Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 130
Підписники
-224 години
-117 днів
-4030 день
Архів дописів
4 130
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, पुणे येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना कृतज्ञता पत्रांचे वितरण केले.
कृतज्ञता पत्र देण्यात आलेले मान्यवर :
✅ राजेश खत्री, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
✅ राजू शहाणी, बोर्ड चेयर, क्रिस्टल हाऊस इंडिया
✅ राजेश नायर, प्रेसिडंट एचआर, एमक्योर फार्मा
✅ स्वाती शालिग्राम, राज्य प्रमुख, सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय, एचडीएफसी बँक
✅ डॉ. संतोष भोसले, सीएसआर प्रतिनिधी, आय केयर फाऊडेशन
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule
4 130
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | दिल्ली
https://www.youtube.com/live/gm3fNDo5Pfg?si=9PfzHz9Nc_ZPzsd0
4 130
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | दिल्ली
https://www.youtube.com/live/gm3fNDo5Pfg?si=9PfzHz9Nc_ZPzsd0
4 130
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE |Female Officers| पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन | दिल्ली
https://www.youtube.com/live/gm3fNDo5Pfg?si=9PfzHz9Nc_ZPzsd0
4 130
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज खानवडी, पुणे येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 'महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र' या नवीन उपक्रमाचा शुभारंभ केला. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule
4 130
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले इनकी 200वीं जन्मशताब्दी के उपलक्ष्य में वर्षभर कार्यक्रम आयोजित करने का निर्णय लिया है।
(पुणे | 11-4-2026)
#Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule
4 130
CMO Maharashtra Tweets:
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मस्थळी खानवडी, पुणे येथे उभारलेली ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा आहे, या शाळेत अत्याधुनिक सुविधा, CBSE अभ्यासक्रम आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या स्मारकरुपी 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे'ची विस्तृत माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaJyotibaPhule
4 130
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव खानवडी, पुणे येथे 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळे'चे उदघाटन संपन्न झाले. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त उभारलेली ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत सामाजिक समता व सक्षमीकरणाला चालना देणार आहे.
शाळेची ठळक वैशिष्ट्ये :
✅ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित व शिक्षणप्रधान विचारांना साकार करणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम
✅ बालवाडी ते इयत्ता 12 वीपर्यंत CBSE अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रीडा सुविधा उपलब्ध
✅ सुमारे 12 एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पासाठी 2022 मध्ये शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेला आवश्यक शासकीय मान्यताही देण्यात आली आहे
✅2026-27 या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी ते इयत्ता 2 रीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून सध्या सुमारे 260 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे
✅ पुढील वर्षापासून इयत्ता 6 वीपासून निवासी शाळा व प्रारंभी 40 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा
✅ या प्रकल्पासाठी CSR अंतर्गत ₹21 कोटी, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद निधीतून ₹15 कोटी असा एकूण मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule
4 130
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज खानवडी येथे पुणे जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या 'पुणे जिल्हा परिषद : परिवर्तनाची वाटचाल' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
