Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 136
Підписники
-324 години
-127 днів
-4430 день
Архів дописів
4 136
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ‘नारी शक्ती वंदन मोर्चा’ समारोप कार्यक्रम
🕗 रा. ८.१२ वा. | २१-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #NariShaktiVandan #WomenEmpowerment
https://www.youtube.com/live/jIRifZK6wqo?si=HtupoE2lrlbjPtQJ
https://www.facebook.com/100044197187974/videos/943630488419772
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046600782477422877?s=20
4 136
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring Excellence, Driving Transformation!
Glad to attend the ‘Civil Services Day 2026 and Rajiv Gandhi Administrative Acceleration (PRAGATI) Mission and Competition 2024–25 Award Distribution’ ceremony in Mumbai today. Awarded the officials for their contribution in bringing transparency and dynamism to the administration and administrative work. Highlighted the invaluable contribution of the Iron Man of India and first Deputy Prime Minister of independent India, BharatRatna Sardar Vallabhbhai Patel, in preserving national unity and strengthening administrative services. MahaManav BharatRatna Dr. BabaSaheb Ambedkar further reinforced the same vision through the creation of the ‘All India Services,’ ensuring a strong federal structure and enduring administrative harmony.
Under the 100-day and 150-day programmes, a strong emphasis has been placed on enhancing administrative efficiency, with 85% of the targets successfully achieved. Through e-governance, several processes have been simplified to improve the ease of doing business. Aligned with the vision of ‘Viksit Maharashtra,’ a forward-looking roadmap has been charted across three key milestones: 2029, 2035, and 2047. For the 2029 phase, all departments have undertaken comprehensive reviews and completed thorough preparations to drive transformative progress.
Directed that every officer and employee in the administration adopt a ‘startup’ approach towards their work, encouraging innovation, efficiency, and speed. Such initiatives will enable the administration to move steadily towards the vision of ‘zero bureaucracy’.
Congratulations to all awardees whose innovation, intellect, and creativity are strengthening transparency, enhancing governance, and reinforcing a steadfast commitment to public service.
Minister Mangal Prabhat Lodha ji, senior officials and awardees were present.
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046596949785432540?s=20
4 136
CMO Maharashtra Tweets:
वारकऱ्यांच्या सोयीसाठी पालखी मार्गावरील सुविधा वाढविण्यावर भर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पालखी मार्गावरील विश्रामस्थळ सुविधेसंदर्भात बैठक पार पडली.
आषाढी वारी काळात निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत. वारकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी, तसेच पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकासकामांसाठी ₹1303 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ₹964 कोटी मंजूर झाले असून त्यातील ₹959 कोटी खर्च झाले आहेत. या आराखड्यांतर्गत दोन्ही पालखी मार्गातील पालखीतळांच्या ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी सेफ्टी टँक, कमानीचे बांधकाम करणे, जमीन सपाटीकरण करणे, हायमास्ट पोल उभारणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे आदी कामांपैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना हव्या असलेल्या इतर सुविधा करून द्याव्यात. पालखी तळावर कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची कामे करावीत. पालखी तळावर वारकऱ्यांसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त हँगरची व्यवस्था करावी आणि पालखी मार्गावरील महामार्गांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गांची कामे सुरू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Palkhi
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रशासनात पारदर्शकता व गतिशीलता आणण्यासाठी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार…
प्रशासन में पारदर्शिता और गतिशीलता लाने के लिए कार्य करने वाले अधिकारियों का सम्मान…
(नागरी सेवा दिन 2026 | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जे पात्र आहेत, त्यांना सेवा मिळाली पाहिजे अशाप्रकारचे 'झिरो ब्युरोक्रसी'चे मॉडेल विकसित होत आहे.
जो पात्र हैं, उन्हें सेवा मिलनी ही चाहिए, इस प्रकार का ‘जीरो ब्यूरोक्रेसी’ का मॉडल विकसित हो रहा है।
(नागरी सेवा दिन 2026 | मुंबई | 21-4-2026)
#Maharashtra #Mumbai #CivilServicesDay
4 136
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #WomenEmpowerment | ‘नारी शक्ती वंदन मोर्चा’ समारोप कार्यक्रम | मुंबई
https://www.youtube.com/live/jIRifZK6wqo?si=jkV4mrwRU3VZXXjg
4 136
CMO Maharashtra Tweets:
गतिमान प्रशासन, विकसित महाराष्ट्र!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे 'नागरी सेवा दिन 2026 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2025-26 पारितोषिक प्रदान समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करून प्रशासनातील कल्पकता व नव्या कल्पनांची अंमलबजावणी हीच भविष्यातील बदलाची दिशा ठरेल, असे सांगत सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज असून, सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय व मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झिरो ब्युरोक्रसी म्हणजे अधिकारी नसणे नव्हे, तर प्रक्रियांची पुनर्रचना (री-इंजिनिअरिंग) करून त्या अधिक सुलभ आणि पारदर्शक करणे होय. कोणत्याही व्यक्तीच्या पसंती-अपसंतीवर सेवा अवलंबून न राहता, पात्रतेनुसार सेवा मिळाली पाहिजे. शासनाने 100 दिवस आणि 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असून, त्यातील 85% उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश आले आहे. तसेच, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'विकसित महाराष्ट्र 2047'चा आराखडा मांडताना 2029, 2035 आणि 2047 हे तीन टप्पे निश्चित केल्याचे सांगितले. प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी 20 महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, 'आपले सरकार 2.0'च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कामाकडे 'स्टार्टअप'च्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नावीन्य, कार्यक्षमता आणि वेग यांचा संगम साधता येईल. अशा उपक्रमांमुळेच प्रशासन 'झिरो ब्युरोक्रसी'कडे वाटचाल करू शकते. असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ अधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CivilServicesDay
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
