Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 118
Підписники
-224 години
-87 днів
-3330 день
Архів дописів
4 118
CMO Maharashtra Tweets:
सशक्त पोलीस, सुरक्षित भारत: कर्तव्य, तंत्रज्ञान आणि सेवा यांचा संगम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते '69 वे ऑल इंडिया पोलीस ड्यूटी मीट 2025-2026 चे' उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहे.
भारतातील केंद्रीय व राज्य पोलीस दलांचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करत, विविध आव्हानांवर मात करत पोलिसांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात तीन महत्त्वपूर्ण कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता अंमलात आणण्यात आले असून, या कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहे.
वाढत्या टेक्नॉलॉजीने जसे सर्वसामान्यांचे जीवन बदलले आहे, तसेच ते गुन्हेगारांचेही बदलेले आहे. गुन्हेगारी आता 'स्ट्रीट क्राईम'पासून 'व्हाईट कॉलर क्राईम' आणि 'सायबर क्राईम' पर्यंत पोहोचली आहे. सायबर क्राईमपासून ते डिजिटल अरेस्टपर्यंतसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. सायबर आधारित गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना शासन होताना पाहायला मिळत आहे, ही बाब अत्यंत सुखावणारी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सक्षम पोलीस दलांपैकी एक असून, सायबर गुन्ह्यांच्या उकल करण्यातही महाराष्ट्र पोलीस दल आघाडीवर आहे. तसेच, अत्याधुनिक सायबर लॅब आणि एआय आधारित प्रणाली विकसित करून महाराष्ट्र देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #PoliceDutyMeet
4 118
🪷 CM Devendra Fadnavis at 'BJP Pandit Deendayal Upadhyaya Prashikshan MahaAbhiyan 2026: Mandal Stariya Karyashala South-West Constituency, Nagpur'.
Local BJP office bearers and karyakartas were present.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भाजपा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 : मंडळस्तरीय कार्यशाळा दक्षिण-पश्चिम मतदार संघ, नागपूर' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळेस स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'भाजपा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 : मंडल स्तरीय कार्यशाला दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र, नागपुर' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर स्थानीय भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे।
🕞 3.35pm | 29-3-2026📍Nagpur | दु. ३.३५ वा. | २९-३-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #BJP
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नूतनीकृत 'सिंथेटिक ट्रॅक'च्या कोनशिलेचे अनावरण केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #PoliceDutyMeet
