Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 117
Підписники
-324 години
-47 днів
-3730 день
Архів дописів
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माझ्या लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा सन्मान निधी वितरणास सुरूवात, ३ दिवसांत थेट खात्यात जमा होणार.
#Maharashtra #LadkiBahinYojana
4 117
CMO Maharashtra Tweets:
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबईच्या आझाद मैदान येथे ‘महाराष्ट्र संस्कृती’ या उपक्रमांतर्गत सुमारे 2000 ड्रोनच्या साहाय्याने विशेष प्रकाशमय सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे विविध पैलू आकाशात प्रदर्शित करण्यात आले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sanskruti
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झालो. या बैठकीस मा केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, मा केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित होते. देशातील 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील तयारी व उपाययोजनांची माहिती दिली. जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची तयारी, केंद्र-राज्य समन्वय मजबूत ठेवणे आणि सामान्य नागरिकांवर कोणताही अतिरिक्त भार पडू न देणे, यावर बैठकीत महत्त्वपूर्ण दिशा ठरवण्यात आली. या बैठकीत सहभागी होत महाराष्ट्राच्यावतीने आमची भूमिका मांडली.
‘टीम इंडिया’च्या भावनेतून सातत्यपूर्ण समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि एकत्रित प्रतिसाद आवश्यक असल्याचे मा पंतप्रधान मोदीजी यांनी अधोरेखित केले.
या कठीण काळात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या सक्षम नेतृत्वाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अनेक देशांमध्ये निर्बंध, आपत्कालीन स्थिती आणि आर्थिक ताण वाढत असताना भारतात सामान्य परिस्थिती राखण्यात यश आले आहे.
इंधनावरील उत्पादन शुल्कात केलेली कपात ही सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. इतर देशांमध्ये 20-30% दरवाढ होत असताना केंद्र सरकारने हा भार स्वतः उचलत नागरिकांवर बोजा वाढू दिला नाही, याबद्दल मा. पंतप्रधान मोदीजी यांचे विशेष आभार मानतो. ‘राष्ट्र प्रथम, भारतीय प्रथम’ या तत्त्वाचा यामध्ये प्रत्यय येतो.
गेल्या 11 वर्षांत ऊर्जा स्त्रोतांचे विकेंद्रीकरण, 27 ऐवजी 41 देशांतून आयात, सौर ऊर्जा आणि ई-बसेस यांसारख्या उपक्रमांमुळे देश अधिक सक्षम झाला आहे. एलपीजी पुरवठा सुरळीत असून आत्मनिर्भर भारत अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
राज्यात खतांची पुरेशी उपलब्धता असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत. साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असून अॅग्रीस्टॅकद्वारे पारदर्शकता वाढवत आहोत.
पीएनजी विस्तारासाठी गती देत असून ‘Ease of Doing Business’च्या माध्यमातून प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर देत आहोत. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करत राज्याच्या हितासाठी समन्वित व जबाबदार कृती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
#Maharashtra
4 117
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Transforming Maharashtra into a Global Hub for Healthcare and Innovation
Chaired a roundtable meeting by USISPF at 'PULSE 2026' on the theme ‘Future Ready Healthcare and Skilling Ecosystem for India: Leveraging Technology and Government – Industry Collaborations.'
A comprehensive healthcare system from primary care to advanced services is operational across the state. To further strengthen and modernise this ecosystem, focused efforts are underway to leverage cutting-edge technology and innovation. The vision is to build a prosperous Maharashtra equipped with world-class healthcare facilities. Robust digital infrastructure is being developed across the healthcare sector, supported by progressive and enabling policies within the state. Expanding cancer detection and treatment facilities across Maharashtra remains a top priority. Every effort will be made to support research into affordable and effective care, ensuring no patient is left behind.
Maharashtra has established strong capabilities in Global Capability Centres across multiple sectors in the country. Building on this strength, focused efforts are now underway to develop Global Capability Centres in the pharmaceutical sector as well, further enhancing the state’s position as a hub of innovation and excellence.
In today’s fast-paced and demanding world, mental health has become critically important. Dedicated efforts are being made to expand and strengthen mental healthcare infrastructure across the state.
DCM Sunetratai Pawar, MoS Madhuritai Misal and other dignitaries were present.
#Maharashtra #RoundtableMeeting #Pulse2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037586346936840326?s=20
4 117
CMO Maharashtra Tweets:
आरोग्य, औषधनिर्माण क्षेत्रात मोठी झेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे ‘पल्स 2026’ येथे USISPF तर्फे आयोजित ‘फ्युचर रेडी हेल्थकेअर अँड स्किलिंग इकोसिस्टम फॉर इंडिया: लेव्हरेजिंग टेक्नॉलॉजी अँड गव्हर्नमेंट–इंडस्ट्री कोलॅबोरेशन्स’ या विषयावर राउंडटेबल बैठक पार पडली.
आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा असलेला संपन्न महाराष्ट्र निर्माण करण्याचा मानस असून, आरोग्य व औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांनी शासनासोबत भागीदारी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने देशात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरची क्षमता निर्माण केली आहे. आता औषधनिर्माण क्षेत्रातही अशा केंद्रांची उभारणी करण्यावर शासनाचा भर आहे. राज्यात मानसिक आरोग्याच्या उपचार सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औषधनिर्माण व आरोग्य क्षेत्रात आवश्यक असलेले संशोधन, कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारण्यासाठी अनुकूल धोरणे आखली जात आहेत. भविष्यातील आजारांच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जीवशास्त्रातील संशोधन वाढविणे आवश्यक असून, या क्षेत्रात प्रोत्साहन देत नवनवीन विषयांवर पीएचडी स्तरावरील संशोधनाला चालना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शासनाकडे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध आहे. हा डेटा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संलग्न करून आरोग्य क्षेत्रातील विविध समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करणे शक्य होणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत असून, उपचार सेवांचा विस्तारही केला जात आहे. कर्करोगावर प्रभावी आणि कमी खर्चिक उपचार पद्धती विकसित करणाऱ्या संशोधनासाठी राज्य शासन भरीव सहकार्य करेल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षणात नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होत असून, त्याचा प्रभावी वापर करून ‘युनिफाईड लर्निंग प्लॅटफॉर्म’ विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वेलनेस क्षेत्रात आपला ठसा उमटवत असून, राज्यात मेडिकल टुरिझम वाढत आहे. या क्षेत्रात गतीने पावले उचलली जात आहेत. वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील नवकल्पनांवर काम करण्यासाठी शासन कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास तयार आहे. औषधनिर्माण व आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #RoundtableMeeting #Pulse2026
