cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

HiSTORY by Hardikar

Більше
Рекламні дописи
1 516
Підписники
+224 години
+27 днів
+2330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

आज ४ जुलै. आज २९५ वी पुण्यतिथी आहे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांची! ‘प्रिन्सेस ॲन’ नावाचं जहाज १७१८ मध्ये इंग्लंडवरून भारतामार्गे हॉंगकॉंगला चाललं होतं. जाताना पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला येऊन मग ते पुढे गेले. ह्या जहाजाचा कॅप्टन होता निकोलस ल्यूहॉर्न. ह्याचा तसा कान्होजींशी प्रत्यक्ष कधीच संबंध वा संपर्क आला नव्हता. पण कान्होजींचं नाव त्या भागात इतकं प्रसिध्द होतं की त्यानं ते नक्कीच ऐकलं असावं. त्यावेळेस कंपनीच्या काही नाममात्र वाटाघाटीही कान्होजींसोबत चालल्या होत्या. ल्यूहॉर्नचं जहाज मुंबईजवळून जाताना ह्याने एक नोंद लिहून ठेवली आहे. ह्यात तो लिहीतो “…Several Gallivats at shore to look out, believing them to belong to Angrey whom is reckoned the greatest rogue on all this coast to everybody except the English…” (भावार्थ: “…किनाऱ्यावर भरपूर गलबतं होती, बहुतेक ती (कान्होजी) आंग्ऱ्यांची असावीत, (हे आंग्रे) इंग्रज सोडून इतरांसाठी ह्या किनारपट्टीवरचे सर्वात मोठे लुटारू म्हणून कुप्रसिध्द आहेत…”) वाटाघाटी सुरु असल्या तरी कान्होजी इंग्रजांचे शत्रू होते हे तर जगजाहीर होतंच. म्हणून जाताजाता त्याने “Their boats always returning to the harbour in the evening” म्हणजे: “त्यांची (कान्होजींची) जहाजं बंदरात नेहेमी संध्याकाळी परत येतात”. ही नोंदही करून ठेवली आहे. म्हणजे कंपनीच्या आरमारास कान्होजींच्या आरमारावर हल्ला वगैरे करायचा झाला तर ही गोष्ट कामास येईल. एकीकडे बोलणी करत आहोत हे दाखवून शत्रूवर बारीक पाळत ठेवायची इंग्रजांची सवयही जुनीच. पण कान्होजी आंग्र्यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदब्याचा नुसता अंदाजही यायला ही एका तिऱ्हाईताची छोटीशी नोंदही पुरेशी आहे. आज स्मृतिदिनानामित्त सरखेल कान्होजी आंग्र्यांना सादर प्रणाम! - संकेत कुलकर्णी (लंडन)
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
१ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला यमसदनाला पाठवले. मदन लाल धिंग्रा यांनी दावा केला की त्यांनी कर्झन-वायली यांची हत्या देशभक्तीपर कृत्य म्हणून केली होती आणि भारतातील ब्रिटीश सरकारने भारतीयांच्या अमानुष हत्येचा बदला घेतला होता. . On 1 July 1909, during a meeting of the Indian National Association at the Imperial Institute's Jahangir House, Madanlal Dhingra assassinated Curzon Wylie Madan Lal Dhingra claimed that he had murdered Curzon-Wyllie as a patriotic act and in revenge for the inhumane killings of Indians by the British Government in India.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
Фото недоступнеДивитись в Telegram
वर्तमान काळ कधीच कुणासाठी थांबून राहत नाही. काल याच वेळेला सगळे आपापला जीव मुठीत धरून सामना पाहत होते व प्रत्येक जण आपापल्या परीने देवाला साकडे घालत होता! कालचा दिवस आज भूतकाळ झाला!😔
Показати все...
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जन्म : २६ जून १८३८; - ८ एप्रिल १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. बंकिंमचंद्रचा मूळ पिंड लेखकाचा होता. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (इंग्रजी) (१८६४) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी. प्रकाशित साहित्य संपादन कादंबऱ्या संपादन दुर्गेशनंदिनी (१८६५) कपालकुंडला (१८६६) मृणालिनी (१८६९) विषवृक्ष (१८७३) इंदिरा युगलांगुरीय़ चंद्ररशेखर राधारानी आनंदमठ (१८८२) कृष्णकान्तेर उइल (१८७८) रजनी (१८७७) Rajmohan's Wife (इंग्रजी) राजसिंह (१८८२) देवी चौधुरानी (१८८४) सीताराम (१८८७) वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे. निबंध संपादन लोकरहस्य (१८७४) विज्ञान रहस्य (१८७५) कमलाकान्तेर दप्तर (१८७५) विविध समालोचना (१८७६) साम्य (१८७९) कृष्णचरित्र (१८८६) (संक्षिप्त स्वैर मराठी अनुवाद - चारुशीला धर) विविध प्रबंध (१ला खंड-१८८७, २रा खंड-१८९२) धर्मतत्त्व अनुशीलन (१८८८) श्रीमद्भगवद्गीता (१९०२) पत्रकारिता संपादन वंगदर्शन पत्रिका (१८७२-१८७६) योगदान संपादन देशभक्तीचा धर्म ही बंकिमचंद्रांच्या लिखाणाची प्रमुख कल्पना आहे असे श्रीअरविंद घोष यांनी म्हटले आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आणि देशभक्तीचा धर्म या दोन गोष्टी म्हणजे त्यांनी राष्ट्राला दिलेले योगदान आहे असे ते म्हणतात. बंकिमचंद्रांनी भारतीयांना भारताकडे माता या रूपात पाहण्याची दृष्टी दिली हे त्यांचे आणखी एक योगदान आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आणि म्हणून बंकिंमचंद्र हे नवभारताचे प्रेरणास्रोत आणि राजकीय गुरू आहेत, असे श्रीअरविंद म्हणतात. [१]
Показати все...
#Repost तो 'राजहंस' एक! असं म्हणतात की, गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक घरातील महिला आरशात स्वत:ला न्याहाळताना 'मी बालगंधर्वांसारखी दिसते का?' असं स्वत:लाच विचारत व गंधर्वांप्रमाणेच केशरचना, रंगभूषा व वस्त्रभूषा करून सभा-संमेलनांना जात. रुपवतींनाही हेवा वाटावा, असे मोहक रुप, आकर्षक स्मित व गोड गळा लाभलेले संगीत रंभूमीवरील विलक्षण व्यक्तिमत्व नारायणराव राजहंस उर्फ बाल गंधर्व यांचा आज स्मृतिदिन. आजच्या दिवशी १९६७ साली वयाच्या ७९व्या वर्षी वार्धक्यातील दीर्घ आजाराने बाल गंधर्वांचे निधन झाले. पृथ्वीवर इतका काळ वावरणारा 'गंधर्व' पुन्हा स्वर्गलोकी निघून गेला. मराठी सांस्कृतिक जीवनातील 'गंधर्व युग' संपले. त्याआधी व त्या नंतर मराठी रंगभूमीने अनेक गायक नट पाहिले. स्त्री भूमिका करणारे कसलेले अभिनेतेही अनुभवले पण बाल गंधर्व या नावाची सर कुणालाच आली नाही. ते जाऊन ४९ वर्षे लोटली, तरी त्यांचे गारुड कायम आहे. सांगलीतील पलुस गावी २६ जून १८८८ रोजी जन्मलेले नारायण श्रीपाद राजहंस पंडित बखलेंकडे गाणे शिकले. लहान वयातच त्यांची तयारी व गोड गळा पाहून लोकमान्य टिळकांनी त्यांचे वर्णन 'बाल गंधर्व' असे केले. तीच त्यांची ओळख बनली. किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ साली गंधर्वांची नाट्यकारकीर्द सुरू झाली. तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधन झाल्यानंतर संस्थेत वाद झाले. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. १९२१ मध्ये नारायणराव राजहंसांकडे कंपनीची पूर्ण मालकी आली. त्यावेळी कंपनी कर्जाचे बुडालेली होती. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते. नाटकातून पुरेशी कमाई होईना, तेव्हा नारायणरावांनी चित्रपटांतही भूमिका केल्या. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिका त्यांनीच केली. संगीत रंगभूमीला श्रीमंती मिळवून देण्यात बाल गंधर्वांचा वाटा मोठा आहे. संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार त्यांनी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. त्यांचे नाटक रात्री सुरू होई व पहाटेपर्यंत चालू राही, असे म्हणतात. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला सह त्यांनी एकूण २५ नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल मधील ‘शकुंतला’ व मानापमान मधील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. 'संगीत एकच प्याला' नाटकात त्यांनी १९५५मध्ये साकारलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. पण ती अजरामर ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. गोहरबाई कर्नाटकी यांच्याशी त्यांनी १९५१ मध्ये विवाह केला. गंधर्व नाटक कंपनीच्या पडत्या काळात त्या भूमिका करू लागल्या. नारायणरावांचे निधन झाल्यावर कंपनीची धुराही गोहरबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली. नाटक व कंपनी हेच बालगंधर्वांचे विश्व होते. त्या पलिकडे त्यांनी कधी पाहिलेच नाही. त्यामुळेच १९२९मध्ये त्यांनी ४२ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा अनेकांना आश्चर्यचकीत वाटले होते. माझ्या बालपणी मुंबईत दादरला एका कार्यक्रमात वृद्ध बाल गंधर्वांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता. ते तेव्हा गाण्याच्या स्थितीत मात्र नव्हते. थिएटरात जमलेल्या प्रेक्षकांना 'माय-बाप सरकार' अशी प्रेमार्द्र साद घालणाऱ्या या जगावेगळ्या कलावंतास लाख लाख प्रणाम ! व्हाट्सएप गृप शेअर वरून साभार
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
बाल गंधर्व
Показати все...
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.