Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 100
Підписники
Немає даних24 години
-57 днів
-1430 днів
Архів дописів
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुर्नवसनाच्या नावाखाली पालघर येथील हनुमाननगर आणि चंद्रनगरच्या नागरीकांना 50 वर्षांचा संघर्ष करावा लागला पण आज त्यांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस उजाडला.
पुनर्वसन के नाम पर पालघर के हनुमाननगर और चंद्रनगर के नागरिकों को 50 वर्षों तक संघर्ष करना पड़ा, लेकिन आज उनके जीवन में स्वर्णिम दिन आया है।
(सेवा संकल्प अभियान 2026 | पालघर | 9-10-2026)
#Maharashtra #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सेवा संकल्प अभियानाचा उद्देश समाजातील शेवटच्या घटकांचे प्रश्न सोडवून शासनाच्या योजनांद्वारे जीवनात बदल घडवणे हा आहे.
सेवा संकल्प अभियान का उद्देश्य समाज के अंतिम पायदान पर खड़े लोगों की समस्याओं का समाधान कर सरकारी योजनाओं के माध्यम से उनके जीवन में बदलाव लाना है।
(सेवा संकल्प अभियान 2026 | पालघर | 9-10-2026)
#Maharashtra #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे 'सेवा संकल्प अभियान 2026' अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व अनुदान वितरित केले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मध्ये पालघर जिल्ह्याला 60,479 घरकुलांचे लक्ष्य प्राप्त झाले असून, आजपर्यंत 30,999 घरकुले पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी 4 हप्त्यांमध्ये एकूण ₹1,20,000 अनुदान वितरित करण्यात येते.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी
✅ संगीता डगळा – ₹1,20,000
✅ वसंत खरपडे – ₹1,20,000
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालघर येथे स्वरा शैक्षणिक संस्था यांच्या वतीने तुषार संखे, मुकेश पाटील, विवेक वडे, महेंद्र भोईर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे 'सेवा संकल्प अभियान 2026' अंतर्गत वनपट्टेधारकांना वनपट्ट्यांच्या डिजिटल नकाशांचे वाटप केले.
पूर्वी वनपट्टेधारकांना साध्या स्वरूपातील नकाशे उपलब्ध करून दिले जात होते. आता MRSAC इमेजेसच्या आधारे डिजिटल स्वरूपातील नकाशे उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे वनपट्ट्यांच्या क्षेत्रांची निश्चिती अधिक सुस्पष्टपणे होत आहे.
MRSAC च्या माध्यमातून तयार केलेल्या वनपट्ट्यांच्या डिजिटल नकाशांचे लाभार्थी
✅ महादु पालवा, नानिवली
✅ दिनेश कामडी, आकोली
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत वनपट्ट्यांचे लाभार्थ्यांना वितरण केले.
2005 पूर्वीच्या वनहक्क पट्ट्यांसाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याने योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असलेल्या वनहक्कधारकांना दिलासा मिळाला आहे. एमआरएसएसी, नागपूर यांच्या माध्यमातून 2005 पूर्वीची सॅटेलाइट छायाचित्रे उपलब्ध झाल्याने पालघर जिल्ह्यातील 1000 हून अधिक लाभार्थ्यांचे वनहक्क दावे मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. याचा प्रामुख्याने आदिवासी बांधवांना लाभ होत आहे.
लाभार्थी :-
✅ रेखा दुमाडा
✅ दत्ता कामडी
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत 7 ई /12 ई च्या लाभांचे लाभार्थ्यांना वितरण केले.
शासन निर्णय दिनांक 10 जुलै 2026 नुसार, वनहक्क पट्टेधारकांच्या नोंदी अधिकार अभिलेखात स्वतंत्रपणे करण्यासाठी गाव नमुना 7 ई आणि 12 ई सुरू करण्यात आले आहेत. यामुळे वनहक्क पट्टेधारकांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
7 ई /12 ई चे लाभार्थी :-
✅ अशोक दळवी
✅ बेबी सुमडा
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत सूर्या प्रकल्पांतर्गत हनुमान नगर, पालघर येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना शासन निर्णयांचे हस्तांतरण केले.
पुनर्वसनाअंतर्गत वाटप केलेल्या शेतजमिनींचे सातबारे सद्यस्थितीतील वहिवाटीनुसार अचूक व निर्दोष तयार करण्याच्या प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, यासंदर्भात 29 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
शासन निर्णयांचे हस्तांतरण करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्ती : -
✅ गुलाब खरपडे
✅ प्रदीप रिंजड
✅ विश्राम चौधरी
✅ नंदिनी अंधेर
#Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan
