Machal Village Ratnagiri : कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. मात्र याच कोकणात असं एक ठिकाण आहे  ते पर्यटकांना आता खुणावतंय. या ठिकाणाला कोकणातलं मीनी महाबळेश्वर असंही संबोधलं जातं. हे आहे रत्नागिरीतलं माचाळ गाव.   हिरवीगार झाडी... नागमोडी वळणाचा रस्ता... परिसरात पूर्णपणे धुके... थंड वातावरण... डोंगरावरून कोसळणारे धबधबे... अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.  लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. खाली उतरलेले आभाळ. आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो. माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो खरं तर या गावात मुचकुंदी  ऋषिंची गुहा आहे याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधलं जातं. अवघे तीनशे ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. येथील घरे कौलारु डोंगर उताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते.  माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोचता येतं. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात. एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्टय़ हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं. माचाळ हे गाव पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. तुम्हीही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा. 
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
‼️ ढगांवर तरंगणारे कोकणातील सर्वात सुंदर गाव! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घोषीत केले थंड हवेचे पहिले गाव माचाळ ते रत्नागिरी जिल्हा मध्ये येत असून त्या गावची लोकसंख्या फक्तं 350/400आहे.
Показати все...
sticker.webp0.00 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
_*आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.*_ *🚩 #जय_शिवराय*
Показати все...
sticker.webp0.32 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
*🚩 #ऊर्जामंत्र* _*आपल्या आयुष्यात नेहमी आपल्या आवती-भोवती घडलेल्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा त्यात खूप काही शिकायला भेटतं.*_ *#हर_हर_महादेव 🚩*
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
*यतो धर्मस्ततो जयः |* _*जिथे धर्म आहे, तेथे विजय आहे, धर्माच्या पाठीशी उभे राहिल्याचा विजय निश्चित आहे.*_ *जय_श्रीराम 🚩* *शिवराय_असे_शक्तिदाता..🚩*
#pk धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
Показати все...
sticker.webp0.00 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
❗️खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित❗️
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.